पान,चुना..तंबाखु!

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
20 Dec 2014 - 4:47 pm

मी:- राम राम मंडळी...

मंडळी:- राम राम... काय? झाली का कामं?

मी:- हो...झाली की!

मंडळीतले तात्या:- या...मग बसा! .. ए गेनू.. च्या आन रे!

मी:- नको राव. लै झालाय आज. चहा नको..

तात्या:- बरं..र्‍हायलं..मंग पान खा!

येश्या:- का गुटखा देऊ?

तात्या:- भाड्या..गुर्जिला परत गुटखा इचारला,तर तीच पुडी सारीन तुज्यात!

शामू:-तात्या आज बिनपाण्यानी करणार काय येश्या'ची? .. ह्या ह्या ह्या ह्या!!!

तात्या:- तसं नाय हो. पण पान कुटं..आनी गुटखा कुटं?

येश्या:- बरोबर (आ)हे...आपलं त्ये पान,लोकाचा तो गुटखा!

तात्या:- तुज्यायचा तोंड फुटका तुज्या...गप र्‍हा जरा..

शामू:- ख्या ख्या ख्या ख्या... तात्या तेजीत आलं!

मी:- अहो अहो... सोडा हो ते पान नी गुटखा नी चहा.. हे बगा आज आमी तुमच्यासाठी पेश्शल आनलय.. रॉ-तंबाखू एकदम

तात्या:- मंजी काय असतय त्ये!?

येश्या:- रॉ मंजी ते काय तरी फोलिसातलं येगळ खातं हाय नव्हं?

तात्या:- गप तो का तू.... गुर्जी...तुमी बोला हो... आपलं ते..हे..दाखवा!

मी:- हे बगा... ह्याला म्हणतात तंबाखूचं पान.. मूळ तंबाखू ही अशी असते!

शामू:- आयच्या गावात..केव्हढं हाय हो हे भलं मोठ्ठं..आळवाच्या पानासारकं

मी:- हम्म्म्म.. हे पान दोन बोट घ्यायचं...

येश्या:- असं नुस्तच!?

मी:- ऐक बे जरा..तर..हे दोन बोटं घ्यायचं..जरा चुरडायचं.आणि तयार विड्याच्या पानाबरोबर ,चुना कात थो..डि पक्की सुपारी,गुंजपाला आणि जमली तर १ विलायची...आणि मग दोन मिनिटात अगदी..बहार आणतं!

तात्या:- तेजायला...आम्मी एव्हढं पानाचं शौकिन पण हे असलं सादंसुदं कदी गावलं नाय बगा...आना आना जरा हिकडं. ए...शाम्या.. जरा ती पानं घे .आनी त्यातलं तया...र पान काड.

येश्या:- ह्म्म्म्म्म...तात्या... तयार पान काय??? पिकल्या पानाचा...देठ की हो....हिरवाssssssssss ..ख्या ख्या ख्या ख्या!!!

तात्या:- ................................ येश्या... गां%$$#...आता माज्या अंगाशी आला ना,तर त्यो बांबू हाय त्यो घेऊन त्याला चुना लाऊन .....................

बाकिचे सगळे:- जाऊ द्या ओ...तात्या जाऊ द्या... कशाला तुमी पन लक्ष देता त्या चाठाळ मानसाकडं!? इग्नोर मारा ना!

तात्या:- ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह..... द्या ओ गुर्जी..द्या त्ये तुमचं रॉ तंबाकू.

मी:- घ्या!

तात्या:- (पान घोळवत..) ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआ...जबरी ध्यान लागलं कि ओ!!!., पन काय हो? ह्या पानात आनी पेश्शल तंबाखू पानात आनी गुटख्यात काय फरकं हो? सगळ्यात तर असती ती तंबाकूच ना?

शामू:- हा आता कसं मुद्द्याचं बोल्ला. आता बोला गुर्जी..

मी:- अहो..अवतार वेगळे ,देव एकच.

येश्या:- गुर्जी........................... नाय...,,,आता बेरिंग सोडलं तरी चालल...बरं का!

सगळे:- ह्या..ह्या..ह्या..ह्या..ह्या

तात्या:- ......... गुर्जी..जरा वायलं वायलं करुन सांगा ना.

मी:- आओ तात्या मी बेरिंग मदे असतो का कदी हिकडं आल्यावर.??? पण द्येव म्हटलं कि काहि पन समजायला सोप्पं जातं कि नै? म्हणून जरा देव घेतलं.

तात्या:- घ्या..घ्या..

मी:- आता..मानसाला भ्या वाटलं म्हणून त्यानी द्येव शोदला का नै? सांगा बरं?

सगळे:- (एकजात..) खरं..खरं..!

मी:- हां...,तंबाकूचा मूळ द्येव मंजे ह्ये रॉ तंबाकू..मंजे त्याचं पान. आता आपन जी मळून खातो ती तंबाखू मंजी याच पानाचा चुराडा करून देतात..फक्त त्येच्यावर प्रक्रीया करून?

शामू:- आनी का त्ये?

मी:- आरे..मानसाला भ्येटलेला पहिला देव कोन होता? ..निसर्ग आनी त्याच्यातली शक्ती!

येश्या: -मंजी त्ये पंच्म्हा..भुतं का हो?

मी:- येकदम्म बराब्बर! पंचमहाभूतं.तसं ह्ये रॉ तंबाकू पंचम्हाभूतातलं हाय! पचलं तर पूर्ण पचतं.नायतर साफ उलटतं.अता सगळ्यांनाच काय हा कठोर देव पचनार न्हाय..म्हणून मग माणसाच्या बुद्धीनं त्येच्यावर प्रक्रीया केली.

शामू:- आरं त्येज्यायला...मंजी काय केली हो?

मी:- ह्या हार्ड तंबाखूला जरा सॉप्ट करन्यासाटी,त्येला कसले कसले रसायनं/मिठाचं पानी ह्यात मुरवून वाळवली.आनी मग तयार केली,ती ही आपली पहिली खायाची तंबाकू..

येश्या:- मंजे त्याची मूळ चव-घालवली!

तात्या:- तुज्यायला लावला तुज्या चुना....! जरा गप की भाड्या.. गुर्जी त्ये आमी बी ऐकलय हो..पन नीट उतरलं नाय कदी..तुमी त्ये तंबाकूला द्येव-लाऊनच इस्कटा,मंजी आमच्यात शिरलं.

मी:- आओ..आता आग,वारा,पाऊसपानी,वीज,भूकंप.. ह्ये सगळे निसर्गाचे चमत्कार..त्ये आता कशे होतात,ह्ये आपल्याला कळतं..त्ये का कळतं??? सांगा बरं.

सगळे:- ??????

मी:-आपन त्येला आपल्या बुद्धिला झेपल इअतकं सॉफ्ट क्येलं..त्येला नावं दिली. वायुदेवता/जल्देवता/अग्निदेवता/धरणीमाता..झालं! देवता म्हनल्यावर आपली त्येच्याशी जवळिक झाली,आनी कळाया पन लागलं.. तसं ही रॉ तंबाकू पानाशिवाय नुस्ती तोंडात टाकून बगा बरं.. आपन..थू.थू..करून थुकारुन टाकू. आनी चुन्याबरोबर जरी निस्ती लावली,तरी किक ऐवजी आंधारी यील..

येश्या:-(डोळे मिटून..) ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआ! लय भारी..सांगा सांगा..अजून

तात्या:- ह्येज्यायचं ह्येच्या..ह्याला आंधारीपन आवाडती..रान्टीच हाय ब्येन!

मी:- पन तेच त्येला पहिली प्रक्रिया केली,मंजे चघळन्याच्या लायकीची केली,की खाल्याव पहिली आपल्याला किक बसती,आनी मग ती आपल्याला-कळायला लागती..! ;) हाय की नाय?

येश्या:- ..........

बाकिचे:- ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआ..करेट..करेट!

येश्या:- पन गुर्जी..मगाशी मी ती तशीच हान्ली... (तात्यांना बगून बावचळत..) आपलं ते हे...खाल्ली खाल्ली..अंधारी बी आली,पन मला त्या अंधारीचा तरास न्है जाला..उलट त्या भगवंताचं सत्यरूप कळ्ळं! ( ;) )

तात्या:-(दातओठ खात..) माणणीय येशवंतराव..आपुन म्हायोगी आहात,तवा आपलं बुद्दिवादी त्वांड त्याच तंबाकूनी बंद करून आम्मा सामाण्य ल्येक्रांना ऐकायला द्येताल का?

मी:- सोडा हो त्येला..तर, पंचमहाभूतांना नावं दिली,कि ती आपल्या-जवळ येतात आनी कळाया लागतात.तशी ही मळून खायची पहिली तंबाकू हाय.हा...मंजी बिडी/हुक्क्याला पन तीच वापरतात.पन थोडी येगळी.पन येगळी असली तरी जात सादिच.

तात्या:- मगं..प्पेश्शल चं काय? १२०/३००/४००/६०० ह्याचं काय हो?

मी:- आओ..ही सादी तंबाकू मंजी आपल्या विरोबा,ताडोबा असल्या ग्राम्दैवता सारकी असती हो..पन पेश्शल्चं तसं नाय,त्यात अजून भावभावना ओतून त्येचा इषेश-फळ द्येनारा द्येव क्येला,की झाली पेश्शल तंबाकू

येश्या:- (तोंड दाबुन हसत..) गुर्जी....मला आता गावातले सगळे नवसाचे द्येव दिस्ले! ह्या ह्या ह्या ह्या =))

शामू:- अस का..! .. इद्वान!! मंग गप गुमान दर्शन घ्यावा त्यांचं!

मी:- मंजी तंबाकू चांगली निवडायची,त्येच्यात काडी कचरा बिल्कुल र्‍हाऊ द्याचा नाही. आनी ह्या निवडल्येला पत्त्यात्लं मूळ बीज अधिक अस्सल करून घ्यायचं,त्येला विशेष सुगंद येइल अशी व्यवस्था करायची..आता एवडं सगळं आलं की त्याला खर्च बी आलाच! म्हणून ह्या प्पेश्शलच्ये भाव, आनी पेश्शल होत जात्यात! नंबर वाडला की भाव वाड्लाच!

तात्या:- पन गुर्जी..ह्ये येश्या हारामखोर बोल्ला..तसं ही प्पेश्शल तंबाकू मनात क्येल्येला नव्साला फळ द्येती हो..बराब्बर..त्ये कसं?????

मी:- आओ...आपलं कसं होतं म्हायती का? आदी आपण मूळ द्येवाचे निस्सिम उपासक..त्येच्या मुळं, ह्ये व्यापारी लोकांनी केल्येल्या नव्या नव्या झायराती आपल्यावर निम्मा आसर खान्या आदीच पाडतात..

येश्या:- मंजी..श्रद्दा वाढवतात!

सगळे:- (येश्याकडे बघून..) %$#@*&^%

मी:- मग आपण ह्या प्पेश्शल तंबाकू ला असलेल्या पेश्शल डब्यांच्या रुपड्यांना आनखि भुलतो. खायला जवळ ग्येलो,की वास उरलेलं काम अजून पुढं न्येतो..आनी मग इतक्या भावना मनात दाटलेल्या असल्यावर आतलं-बीज काय आपल्याला सोडनार व्हय? त्ये देत लग्गीच हळूवार करंट ..आनी मंग आपली गाडी लागती.ह्या भव्सागरात डुलाया...मग डोकेदुखीही कळत न्हाई आनी तापाचा बी इसर पडतो... आनी आपनच त्येला नाव द्येऊन त्या प्पेश्शल द्येवांचं आणखि फुकाट मार्केटींग करतो..म्हन्तो:- "लाखो दुखों की येक दवा/ज्याला जवा पायजेल्,त्यानी घ्या..तवा..तवा!!!"

येश्या:- ( =)))))) ) गुर्जी..मला आता येका द्येवाची म्होट्टी जत्रा दिस्ली! आनी तिकिट लाऊन जायचे सगळे द्येव बी दिस्ले! ( =)) )

शामू:- आरं..त्येज्याचं त्याज्या..मला ह्ये असं कदी दिस्लच न्हाय!

तात्या:- गुर्जी लै भारी...अता गुटका सांगाच! त्येच्या शिवाय फुडचं पान न्हाय रंगायचं... नामू...परत च्या आन रे सगळ्यांना..आनी फुल्ल आन!

मी:- आता माजं काम सोप्पं झालं बगा.. आता तुम्मी सगळे घाटात आले..आता मी खाट्टकन सांगतो..पण रागवायचं न्हाय बरं का कुनी

सगळे:- ..........................

मी:- आओ..गुटखा मंजी सगळ्या समाज मनाला झुलवणारा नामी बाबा असतो..त्येला तयारच त्यासाटी क्येलेलं असतं...भक्तिभाव संपला,गरजही भागली...मग आता उरलं काय?

सगळे:- वेंजॉय...

येश्या:-(नाचत...) वेलकम हो राया वेलक...म हां..,,,आमच्या गावी वेलकम...!

मी:- येश्या तुजी अक्कल जरा जास्तच चालती हां.........

शामू:- त्याची %$#@ घालू दे त्येला..तुमी बोला हो पुढं

मी:- माज्या दोस्तांनो...आरं हा वेंजॉय बी नाय हो.. ही इकृती हाय

येश्या:- हा....गुर्जी..ह्ये बरं हाय तुजं..तुजा गुटका सुटला..तर लगीच..इ कृ ती??????

मी:- ( :D ) आबे नाय बे येश्या..माजा येक टाइम पिरेड आला,आनी ग्येला..पन तरी बी मला मान्य हाय की मी कुटतरी तसा अशेल आत मदी..म्हनुनच त्येचं भूत बसलं माज्या डोक्यावर! ..

बाकिचे:- ....

मी:- हा..तर साद्या सुपारी बरोबर, आगदी लाकडाचा भुगा,आनी नशेला पावरबाज करून बुद्धीला-खलास करनारी रसायनं मारून आपल्या समोर येतो..तो गुटका..

तात्या:- आम्माला म्हैत हाय त्ये... पन कळत नाय हो.. तुम्मी द्येव सोडू नका बरं मधिच!

मी:- आओ..."तुमच्या जिवनाची सगळी दु:ख्ख मी घेतो..आनी तुम्माला आनंदसागरात सोडतो" अशी वाक्य फेकून मारणार्‍या झायराती पायल्या..की मग आपन पळत पळत.. "येकदा ट्राय" मारायला जातो. आनी एकदा का आत गेलो..की ती फास्ट होणारी नशा,आपल्या बुद्धीचा सगळा गाशा गुंडाळाया लावती.. आनी मग काय? वार्‍या वाढायला लागतात..आनी त्यांचे बिल्ले पन आपन आभिमानानं मिरवतो... वर कुणी "ह्ये खाऊ नका" म्हणून समजावायला आलं..तर त्येला हान्तो द्येखिल!

तात्या :- मायला.... कस्ला खतरनाक ख्येळ हो हा! आमी बरं झालं..आपली ग्राम दैवतं आनी स्थान दैवतं सोडून ग्येलो न्याई त्ये!

येश्या:- बरुबर हे तात्या तुमचं..हाळू मारणारं येकदम त्रासाचं होत न्हाईच!

तात्या:---(येश्याला...शांतपणे..) इग्नॉर मारला तुला..... ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्जाआआआआआआआआ!

येश्या:- ( :D .. :D .. :D )

मी:- आओ...सोडा त्या येश्याला.. मज्जा आली का नाय आज..सांगा बरं!?

सगळे:- येकदम धम्माल..तिच्यायला!
................
...............
..........
चहावाला गेनू.:- तात्या...हा घ्या चहा...आनी काडा जरा त्ये तुमचं...

पान...चुना..आनी तंबाकू!!!
=========================================
https://lh6.googleusercontent.com/-FZVp-aEkfwo/VIyXlXVHjII/AAAAAAAAGnM/VdOytfGPepo/w326-h580-no/IMG_20141118_172810096.jpg

संस्कृतीसमाजमौजमजाविचारविरंगुळा

प्रतिक्रिया

गम्पत पाटील's picture

20 Dec 2014 - 5:22 pm | गम्पत पाटील

लय बेस रंगलाय इडा......

जेपी's picture

20 Dec 2014 - 5:25 pm | जेपी

हि हि हि...आवडल.

(गावरान प्रेमी)जेपी

१२० वगैरे नाही कळलं कसं करतात ते आणि गुटखा मध्ये द्येव कसा आला ?

अत्रुप्त आत्मा's picture

20 Dec 2014 - 5:51 pm | अत्रुप्त आत्मा

@आणि गुटखा मध्ये द्येव कसा आला ? >>> तुंम्ही खात नसाल्,त्यामुळे कळल नाही/नसेल.
म्हणून वाइड बॉल समजून सोडून द्या!

विवेकपटाईत's picture

20 Dec 2014 - 6:08 pm | विवेकपटाईत

वाचून ग्यान चक्षु उघडले, तंबाकू म्हजे निराकार परब्रम्हाचे स्वरूप आजच कळले.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Dec 2014 - 7:20 pm | अत्रुप्त आत्मा

@तंबाकू म्हजे निराकार परब्रम्हाचे स्वरूप आजच कळले.>>>
तुंम्हास तसे दिसले? चालावयाचेच! ज्याची त्याची अनूभूती *mamba*

आम्ही खात नसल्यामुळे करंटे !!

मुक्त विहारि's picture

21 Dec 2014 - 12:33 am | मुक्त विहारि

अजिबात नाही...

व्यसन, मग ते कुठल्याही प्रकारचे असो.... न करणारा मनुष्य उत्तमच...

अत्रुप्त आत्मा's picture

21 Dec 2014 - 8:23 am | अत्रुप्त आत्मा

+++++१११११ टू मुवि

एस's picture

21 Dec 2014 - 12:40 am | एस

आम्ही याही बाबतीत कट्टर नास्तिक आहोत. लेखनशैली मात्र छान आहे! हा लेख आवडला.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Dec 2014 - 11:12 am | डॉ सुहास म्हात्रे

याबाबतीत आम्ही कट्टर नास्तीक आहोत.

आमचा गुरूमंत्र : "तंबाकू खाणे आरोग्यास हानीकारक आहे. तंबाकूने खाण्याने तोंडाचा कर्करोग होतो. सिगरेट ओढण्याने कर्करोग, हृदयरोग, श्वसनाचे व रक्तवाहिन्यांचे अनेक प्रकारचे आजार, इ होतात."

प्रचेतस's picture

21 Dec 2014 - 4:16 pm | प्रचेतस

लेखन चांगलं, शैलीही चांगली . पण तंबाखूचं उदात्तीकरण नाही पटलं.

अत्रुप्त आत्मा's picture

21 Dec 2014 - 5:06 pm | अत्रुप्त आत्मा

@ पण तंबाखूचं उदात्तीकरण नाही पटलं. >>> काय करावं रे कर्मा??? हे तंबाखुचं उदात्तीकरण आहे????????

पिंपातला उंदीर's picture

21 Dec 2014 - 4:27 pm | पिंपातला उंदीर

आवडल हो

अत्रुप्त आत्मा's picture

21 Dec 2014 - 5:12 pm | अत्रुप्त आत्मा

@ पण तंबाखूचं उदात्तीकरण नाही पटलं. >>> काय करावं रे कर्मा??? हे तंबाखुचं उदात्तीकरण आहे????????

ते अत्तराख्यान सोडून मध्येच हे पान, तंबाखू कुठे?

प्रचेतस's picture

21 Dec 2014 - 9:54 pm | प्रचेतस

त्याला करंट म्हणतात.

अत्रुप्त आत्मा's picture

21 Dec 2014 - 10:41 pm | अत्रुप्त आत्मा

दुष्ष्ष्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्त्त्त =)) हत्ती :p

फुडचं अत्तर करंट्वालच हाए। ;)

यशोधरा's picture

22 Dec 2014 - 10:49 am | यशोधरा

=))

पाषाणभेद's picture

22 Dec 2014 - 8:43 am | पाषाणभेद

गुर्जी आपलंपण एक पान जमवा.