ऑफीस ऑफीस...
हाफिसात मागच्या आठवड्यात घडलेला एक किस्सा..
एखादा प्रश्न विचारला गेल्याने "न हसता आणि न वैतागता" कसे उत्तर द्यावे हे न कळणार्या प्रसंगांपैकी एक प्रसंग..
मंथली प्रेझेंटेशन सुरू होते..
माझ्या एका रिपोर्टमधील आकडेवारी आणि आमच्या लंडन ऑफीसमधील एकाने तयार केलेली आकडेवारी काही केल्या जुळत नव्हती...
शेवटी असा निष्कर्ष निघाला की "दोन्ही रिपोर्टस चुकीचे आहेत व एक तिसराच रिपोर्ट तयार केला जावा.."
अचानक आमचा एका मोठ्ठा सायेब वदला...
आय अंडरस्टँड रिपोर्ट A इज इनकरेक्ट, रिपोर्ट B इज इनकरेक्ट अॅजवेल! बट व्हाय दोज इनकरेक्ट फिगर्स आर नॉट कन्सिस्टंट..? इट शुड बी इन सिंक यू नो..
आम्ही सर्वजण हसू दाबण्याच्या प्रयत्नात काय भाव दर्शविले असावेत देव जाणे!! :-))
*******************************************************************************
तुमच्या हाफिसात अशा मजा होत असतील तर जरूर टंका. (आणखी टंकण्यासारखे बरेच मटेरीयल आहे माझ्याकडे, सवडीने टंकेन)
*******************************************************************************
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अच्चा
बॉसच्या म्हणण्यात काहीतरी
पण...
पोट धरुन हसत आहे...
पोट धरुन हसत आहे... कोणाचे ?