मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुक्त कविता

खडक

gsjendra ·
लेखनविषय:
काव्यरस
खडकात काही मोहवणारं ? कदापि नाही खडकात काही लूभावणारं ? मूळीच नाही खडक राकट काळा कभिन्न काष्ठ कठोर पण खडकातलं पाणी असतं गोड खडकातलं पाणी असतं कायम काही माणसं अशीच असतात खडकासारखी

जोडी

मयुरMK ·
लेखनविषय:
काव्यरस
सांगू का ? मी कसा अन तू कशी ? तुटता निद्राबंधन करिता मुखमंजन ब्रश मी अन पेस्ट तू शुभ्रशी- सका-सकाळी चहाच्या वेळी कप मी अन तू बशी !- करावया ईशचिंतन धूप मी, तू निरंजन तैसेचि टाळ मी, घंटी तू मधूरशी!- नळाभोवती भाजन जमती तिथे हंडा मी अन तू कळशी !- भोजन पंगती आपण संगती वाटी तू या ताटापाशी !- होता उदरभरती चढली सुस्ती तक्क्या तिथे मी अन तू उशी !- उद्यानी त्या सायंकाळी रमणीय स्थळी भ्रमर मी, तू कळी इवलीशी !

झाडांच्या सावलीत, राणीच्या बागेत, ... ... येताय ना ? ;)

माहितगार ·
प्रेरना माननीय प्रेषक, कंजूस, यांची नैसर्गीकपणे मोकळी-चाकळी माफी मागून :) मिपाकरांच्या सेवेत सादर ... झाडांच्या सावलीत राणीच्या बागेत ने-चर वॉक श्रवणोत्सुक नेत्र वेगळ्या कोनातून मनोरा पाहणारे Appreciation टॉक चिंचेची अन चिनाराची झाडे कुट-कुटली, पुर्व-पश्चिम दक्षीण-उत्तर, गाभुळलेले, हिरवे चढ उतार झेलत हळूवार-मौन कधी जोरदार वाहत्या वार्‍यासंगे बोलके तुषार वळणे डौलदार नजाकत लवलव गवताची पाती झुलता झंकार फुलपाखरे किती चमकदार पक्षीगाती मंजुळ मनाचे तराणे कळ्या फुलतात हळूवार प्रतिक्षा त्या खास किटकांची फुलांचे परागीभवन फळांच्या आशा कधी निराशा

माझी मस्तानी

सौन्दर्य ·
लेखनविषय:
‘बाजीराव-मस्तानी’ सिनेमा पाहताना ही मुसमुसत होती, मस्तानी जगताना. ठरवले ह्याच क्षणी सांगावे हिला मनोगत सहज पूर्ण होईल जीवनाचे मनोरथ. “मी पण आणू म्हणतो मस्तानी आपल्या आयुष्यात” फक्त पुढचे काही क्षण गेले मौनात, मा‍झ्या जीवनात. डोळे बरसू लागले तोफ गोळे आणि जिव्हा, तप्त लाव्हा ‘मुलुख मैदानी’च्या वर्षावात सर्व झाले स्वाहा. बाळगा जरा मनाची, असलं काही बोलायला, पोरीचे हात पिवळे करायचे, तर निघाले तोंड काळे करायला.

वीट....(ती - त्याला)

अविनाश लोंढे. ·
लेखनविषय:
काव्यरस
वीट आलाय , तुझ्या त्या जुण्या प्रेमाचा , त्या कचऱ्याचा , तू मला सोडण्याचा , वीट आलाय , तुझ्या त्या जुण्या प्रेमाचा , पर्वा न करता तोडलेल्या वचनांचा वीट आलाय , तुझ्या त्या जुण्या प्रेमाचा , प्रेमाविना तुझ्या लालासलेल्या शरीराचा वीट आलाय , तुझ्या त्या जुण्या प्रेमाचा , तू तोडलेल्या तुझ्या बोलांचा , रागाचा घेऊन जा , तुझी हरएक चिज़, घेऊन जा , दिलेल प्रेमाच बीज.... कस विसरू तुझ ,लाख वेळाच झूट, कितीदा न कशी देऊ पून्हा तीच ती सूट …। काळजाच्या माझ केलस तू तुकड , श्वासालाही माझ्या आत्ता हवेचे वाकड ….

गॅलरीतला [ चौथा ] पालापाचोळा

शिव कन्या ·
मनाला गॅलरी आपली आपली गॅलरीतले आपण, आपले आपले. गुलाब काढा, मोगरा लावा मोगरा काढा, मरवा लावा, मरवा काढा, सुगंध ठेवा मनाला गॅलरी आपली आपली गॅलरीतला सुगंध आपला आपला. खुर्ची काढा, झोपाळा लावा, झोपाळा काढा, चटई टाका, चटई काढा, मोकळीच ठेवा मनाला गॅलरी आपली आपली गॅलरीतली स्पेस आपली आपली. काचा काढा, गज लावा गज काढा, पडदे लावा, पडदे काढा, उघडीच ठेवा मनाला गॅलरी आपली आपली गॅलरीतला प्रकाश आपला आपला. असणे नको, नसणे नको, आता कुठला ध्यास नको, कुठे फुलला, कुठे अडकला, असला मिळमिळ श्वास नको, मनाला गॅलरी आपली आपली गॅलरीतला श्वास आपला आपला.

हवाबाणहरडेचघळ

ज्ञानोबाचे पैजार ·
पेरणेमधल्या हळूवार भावना या कवितेतही जपायचा प्रयत्न केला गेल्या आहे. तरी सुध्दा अतिसंवेदनाशील वाचकांनी कृपया खालील काव्य वाचू नये. होणार्‍या परीणामास मंडळ जबाबदार रहाणार नाही.

अँड व्हॉट दे सेड ? हॅप्पी न्यू यीअर !! ; ओह मिपाकर हॅप्पी न्यू यीअर !! बरं का ! हॅप्पी न्यू यीअर !!

माहितगार ·
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग स्वप्नात झाले होते पटाईत आमचे (पटाईतांची पटाईतपणे माफी मागून!) पंतप्रधान मोदींचे सचीव !! :) क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग त्यांनी विचारले गेले वर्ष भर काय केले ? ओबामां फोनु आला डू यु नो अँड व्हॉट दे सेड ? हॅप्पी न्यू यीअर !! ओह मिपाकरांना आमचा निरोप द्या ओह मिपाकर हॅप्पी न्यू यीअर !!

कविता कुणाची? - एक जोड - बेजोड प्रयोग

निनाव ·
लेखनविषय:
श्री न. गोळे ह्यांच्या कविते ला मिळालेल्या प्रतिसादातून हा विषय घेऊन येण्याची परवानगी असावी. कविता कुणाची असते , हा प्रश्नच मनास विचलित करून गेला , ह्या सर्व प्रतिसादांमधून. हे प्रश्न मी कविते च्याच माध्यमातून विचारतो आहे. सर्वांनी कृपया जोड द्यावी. विडंबन, जोड , सर्व काही - आपल्या सर्वांची कविता :) कविता कुणाची कवीच्या भावनेच्या अथांग समुद्रातून अमृत स्वरूपात आलेली ती कविता कुणाची? त्या कवीची ? कि त्या बोरू ची ? कि असेल ती त्या कागदाची ? कि त्या वेड्या कला प्रेमीची जो प्रत्येक कवितेस आवर्जून वाचतो प्रेम करतो - निरागस - स्वैर कविता कुणाची ?