आपण मुर्खात मोडतो का शहाण्यात ?
- Read more about आपण मुर्खात मोडतो का शहाण्यात ?
- 10 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
दुर्दैवाने मला हा लेख परत एकदा प्रकाशीत करावा लागत आहे. म्ह्नजे तो आत्त मिपा वर आहे असे नाही कारण मी तो काढला होता पण तो एवढ्या लवकर परत टाकावा लागेल असे वाटले नव्हते. त्याच बरोबर दुसरा पण टाकत आहे.
"
"जो आपल्या चमत्कारांचे विश्लेषण करु देत नाही तो पक्का बदमाश असतो. जो चमत्कारांचे विश्लेषण करायला घाबरतो, तो फसवणुकीला बळी पडतो.
"
"जो आपल्या चमत्कारांचे विश्लेषण करु देत नाही तो पक्का बदमाश असतो. जो चमत्कारांचे विश्लेषण करायला घाबरतो, तो फसवणुकीला बळी पडतो.धक धक करने लगा...
- Read more about धक धक करने लगा...
- 4 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
कधी कधी आमच्या काळजात कळ निघाली की आमचे दिल धकधक करु लागते. हा अनुभव प्रत्येकाने एक दोनदा तरी घेतलेला असावा. छातीत धडधड वाढली की कोठेतरी काहीतरी पडझड झालीय याचा अंदाज बांधता येतो. कधी ती कौटुंबिक कलहाची खडखड असते तर कधी मनोभावे पाहिलेल्या नजरतीराने उडालेली गडबड असू शकते. फाटलेले शिवण्याची धडपडदेखील कट्यार काळजात रोवून जाते. एकूणच ही काळजातली धडधड काळजी करायला लावणारी.
दुबई ला जाताय..जरा जपून
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about दुबई ला जाताय..जरा जपून
- 9 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
काल एक ढकलपत्रातून अस कळल की कोणाच्या तरि मित्राला खसखस बाळगल्या बद्दल दुबई मध्ये २० वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली.
लहानपणी आम्ही चार आण्याची खसखस...................फसफस...अस काहितरी गाण म्हणायचो. खसखस अनारश्यात खाल्ल्याचे आठवते. म्हणजे आता दिवाळी ला फराळ करुन प्रवास केला तर तुरुंगाची हवा खावी लागेल. ही बातमी बघा http://www.boddunan.com/forums/11-general-discussions/70531-a-very-very-serious-warning-to-those-going-to-uae-and-gulf-countries.html
थोड गुगल करुन पाहील, बातमी मध्ये तथ्य आहे असे वाटते. http://news.bbc.co.uk/2/hi/uk_news/7234786.stm . बहुतेक ढकलपत्र जुनं असाव.
तू तर नागीण!
- Read more about तू तर नागीण!
- 2 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
"तू तर एक जातिवंत नागीण निघालीस. मला तुझा सर्पस्वभाव नव्याने कळला..
काल तुझी माझी भेट झाली, कदाचित शेवटचीच. या आधीही आपण भेटलोच की. पण कालची भेट बहुदा अखेरचीच ठरणार होती तर..
तत्पूर्वी व्हायचं असं की, तू माझ्या अंगणात यायचीस. मनमोहकशा सळसळत्या मदमस्त चालीत. कधी अवचित, तर कधी ठरवून. त्या तुझ्या नव्या नव्हाळीच्या सावळ्या रुपावर, मनोवेधक गोड शब्दांनी लपलपणाऱ्या जिव्हेच्या करामतीवर मी पटकन भाळलो. तुझी आकर्षक बांधणी, मुळचीच तंग धाटणी अन् अंगाची आकर्षक वेढणी मला वेडावून जायची. वाटायचं चला आपणही आता कात टाकावी, तुझ्या निकट जावं, सळसळावं, खेळावं.
निद्रेची चिरफाड
- Read more about निद्रेची चिरफाड
- 17 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
निद्रादेवीची कुंडली मांडून तिला समजून घेणं फारसं अवघड नाहिये. ती आपल्यावर का बरे रुसलीये याचीही उत्तरे मग शोधता येतात. पूर्वीची माणसं उशाला दगड घेऊनही प्रगाढ झोपत असत असे म्हणतात. याउलट आजच्या सिमेंटच्या जंगलात दगड सापडणे दुरापास्त झाल्यामुळे की काय कोण जाणे, माणसांना मऊ उशा अंगाखाली घेऊनही 'म्हणावी तशी' झोप लागत नसते. किंबहुना अशी तक्रार नेहमी कानावर येते. त्यामुळेच निद्रेची चिरफाड करण्याचे योजिले आहे.
तर ती निद्रादेवी एकटी नसून त्या दोन जुळ्या बहिणी असतात. भिन्न स्वभावाच्या, विरोधी आचरणाच्या. रात्रभर त्या फेर धरुन कधी झिम्मा, कधी लपाछपी तर कधी खोखो खेळतात.
मैसूर
नको ते सल्ले हवेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about नको ते सल्ले हवेत.
- 8 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
नमस्कार्,नमस्कार...........
माझ्या लेखांची काही दीवसांपासुन फार चिरफाड होत आहे.५ फुटात पोहणारे,पकवे हॅकर,पकाउ विडंबन करणारे काही लोक कारणीभुत आहेत,त्यांना एकच सांगेन की हा विरोध म्हणजे आमच्या प्रगतीच्या मार्गातील अपेक्षित अडथळे आहेत.महात्मा फुलेंना दगडे मारणारे होतेच की.
असो,तर आज आम्ही काहीतरी (नेहमीसारखेच) क्रांतीकारक्,मार्गदर्शनपर लिहणार आहोत..
मला एक scrap आला,मी तीन-चार महीन्यांपुर्वी जो एक प्रतिसद पाठवला होता,त्याचे उत्तर होते ते.त्यात मी तुला contact वगैरे सारखे फालतु लिहले होते.मला ती व्यक्ती लगेच contact करेल अस काहीतरी करायचे आहे.
ती व्यक्ती आमची लहनपणीची मैत्रीण.कुठे,कस ते लिहले त
आपले आवडते वुत्तपत्र व काही सुझाव.
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about आपले आवडते वुत्तपत्र व काही सुझाव.
- 18 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
सुझाव???????
असो...नमस्कार्,नमस्कार.......
आम्ही आजच पेपरवाल्या अण्णाला 'कल से ये न्युजपेपर बंद करना है" अस सांगितल.त्याने "ठीक है,फीर कोनसा पेपर लोगे?' हा अपेक्षित प्रश्न विचारला.
मी विचार तर नव्हता केला म्हणून "बाद मे बताता हुं,१५ तारीख तक यही पेपर देना" अस सांगितल.
तर मला एक मराठी व एक ईंग्लिश असे दोन पेपर रोजच्या वाचनात आणायचे आहेत.बाहेर जाउन DNA,Mumbai-Mirror व Mid-Day आणला,त्यात ,Mumbai-Mirror आवडला पण फार मर्यादीत असतो.बाकी काही लिखाण छान होतं.आपण कोणता ईंग्रजी पेपर सुचवाल?तो आपल्याला का आवडतो हेही सांगा.पेपरात नोकरी(आम्हाला हाय बर्का!)),शिक्षण व विज्ञान ह्या विषयावर अलग विभाग असावा ह