आपण ग्रेट आहोतच !

सुधीर मुतालीक's picture
सुधीर मुतालीक in जनातलं, मनातलं
5 Nov 2013 - 12:18 pm

१५ ऑगस्ट २०१२ चे पंतप्रधान मनमोहनसिंघ यांचे भाषण मला आठवते. बहुदा विज्ञान, तंत्रज्ञान या क्षेत्रातल्या घोषणा लक्षात राहतात. कारण या दोनही क्षेत्रातल्या माझ्या देशाच्या घोडदौडीचे मला नेहमी कौतुक वाटते. १७५० साली ब्रिटन मध्ये सुरु झालेली औद्योगिक क्रांती तंत्रज्ञानाची सुरुवात मानली तर सुमारे दोनशे वर्षांनी म्हणजे सुमारे १९५० साली आपल्याकडे स्वत:च्या तंत्रज्ञानाची सुरुवात झाली. डॉ भाभा, जमशेदजी आणि नेहरू या त्रिकुटाचे प्रत्येक स्वकीयाने आभारच मानले पाहिजेत. स्वातंत्र्य मिळाल्यावर अवघ्या सतरा वर्षाच्या कालावधीत या आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या देशात, अहो, पंचेचाळीस विविध वैज्ञानिक संस्था, प्रामुख्याने प्रयोगशाळा सुरु झाल्या होत्या …भरकटलो …… फार इतिहासात शब्द खर्च करत नाही. इतिहास पुन्हा कधी तरी !

तर १५ ऑगस्ट २०१२ रोजी लाल किल्ल्यावर पंतप्रधानांनी घोषणा केली होती … आता लवकरच भारतीयांची स्वारी मंगळावर ! आणि आज तो दिवस उजाडलाय. घोषणा केल्यावर फक्त सव्वा वर्षात. आपली इस्त्रो ही अवकाश शास्त्रात संशोधन करणारी भारतीय संस्था आज दुपारी दोन वाजून अडतीस मिनिटांनी १०० टक्के भारतीय बनावटीचे एक यान मंगळ ग्रहाच्या कक्षेत पाठविणार आहे. कदाचित आठवत असेल तर नासाची एक छोटी गाडी मंगळाच्या पृष्ठ भागाची चाचपणी करण्यासाठी पाठवली आहे. आपले भारतीय यान मंगळाचे वातावरण अभ्यासणार आहे. भारतीय इतिहासात आपली कामगिरी मैलाचा दगड ठरणार आहे आणि आपणा सर्व भारतीयाच्या दृष्टीने ही अभिमानास्पद बाब आहे. फक्त मोजक्याच म्हणजे अमेरिका, चीन आणि रशिया या फक्त तीन देशानंतर भारत हे चौथे राष्ट्र आहे ज्याने मंगळाची स्वारी करण्याची आपली कुवत सिद्ध केली आहे.

मंगळाला दिमोस आणि फोबोस असे दोन चंद्र आहेत. आपले यान फोबोस च्या संगतीत असेल. फोबोस जवळून जाणारा आणि मंगळापासून पन्नास हजार किलोमीटर इतक्या जवळून जाणारा एक धुमकेतू पुढील वर्षी आपल्या यानाला अभ्यासता येणार आहे. अर्थात भारतीय यानाला आज प्रवास सुरु केल्यावर मंगळाच्या कक्षेत अजुनी दहा महिने तर नक्की लागतील - म्हणजे सुमारे सप्टे २०१४ मध्ये साहेब स्थिरावतील. कारण प्रवास सोपा नाही. अंतर सुमारे पंचाव्वान लाख किलोमीटर. म्हणजे पृथ्वीची कक्षा, हेलिओसेंट्रीक त्र्याजेट्री आणि मंगळाची कक्षा असा लई लांबचा पल्ला आहे. आपले शास्त्रज्ञ इस्त्रो मध्ये बसून हा सर्व प्रवास नियंत्रित करणार आहेत.

आख्खे जग आज "ऑ" होणार आहे. भारतीयांचे कौतुक होत आहेच पण फक्त साठ सत्तर वर्षात एवढी प्रचंड घेणा-या आपणा विषयी हेवा ही वाटतो आहे, हे नक्की. वाहणारी गटारे, उखडलेले खड्डे, भ्रष्टाचार हे सगळे खूप छोटे आहे हो, थोडे दिवस ते पूर्ण बाजूला ठेऊन आपण आपल्या क्षमतांमध्ये मश्गुल झालो तर समाजाचे हरवलेले मनोबल नक्की उंचावेल. तक्रारीचे सूर जरा बाजूला ठेऊन आपण आपल्याच कडे बघण्याची फार गरज आहे, बुवा.

समस्त भारतीयांचे प्रचंड अभिनंदन.

तंत्रविज्ञानप्रकटनशुभेच्छाअभिनंदनप्रतिभा

प्रतिक्रिया

चीनला अजुन सफलता मिळालेली नाहिये. अमेरिका, रशिया आणि युरोपिअन स्पेस एजेन्सी हेच आता पर्यन्त पोहोचले आहेत मंगळावर.

सचिन कुलकर्णी's picture

5 Nov 2013 - 1:39 pm | सचिन कुलकर्णी

याआधीचे बरेच मिशन फेल देखील झाले आहेत.
http://en.wikipedia.org/wiki/List_of_missions_to_Mars

आणि अमेरिकेने मंगळ ग्रहाला १९६० सालापासूनच गवसणी घालण्याचे प्रयत्न सुरु केलेत. बाकी १९४७ नंतर आपण फार लवकर हि झेप घेतली हे मान्य. (अर्थात याची खरोखर गरज आहे का विशेषत: प्राथमिक प्रश्न आ वासून उभे असताना, असेही प्रश्न काही बुद्धीवाद्यांकडून विचारले जात आहेतच.

रुस्तम's picture

5 Nov 2013 - 1:41 pm | रुस्तम

Isro chief Radhakrishnan offered prayers on Monday morning for the successful launch of PSLV-C25

http://www.business-standard.com/article/current-affairs/isro-chief-visi...

सचिन कुलकर्णी's picture

5 Nov 2013 - 1:49 pm | सचिन कुलकर्णी

सेम मी पोस्ट केलेय इथे चेपूवर. मारामारी चालूये तिथे बघा. (ग्रुपच्या सदस्यांना जरूर दिसेल).

ज्यांना लाईव बघायचे आहे त्यांच्यासाठी
http://www.isro.org/scripts/livewebcast-c22.aspx

खबो जाप's picture

5 Nov 2013 - 2:07 pm | खबो जाप

काही तरी गन्डलाय वाटत
http://webcast.gov.in/live/

पैसा's picture

5 Nov 2013 - 2:11 pm | पैसा

बाकी सगळ्या चर्चा वादविवाद बाजूला ठेवूया आणि आपल्या शास्त्रज्ञांचे कौतुक करूया! मस्त बातमी. यानाला यश मिळेल न मिळेल. निदान सुरुवात तरी झाली आहे.

बॅटमॅन's picture

5 Nov 2013 - 4:03 pm | बॅटमॅन

असेच म्हणतो. किती खपून हे सगळं उभं केलंय मायला, बाकी मरूदे पण यान मंगळावर जाऊदे बॉ. शास्त्रज्ञांना टनभर शुभेच्छा!!!!

मुक्त विहारि's picture

5 Nov 2013 - 2:11 pm | मुक्त विहारि

भारतियांचे पावूल पडते पुढे....

जेपी's picture

5 Nov 2013 - 4:02 pm | जेपी

उडाल ऐकदाच यशस्वीपणे .
अभिनंदन इस्रौचे .

इन्दुसुता's picture

5 Nov 2013 - 8:27 pm | इन्दुसुता

भारताच्या तंत्रज्ञानातील प्रगतीबद्दल ( आणि ज्या वेगाने ती झाली ) याबद्दल सार्थ अभिमान आहेच.
यानाला व प्रोजेक्ट्ला यश मिळो ही प्रार्थना आणि सदिच्छा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Nov 2013 - 9:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारतियांसाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट. भारतिय वैज्ञानिकांना आणि तंत्रज्ञांना कडक सॅल्युट !

अर्धवटराव's picture

5 Nov 2013 - 10:13 pm | अर्धवटराव

नेहरु स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री झाले याबद्दल मला नेहमीच खुप बरं वाटतं... वन ऑफ द रिझन्स, त्यांना विज्ञानाच्या शक्तीची पूर्ण जाणीव होती व या बाबतीत भारत अद्यावत राहावा म्हणुन त्यांनी शक्य तेव्हढी पायाभरणी केली.
वी रॉक्

आणि समस्त भारतीयांचे मनःपूर्वक अभिनंदन! ही फार मोठी झेप आहे यात शंकाच नाही.

(आनंदी)रंगा

फार अभिमान वाटला भारताबद्दल.
पण मग येथे ती न्युज दाखवताना उगा आपल कोण तरी एक जण हे पैसे वाया गेले म्हणुन सांगणारे पण दाखवताहेत+ एक झोपडपट्टीचा स्नॅप पण अगदी मस्ट!