या आधीचे लेखः
साकिया - पुर्वतयारी
==========================================================
स्ट्रॉबेरी मार्गारिटा
हे कॉकटेल मी आमच्या बे एरियाच्या मागच्या कट्ट्याला (अट्टाकट्टा) केले होते.
साहित्य:
- १/२ औंस ट्रिपल-सेक (
Tripple Sec)
- १ औंस टकिला (
Tequila)
- १ औंस लिंबाचा रस
- ४ स्ट्रॉबेरीज
- १/२ औंस डाळींबाचा रस
- मीठ
- बर्फ
 |
मार्गारिटा ग्लास (आंतरजालावरून साभार)
कृती:
मिक्सर मध्ये १/२ भांडे भरून बर्फ घ्या त्यात लिंबाचा रस, ट्रिपल-सेक, टकिला आणि २-३ स्ट्राबेरीज टाका. चांगले एकजीव होई पर्यंत मिक्सर्मध्ये घुसळा. उरलेले लिंबू रिकाम्या कॉकटेल ग्लासच्या कडेला चोळा आणि एक बशीत मीठ पसरून त्यात ग्लास उपडा करा. आता ग्लासच्या कडेला मीठाचे फ्रॉस्टींग होईल. त्यात मिक्सरमध्ये तयार झालेली मार्गारीटा ओता. त्यात अलगदपणे डाळींबचा रस टाका. एक स्ट्रॉबेरी अर्धी कापून त्याला थोडी खाच पाडा आणि ग्लासच्या कडेला सजावटीसाठी लावा.
मार्गारिटा तयार आहे, सर्व करा. (किंवा स्वतःच पिऊन टाका ;-) )
यात जर टकिला आणि ट्रिपल-सेक नाही टाकले तर नॉन-अल्कोहोलिक मार्गारिटा बनेल. फक्त लिंबाच्या रसाचे प्रमाण दुप्पट करा.
डिस्क्लेमरः
१. सूरापानासाठी किमान २१ (की १८?) वर्षे वय असणे गरजेचे आहे अथवा हे कायदे प्रत्येक देश/राज्यावर अवलंबून आहेत.
२. अल्कोहोलचे सेवन आपापल्या जबाबदारीवर करावे.
धन्यवाद...
- नाटक्या
गुरुदेव आ
In reply to गुरुदेव आ by परिकथेतील राजकुमार
मद्यानंदी टाळी...
क्या बात है !!
आहा रे
बेष्ट!!!
जाहिद
टल्लि हुआ टल्ली हुआ
आहाहा!
माहिती
In reply to माहिती by मीनल
पटेल मध्ये
In reply to माहिती by मीनल
वाईन!
In reply to वाईन! by पिवळा डांबिस
अरे डांबिस
मजा आली . ..
लै बेष्ट !!!
मस्त!
In reply to मस्त! by रेवा
मस्तच
In reply to मस्तच by दशानन
राजे पे
In reply to मस्त! by रेवा
क्या बात है!!
नाटक्याभौ!!
नमन सुरू आहे..
In reply to नमन सुरू आहे.. by नाटक्या
वाइन
मस्तच!