सिंहलव्दीपाची सहल : १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================हॉटेलवर पोहोचून गरम गरम शॉवर घेऊन, जेवण करून, बिछान्यावर पडलो तेव्हा सहलीच्या चवथ्या दिवसात बघायचे पिन्नावाला येथील हत्तींचे अनाथालय आणि लिट्ल इंग्लंड म्हणून ओळखले जाणारे नुवारा एलिया कसे असेल असा विचार करत झोपी गेलो.
सकाळी जाग आल्यावर माझ्या नेहमीच्या सवयीने खिडकीचा पडदा दूर करून बाहेर डोकावलो. मागच्या हॉटेलप्रमाणे या हॉटेलचा परिसरही सुंदर असल्याचे दिसले. श्रीलंकेच्या सर्वात मोठ्या महावेली नदीच्या काठी आणि विषुववृत्तीय पर्जन्यारण्याच्या हिरवाईत गुरफटलेला मनोहारी परिसर दिसला. मग काय, भराभर आवरून आणि भरपेट न्याहारी करून कॅमेरा घेऊन शिकारीवर निघालो.
तेव्हा टिपलेली ही काही सावजे...
महावेली नदीचा परिसर ०१
महावेली नदीचा परिसर ०२
महावेली नदीचा परिसर ०३
महावेली नदीचा परिसर ०४
महावेली नदीचा परिसर ०५
***************
आजचा, चवथ्या दिवसाचा, कार्यक्रम असा होता...
सिंहलव्दीपाची सहल : चवथा दिवस : कँडी --> पिन्नावाला येथील हत्तींचे अनाथालय --> मध्य श्रीलंकेच्या पहाडांतल्या चहाच्या बागांच्या रमणीय प्रदेशातून प्रवास --> नुवारा एलिया (Little England) (वस्ती) (मूळ नकाशा जालावरून साभार)
***************
मार्गदर्शक गाडी घेऊन आला आणि आम्ही पाचूच्या जंगलातून पिन्नावाला हत्ती अनाथालयाकडे निघालो...
कँडीकडून पिन्नावालाकडे जाताना ०१
कँडीकडून पिन्नावालाकडे जाताना ०२
कँडीकडून पिन्नावालाकडे जाताना ०३
कँडीकडून पिन्नावालाकडे जाताना ०४
कँडीकडून पिन्नावालाकडे जाताना ०५
***************
पिन्नावाला हत्ती अनाथालय
महा ओया नदीच्या काठावर नारळाच्या झाडांनी भरलेल्या २५ एकर आवारात श्रीलंका वन्यजीव खात्याने (Sri Lanka Wildlife Department) हे हत्तींचे अनाथालय १९७५ साली सुरू केले. याची सुरुवात मातेचा मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या जंगली हत्तीच्या पिल्लांची काळजी घेण्यासाठी झाली. ब्रिटिशांनी वसाहतवादाच्या कालात शिकारीच्या खेळाच्या नावाखाली हत्तींची अनिर्बध कत्तल केली गेली. या काळाच्या हत्तींची संख्या ३०,००० वरून कमी होऊन ती प्रजाती श्रीलंकेतून नष्ट होण्याच्या उंबर्यावर पोहोचली होती. त्याचा एक उपाय म्हणून इ स १९७८ मध्ये या अनाथालयाला राष्ट्रीय प्राणी उद्यान विभागाकडे (National Zoological Gardens) हस्तांतरित करून त्याच्या कामाचे स्वरूप विस्तारित केले गेले व इ स १९८२ मध्ये हत्तींची संख्या वाढविण्यासाठी कृत्रिम संवर्धन प्रकल्प सुरू केला गेला आहे. एकाच ठिकाणी जगातील सर्वात जास्त पाळीव हत्ती असलेली ही जागा आहे असा या संस्थेचा दावा आहे. सद्या श्रीलंकेतील सर्व (जंगली व पाळीव) हत्तींची संख्या ३,००० च्या घरात पोहोचली आहे. अनाथालयातल्या हत्तींना दिवसातून दोनदा नदीवर पाणी पिण्यासाठी व अंघोळीसाठी नेले जाते. यावेळी मोठ्या हत्तींपासून बाटलीतून दूध पिणार्या पिलांपर्यंत हत्तींच्या सर्व वयोगटांचे जवळून दर्शन होते. अर्थातच हा सोहळा एक मोठे पर्यटक आकर्षण आहे. ही त्या सोहळ्याची काही क्षणचित्रे...
पिन्नावाला हत्ती अनाथालय स्नानसोहळा : ०१
पिन्नावाला हत्ती अनाथालय स्नानसोहळा : ०२
पिन्नावाला हत्ती अनाथालय स्नानसोहळा : ०३
पिन्नावाला हत्ती अनाथालय स्नानसोहळा : ०४
पिन्नावाला हत्ती अनाथालय स्नानसोहळा : ०५
पिन्नावाला हत्ती अनाथालय स्नानसोहळा : ०६
पिन्नावालाकडून नुवारा एलियाकडे जाताना ०१
पिन्नावालाकडून नुवारा एलियाकडे जाताना ०२
पिन्नावालाकडून नुवारा एलियाकडे जाताना ०३
पिन्नावालाकडून नुवारा एलियाकडे जाताना ०४
पिन्नावालाकडून नुवारा एलियाकडे जाताना ०५
पिन्नावालाकडून नुवारा एलियाकडे जाताना ०६
***************
चहा फॅक्टरी
वाटेत आम्ही एका चहा फॅक्टरीला भेट दिली. तेथील मॅनेजरने सर्व फॅक्टरीभर फिरवून चहाची तोडलेली पाने फॅक्टरीत आल्यापासून त्यांच्यापासून बाजारात विकण्याजोगी चहा कसा बनवला जातो याची संपूर्ण प्रक्रिया दाखवली.
चहाची फॅक्टरी ०१ : प्रवेशमार्ग
चहाची फॅक्टरी ०२ : फॅक्टरी इमारत
चहाची फॅक्टरी ०३ : चहा बनवण्याच्या प्रक्रियेतील काही पायर्यांची चित्रे
चहाची फॅक्टरी ०४ : फॅक्टरीचे आवार
***************
येथून पुढचा प्रवास सुरू झाल्यावर एकदम वेगळ्याच परिसरात आल्यासारखे वाटू लागले. आतापर्यंत पाहिलेला श्रीलंकेचा सर्वच भाग सुंदर हिरव्यागार जंगलाने भरलेला होता. इथून पुढे त्याच्यावर वरताण करणारे सौंदर्य दिसू लागले. या डोंगराळ भागात, गाडी जसजशी अधिकाधिक उंचीवर जाऊ लागली, तसतशी भोवतालच्या पर्वतराजीचे व त्यावरच्या वृक्षराजीचे स्वरूप बदलू लागले. निसर्गसौंदर्य अधिकाधिक सुंदर होऊ लागले... जणू या भागाला "लिट्ल इंग्लंड" का म्हणतात याचे पुरावे आता निसर्ग देऊ लागला होता ! अर्थातच, या भागातले सर्वात मोठे आणि सर्वात सुंदर नुवारा एलिया हे शहर पहाण्याचे वेध लागले होते. . (क्रमश : ) ================================================================== सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन... ०२ : औकानाची बुद्धमूर्ती... ०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी... ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान... ०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी... ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह... ०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान... ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)... ०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)... १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर... ११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी... १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी... १३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड... १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास... १५ : याला राष्ट्रीय उद्यान... १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल... १७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो... १८ : कोलंबो... (समाप्त) ================================================================== ==================================================================
भरपूर हिरवाई पाहून छान वाटले.
ह्या भागाची वाट बघत होते,
In reply to ह्या भागाची वाट बघत होते, by यशोधरा
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
हां, अनाथालय म्हणायला मला नको
अभयारण्यातले हत्ती पाहिल्यावर
मस्तं वर्णन. ती हत्तीची
पोच.
नेत्रसुखद भाग! प्रचंड सुंदर..
धन्यवाद !
मस्त
j
वा ......