मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १० : बांतीय साम्रे, प्रे रुप, प्रसात क्रावन आणि कंबोज नृत्य-संगीत-रजनी

डॉ सुहास म्हात्रे · · भटकंती
================================================================== जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६... ७... ८... ९... १०... ११... १२... ================================================================== ...कोरीवकामाचे वर्णन करायचा प्रयत्न मुद्दामच केला नाही... दगडांनी लिहिलेले हे काव्य शब्दात पकडणे केवळ अशक्य आहे. नि:शब्द होऊन ते डोळ्यांनी मनात साठवणेच शहाणपणाचे आहे. यानंतर आम्ही काही मंदिरांना धावती भेट दिली. त्याचा हा धावता आलेख...

बांतीय साम्रे मंदिर

हे सम्राट दुसरा सूर्यवर्मनने (इ स १११३ - ११५०) वाराव्या शतकाच्या मध्यात बांधलेले विष्णूमंदिर आहे. पुनस्थापनेचे अनास्टायलोसिस तंत्र वापरून त्याला जवळ जवळ पूर्णावस्थेत उभे केलेले आहे. ख्मेर मंदिरे बांधण्यासाठी लागणारे दगड मिळणार्‍या कुलेन पर्वतराजीतील खाणींच्या परिसरात राहणार्‍या साम्रे जमातिच्या नावावरून या मंदिराचे नाव पडले आहे. चला तर चक्कर मारू या मंदिरामध्ये...

 बांतीय साम्रे परिसरातले स्वागतालय

.

 बांतीय साम्रे : ०१ : गोपुर

.

 बांतीय साम्रे : ०२

.

 बांतीय साम्रे : ०३

.

 बांतीय साम्रे : ०४

.

 ...... बांतीय साम्रे : ०५ व ०६

.

 बांतीय साम्रे : ०७

.

 बांतीय साम्रे : ०८

.

 बांतीय साम्रे : ०९

.

 बांतीय साम्रे : १० : मंदिर त्याच्या संपूर्णावस्थेत कसे दिसत होते याचे कल्पनाचित्र

.

प्रे रूप मंदिर

हे शिवमंदिर सम्राट दुसरा राजेंद्रवर्मन याने दहाव्या शतकाच्या दुसर्‍या भागात बांधले. याच्या बांधकामाच्या खास शैलीला त्याचेच म्हणजे प्रे रूप शैली असे नाव दिले गेले आहे.

 प्रे रूप : ०१

.

 प्रे रूप : ०२

.

 प्रे रूप : ०३ : ह्या मंदिराच्या मध्यभागातिल पायर्‍यांचा चढ इतका तीव्र आहे की केवळ पर्यटकांनाच नाही तर येथे नेहमी येणार्‍या कंबोडियन लोकांनाही तिरके राहूनच चढ-उतर करावे लागते !

.

 प्रे रूप : ०४

.

 प्रे रूप : ०५

.

 प्रे रूप : ०६ : मंदिराच्या मध्यशिखराच्या आतून शिवपिंडीच्या वरच्या भागाचा फोटो. वरचा मोकळा भाग बहुतेक सोन्याचे शिखर चोरीला गेल्यामुळे उघडा झालेला आहे

.

प्रसात क्रावन मंदिर

सम्राट हर्षवर्धनच्या कालात (इ स ९१५ -९२३) बांधले गेलेले हे शिवमंदिर सम्राटाने बांधलेले नसून बहुतेक त्याच्या दरबार्‍यांपैकी कोणीतरी बांधले असे समजले जाते. याच्या बांधणीचा विशेष म्हणजे या मंदिराची रचना नेहमीच्या ख्मेर परंपरेप्रमाणे चार मनोर्‍यात मध्यभागी मुख्य मनोरा अशी नसून एका रांगेत पाच मनोरे अशी आहे.

 प्रसात क्रावन : ०१

.

 प्रसात क्रावन : ०२ : शिलालेख

.

 प्रसात क्रावन : ०३ : मध्य मनोर्‍यातल्या शिवपिंडी भोवतालच्या भिंतीवरील तांडवनृत्य करणार्‍या शिवाचे उठावचित्र

.

 प्रसात क्रावन : ०४ : मध्य मनोर्‍यातल्या शिवपिंडी भोवतालच्या भिंतीवरील गरूडावर आरूढ झालेल्या विष्णूचे उठावचित्र

.

 प्रसात क्रावन : ०५ : मंदिर त्याच्या संपूर्णावस्थेत कसे दिसत होते याचे कल्पनाचित्र

. थकलेल्या शरीराने आता तक्रार करायला सुरुवात केली होती. संध्याकाळ होऊ लागली होती. शिवाय आज रात्री कंबोज संगीत-नृत्य कार्यक्रम बघायला जायचे होते. त्यामुळे तेथे पूर्ण ताकदीनिशी पोहोचण्यासाठी हॉटेलवर परतून गरम गरम शॉवर घेणे भाग होते. नाईलाजाने परत फिरलो.

कंबोज नृत्य-संगीत-रजनी

पारंपरिक कंबोज नृत्याला "अप्सरा नृत्य" असे म्हटले जाते. अनेक देवळांच्या उठावचित्रांत या अप्सरांना मानाचे स्थान आहे. अंगकोर वट मध्ये तर अप्सरांची वेगवेगळी जवळ जवळ २,००० उठावचित्रे आहेत हे आपण पूर्वीच पाहिले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाबाबत बरीच उत्सुकता होती. तर बघूया त्या कार्यक्रमाची क्षणचित्रे...

 अप्सरा नृत्य : ०१

.

 अप्सरा नृत्य : ०२

.

 अप्सरा नृत्य : ०३

.

 अप्सरा नृत्य : ०४ : राम आणि सीता

.

 अप्सरा नृत्य : ०५

.

 अप्सरा नृत्य : ०६

.

 अप्सरा नृत्य : ०७

. अप्सरा नृत्याचे काही क्षणांची चित्रफीत... . अप्सरा नृत्यांबरोबर मधून मधून लोकसंगीतनृत्याचाही कार्यक्रम होता...

 कंबोज लोककला : ०१

.

 कंबोज लोककला : ०२

.

 कंबोज लोककला : ०३

. कंबोज लोककलेच्या नृत्याच्या काही क्षणांच्या दोन चित्रफिती... . . कंबोज कला आणि कंबोज-आंतरराष्ट्रीय जेवणाचा आनंद घेत संध्याकाळ कशी संपली ते कललेच नाही. उद्याच्या दिवसात अजून काय सुखद आश्चर्याचे धक्के बसणार आहेत असा विचार करत बिछान्याला पाठ टेकवली. (क्रमशः ) ================================================================== जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६... ७... ८... ९... १०... ११... १२... ==================================================================

वाचन 8725 प्रतिक्रिया 18