जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : ६ : महामंदिर अंगकोर वट
...मनातल्या मनात ख्मेर सम्राट बनून विजयी सैन्याची राजवंदना स्वीकारून भारावलेल्या अवस्थेत असताना मार्गदर्शकाने... "चला, आता अंगकोर वट बघायला जाऊया" असं म्हणून भानावर आणले. उत्सुकतेची परिसीमा कशीबशी सांभाळत आम्ही जगातले सर्वात मोठे धार्मिक स्थान असलेल्या जगप्रसिद्ध राजमंदिराकडे निघालो.
अंगकोर वट आकारमान, शिल्पकला आणि कोरीवकामाच्या दृष्टीने खरोखरच महामंदिर आहे. हे मंदिर कंबोज स्थापत्यशैलीचा अत्युच्च नमुना समजला जातो. त्याच्या या शैलीला कंबोडियन अंगकोर वट शैली हे नाव दिले गेले आहे. हे मंदिर आधुनिक कंबोडियाची ओळख बनलेले आहे. त्यामुळेच केवळ कंबोडियाच्या पर्यटनातच नव्हे तर त्याच्या राष्ट्रध्वजावर आणि चलनाच्या नोटांवरही या मंदिराच्या चित्राने मानाचे स्थान पटकावले आहे. १९९२ पासून ते युनेस्को मान्यताप्राप्त जागतिक वारसा स्थान झालेले आहे.
या राजमंदिराची उभारणी सम्राट दुसरा सूर्यवर्मन (इ स १११३ - ११५०) याने बाराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात केली. हे विष्णूमंदिर "वराह विष्णुलोक" या नावाने बांधले गेले. सोळाव्या शतकात बदलत्या राजधर्माबरोबर तेथे बुद्ध उपासना सुरू झाली. जगातील सर्वात मोठी धार्मिक इमारत असलेल्या या बांधकामावर अंदाजे ५०,००० लोकांनी ३० वर्षे काम केले. याच्या सर्वात बाहेर १५०० मी X १३०० मी आकाराची चौकोनी संरक्षक भिंत आहे. त्या भिंतीबाहेर सर्व बाजूंनी २०० मीटर रुंदीचा खंदक आहे. परिघाकडून केंद्राकडे जाताना उंच होत जाणार्या तीन समकेंद्रीत चौकोनी सज्जा (galleries) आहेत. त्या सज्जांना जोडणार्या पूर्वपश्चिम आणि उत्तरदक्षिण अश्या अक्षाकृती सज्जा आहेत. जेथे सज्जे एकमेकाला छेदतात त्या दर ठिकाणी गोपुरे आहेत. द्रविड शैलीचा प्रभाव असलेल्या उंच मध्यावर चार टोकांना चार आणि मध्यभागी एक अशी पाच शिखरे आहेत. मधले शिखर ६५ मीटर (साधारण २२ मजली इमारतीइतके) उंच आहे. शिखरे कमळाच्या कळ्यांच्या आकाराची आहेत. सर्वात मध्यभागी ख्मेरमध्ये बाकान (Bakan) या नावाचा चौरस आकाराचा मंदिराचा केंद्रीय भाग आहे. तेथे जाण्यासाठी उभ्या चढाच्या पाहिर्या आहेत.
संरक्षक भिंतीबाहेरचा खंदक म्हणजे दुग्धसागर, मध्यभागाचा बाकान म्हणजे पाच शिखरे असलेला पौराणिक मेरू पर्वत आणि त्यावरच्या देवलोकात विष्णू व देवतास्वरूप सम्राटाचे वास्तव्य अशी ही ख्मेर परंपरेप्रमाणे असलेली वास्तुरचना आहे.
या मंदिराचे एकूण क्षेत्रफळ ८२०,००० चौ मीटर (२०३ एकर) आहे. अंगकोर पद्धतीप्रमाणे देऊळ सोडून इतर इमारती लाकडाच्या असत त्यामुळे अर्थातच त्या आतापर्यंत नष्ट झाल्या आहेत. तसेच मंदिरातील सुवर्ण, रौप्य, हिरे-माणके इ मध्यकाळात झालेल्या लुटालुटीत नाहीसे झालेले आहे. केवळ उरलेल्या दगडी इमारतीच्या स्थापत्याने आणि त्यातील कोरीवकामाने अंगकोर वटचे इतके नाव झाले आहे तर मग सर्व वैभवासह असलेले हे मंदिर कसे असेल त्याची कल्पना करणेही कठीण आहे.
अंगकोर वट : विहंगम दृश्य (जालावरून साभार)
अंगकोर वट : मंदिरमध्याचे स्थापत्यचित्र (जालावरून साभार)
अंगकोर वट : मंदिरमध्याची प्रतिकृती (जालावरून साभार)
अंगकोर वट : सज्जांवरील उठावचित्रांच्या मालिकांचे स्थान दाखवणारा नकाशा
(http://www.art-and-archaeology.com/ वरून साभार)
अंगकोर वट : खंदक ओलांडून पश्चिम गोपुराकडे नेणारा बंधारा
बाहेरच्या भिंतीच्या गोपुराच्या मनोर्यांची पडझड झालेली आहे. पण तरीही त्यांच्या अवशेषांची भव्यता मन मोहून घेते...अंगकोर वट : पश्चिम गोपुर ०१
.अंगकोर वट : पश्चिम गोपुर ०२
गोपुरापर्यंत पोचेपर्यंत मुख्य मंदिर पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. पण गोपुरापासून दोन्ही बाजूंच्या गोपुराला जोडणारे सज्जे पावलांना थबकवतात. न संपणार्या लहान लहान होत जाण्यार्या दरवाज्यांच्या मालिकेसारख्या दिसणार्या सज्जातून पूर्ण परिक्रमा करणे पुरेश्या वेळेच्या अभावामुळे शक्य नव्हते. तरीसुद्धा दोन्ही बाजूला काही पावले गेल्याशिवाय राहवत नाही...अंगकोर वट : पश्चिम गोपुराला इतर गोपुराशी जोडणार्या सज्जाचा एक भाग
गोपुर ओलांडून आत गेल्यावर ध्यानात येते की "दिल्ली अजून बरीच दूर आहे." कारण पुढे गोपुराला मुख्य मंदिराशी जोडणारा ३५० मीटर लांबीचा, काही मीटर उंचीचा बंधारा (causeway) समोर येतो...अंगकोर वट : पश्चिम गोपुराला मुख्य मंदिराशी जोडणारा बंधारा
सगळ्यात बाहेरची संरक्षक भिंत आणि मुख्य मंदिराच्या इमारतीच्या मधल्या भागात प्राचीन काळी लाकडी घरांची वस्ती होती. आता तेथे थोडी मोकळी जागा आणि इतर ठिकाणी जंगल वाढलेले आहे. बंधार्यावरून काही अंतर चालल्यावर परत मागे वळून गोपुराकडे पाहण्याचा मोह होतोच...अंगकोर वट : मदिराच्या बाजूने पश्चिम गोपुर
बंधार्याच्या प्रत्येक बाजूला एक अश्या दोन विशाल प्राचीन वाचनालयाच्या इमारती आहेत. त्या इमारतींचा आकार आणि बांधणी पाहून ख्मेर साम्राज्यात ज्ञानाची किती आदर केला जात असावा याचा अंदाज येतो...अंगकोर वट : डावीकडचे वाचनालय
.अंगकोर वट : उजवीकडचे वाचनालय
जसजसे आपण अंगकोर वटचे प्रतीक म्हणून वापरलेल्या देखाव्याच्या जवळ येऊ लागलो तसे इमारतीच्या खर्या भव्यतेची कल्पना येऊ लागते आणि ध्यानात येते की प्रतिकचिन्ह संपूर्ण मंदिराला पुरेसा न्याय देउ शकलेले नाही. मूळ इमारत अधिक भव्य, अधिक आकर्षक वाटते...अंगकोर वट : प्रतिकचिन्ह दर्शन ०१
आम्ही भेट दिली तेव्हा दुसर्या पश्चिम गोपूराच्या मुख्य व्दाराच्या पुनस्थापनेचे काम चालू होते. त्यामुळे आम्हाला त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या उपदरवाज्यांपैकी एकाने आत जावे लागले. मध्यमार्गापेक्षा लहान असलेल्या पुर्णाकृती सिंहमूर्तींनी सजवलेल्या या उपमार्गालाही लहान म्हणणे कठीण आहे...अंगकोर वट : दुसरे पश्चिम गोपुर ०२
.अंगकोर वट : दुसरे पश्चिम गोपुर ०३
.अंगकोर वट : दुसरे पश्चिम गोपुर ०४
मध्यमार्गाच्या पाहिर्या चढून आल्यावर एक प्रशस्त स्वागतक आहे. तो स्वागतकक्ष मंदिराच्या सज्जात उघडतो तर उपमार्गांच्या पाहिर्या आपल्याला तडक सज्जात नेवून सोडतात...अंगकोर वट : दुसर्या पश्चिम गोपुराच्या डाव्या उपव्दारातून झालेले मुख्यव्दाराचे दर्शन
.अंगकोर वट : दुसरे पश्चिम गोपुर आणि इतर गोपूरांना जोडणारा सज्जा
हे गोपुर ओलांडून आत गेल्यावर आपण मंदिराच्या मुख्य इमारतीत प्रवेश करतो. दुसर्या आणि तिसर्या सज्जाला जोडणार्या मार्गाच्या प्रत्येक बाजूला दोन अशी दगडी बांधकाम असलेली एकूण चार चौरस आकाराची कुंडे आहेत. आता कोरडी असली तरी देऊळ वापरात असताना ती सतत पाण्याने भरलेली असत...अंगकोर वट : पाण्याचे कुंड
कुंडांच्या आजूबाजूचे आणि इतर सर्व सज्जे कोरीवकामाने सजलेले आहेत. आतापर्यंत सज्जांची भव्यता, सज्जातील कोरीव उठावचित्रे, एकूण इमारतीची लांबी-रुंदी-भव्यता व सज्जांचे जाळे यांच्यात काय बघू आणि काय नको होउन प्रचंड गडबड होत होती. सर्वच भिंती आणि खांबांचे पृष्ठभाग उठावचित्रांनी सजवलेले आहेत. काहीच मनासारखे बघितले जात नाही असे वारंवार वाटत होते...
अंगकोर वट : अप्सरा
अंगकोर वट : उठावचित्रे
पण उठावचित्रे शांतपणे बघण्याअगोदर प्रथम बाकान म्हणजे मंदिराचा सर्वोच्च मध्यभाग बघून घेऊ असे मार्गदर्शक म्हणाला म्हणून आम्ही पुढे निघालो. बाकानला मध्यभाग म्हणत असले तरी केवळ हा भाग म्हणजे मानवनिर्मित दगडी टेकडीवरचे एक पूर्ण मंदिरच आहे...अंगकोर वट : बाकान (मंदिरमध्य) ०१
.अंगकोर वट : बाकान (मंदिरमध्य) ०२
.अंगकोर वट : बाकान (मंदिरमध्य) ०३ व ०४
.अंगकोर वट : बाकान (मंदिरमध्य) वरील अप्सरा
.अंगकोर वट : बाकान (मंदिरमध्य) वरचे कोरीवकाम
.
अंगकोर वट : बाकानचे प्रवेशव्दार
अंगकोर वट : बाकानच्या प्रवेशव्दारावरील नक्षी
मंदिराच्या इमारतींच्या खिडक्या आणि छपरे दगडी आहेत. खिडक्यांना कोरीव दगडाच्या सळया आहेत. छपरांची रचना आणि कोरीवकाम जणू ते छप्पर झाडांच्या फांद्यांनी शाकारलेले दिसावे असे आहे...अंगकोर वट : सज्जाचे बाहेरच्या बाजूने घेतलेले चित्र
.अंगकोर वट : छप्पर
सर्व भिंती कोरीवकामाने भरलेल्या आहेत...अंगकोर वट : बाकानच्या भिंतींवरचे कोरीवकाम ०१
.अंगकोर वट : बाकानच्या भिंतींवरचे कोरीवकाम ०२ व ०३
मंदिरातून फिरताना एका सज्जातून दुसर्या सज्जात फिरताना चारी बाजूला असलेल्या भीती, खांब आणि खिडक्यांमुळे बरेच चाललो आहे हे कळत असले तरीसुद्धा बाकानच्या उंचीवरून मंदिराच्या मध्य आवाराच्या चारी बाजूंचे दर्शन घेतल्यावरच त्याच्या भव्यतेची खरी ओळख पटते...
अंगकोर वट : बाकानमधून दिसणारे मंदिराचे मध्य आवार ०१
अंगकोर वट : बाकानमधून दिसणारे मंदिराचे मध्य आवार ०२
अंगकोर वट : बाकानमधून दिसणारे मंदिराचे मध्य आवार ०३
अंगकोर वट : बाकानमधून दिसणारे मंदिराचे मध्य आवार ०४
अंगकोर वट : बाकानमधून दिसणारे मंदिराचे मध्य आवार ०५
अंगकोर वट : बाकानचा मध्यभाग
अंगकोर वट : बाकानच्या वरच्या मजल्यावरून दिसणारे बाकानचे मध्यशिखर
अंगकोर वट : सज्जा ०१
...
अंगकोर वट : सज्जा ०२ व ०३
...
अंगकोर वट : सज्जा ०४ व ०५
अंगकोर वट : सज्जा ०६
बाहेर येत येत सरतेशेवटी आम्ही खास उठावचित्रांकरता जगप्रसिद्ध असलेल्या सज्जात आलो. तेथे आल्यावर ध्यानात आले की ह्या १८७ मी X २१५ मी आकाराच्या सज्जाच्या एकूण ८०४ मीटर परिघातली सगळी उठावचित्रे नीट पहायची तर दोन पूर्ण दिवसही कमी पडतील, धावत धावत बघायला सहा तास तरी सहज लागतील...अंगकोर वट : उठावचित्रांसाठी प्रसिद्ध असलेल्या सज्जाच्या एका दिशेच्या अर्ध्या भागाची झलक
या वरच्या चित्रात दिसणार्या संपूर्ण भागात साधारण ९० मी X ३ मी आकाराचे महाभारत युद्धाचे एकच उठावचित्र आहे ! या सज्जात तशीच प्रचंड आकाराची इतर अनेक उठावचित्रे आहेत. त्या चित्रांच्या जागा दाखवणारा नकाशा सुरुवातीसच दिला आहेच. उठावचित्रे पाहण्यात गुंतलेले डोळे पायांना त्या सज्जाबाहेर जाउ देण्यास तयार नव्हते. पण "सूर्यास्ताकरता प्रसिद्ध असलेल्या एका मंदिरावर जायचे आहे" असे सांगून आमचा मार्गदर्शक घाई करत होता. नाईलाजाने जेवढी मिळतील तेवढी उठावचित्रे धावत धावत बघितली आणि जमतील तेवढी चित्रे काढून घेतली...अंगकोर वट : सहस्त्रबाहू रावण
.
मस्त. तुमच्या लेखात खरोखर
In reply to मस्त. तुमच्या लेखात खरोखर by विवेकपटाईत
@तुमच्या लेखात खरोखर
संपुर्ण लेखमाला संपल्यानंतर
प्रत्येक भागात प्रतिसाद देत
आई
In reply to आई by बॅटमॅन
+११११११११
खरोखरच महामंदिर आहे.
In reply to खरोखरच महामंदिर आहे. by प्रचेतस
धन्यवाद !
त्या सिंहाच्या मधून जाणार्या पायर्या लाकडी दिसताहेत. त्या पूर्वीच्याच आहेत का हल्लीच बसवल्यात?काही ठिकाणी तुटलेल्या दगडी पायर्यांचे अधिक नुकसान टाळण्यासाठी आणि / किंवा पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लाकडी पायर्या बसवल्या आहेत. चित्रातल्या पायर्या अशा प्रकारे डागडूजी केलेल्या आहेत.In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by प्रचेतस
आता ते बुद्धमंदिर झालेले
In reply to आता ते बुद्धमंदिर झालेले by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by प्रचेतस
एक खुस्पट.
In reply to एक खुस्पट. by बॅटमॅन
माझ्या माहितीप्रमाणे तरी
In reply to माझ्या माहितीप्रमाणे तरी by प्रचेतस
ओह अच्छा, धन्यवाद फॉर द
In reply to धन्यवाद. by प्रचेतस
पहुडलेला बुद्ध (reclining
In reply to पहुडलेला बुद्ध (reclining by डॉ सुहास म्हात्रे
फॅण्टास्टिक.
In reply to फॅण्टास्टिक. by प्रचेतस
नाही. या जालावरच्या आहेत.
In reply to नाही. या जालावरच्या आहेत. by डॉ सुहास म्हात्रे
ओह्ह. ओके.
In reply to ओह्ह. ओके. by प्रचेतस
असेच म्हणतो.
आयला! माणसानं काय काम करुन ठेवलंय!
In reply to आयला! माणसानं काय काम करुन ठेवलंय! by संजय क्षीरसागर
हेच बोल्तो.
स्पेक्टॅक्युलर ! ! थक्क
धन्यवाद !
फक्त एव्हढेच म्हणतो... तुम्ही
ज ह ब ह रा ट
In reply to ज ह ब ह रा ट by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
धन्यवाद !
भाग १ मधे तुम्ही दिलेला
In reply to भाग १ मधे तुम्ही दिलेला by मदनबाण
धन्यवाद !
मात्र मंडल / मंत्र याबाबतचे
सुरेख आणि भव्यदिव्य आहे सगळे!