_H.png)
१२ प्रकारची मूलभूत कौशल्यं. करियर्सचे ६००पेक्षा जास्त मुख्य गट आणि त्याच्या दसपट संख्येने उपलब्ध असलेले शैक्षणिक पर्याय
....आणि फक्त एक आयुष्य!
विद्यार्थ्यांसाठी आणि मिड करियर चेंजसाठी करियर प्लॅनिंग करत असताना असं लक्षात येत गेलं की 'अपुऱ्या माहितीवर बेतलेले निर्णय' हे व्यावसायिक असमाधानाचं, अपयशाचं मोठंच कारण आहे. करियरची निवड सहसा नेहमी ऐकल्या-बोलल्या जाणाऱ्या पर्यायांमधून होते. त्यात मुलाला, मुलीला काय आवडतंय, काय जमतंय आणि त्याचा-तिचा स्वभाव कसा आहे, याचा विचार अजूनही फारसा होत नाही. तर मग त्या क्षेत्रात पुढची वीस-तीस वर्षं कोणत्या संधी मिळणार आहेत, किती बदल होणार आहेत हे लक्षात घेऊन करियर ठरवणं तर आणखीनच दुर्मीळ. साहजिकच अपेक्षा आणि क्षमता यांची मोट बांधताना दमछाक होते. हे टाळायचं, तर पहिली पायरीच विचारपूर्वक निवडणं आलं. एखाद्या तज्ज्ञाच्या मदतीने आजचाच नाही, तर पुढच्या दशकभराचा अंदाज घेणं आलं.
आज शिकत असलेल्या मुलांच्या करियर्स आणखी काही वर्षांनी मार्गी लागतील. त्यांच्या आयुष्याचा आकार ठरवणाऱ्या भविष्यकाळातल्या करियर्सचा हा कर्टन रेजर!
------
२००७मध्ये फेसबुक हे नाव फारसं प्रसिद्ध नव्हतं. व्हॉट्स अॅप या शब्दाचा जन्म व्हायचा होता. आणि टच स्क्रीन काय असतं हे बहुतेकांच्या कल्पनेतही नव्हतं. याच तीन गोष्टींचा आज होत असलेला वापर त्या वेळी कोणाच्या मनातही आला नसेल. अवघ्या दहा वर्षांत आपली संवादाची, संपर्काची साधनं बदलली. तंत्र बदललं. असेच वेगवान - काहीसे भयावह - बदल सगळ्याच क्षेत्रांमध्ये होताना आपण बघतोय. त्याचबरोबर प्रचंड वेगाने त्या त्या व्यवसायांच्या आणि करियरच्या संधीही बदलतायत.
केवळ फेसबुक, व्हॉट्स अॅप, ट्विटर या सगळ्यांनी शेकडो नव्या करियर्स जन्माला घातल्या आहेत. यात हार्डवेअर तंत्रज्ञ, सॉफ्टवेअर तंत्रज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, माहिती विश्लेषक असे औपचारिक पर्याय तर आहेतच, त्याचबरोबर निव्वळ खरेदी करण्याची, खाण्याची, भटकण्याची, व्हिडिओ गेम खेळण्याची आवड असलेल्यांसाठीही असंख्य करियर्स घडत आहेत. नव्या करियर्स जन्माला येत आहेत, त्याहूनही कितीतरी जास्त निरुपयोगी ठरत आहेत. आज वेगवेगळ्या टॉप १० याद्यांमध्ये असलेले अनेक पर्याय दहा वर्षांपूर्वी माहीतही नव्हते. असं असताना दहा वर्षांनंतरच्या टॉप १० याद्यांमध्ये काय दिसून येईल? काय नाहीसं होईल? म्हणजे आज शिकत असलेली पिढी नोकरी-व्यवसायात शिरेल, तेव्हा चित्र नेमकं कसं असणार आहे?
काय जाईल?
ऑटोमेशन या सर्वपरिचित शब्दापासून सुरुवात केली, तर इंडस्ट्रिअल ऑटोमेशन, प्रॉडक्शन लाइन, फूड प्रोसेसिंगमध्ये झालेले बदल हे आता जुने झालेत. येत्या काळात जी क्षेत्रं संपूर्णपणे स्वयंचलित, स्वतंत्र होतील, त्यात कस्टमर केअर - फ्रंट एंड आणि बॅक एंड दोन्हीचा समावेश असेल. मोबाइल कंपन्या, बँक्स, अर्थसाहाय्य देणाऱ्या कंपन्या, मॉल्स या सर्व ठिकाणी येत्या काही वर्षांतच संपूर्ण स्वयंचलन झालेलं दिसून येईल. इतकंच नाही, तर अकाउंटिंग, कायदे सल्लागार, मालवाहतूक आणि पुरवठा (transport and logistics), सफाई व्यवस्थापन याही ठिकाणी आॅटोमेशन आणि सोबत कृत्रिम बुद्धिमत्ता आपले हातपाय पसरताना दिसत आहे. थोडक्यात, हे सर्वच पर्याय संभाव्य करियर्सच्या यादीतून हळूहळू नाहीसे होतील. (कंपनीने नवीन सॉफ्टवेअर आणल्यामुळे ४०-५० जणांची टीम गारद होऊन त्यातल्या सीए मंडळींच्या नोकरीवर गदा आल्याचं उदाहरण नुकतंच कानावर आलंय.)
काही क्षेत्रामध्ये नोकऱ्या राहतील, पण त्यांचं स्वरूप बदलेल. उदा. आंतरराष्ट्रीय कंपन्यांची सेवा केंद्रं - या क्षेत्रात स्पर्धक वाढल्यामुळे आता या ठिकाणी अनेक बदल घडताना दिसत आहेत. कायमस्वरूपी कर्मचारी कमी करून त्याऐवजी Extended Workforceचा (Cloud Talent Sourcingचा) वापर सुरू झाला आहे. म्हणजेच प्रोजेक्ट्सवर स्वतंत्रपणे काम करता येतंय अशांकडे काम वाढेल. जास्तीत जास्त कंपन्या हा पर्याय स्वीकारून ताळेबंदातला एक मोठाच खर्च कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत. याचा आणखी एक परिणाम म्हणजे मानवी संसाधन विभागाचं काम पूर्णपणे पालटताना दिसतंय. पूर्वीसारखं एचआरमधली नोकरी म्हणजे निवांतपणा हे यापुढे समीकरण राहणार नाही.
येत्या १५ वर्षांत आपल्या आयुष्यातून वृत्तपत्रं, लँडलाइन फोन, मोबाइल फोन, क्रेडिट कार्ड, छापील चलन, हार्ड डिस्क आणि पेन ड्राइव्ह्ज, केबल टीव्ही अशी असंख्य उत्पादनं नाहीशी होणार आहेत. आणि अर्थातच त्यांच्याशी संबंधित असंख्य करियर्सदेखील..?
काय बदलेल?
रोटी-कपडा-मकान या माणसाच्या मूलभूत गरजा. त्यापैकी अन्नधान्य उत्पादनाचं तंत्र झपाट्याने बदलतं आहे. ग्रीनहाऊस फार्मिंग, ऑरगॅनिक फार्मिंग हे आजचे चलनी शब्द आहेत. पण ते फक्त आजचे. यापुढचा काळ हा डिजिटल मॅपिंग केलेल्या मातीत ड्रोनच्या निरीक्षणाखाली पिकवलेल्या अन्नधान्याचा असेल. मातीशिवाय पिकवलेल्या, न धुताच खाता येतील अशा हायड्रोपोनिक फळांचा आणि भाज्यांचा असेल. अॅपच्या मदतीने तुम्हाला हव्या असलेल्या उत्पादनांची शेतातली प्रगती तुम्ही पाहू शकाल, समाधानकारक वाटल्यास मागणी नोंदवू शकाल, आणि ती थेट शेतातून तुमच्या घरी पाठवली जातील. म्हणजेच अॅग्रोइंजीनियरिंग, वेदर अॅनालिसिस, लाॅजिस्टिक्स, इ-काॅमर्स हे सगळं शेतकऱ्याच्या दिमतीला हजर राहील.
तयार अन्न हवं असेल, तर ते ३डी प्रिटिंग करून मिळवण्याचा काळही फार दूर नाही :) या क्षेत्रात सध्या होत असलेली अविश्वसनीय प्रगती पाहता हे सर्वत्र दिसू लागेल, अशी चिन्हं आहेत. गोल्डमन सॅक्सने 'पारंपरिक व्यवसायपद्धती संपूर्णपणे नष्ट करण्याची क्षमता असलेलं कल्पक तंत्र' असं या तंत्राचं वर्णन केलं आहे. आंतरजालाने जसे आपले सर्व व्यवहार अक्षरशः गिळंकृत केले आहेत, तसं हे तंत्रदेखील दररोज नवनवी क्षेत्रं काबीज करत आहे. आतापर्यंत प्रायोगिक तत्त्वावर ३डी प्रिटिंगच्या मदतीने इमारती बांधल्या गेल्या आहेत, अन्नपदार्थाचं प्रिटिंग थोड्याफार प्रमाणावर सुरू झालं आहे. जसजसा याचा वापर वाढत जाईल, तसतशी त्रिमित इमारती बांधणारे - नव्हे, छापणारे वास्तुतज्ज्ञ, '३डी प्रिंट' केलेले अवयव बसवणारे शल्यविशारद, शिक्षणासाठी त्रिमित नमुन्यांची निर्मिती करणारे तज्ज्ञ, या तंत्राने कपडे छापणारे व्यावसायिक अशा अनेक वेगवेगळ्या करियर्सचा जन्म होऊ लागेल. तसंच साध्या प्रिंटरशी ज्या ज्या व्यावसायिक संधी जोडलेल्या आहेत, त्याच किंचित फरकाने ३डी प्रिटींगमध्येही राहतीलच. खुद्द घरबांधणी व्यवसायात घडत असलेले अनेक बदल आजही पाहता येत आहेतच. त्यावरून भविष्यातली स्मार्ट, किंबहुना इंटेलिजंट घरं कशी असतील याचा अंदाज बांधणं अगदीच अशक्य नाही. हे सगळं आज कदाचित साय-फाय कथेसारखं वाटत असलं, तरी पुढची पिढी या सगळ्याचा अनुभव घेताना दिसणार आहे.
याउलट हेल्थ सायन्समधले मानसिक आरोग्याशी संबंधित व्यवसाय अबाधित राहतील... खरं तर वाढतीलच. समूळ बदलत असलेल्या या जगात कुटुंबीय सर्वदूर पांगत आहेत. आप्तेष्ट जवळपास नसल्यामुळे आणि फक्त आभासी नात्यांचाच गोतावळा जमल्यामुळे स्वतःचा तोल राखण्यासाठी काउन्सेलर्स, लाइफ कोच, केअरगिव्हर्स अशा लोकांची गरज खूप मोठ्या प्रमाणावर भासणार आहे. अगदी सध्याचंच उदाहरण घ्यायचं, तर अमेरिकेतून मनाविरुद्ध परत यावं लागलेल्या भारतीय कुटुंबांना इथे सामावून घ्यायची वेळ येईल, तेव्हा या अशा व्यावसायिकांचा आधार आवश्यक ठरेल. दुर्दैवी असलं, तरी यात सायकाॅलाॅजी आणि काउन्सेलिंग या क्षेत्रांमधल्या करियर्स मोठ्या प्रमाणावर दिसून येतील.
स्पर्धात्मक खेळांमध्ये मोठ्या प्रमाणावर आणि नवनवे बदल दिसत आहेत. केवळ खेळाशी संबंधित असलेल्या अनेक व्यवस्थापन पदव्याही आता मिळवता येतात. व्याप्ती वाढू लागल्यामुळे केवळ या एका क्षेत्रातच गेल्या काही वर्षांमध्ये करियरचे १० ते १२ नवे पर्याय जन्माला आले आहेत, आणि त्यासाठी तो खेळ खेळत असणं, संघात असणं हे अजिबात आवश्यक नाही! प्रत्यक्ष न खेळता एखाद्या खेळामध्ये करियर करणं आता फारसं नवं राहिलेलं नाही.
(जाता जाता एक नोंद - किमान ५० विषयांमध्ये एमबीए करता येतं. फायनान्स, एच आर आणि मार्केटिंग हे त्या पन्नासपैकी सगळ्यात जास्त गर्दी असलेले आणि सगळ्यात कमी संधी असलेले पर्याय आहेत.)
काय येईल?
लेखाच्या सुरुवातीला मांडलेला हा सगळ्यात कळीचा मुद्दा. २०२७मधलं जग कोणकोणत्या प्रकारे आपल्याला विस्मयचकित करणार आहे? ग्राहक म्हणून आणि नोकरदार किंवा व्यावसायिक म्हणूनही आपलं आयुष्य कसं असेल? आज दहा-पंधरा वर्षांची असलेली मुलं जेव्हा त्यांच्यासमोर असलेले करियरचे पर्याय निवडतील, तेव्हा ही उत्तरंच महत्त्वाची ठरणार आहेत. इतकंच नाही, तर जी मंडळी आज तिशीत आहेत, त्यांच्यावरही याचे परिणाम होताना दिसतील. कारण करियर हा केवळ एकदा घ्यायचा निर्णय नसून आपण पुढची ३०-४० वर्षं काय करणार आहोत, या प्रश्नाचं उत्तर आहे. ‘नोकरी’ या शब्दाची व्याख्या बदललेली असणार आहे. आणि नोकरी म्हणजे दीर्घकालीन सुरक्षा हे समीकरणही संपलेलं असेल. हवं तिथून काम करण्याची संस्कृती रुळलेली असणार आहे. त्यामुळे 'ऑफिसला जाणं' हा प्रकार फारच कमी झालेला असेल. आणखी एक मोठा फरक पडेल तो स्त्रियांनी आणि पुरुषांनी करायच्या कामांमध्ये. या दोन प्रकारच्या कामांमधलं अंतर झपाट्याने कमी होत नाहीसं होईल. शिवाय जसजसं मनुष्यबळाची जागा उपकरणं घेत जातील, तसतसं पुरुषांनी करायची श्रमाची कामं कमी होत जातील. त्याच वेळी ज्या कामांमध्ये स्त्रिया अजूनही पिछाडीवर आहेत, वरच्या पदांवर पोहोचू शकलेल्या नाहीत, किंवा कमी वेतनावर काम करत आहेत, तिथे परिस्थिती हळूहळू बदलत जाईल.
रिन्युएबल किंवा पर्यायी एनर्जी, रोबोटिक्स, ऑग्मेंटेड रिअॅलिटी, बायोइंजीनिअरिंग ही सगळी नावं यापुढे वारंवार ऐकायला मिळणार आहेत. 'बिग डेटा'च्या मदतीने ट्रम्प यांनी दिलेल्या धक्क्याची तर अजून बहुतेकांना जाणीवही नसावी. हाही ३डी प्रिटिंगसारखाच अकराळविकराळ क्षमता असलेला आणि अनेक संधी देऊ करणारा एक विषय आहे. कला, संवादमाध्यमं, आर्थिक व्यवहार, आरोग्य या क्षेत्रांत आमूलाग्र बदल घडतील. वैद्यकीय सुविधांचा आणि आयुष्यमानाचा दर्जा सुधारल्याने माणसाला बराच जास्त काळ जगता येणार आहे. म्हणजेच ते जगणं सुसह्य करण्यासाठी रोबोटिक केअरगिव्हर्स, अवयवांचं प्रत्यारोपण असे अनेक नवे शोध लावले जातील. मार्केटिंग आणि फायनान्स अशा नोकऱ्यांमध्ये तंत्रज्ञान आणि विश्लेषण अधिकाधिक महत्त्वाचं होईल. कागदी चलन नाहीसं होऊन आभासी चलन त्याची जागा घेईल. क्राउडफंडिंग, शेअर्ड इकॉनॉमी, क्रिप्टोकरन्सी या सगळ्यामुळे आर्थिक व्यवहारांचं रूप पालटेल. अर्थशास्त्रामध्ये नवनवे विषय समाविष्ट होतील. आज शिकवली जाणारी जवळजवळ ३०% कौशल्यं बाद होऊन, त्यांची जागा Spatial Visualisation, Concept Formation, Abstract reasoning अशी नवी कौशल्यं घेतील. आणि हो… या सगळ्या प्रकारच्या मागण्या पुरवण्यासाठी योग्य ते कर्मचारी शोधून देणारी मध्यस्थांची एक नवी जमातही जन्माला येईल!
अवाढव्य जगाचं तळहातावर मावेल असं ग्लोबल खेडं बनताना आपल्या पिढीने ऐकलं आणि प्रत्यक्ष पाहिलंदेखील. 'कनेक्शन'च्या जादुई छडीने हे रूपांतर घडवून आणलंय. 'कनेक्ट' हा आजच्या जगाचा पासवर्ड आहे, आणि पासवर्ड नेहमीच बदलते असतात. या ग्लोबल खेड्याचा नवा पासवर्ड असेल 'आभास'. प्रत्यक्ष वस्तूंची, अनुभवांची जागा त्यांचे आभास घेतील. कपडे विकत घेताना, कार विकत घेताना, अगदी घर घेतानादेखील प्रत्यक्षात पाहणं, हात लावणं वगैरे करावं न लागता त्याऐवजी सिम्युलेटेड, ऑग्मेंटेड रिअॅलिटीचा उपयोग होईल. त्याचबरोबर जेनेटिक बदल घडवलेलं अन्नधान्य, बायोनिक अवयव, त्याहीपुढे जाऊन कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत सर्व काही प्रत्यक्षात येताना दिसेल. नैसर्गिक बुद्धिमत्ता आणि सुज्ञता टिकवून ठेवणं हे आतापासूनच एक मोठं आव्हान ठरत आहे, ते आणखी कठीण होत जाईल.
थोडक्यात सांगायचं, तर बदल व्हायचे कोणासाठी थांबले नाहीत, यापुढेही थांबणार नाहीत. संपूर्णपणे नैसर्गिक आयुष्य जगलेली पिढी यापूर्वीच संपली. आत्ताची पिढी नैसर्गिक संसाधनांवर जगणारी शेवटची पिढी असेल. २०१७मधलं जग हे कल्पनेपलीकडच्या संधींचं आणि शक्यतांचं आहे. आजच्या जगापेक्षा कैक पिढ्या आधुनिक - बहुतांशी माणसाने (बि)घडवलेलं - असणार आहे. आणि उद्याच्या या विश्वामित्री दुनियेची 'एमिनंट सिटिझनशिप' आपल्या मुलांना मिळावी, यासाठी आत्तापासूनच प्लॅन ठरवायला हवा आहे.
- योगिनी नेने (Parenting Coach and Career Planning Mentor)
_F.jpg)
हा आवाका वाचून थक्क व्हायला
वाचूनच अंगावर काटा आला
In reply to वाचूनच अंगावर काटा आला by ट्रेड मार्क
ही सगळी प्रगती फक्त नोक-या
डोळस आढावा
एकेकाळी अतर्क्य वाटणार्या
उत्तम आढावा.
इनि,
भन्नाट भन्नाट भन्नाट!
ह्या नव्या (आभासी ?) जगात
In reply to ह्या नव्या (आभासी ?) जगात by मराठी_माणूस
मोलाचा प्रश्न.
रोचक लेख !
In reply to रोचक लेख ! by सस्नेह
हो. माझ्या कम्पनीमध्ये २ वर्षांपुर्वी
सुंदर लिहिलय इनाबाय.
In reply to सुंदर लिहिलय इनाबाय. by अभ्या..
गुंफाचित्र व्हायलीत
In reply to गुंफाचित्र व्हायलीत by संदीप डांगे
येप्प्प.
In reply to सुंदर लिहिलय इनाबाय. by अभ्या..
टूल्स तर बदलतीलच आणि गरजाही
ओह, एखाद्या कथेसारखं वाटलं.
अगदी पटलं. मुलगी दहावीला आहे,
In reply to अगदी पटलं. मुलगी दहावीला आहे, by प्राची अश्विनी
जरूर, हेच अपेक्षित आहे.
भविष्यातील करियर्स चा उत्तम
जबरदस्त लिहिलंस!
In reply to जबरदस्त लिहिलंस! by पैसा
+1!
रोचक
In reply to रोचक by माहितगार
लेखासाठीं रिसर्च करत असताना
नोकऱ्यासंधी उपलब्ध होत राहणारच आहेत. संपूर्ण जगाच्या अनएम्प्लॉयमेन्टचा गेल्या दहा-वीस वर्षांचा ग्राफ कोणी इथे देऊ शकलं तर यातलं तथ्य समजेल.चांगला आढावा घेतला आहे...
(जाता जाता एक नोंद - किमान ५० विषयांमध्ये एमबीए करता येतं. फायनान्स, एच आर आणि मार्केटिंग हे त्या पन्नासपैकी सगळ्यात जास्त गर्दी असलेले आणि सगळ्यात कमी संधी असलेले पर्याय आहेत.)एमबीए साठीचे राहिलेले ४७ विषय कुठले? त्यांची पण थोडक्यात ओळख करून दिलीत तर उत्तम. तसेच चालू असलेली नोकरी सोडून एमबीए करणे हा पर्याय स्वीकारणारे लोक मी साधारण ८-१० वर्षांपूर्वी पाहिले होते. सध्याच्या काळात एमबीए करण्याला किती महत्व आहे ? आतबट्ट्याचा व्यवहार ठरण्याची भीती वाटते. हातचे सोडून पळत्याच्या पाठी पळायला जावे तसे होईल असे वाटते. (एमबीए : मागणी पेक्षा पुरवठा जास्त, दर्जाचे काय) आयटी क्षेत्रातल्या संधींबद्दल काही परखड मते ऐकायला आवडतील. कामाचे स्वरूप, ताण आणि अपेक्षांचे ओझे यांचा फुगा प्रमाणाबाहेर फुगला आहे असे वाटते. सतत बदलणारे तंत्रज्ञान, ते शिकून त्यात निष्णात होण्यासाठी लागणारा वेळ, श्रम आणि कौटुंबिक पातळीवर त्याची चुकवावी लागणारी किंमत ह्याबद्दल पण मते ऐकायला आवडतील. जगात आलेली आणि पुढे कदाचित येऊ शकणारी उजव्या विचारसरणीची सरकारे, जागतिकीकरणापेक्षा स्थानिक गोष्टींना जास्त महत्व देतील का? त्यांचा करियर ठरवण्यात/बिघडवण्यात नक्कीच मोठा वाटा असेल.उद्याच्या या विश्वामित्री दुनियेची 'एमिनंट सिटिझनशिप' आपल्या मुलांना मिळावी, यासाठी आत्तापासूनच प्लॅन ठरवायला हवा आहे.म्हणजे नक्की काय करायचं ? मुलांचे बालपण हिरावून न घेता हे कश्या प्रकारे करता येईल? व्यावसायिक-कौटुंबिक समतोल सांभाळा असे नुसते मेल पाठवून प्रत्यक्ष्य वेळ आल्यावर मात्र सुट्टी ना देणे किंवा जास्तीचा वेळ काम करायला लागणे, आणि मग त्यातून घरच्यांना वेळ ना देता आल्याची खंत.... ह्या सगळ्याचा सामना आपण आत्तापासूनच करत आहोत, उद्याची पिढी ह्याकडे कश्या तऱ्हेने पाहील ? सतत कोणाशी/ कशाशी तरी कनेक्टेड राहण्याची सवय(खरंतर व्यसन) चांगल्या मार्गाकडे घेऊन जाईल का तुटकपणा वाढून नात्यांवर अजून परिणाम होईल? आणि ह्या सगळ्यात "एक उनाड दिवस" अनुभवलेल्या आणि त्यातली गंमत कळलेल्याचे भवितव्य काय? का तो त्या चित्रातच नसेल? ह्या धाग्यावर चांगल्या चर्चेच्या प्रतीक्षेत . धन्यवाद.In reply to चांगला आढावा घेतला आहे... by तेजस आठवले
चांगला प्रतिसाद! दर्द जाणवतो
In reply to चांगला आढावा घेतला आहे... by तेजस आठवले
तुमच्या प्रतिसादाला उत्तर
In reply to तुमच्या प्रतिसादाला उत्तर by इनिगोय
सुंदर उत्तर! धन्यवाद! सविस्तर
In reply to तुमच्या प्रतिसादाला उत्तर by इनिगोय
माहितीपूर्ण प्रतिसाद. बऱ्याच
परिस्थिती माझं नियंत्रण करतेय की मी परिस्थितीचं - याचं उत्तर माहित असणं, आणि माझी कृती त्यानुसार आधारलेली आहे का, हे वेळोवेळी तपासून पाहणं अत्यंत आवश्यक.हे मात्र खरं. हे ज्याला कळले तो तरला. बऱ्याचदा आपल्याला वाटते की खेळ आपण आपल्याला हवा तसा खेळतो आहोत पण खेळ संपायच्या वेळी लक्षात येते की आपण फक्त एक प्यादे होतो. असो. असेच चांगले प्रतिसाद येउदेत आणि विचारमंथन होऊ दे. धन्यवाद. आपल्या विस्तृत प्रतिसादाबद्दल आभार.In reply to चांगला आढावा घेतला आहे... by तेजस आठवले
तेजस आठवले तुम्ही फार कळीचे मुद्दे मांडले आहेत
In reply to तेजस आठवले तुम्ही फार कळीचे मुद्दे मांडले आहेत by इडली डोसा
तुमचा लेख वाचला, चांगला आहे
+१०००
In reply to +१००० by अजया
बुद्धिमत्ता म्हणजे आपल्या
या विषयावर इथे डिटेल मध्ये
In reply to या विषयावर इथे डिटेल मध्ये by अत्रे
याच्या अपेंडिक्स मध्ये
खूप छान
अत्यंत अभ्यासपूर्ण लेख
In reply to अत्यंत अभ्यासपूर्ण लेख by मनिमौ
लेखात बिग डेटाच्या संदर्भाने
In reply to लेखात बिग डेटाच्या संदर्भाने by इनिगोय
आणि आता
In reply to आणि आता by आनंदयात्री
या नाटकाचा पहिलाअधिकृत अंक
उत्तम
उत्तम लेख!
Tilt Brush
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- We don't talk anymore, we don't talk anymore, We don't talk anymore, like we used to do... (feat. Selena Gomez) :- Charlie Puth [Official Video]लेख आवडला.
चांगला लेख आहे.
@इनिगोय
बेक्क्कार
In reply to बेक्क्कार by प्रसाद गोडबोले
#I am here to live, Not to
#I am here to live, Not to increase GDP#
In reply to बेक्क्कार by प्रसाद गोडबोले
ह्या डार्विन, न्युटन , मेंडेल
मदनबाण.....
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Knight Rider Theme - Only Minimoog Cover