विश्वाचे आर्त - भाग १७ - डीएनए एक तोंडओळख
लेखनप्रकार

वाचने
6558
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
खरच डोळे दिपवुन टाकणारा व्यवहार आहे हा...
डीएनए रेणूची क्षमता अशी असते की आसपासच्या सामान्य रेणूंतून वाचक निर्माण होतात. ते वाचक हे पुस्तक वाचून इतर अधिक क्लिष्ट वाचक निर्माण करतात. त्यांपासून नवीन रेणू तयार होतात ज्यांमध्ये आपल्या भवतालाच्या परिस्थितीचे - पेशीचे - गुणधर्म ठरवण्याची क्षमता असते.हे थोडंफार अॅडीटीव्ह मॅन्युफॅक्चरींग झालं... पण माणसाला बाय डिफॉल्ट अॅडीटीव्ह मॅन्युफॅक्चरींगची वृत्ती नसते... डीएनए आपली फंडामेंटल वृत्ती कॅरी फॉर्वर्ड करत नाहि ?? (अर्थात, हि फारच जास्त अपेक्षा झाली)
In reply to अन्बिलिव्हेबल... by अर्धवटराव
प्राण्याच्या शरीरात पेशी असतात - पेशींचे गुणधर्म डीएनएद्वारे ठरवले जातात. प्रत्येक पेशी इतर पेशींना जोडलेली असते, या जोडणीतून त्या अवयवाचं कार्य ठरतं. आणि या सर्व अवयवांचा समुच्चय म्हणून त्या प्राण्याचे गुणधर्म ठरतात. या सर्व वरवर जाणाऱ्या पातळ्या आहेत. कुठचीही क्लिष्ट वस्तू अशाच वेगवेगळ्या पातळ्यांनी बनलेली असते. मात्र त्यातला सर्वात लहान कार्यकारी घटक (फंक्शनल युनिट) अतिशय सोपा असू शकतो. त्याचे गुणधर्म आणि वरच्या पातळ्यांचे गुणधर्म हे पूर्णपणे वेगळे असू शकतात.
एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या मेंदूची रचना न्यूरॉन्सनी झालेली असते. एक विशिष्ट न्यूरॉन घेतला तर त्याला इनपुट आणि आउटपुट असतं. इनपुट विशिष्ट पातळीला गेलं की आउटपुट बाहेर येतं. बस्स. इतकी साधी निर्णयप्रक्रिया असते. पण त्यातून आपल्याला दिसणारं मेंदूचं थक्क करून सोडणारं वर्तन दिसतं. प्रत्येक माणसातल्या न्यूरॉन्सची कार्यपद्धती सारखीच - एक प्रकारे यांत्रिक - असली तरी एकाच घटनेला प्रत्येक माणूस वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतो. त्यामुळे तळागाळातली युनिट्स काय आहेत, त्यांचे गुणधर्म काय आहेत हे वरच्या पातळीवर दिसणाऱ्या सिस्टिमला लागू पडेलच असं नाही.
ग्योडेल एश्चर बाख या पुस्तकात मुंग्यांच्या हालचालींतून वारुळाला एक व्यक्तिमत्व प्राप्त होतं अशी कल्पना करून हे खूप छान रीतीने समजावून सांगितलेलं आहे. त्यातून तो होलिझम आणि रिडक्शनिझमवर उत्तम भाष्य करतो.
छान लिहिलं आहे.
मॅट रीडलेने आपल्या जिनोम या पुस्तकात हा विषय अतिशय सविस्तर आणि सोप्या भाषेत मांडला आहे.
कुठल्यातरी देवाने आपोआप हे सगळे तयार केले असे मानण्यापेक्षा हे सत्य डोळे दिपवून टाकणारे आहे. दुर्दैवाने अजूनही बहुतांश मानवजात या तेजस्वी प्रकाशापासून दूर आहे. अंधाराला सरावलेल्या डोळ्यांना अजूनही कचकड्यांच्या प्रकाशाने दिपून जायला होते.परफेक्ट. विज्ञानी हटवादी प्रचारकी प्रसारकी यांपैकी काहीही नसलेलं हे विधान.. आवडलं.
(तुमचं लेखन नव्हे) ही प्रक्रिया.
एका प्रक्रियेतून रेणू बनतात, दुसरी प्रक्रिया त्या रेणूंना जोडून अमिनो आम्ले बनवते. पुढची प्रक्रिया त्या अमिनो आम्लांना जोडून प्रथिने बनवते. आणखी एक प्रोसेस त्या हिमोग्लोबिनला त्यांचं काम करायला लावते.
सुंदर लिहिलेय!
राजेशजी
या मालिकेत अजून लेख टाकणार आहात का ?
डीएनए वा जीन्स मध्ये बदल घडवून काय काय साध्य केले जावू शकते याबद्दल उत्कंठा आहे.
In reply to राजेशजी by मराठी कथालेखक
या मालिकेत अजून अनेक लेख येणार आहेत. मात्र प्रत्येक लेख हा स्वतंत्र निबंध असल्यामुळे नक्की काय काय कव्हर करता येईल, आणि ते नेमक्या कुठच्या क्रमाने येईल हे सांगता येणार नाही. पुढच्या काही लेखांमध्ये उत्क्रांतीच्या पुराव्यांबद्दल माहिती येईल. त्यासाठी कार्बन डेटिंग, भूस्तरीय अवशेष, आणि प्रयोगशाळेत दिसून आलेली उत्क्रांती यावरची चर्चा करणार आहे.
In reply to या मालिकेत अजून अनेक लेख by राजेश घासकडवी
या मालिकेत अजून अनेक लेख येणार आहेत.तोपर्यंत पत्र, आयडी -डूआयडी, पॉपकॉर्न झेलावे लागेल
In reply to राजेशजी by मराठी कथालेखक
डिनए, जीन्स किंवा जीन्सचे परिणाम बदलण्याच्या काही टेकनि़क्स
https://en.wikipedia.org/wiki/CRISPR
https://en.wikipedia.org/wiki/Recombinant_DNA
https://en.wikipedia.org/wiki/Small_interfering_RNA
ह्या तीनही अजून पुर्णत: यशस्वी झालेल्या नाहीत.
मी मेलो की जर का चित्रगुप्ताने मला प्रश्न विचारला की मी मला तिथे पृथ्वीवर काय सर्वात विस्मयकारक आढळले तर माझे उत्तर असेल " सूक्क्ष्म पातळीवर डी एन ए ,व्यक्त पातळीवर पाणी व अव्यक्त पातळीवर मन " ! मिपावरच्या वादावादी लेखांवर आपले लेख अॅन्टीडोट ठरावेत." बॉडी अॅट वॉर" या पुस्तकात "मी" असा एक केमिकल मार्क त्यासोबत यकृत //स्वादुपिन्ड असा एक मार्क असा असतो असा उल्लेख आहे . त्यामुळे एका अवयवाची पेशी दुसरीकडे जाउच शकत नाही. अपवाद कॅन्सरची पेशी.
मस्त झालाय हा भाग पण.
ही सगळी मालिकाच भारी आहे.
वेल एक्सप्लेनड.. मिपावरच्या धुरळ्यात हा लेख हरवला होता. आज मिळाला.
अन्बिलिव्हेबल...