उर्वरित जीवनसत्वे व लेखमालेचा समारोप
या लेखमालेत आतापर्यंत आपण ६ जीवनसत्वांचा स्वतंत्र लेखांतून आढावा घेतला. उरलेल्यांपैकी काहींचा धावता आढावा या लेखात घेत आहे. या सर्वांना एका लेखात कोंबले आहे म्हणून त्यांना ‘चिल्लीपिल्ली’ समजू नये ! आरोग्यदृष्ट्या ती सर्वच महत्वाची आहेत. फक्त त्या प्रत्येकावर स्वतंत्र लेख लिहीण्याइतका मजकूर नाही.
K जीवनसत्व :
जीवनसत्वांची ऐतिहासिक नावे इंग्रजी वर्णमालेनुसार A ते E अशी दिलेली होती. जेव्हा या नव्या जीवनसत्वाचा शोध लागला, तेव्हा वर्णमालेचा क्रम बिघडवून संशोधकांनी एकदम Kवर का उडी मारली असावी याचे वाचकांस कुतूहल वाटेल. Kचे शरीरातील कार्य जखमेनंतर आपले रक्त गोठण्याच्या( coagulation) संदर्भात आहे. त्याचा जेव्हा शोध लागला तेव्हा तो प्रथम एका जर्मन नियतकालिकात प्रसिद्ध झाला. त्या भाषेत coagulation हा शब्द Koagulations असा लिहीला जातो. त्यामुळे त्याला K हे लघुनाम मिळाले. Quinone हे त्याचे अधिकृत नाव.
K आपल्याला पालेभाज्या आणि नेहमीच्या तेलांतून सहज मिळते. तसेच आपल्या मोठ्या आतड्यांतील उपयुक्त जीवाणूही ते तयार करतात. त्यामुळे सहसा त्याचा अभाव दिसून येत नाही. काही नवजात बालकांत अभाव होऊ शकतो आणि त्यांना रक्तस्त्राव होतो. प्रौढांमध्ये जर काही आजारांत काही antibiotics तोंडातून दीर्घकाळ दिली गेली तर त्यामुळे आपल्या आतड्यातले उपयुक्त जीवाणू मरतात. त्यातून K चे अंतर्गत उत्पादन कमी होते.
उर्वरित ‘ब’ जीवनसत्वे :
सर्व ‘ब’ जीवनसत्वांचा एक गट करण्यामागे कारण आहे. सहसा ती विविध आहारस्त्रोतांत एकत्रित आढळतात. साधारणपणे जेव्हा ‘ब’चा अभाव होतो तेव्हा तो एकापेक्षा जास्त जीवनसत्वांचा मिळून असतो. तरीसुद्धा या गटातील काही विशिष्ट घटकांच्या अभावाने स्वतंत्र आजार होऊ शकतात.
यांतील ब- २,३,६ व ९ यांचा थोडक्यात आढावा घेतो.
ब-२ (Riboflavin):
हे मुख्यतः पेशींत ऊर्जानिर्मितीचे गतिवर्धक म्हणून काम करते. त्याचा अभाव समाजात बऱ्यापैकी दिसतो. त्याने तोंडाचा दाह (“तोंड येणे”) होतो. हा दाह मुख्यतः ओठांच्या कोपऱ्यात (angles) दिसतो. तसेच त्वचेचाही दाह होतो. चित्र पाहा:
ब-३ (Niacin):
याचे कार्यही ब-२ प्रमाणेच. ते आपल्या शरीरात एका अमिनो आम्लापासून तयार होते पण तेवढे पुरेसे नसल्याने आहारातूनही आवश्यक. त्याच्या अभावाचे तीन परिणाम असे:
१. त्वचेचा दाह : याचे वैशिष्ट्य म्हणजे तो शरीराच्या कपडे न घातलेल्या भागांवर होतो. साधारण तो दोन्ही हात व मानेचा उघडा भाग इथे दिसतो.
२. जुलाब होणे
३. मानसिक ऱ्हास
या आजाराला Pellagra (= शुष्क त्वचा ) असे म्हणतात. चित्र पाहा :
ब-६ (Pyridoxine) : हे ऊर्जानिर्मिती आणि अमिनो आम्लांचा चयायपचय यांत महत्वाची भूमिका निभावते. निव्वळ त्याच्या एकट्याचा अभाव सहसा दिसत नाही.
ब-९ (Folic acid) :
हे जीवनसत्व ब-१२ च्या जोडीने DNAच्या निर्मितीत योगदान देते. किंबहुना ही दोन्ही जीवनसत्वे जोडीने काम करतात. हिरव्या पालेभाज्यांच्या मोठ्या पानांमध्ये (foliage) हे विपुल प्रमाणात आढळते. त्यामुळेच त्याला folic असे नाव मिळाले.
गर्भवती स्त्रियांत याची गरज नेहमीपेक्षा दुप्पट असते. या अवस्थेतील त्याच्या अभावाने गर्भावर विपरीत परिणाम होऊ शकतात. म्हणून सर्व गर्भवतीना folic a च्या गोळ्या नियमित दिल्या जातात.
ब-९ च्या अभावाने रक्तन्यूनता होते आणि ती ब-१२ च्या अभावासारखीच असते. त्याच्या अभावातून मोठ्या आतड्यांचा कर्करोग बळावू शकतो असे अलीकडील संशोधनातून वाटते आहे.
‘ब’ गटातील राहिलेली दोन जीवनसत्वे म्हणजे Biotin व Pantothenic acid. ऊर्जानिर्मितीत काम करणाऱ्या अन्य ‘ब’ ना ती साथ देतात एवढी माहिती पुरे.
‘ब’ कुटुंबात एकूण ८ घटक आहेत परंतु त्यांचे क्रमांक मात्र १ ते १२ असे दिलेले आहेत. या क्रमांकांपैकी ४,८,१० व ११ हे क्रमांक कोणालाच दिलेले नाहीत याची नोंद घ्यावी. किंबहुना अशा ऐतिहासिक आकडेवारीपेक्षा प्रत्येक जीवनसत्व हे त्याच्या अधिकृत रासायनिक नावाने ओळखले जावे.
* * *
तर अशी ही १३ जीवनसत्वे. मुळात ती आपल्यासाठी आवश्यक अशी सूक्ष्म पोषणद्रव्ये आहेत. जरी ती आहारात खूप कमी प्रमाणात लागत असली तरी शरीरातील त्यांचे कार्य अत्यंत महत्वाचे आहे. मूलभूत चयापचय, शरीर-बळकटी, प्रतिकारशक्ती आणि काही महत्वाच्या इंद्रियांचे संरक्षण अशी अनेकविध कामे ती करतात. ही मूलभूत माहिती सर्वांना व्हावी या उद्देशाने ही लेखमाला आपल्यापुढे सादर केली. ती उपयुक्त वाटली असेल अशी आशा आहे.
सरतेशेवटी या लेखमालेतील वाचकांच्या सहभागाबद्दल थोडे विवेचन. नियमित वाचकांना ती आवडली आणि त्यांनी पूरक माहितीची भर घालून छान चर्चा केली. ‘क’,’ड’ आणि ब-१२ च्या चर्चा विशेष रंगल्या. ‘क’ च्या संदर्भात वाचकांचे विविध आंबट फळांबाबतचे कुतूहल दिसून आले. एकूणच फळांच्या राज्यातील ती सफर रंजक ठरली. तर ‘ड’च्या चर्चेत बऱ्याच जणांनी वैयक्तिक हाडांच्या आजारांबद्दल शंका विचारल्या. एकंदरीत समाजात वयाच्या पन्नाशीनंतर कमकुवत हाडांच्या समस्या वाढत चालल्याचे त्यातून ध्वनित होते.
ब-१२ च्या स्त्रोतांमध्ये शाकाहार/मांसाहार हा सनातन काथ्याकुटाचा विषय असल्याने इथला वाचकांचा अधिक सहभाग स्वाभाविक असतो. ब-१ हे मात्र चर्चेसाठी उपेक्षित झाल्याचे दिसले. वास्तविक शरीराच्या ऊर्जानिर्मितीत ते अत्यंत महत्वाची भूमिका बजावते. त्यादृष्टीने त्यावर स्वतंत्र लेख लिहीला होता.
‘अ’ हे डोळ्यांच्या संदर्भातले मौल्यवान जीवनसत्व. त्याची चर्चा समाधानकारक झाली तरीही ती ‘क’ व ‘ड’ इतकी रंगली नाही. किंबहुना मी ते लेखमालेत उशीरा घेतल्यानेही तसे झाले असावे.
असो.
पुनश्च एकवार सर्व मिपाकर, सा.संपादक आणि प्रशासक यांचे मनापासून आभार !
***********************************************
सर्व चित्रे जालावरुन साभार !

वर्गीकरण
अनुक्रमणिकेबाबत
साध्या सोप्या भाषेत पण
अभ्या ....
हि लेखमालिका सुद्धा खूपच
उत्तम लेखमाला. धन्यवाद..
उत्तम माहितीपूर्ण लेखमाला ,
एक माहितीपूर्ण आणि अत्यंत
प्रत्येक गोष्टीला ....
वरील सर्व नियमित वाचक
@ कुमार१,
मार्मिक शेरा !
अत्यंत माहितीपूर्ण लेखमाला
ही
अत्यंत उपयोगी माहिती
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार
आभार!
लई भारी
लेखमाला आवडली!
लेखमाला आवडली. एक शंका..
चांगला प्रश्न.
माहितीपूर्ण लेखमाला
डॉ. के. गोपालन : निधन
वाचनात आले नव्हते.
@ जा लो,
उत्कृष्ट लेखमाला
...
मी त्रस्त ...
चौरा,
फेकाफेकी