मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१२ : पाऊस

संपादक मंडळ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
****************************************** छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons) छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ५: "भूक" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६: व्यक्तिचित्रण छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ७: शांतता छायाचित्रणकला स्पर्धा क्र.८ : चतुष्पाद प्राणी छायाचित्रणकला स्पर्धा क्र.९ : सावली छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१० : कृष्णधवल छायाचित्रे छायाचित्रणकला स्पर्धा क्र.११ : प्रतीक्षा ******************************************************** नमस्कार मंडळी! जरा अडखळत सुरुवात झाली, पण आता पाऊस सुरू झाला सगळीकडे. सगळीकडे सृष्टीचे हिरवेगार, शांत रूप बघायला मिळते आहे. मागची स्पर्धा जरा कठीण होती असा विचार बहुसंख्येने ऐकायला मिळाला. यावेळच्या स्पर्धेचा विषय आम्ही कोण ठरवणारे? आपोआपच ठरला तो! सर्वांना सारखंच भिजवणारा पाऊस!
ऋतू हिरवा, ऋतू बरवा, पाचूचा वनी रुजवा युगविरही हृदयावर, सरसरतो मधूशिरवा भिजूनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती नितळ निळया अवकाशी, मधुगंधी तरल हवा -शांताबाई शेळके -
या पावसाचा उत्सव आपापल्या चित्र प्रतिमांमधून इथे साजरा करू यात तर! आधीच्या स्पर्धेच्या धाग्यावर तुम्ही मंडळींनी सुचवलेल्या विषयांची नोंद पुढच्या स्पर्धांसाठी घेतली आहेच. मात्र यावेळी पावसाशिवाय दुसरे काहीच सुचत नाहीये! स्पर्धेसाठी आपापली छायाचित्रे आजपासून १५ दिवसपर्यंत म्हणजे ८ ऑगस्टपर्यंत इथे सादर करा. या स्पर्धेचे नियम आधीच्या स्पर्धांप्रमाणेच. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा आणि वाचकांना धन्यवाद!

वाचने 79365 वाचनखूण प्रतिक्रिया 171

In reply to by Vikrant

श्रीरंग_जोशी Wed, 07/29/2015 - 17:58
त्रुटी:
  • तुम्ही फोटोचा प्रत्यक्ष पत्ता .jpg चा समावेश असलेला न वापरता गुगल फोटोजच्या पेजचा युआरएल वापरला आहे.
  • त्या युआरएल वर गेलो असता फोटो किंवा अल्बमला पब्लिक अ‍ॅक्सेस नसल्याचे दिसत आहे.
उपायः
  • सर्वप्रथम या फोटोला पब्लिकली शेअर करा.
  • गुगल फोटोजमध्ये फोटो उघडल्यावर त्यावर राइट क्लिक करून कॉपी इमेज युआरएलद्वारे प्रत्यक्ष पत्ता मिळवा अन तो पत्ता इथे वापरा.
एक महत्वाची चाचणी:
  • यापुढे इथे फोटो प्रकाशित करताना फोटोचा युआरएल गुगल अकाउंटमधून लॉग आउट करून उघडून पहावा म्हणजे जालावर प्रत्येकाला तो दिसू शकतोय की नाही याची खातरजमा करता येईल.

In reply to by Vikrant

सोंड्या Wed, 07/29/2015 - 12:51
आवडले एकदम गरद लेणी (पळू) जवळील गीरन्यांची* आठवण आली * - गीरी-नद्या याचा अपभ्रंश असावा हा बहुतेक

ढंप्या Wed, 07/29/2015 - 20:49
Paau-1 अजून एक....... Paaus-2 दोन्ही फोटो मोबाईल ने क्लीकले आहेत. (Samsung S-II) टेक्नीकल डिटेल्स ....... माहीत नाही..... ऑटो मोड मध्ये क्लीकले आहेत रस्ता आपला नेहमीचाच..... खोपोली ते पाली याच्यामध्ये कुठेतरी.... २०१३ चे आहेत फोटो.. त्यामुळे आठवत नाही......

In reply to by किल्लेदार

स्पर्धेसाठी दिला असेल किंवा सहज दिला असेल, फोटो पटला नाही. आंतरजालावर सार्वजनिक संस्थळावर वावरताना असे फोटो देऊ नयेत हे माझे वैयक्तीक मत.

In reply to by मधुरा देशपांडे

प्रियाजी Fri, 07/31/2015 - 15:46
मधुरा, मी तुझ्याशी १०० टक्के सहमत आहे. मलाही हा फोटो मि.पा.वर योग्य वाटत नाही.बाकी ज्याची त्याची आवड आणि निवड!!

In reply to by मधुरा देशपांडे

वेल्लाभट Fri, 07/31/2015 - 15:59
ऑलदो, आय से इट्स अ ग्रेट कॅप्चर, पण तुमचं म्हणणं १००% रास्त आहे.

In reply to by कपिलमुनी

एस Fri, 08/07/2015 - 23:05
ते चित्र एस. जी. ठाकूरसिंग यांचे आहे. औंधच्या संग्रहालयात राजा रविवर्मांच्या चित्रांबरोबरच हेही चित्र आहे. पण ते राजा रविवर्माचे नाही.

In reply to by किल्लेदार

ऋतुराज चित्रे Fri, 07/31/2015 - 16:17
स्पर्धेचा विषय निट समजून फोटो टाकावेत. पावसापेक्षा पावसाळ्याचेच फोटो जास्त वाटतात. वरील फोटोतील प्रेमीयुगलासारखे फोटो मिपावर येवू लागले तर भाद्रपदातलेही फोटो यायला लागतील.

In reply to by ऋतुराज चित्रे

चिगो Fri, 07/31/2015 - 17:39
वरील फोटोतील प्रेमीयुगलासारखे फोटो मिपावर येवू लागले तर भाद्रपदातलेही फोटो यायला लागतील.
ह्या वाक्याच्या 'ठ्ठोऽऽ" पोटेंशियलशी सहमत.. पण ह्या फोटोने पावसाचा 'रोमँटीक' किंवा 'प्रणय' मुड बरोबर पकडला आहे असं वाटतं.. ह्या फोटोला 'संस्कारी' विरोध करणारे, 'लहान मुलांचा पावसात बागडण्याचा किंवा कागदी होड्या सोडण्याच्या' फोटोला असाच विरोध करणार का? तो पावसाचा 'निरागस' मुड तसाच हा पावसाचा 'नॉट सो निरागस मुड'..
स्पर्धेचा विषय निट समजून फोटो टाकावेत. पावसापेक्षा पावसाळ्याचेच फोटो जास्त वाटतात.
हे वाक्य ह्या फोटोच्या बाबतीत गैरलागू आहे.. बाकी बर्‍याच फोटोंना मात्र लागू होतंय..

In reply to by चिगो

ऋतुराज चित्रे Sat, 08/01/2015 - 10:22
वरील फोटो विषयाला धरुनच आहे, परंतू बघताना अवघडल्यासारखे वाटते. अशा फोटोंची लाट यायला वेळ लागणार नाही भले मग स्पर्धेचा विषय कोणताही असो. म्हणुन भाद्रपद म्हटले.

In reply to by किल्लेदार

किल्लेदार Fri, 07/31/2015 - 17:46
या छायाचित्रावर संमिश्र प्रतिसाद येणे अपेक्षितच होते. सर्वप्रथम मी संपादक मंडळाला विनंती करतो की छायाचित्र आक्षेपार्ह असल्यास प्रथम इथून काढून टाकावे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य असेल. पण थोडा प्रतिवाद नक्कीच करावासा वाटतो. काही मुद्दे इथे मांडणार आहे पण त्याही आधी संपादक मंडळास काय वाटते ते जाणून घ्यायचे आहे.

In reply to by किल्लेदार

किल्लेदार Tue, 08/04/2015 - 01:28
सर्वप्रथम या छायाचित्राबद्दल …… कुणाच्याही व्यक्तिगत आयुष्यात न डोकावता घेतलेले हे छायाचित्र आहे. (लोणावळ्यात एका चित्रपटाचे छायाचित्रण चालू असताना इतर पाचशे लोकांसमक्ष घेतलेले आहे) १. "आंतरजालावर सार्वजनिक संस्थळावर वावरताना असे फोटो देऊ नयेत" "मलाही हा फोटो मि.पा.वर योग्य वाटत नाही" …. विषयास अनुसरून वाटला म्हणून मी तो इथे दिला. आणि मुळात मिपाकर प्रगल्भ आहेत म्हणूनच तो इथे डकवतांना मला संकोच वाटला नाही. २. पाऊस म्हणजे फक्त नद्या, डोंगर, ओढे आणि निसर्ग-चित्रच असले पाहिजे का ? पहिल्या पावसात पिसारा फुलवणारा मोर, पावसात नाचणारी मुले, भातखाचरात काम करणारे शेतकरी, आडोश्याला बसलेली पाखरे, कडाडणाऱ्या विजा, अगदी खिडकीत ठेवलेली भज्यांची प्लेट आणि बाहेर कोसळणारा पाऊस असे अनेक विषय आणि मूड्स असूच शकतात. चिगो यांनी म्हटले तसे हा मूड पाऊस विषयाला धरून का वाटत नाही ? ३. पाऊस या विषयाला धरून आपल्याकडे कितीतरी सुरेख शृंगारिक गाणी लिहिली गेलीत, छायाचित्रीत झाली आणि लोकप्रिय पण झालीत. त्यातला पाऊस वगळला तर ही गाणी तेवढी परिणामकारक वाटतील का? या छायाचित्रात हाच एक मूड टिपायचा प्रयत्न केला आहे. तरीही मिपाकर सुज्ञ आहेत. त्यांनीच काय ते ठरवावे. बादवे ……. हा स्पर्धेसाठी नाही.

In reply to by किल्लेदार

स्पष्टीकरणाबाबत धन्यवाद. १. फोटो न पटण्यामागे पहिले कारण होते की जर स्पर्धेसाठी दिला असे गृहित धरलं, म्हणजेच तो तुम्ही काढलाय (आंतरजालावरुन घेतलेला नाही) असे समजुन, तेव्हा आता जी पार्श्वभुमी सांगितली (लोणावळ्यात एका चित्रपटाचे छायाचित्रण चालू असताना इतर पाचशे लोकांसमक्ष घेतलेले आहे) ती आधीच दिली असती तर हा एक मुद्दा आला नसता. हे कुणाच्या व्यक्तीगत आयुष्यात न डोकावता घेतले असेल हे वाटत नव्हते, पण आंतरजालावर ज्या प्रमाणात अशा घटना घडु शकतात, त्यामुळे शंका आल्याशिवाय राहात नाही. हे तुम्हाला पर्सनली म्हणत नाहीये. हा किंवा तत्सम फोटो कुणीही टाकला असता तरी हेच वाटले असते. अर्थात तरीही - २ आणि ३. पाऊस म्हणजे फक्त नद्या, डोंगर, ओढे आणि निसर्ग-चित्रच असले पाहिजे का ? पाऊस या विषयाला धरून आपल्याकडे कितीतरी सुरेख शृंगारिक गाणी लिहिली गेलीत, छायाचित्रीत झाली आणि लोकप्रिय पण झालीत. त्यातला पाऊस वगळला तर ही गाणी तेवढी परिणामकारक वाटतील का? असे नक्कीच नाही. पाऊस म्हटला की रोमान्स, प्रणय या बाबी येणारच. आणि त्यावर आक्षेपही नाही. फक्त यातले काही आनंद हे अधिक सार्वजनिक रीत्या सहजगतीने मांडता येतात, तसेच काही हे प्रत्येकाचे खाजगी असु शकतात. हेही अर्थात व्यक्तीसापेक्षा धरुन चालु. पण गाणी कविता लेख यातुन व्यक्त होणे वेगळे आणि या छायाचित्रातुन व्यक्त होणे वेगळे. हे छायाचित्र मला अश्लीलतेकडे झुकणारे वाटले, म्हणुन मी तसे लिहिले. आक्षेप रोमान्सला नव्हता, या छायाचित्रातुन दिसणार्‍या त्या सादरीकरणाला होता आणि म्हणुनच मला मिपावर ते योग्य वाटले नाही. मी फक्त माझे वैयक्तीक मत सांगितले. मिपाकरांची मते वेगळी असु शकतात, त्यामुळे फोटो काढुन टाका असे मी म्हणाले नाही. फक्त पटले नाही हे मत नोंदवले.

प्रभो Fri, 07/31/2015 - 13:52
भेडसे लेण्यांना जाताना एका पानावर जमलेले पावसाचे दवबिंदू... मोबाईल क्यामेर्‍याने टिपलेले. paus

चौकटराजा Fri, 07/31/2015 - 18:49
. एन एच फोर इन रेन स्थळ - वाघजाई उतार -खंडाळा वेळ सकाळी साडे दहा दि. गुरू ३० जुलै २०१५

In reply to by किल्लेदार

चिगो Tue, 08/04/2015 - 14:28
हा अप्रतिम सुंदर फोटो आहे.. हा द्याच स्पर्धेसाठी. आणि कपिलमुनींनी, ज्यांचा फोटो माझ्यामते ह्या विषयातला 'टॉप कंटेंडर' आहे, त्यांनी एवढी खुलून समरसून दाद द्यावी म्हणजे क्या बात.. हा यारानाच सगळ्यात जास्त भावतो मला मिपा आणि मिपाकरांमधे..

In reply to by किल्लेदार

प्यारे१ Tue, 08/04/2015 - 22:13
काय आहे नेमकं हे? कधी नि कसं पकडलंत हे दृश्य ते सांगाल काय? (camera settings बद्दल माहिती नसलेल्या माणसाला समजेल अशा भाषेत सांगता येईल काय)

In reply to by किल्लेदार

किल्लेदार Wed, 08/05/2015 - 00:11
हा एका तळ्याकाठी दुपारी काढलेला फोटो आहे. फोटो काढल्यावर लगेच पाऊस सुरु झाला. इतका जोरात…. की कारच्या काचा पूर्णपणे अपारदर्शक झाल्या. ट्रायपॉड वापरायला सवड आणि जागा पण मिळाली नाही. नाहीतर अजून रौद्र रूप दाखवता आले असते. शिवाय अंधार असल्यामुळे हात स्थिर ठेवतांना कसरत करावी लागली ते वेगळेच. याचे अजून काही सुंदर फोटोज मिळाले पण त्यासाठी एक वेगळा धागा काढावा लागेल.

In reply to by कपिलमुनी

किल्लेदार गुरुवार, 08/06/2015 - 18:33
shutter speed आणि aperture काय घेऊन बसलात कपिलमुनी. वेळच इतका कमी मिळाला की फक्त नीट फ्रेम करून हाणला. पण तरीही landscape घेताना जास्त aperture value घेतलेली चांगली. पण कमी प्रकाश असल्यामुळे ६.३ च ठेऊ शकलो. shutter स्पीड १/६० होती जी हाताने फोटो काढायला पुरेशी नाही. त्यामुळे burst मोड मध्ये बंदूक चालवली. :)….

In reply to by किल्लेदार

एस गुरुवार, 08/06/2015 - 21:32
माझ्या अंदाजाप्रमाणे क्रॉप्ड सेन्सर कॅमेरा + १८-१०५ मिमी लेन्स १८ मिमीवर ठेवली असावी. वाइड अँगलचे परिदृश्य (पर्स्पेक्टिव्ह) फारच छान पकडले आहे. कारमधून घेतलाय तरी एकदम कमी उंचीवरून घेतलाय असे वाटते. लेन्सचा अंदाज बरोबर आहे की अल्ट्रावाइड अँगल लेन्स (११-१६) वापरलीये? बर्स्ट मोडचा वापर करण्याची समयसूचकता आवडली.

In reply to by एस

किल्लेदार Fri, 08/07/2015 - 19:12
कॅनन १००० D + १८-५५ लेन्स वापरले आहे. १८ मी. मी. वर barrel distortion आले आहे आणि त्यामुळे क्षितिजरेषा सरळ ठेवायला त्रास झाला (अजूनही ती सरळ नाहीच). अल्ट्रावाइड अँगल चा भास cropping करून साधला आहे. :) (चला इतरांना पण तसं वाटलं …… लेन्स चे पैसे वाचले :) ) हा फोटो तुम्हाला वाटला तसा खाली बसूनच घेतला आणि नंतर कार मध्ये जाऊन बसताना तारांबळ उडाली…… याचे काही वेगळे फोटोज नंतर नक्की डकविन.

In reply to by पैसा

श्रीरंग_जोशी गुरुवार, 08/06/2015 - 20:24
त्यांनी खालील दुवा वापरला आहे. जो बहुधा अ‍ॅड्रेसबार मधून कॉपी केलाय. फोटोचा दुवा असता तर .jpg अंतर्भूत असतं. https://www.flickr.com/photos/133598057@N08/shares/j81SX1

कोमल गुरुवार, 08/06/2015 - 21:17
कैक दिवसांच्या विश्रांती, मनःशांती, मनोसाधने नंतर आम्ही परतायचा निर्णय घेतला. वाटेत पाहिलं तर गडावर खळबळ दिसली. कानोसा घेतला आणि खबर निघाली की गडावर "छायाचित्रणकला स्पर्धा" चालू आहे. म्हंटंले चलां आंपण पण हजेरीं लांवावी.. ख्याख्याख्या... स्पर्धेसाठी rain Disclaimer: It's not religious photo. The place it was taken is a Hindu temple but intention behind click was not religious
स्पर्धेसाठी rain Disclaimer: It's not religious photo. The place it was taken is a Hindu temple but intention behind click was not religious
खांलील पैंकी कोणताही एक घ्या स्पर्धेसाठी आणि विषय संपवां!!! ख्याख्याख्या rain
rain
सर्व छायाचित्रे गगनबावडा येथे तुफान पावसात काढले आहेत. खॉक् खॉक् खॉ. कॅमेरा: Nikon Coolpix 13 MP Full Resolution: Flickr राम राम

नुकताच पाउस पडून गेला होता ... गडावर वारे सुटले होते आणि ही इवली इवली फुले पाऊस आणि वाऱ्यावर मस्त झुलत आणि नाचत होती! पाऊसवेडी :) पाऊसवेडी फुले