सोबती
लेखनविषय:
काव्यरस
सुखाला मिळतील सोबती खूप
सहायला तुम्ही एकटेच असता
कितीही जवळचं वाटलं कोणी
शेवटी कडेने पोहणारे निघतात
ज्याचं त्याला लागतं भोगावं
प्राक्तनात असलेलं चुकत नसतं
कुणी किती जरी केला अट्टाहास
दैवात लिहलेलं टळत नसतं
हेच जर आहे चिरंतन सत्य
पाठ फिरवून भागणार नसतं
रडतराउ होउन कुंथण्यापेक्षा
हसत सामोरं जाणं योग्य असतं
वाचने
3389
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
वा सुचेता आवडली कविता ..
कविता आवडली. साधी सरळ.
सुरेख. साधेच शब्द पण आशयपूर्ण.
In reply to सुरेख. साधेच शब्द पण आशयपूर्ण by सस्नेह
+१ ,कविता आवडली..
आवडली !!
छान लिहीतेस!!
आवडली कविता.
रडतराउ होउन कुंथण्यापेक्षा हसत सामोरं जाणं योग्य असतंआत्मु गुरुजींनी ही ओळ
रडतराउ होउन कुंथण्यापेक्षा त्रिफळा घेणं योग्य असतंअशी लिहिली असती का असा विचार करतोय.
मी आत्ता वाचलं पण आत्मु गुरुजींनी वाचलीये कि नाही कोण जाणे
In reply to ही ही by सुचेता
यावर १ तांब्या काव्य लिहायला हात शिवशिवत आहेत =))
In reply to यावर १ तांब्या काव्य लिहायला by टवाळ कार्टा
प्रतिभेच्या नळाला पाणी यायची वाट पाहताय का ? *lol*
In reply to मक्काय by सस्नेह
पहिला मान मठाधीपतींचा ;)
In reply to पहिला मान मठाधीपतींचा by टवाळ कार्टा
बुवांचा तो तांब्या!!
इतरांचा तो ठोंब्या !!
टक्या गुर्जींकडून पर्वानगी घेऊन एक तांब्या फिर्वीत का न्हाइ. (मोका है दस्तूर है म्हणून म्हटलं)
आवडली कविता
सुंदर कविता..
सुंदर !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }
वा सुचेता आवडली कविता ..