✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दिवस....

म
माम्लेदारचा पन्खा यांनी
गुरुवार, 04/13/2017 - 20:38  ·  लेख
लेख
ह्या दिवसांचं काही कळतच नाही बुवा...कधी शेवरीच्या कापसासारखे आपसूक उडतात,कधी लोखंडी रोलरसारखे ढकलावे लागतात.... कँलेंडरमधे दिसणारे दिवस दिसतात त्यापेक्षा अधिक जवळ असतात... प्रत्येक उगवणारा दिवस मावळतोच...उद्याचा दिवस दिसेलच याचीही काही खात्री नसते..... काही लोक दिवस मोजत असतात ... काही लोकांचे दिवस फुलत असतात...... काही गोष्टी फक्त दिवसा करतात....कोणी गेला तर त्याचेही दिवस इतर लोक करतात.... दिवसाढवळ्या गुन्हे घडले तर त्याची दखल लगेच घेतली जाते.... काही दिवस दिसतात .....काही दिवस दाखवले जातात....काही दिवस सरतात....काही तरीही उरतात.... दिवसांचे अनेक प्रकार असतात.....उन्हाळ्याचे,पावसाळ्याचे,हिवाळ्याचे,हवेहवेसे, नकोनकोसे ,आठवणीतले आणि असे बरेच..... काही दिवस निषिध्द असतात....काही दिवस अडचणीचे असतात.....काही दिवस विशेष असतात.... बाईला दिवस गेले तर घरदार आनंदतं....पुरुषाचे दिवस नुसतेच येतात आणि जातात..त्यानं होत काहीच नाही....उलट दिवसेंदिवस काहीच केलं नाही तर रिकामटेकडा म्हणतात.... दिवसाला वेगवेगळे रंगही असतात....काही गुलाबी तर काही काळे असतात.... काही दिवस नुसतेच जातात.....काही दिवस कंठावे लागतात.... कष्ट करुन दिवस ढकलणारे आपल्या मनातच उनाड आणि स्वच्छंदी दिवस जगतात..... काही दिवस कायमचे स्मरणात राहतात....काही दिवस चटकन विस्मरणात जातात..... कधी दिवस फिरतात...कधी आपल्यालाच फिरवतात ..... दिवस असेही असतात आणि तसेही......या दिवसांचं सालं काही कळतच नाही बुवा !
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
व्युत्पत्ती
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
2673 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

मस्त लिहिलय.

कौशी
Fri, 04/14/2017 - 01:07 नवीन
"कधी शेवरीच्या कापसासारखे आपसूक उडतात,कधी लोखंडी रोलरसारखे ढकलावे लागतात". हे मात्र खरे.
  • Log in or register to post comments

+१

जव्हेरगंज
Sun, 04/16/2017 - 16:09 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कौशी

मुक्तक आवडले.

पद्मावति
Sun, 04/16/2017 - 14:18 नवीन
मुक्तक आवडले.
  • Log in or register to post comments

आभार...

माम्लेदारचा पन्खा
Tue, 04/18/2017 - 19:35 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा