साक्षीदेवा,
फोटू बाकी सुरेखच काढले आहेस..
आपण तुझ्या फोटुग्राफीला नेहमीच दाद देऊन राहिलेलो आहोत, तशीच आत्ताही देतो..
तुला फोटूग्राफीची प्रचंड आवड आहे हे आम्हाला ठाऊक आहे. म्हणूनच तू काढलेल्या काही उत्कृष्ट फोटुंपैकी काही फोटू तू मिपावर द्यावेस असे वाटते!
अवांतर - आम्ही 'त्या तिथे पलिकडे, तिकडे...' कार्यरत असताना आपलं ठाण्यात एक संमेलन झालं होतं तेव्हा तू काढलेल्या फोटुंचं एक छोटेखानी प्रदर्शन आपण भरवलं होतं तेही फारच सुरेख होतं!
तुझा,
(गाववाला) तात्या.
कुठूनही बघितला तरी मनात हुरहुर उत्पन्न करतो, अगदी काँक्रीटच्या जंगलातही! हे ह्या प्रकाशचित्रात अगदी प्रकर्षाने जाणवते आहे.
साक्षीदेवा, फारच छान!
अजूनही येऊदेत.
चतुरंग
झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा! तो उघडे
तरु शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे उन पडे
उठती वरतीं जलदांवरतीं अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखले सुंदरतेचे रूप महा
अश्या अनेक ओळी एकेका प्रकाशचित्रागणिक आठवत होत्या. अत्यंत नेटकी चित्रं खूप छान
-ऋषिकेश
ह्याला आमच्या कट्ट्यावरच्या भाषेत "फोटो "वेssड" आलेयत " अस॑ म्हणतात.
साक्षीराव, बाकी तुमचा तिसरा डोळा एकदम जबरा दिसतोय हा॑! काय सह्ही फ्रेम्स पकडल्या आहेत. ऍ॑गल पण खासच. आकाश फाडायला निघालेल्या इमारती, त्यातले तुरळक एखाद-दुसर्या खिडकीतले मिणमिणते दिवे अन् ह्या सगळ्या॑च्या वर "डॉमिनेटि॑ग" पिवळे-नारि॑गी सुर्यदेव !!! लाईट आणि कलर इफेक्टस् पण एकदम कल्ला !
आपला
-फोटुयेडा ध मा ल.
धनंजयचे तांत्रिक मत, ऋषिकेशची कविता
अस्ताचलीचा सूर्य आणि सांजवेळेची हुरहुर ... अगदी चतुरंगांसारखेच.
हे स्वातीचे शब्द.
माझे शब्द खुंटले.
अशीच छायाचित्रे अजून येऊ द्यात. मि.पा. वर रसिकांचा तोटा नाही.
ऋषिकेशची कविता
मी इथे नमुद करु इच्छितो ह्या सुंदर ओळी माझ्या नाहित. सुप्रसिद्ध "श्रावणमास" या कवितेतील या ओळी आहेत. मी हे ओळी लिहितानाच नमुद करायला हवं होतं. ह्या ओळी माझ्या आहेत असं वाटले असल्यास क्षमस्व!
ही सुंदर चित्रे बघताना ह्या ओळी आठवल्या इतकेच :)
-ऋषिकेश
प्रतिक्रिया
साक्षीदेवा,
झकास
काय लेन्स आहे!
अचूक अंदाज!
अस्ताचलाला जाणारा सूर्य
सुंदर
सह्हि आहेत..
क्लास!!
व्वा...... झक्कास......
अप्रतिम....
धन्यवाद
प्र का टा आ
माझे शब्दच अपुरे .......
धन्यवाद पण
वा!