Skip to main content

सोबती

लेखक सुचेता यांनी रविवार, 18/01/2015 या दिवशी प्रकाशित केले.
सुखाला मिळतील सोबती खूप सहायला तुम्ही एकटेच असता कितीही जवळचं वाटलं कोणी शेवटी कडेने पोहणारे निघतात ज्याचं त्याला लागतं भोगावं प्राक्तनात असलेलं चुकत नसतं कुणी किती जरी केला अट्टाहास दैवात लिहलेलं टळत नसतं हेच जर आहे चिरंतन सत्य पाठ फिरवून भागणार नसतं रडतराउ होउन कुंथण्यापेक्षा हसत सामोरं जाणं योग्य असतं
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3390
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

रडतराउ होउन कुंथण्यापेक्षा हसत सामोरं जाणं योग्य असतं
आत्मु गुरुजींनी ही ओळ
रडतराउ होउन कुंथण्यापेक्षा त्रिफळा घेणं योग्य असतं
अशी लिहिली असती का असा विचार करतोय.

मी आत्ता वाचलं पण आत्मु गुरुजींनी वाचलीये कि नाही कोण जाणे

In reply to by टवाळ कार्टा

बुवांचा तो तांब्या!! इतरांचा तो ठोंब्या !! टक्या गुर्जींकडून पर्वानगी घेऊन एक तांब्या फिर्वीत का न्हाइ. (मोका है दस्तूर है म्हणून म्हटलं)

आवडली कविता

सुंदर कविता..