विश्वाचे आर्त - भाग २० - उत्क्रांतीचे पुरावे - भूस्तरीय अवशेष
लेखनप्रकार

वाचने
7500
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
सोप्या भाषेत लिहिलेय. उत्तम लेख. पुभाप्र.
नेहेमीप्रमाणॅ अवांतर प्रश्न :) :
हि सगळी उलथापलथ होत असताना, उत्क्रांती होत असताना, प्राण्यांच्या चयापचय, आणि मुख्य म्हणजे श्वसनसंस्थेवर देखील बरच काहि झालं असणार. आज आपण जे ग्रीनहौस इफेक्ट, भगदाडं पडलेली ओझोन लेयर, वगैरे समस्यांविषयी बोलतो त्याचाही परिचय या उत्क्रांतीसाखळीत कुठेतरी नक्की झाला असणार. उत्क्रांतीप्रक्रीयेत या समस्यांवर ज्या काहि प्रतिक्रीया देण्यात आल्या त्या आजघडीला उपाय म्हणुन काहि मार्गदर्शन करु शकतात का?
In reply to अद्भूत आहे हे सगळं. by अर्धवटराव
उपाय म्हणून नाही, पण आजच्या वातावरणाच्या बदलाकडे गेल्या साडेचार अब्ज वर्षांच्या पार्श्वभूमीवर निश्चितच पाहाता येतं. पृथ्वीच्या इतिहासात आजचं दोनतीन डिग्री सेंटिग्रेड तापमान वाढ म्हणजे काहीच नाही इतकी प्रचंड उलाथाल झालेली आहे. सुरूवातीला पृथ्वीवर ऑक्सिजन अगदी कमी होता. गेल्या काही अब्ज वर्षांत तो वाढून २० टक्क्यांवर आलेला आहे. तसंच पृथ्वीच्या तापमानातही अतोनात बदल झालेले आहेत. हे चित्र पाहा.
मुद्दा असा की आत्तापर्यंत जे नैसर्गिक उत्पात, चढउतार झाले त्यावर उत्क्रांतीतून उपाय सांगणं शक्य नाही. कारण उत्क्रांतीचा मार्ग हा अमुकतमुक टाळण्याचा उपाय शोधणं असा नसून, आहे त्या, बदललेल्या परिस्थितीशी मिळतंजुळतं घेणं हा असतो. मानवाचे सध्याचे प्रश्न आणि त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न हे उत्क्रांतीच्या पलिकडचे आहेत. आत्तापर्यंतच्या इतिहासात कोणीच पृथ्वीपातळीवर बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत. जेव्हा तापमान घटतं तेव्हा जाड केस असलेले प्राणी अधिक टिकतात, आणि कमी केस किंवा थंडीपासून संरक्षण करण्याची क्षमता नसलेल्यांचा वंशच्छेद होतो - याच बदलांना उत्क्रांती म्हणतात. माणसाच्या कुठच्याच प्रश्नांना 'तापमान वाढलं तर ठीक आहे, ज्यांच्याकडे त्यात टिकून राहाण्याची क्षमता नाही ते मरून जातील. जाऊदेत.' असं म्हणण्याची सोय नाही. त्यामुळे आजच्या घडीला उत्क्रांतीतून उपाय न शोधता त्या प्रश्नांवर मात करू शकेल असं तंत्रज्ञान शोधायला हवं.
मुद्दा असा की आत्तापर्यंत जे नैसर्गिक उत्पात, चढउतार झाले त्यावर उत्क्रांतीतून उपाय सांगणं शक्य नाही. कारण उत्क्रांतीचा मार्ग हा अमुकतमुक टाळण्याचा उपाय शोधणं असा नसून, आहे त्या, बदललेल्या परिस्थितीशी मिळतंजुळतं घेणं हा असतो. मानवाचे सध्याचे प्रश्न आणि त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न हे उत्क्रांतीच्या पलिकडचे आहेत. आत्तापर्यंतच्या इतिहासात कोणीच पृथ्वीपातळीवर बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत. जेव्हा तापमान घटतं तेव्हा जाड केस असलेले प्राणी अधिक टिकतात, आणि कमी केस किंवा थंडीपासून संरक्षण करण्याची क्षमता नसलेल्यांचा वंशच्छेद होतो - याच बदलांना उत्क्रांती म्हणतात. माणसाच्या कुठच्याच प्रश्नांना 'तापमान वाढलं तर ठीक आहे, ज्यांच्याकडे त्यात टिकून राहाण्याची क्षमता नाही ते मरून जातील. जाऊदेत.' असं म्हणण्याची सोय नाही. त्यामुळे आजच्या घडीला उत्क्रांतीतून उपाय न शोधता त्या प्रश्नांवर मात करू शकेल असं तंत्रज्ञान शोधायला हवं. उत्तम लेख.
उत्क्रांतीचे पुरावे अधिकाधिक बळकट होऊ लागले आहेत.
वाचत आहे..
शीलांगभूत जीवावशेष यावरून आठवले. प्रसिद्ध लेखक गो नि दा. यांच्या सहवासात काही अचाट चीजा त्यांच्या संग्रही असलेल्या पाहिला मिळाल्या. त्यात एका तुरटी सारख्या दिसणार्या पारदर्शक दगडावर एक द्राक्षाच्या पानासारखे दिसणारे पान
सुमारे अर्धा सेमी बाय अर्धा सेमी या मापात कोरलेले आढळले . गोनीदा कडील एका भिंगातूनच ते दिसत असे.तो एक जीवावशेष आहे असे त्यांचे ठाम मत होते.
त्रोटक वाटला. तरीही उत्कृष्टच, आवडला.
पुभाप्र,
धन्यवाद.
पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत
नमस्कार राजेश सर.
'विश्वाचे आर्त' ही अतिशय छान लेख मालिका आहे. ज्ञानभाषा मराठी या आपल्या whatsapp समुहात आपण दर रविवारी ऑनलाईन वाचन कट्टा हा उपक्रम राबवत आहोत. यामध्ये कोणत्याही एखादा लेख, पुस्तकाचा अंश आम्ही वाचतो. त्याची व्होईस नोट समुहात टाकतो. तुमच्या प्रत्येक लेखाचे वाचन केले तर तुमची हरकत तर नाही ना? कृपया तुमचे उत्तर कळवा. याचा आम्हाला काहीच आर्थिक फायदा नाही. केवळ वाचन संस्कृती जोपासण्यासाठीचा एक उपक्रम आहे.
अतिशय सुंदर लेख मालिका...काही दिवसापासून वाचून समजवून घेत आहे. लेखात भोवतालची उदाहरणे देऊन विज्ञान समजावून सांगितल्याने बऱ्या पैकी समजले (लेखाची अजून काही पारायणे कराय लागतील गोष्टी समजवून घ्यायला). ह्या शेवटच्या लेखाशी सुसंगत एक बातमी लोकसत्ता/सकाळ मध्ये आज वाचली त्याची इंग्रजी मधल्या मूळ बातमीची लिंक देत आहे
Largest-Ever Carnivorous Dinosaur Footprint Discovered in Bolivia
http://www.history.com/news/largest-ever-carnivorous-dinosaur-footprint-discovered-in-bolivia
सोप्या भाषेत लिहिलेय. उत्तम