जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १ : संक्षिप्त इतिहास
==================================================================
जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६... ७... ८... ९... १०... ११... १२...
==================================================================
व्हिएतनाम कम्युनिस्ट असला आणि आधुनिक काळातल्या भयंकर युद्ध आणि नरसंहारातून गेला असला तरी लोक रुक्ष वाटले तर नाहीच पण घरे आणि सार्वजनिक जागांमध्ये त्यांच्यातील जितीजागती कलासक्ती सतत दिसत होती. परतताना विमानतळावरच्या चेकईन काउंटरचा ही देखावाही याची खात्री देत होता...
हो ची मिन् शहराच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मला फार काळापासून बघावे अशी इच्छा असलेल्या कंबोडिया या देशाच्या दिशेने विमानाने भरारी घेतली. हो ची मिन् शहर ते नॉम् पेन् (Phnom Penh) हा जेमतेम २०४ किलोमीटरचा प्रवास चाळीस-पंचेचाळीस मिनिटात संपवून आमचे विमान कंबोडियाच्या राजधानीवर येऊन ठेपले...
......
विमान उतरताना दिसलेले नॉम् पेन् चे विहंगम दृश्य
कंबोडियाचा संक्षिप्त इतिहास
कंबोडियात मानववस्ती केव्हापासून आहे याचे सबळ शास्त्रीय पुरावे तसे अभावानेच मिळाले आहेत. तेथील गुहांमध्ये सापडलेल्या मानवी अवशेषांचे वय इ स पूर्व ४,००० वर्षांचे असल्याचे आणि तेथे इ स च्या पहिल्या शतकापूर्वीपासून भातशेती होत असल्याचे पुरावे सापडले आहेत. मानववस्ती बहुदा याच्याही फार पूर्वीपासून असावी. इ स च्या पहिल्या शतकापासून चिनी व्यापाऱ्यांच्या अहवालांत त्या भागातल्या राज्यांबद्दल आलेल्या उल्लेखांवरून आणि प्राचीन स्थानिक पुराव्यांवरून तेथील संस्कृती, भाषा, लिपी, कला, वास्तू-शिल्पकला, धर्म आणि वर्णव्यवस्था असलेली सामाजिक प्रणाली मोठ्या प्रमाणात भारतीय प्रभावाखाली होती. कंबोडियाच्या इतिहासातील पर्वे साधारणपणे खालीलप्रमाणे आहेत १. फुनानच्या ख्मेर राज्याचा कालखंड : इ स च्या पहिल्या शतकापासून सहाव्या शतकापर्यंत त्या वेळेच्या कंबोडियामध्ये (आताच्या दक्षिण व्हिएतनामच्या मेकाँग खोऱ्यामध्ये असलेल्या) चेनला / फुनान आणि (आताच्या दक्षिण-मध्य व्हिएतनाममध्ये असलेल्या) चंपा राज्यांची माहिती व्हिएतनामच्या सफरीत आली आहेच. या किनारपट्टीवरच्या राज्यांबरोबर अंतर्गत भूमीवरही इतर काही विस्कळीत राज्येही होती. ह्या सर्व भागांतील लोकांना ख्मेर (Khmer) असे संबोधले जाते. त्यांच्या भाषेत अजूनही संस्कृतचा प्रभाव जाणवण्याएवढा आहे. तेथे असलेल्या बंदरांतून होत असलेल्या भारत व चीनमधला व्यापारामुळे हे देश भरभराटीला आले होते. आतापर्यंत सापडलेला ख्मेर भाषेतला सर्वात जुना शिलालेख आणि दगड-वीटेने बांधलेले पहिले हिंदू मंदिर चेनला राज्यांच्या कारकीर्दीतल्या ६ / ७ व्या शतकातले आहे. चेनला राज्य मोडकळीला आल्यानंतर लहान राजे अथवा सरदारांच्या आधिपत्याखाली असलेल्या भागांमध्ये सतत चालू असलेल्या लढाया-चढाओढींमध्ये दोनएक शतके गेली. या अंदाधुंदीच्या काळात जावा-सुमात्रा (आताचे इंडोनेशिया) मधल्या राजांनी कंबोडियाच्या बर्याच भूभागांवर आधिपत्य स्थापन केले होते. या काळातल्या काही राजांची कौडिण्य, श्रीइंद्रवर्मन, जयवर्मन (पहिला), नोरोदोम (नरोत्तम), रुद्रवर्मन, सार्वभौम, भाववर्मन, महेंद्रवर्मन अशी संस्कृतप्रचुर नावे होती. एक खास गोष्ट म्हणजे इ स ६८१ ते ७१३ या कालखंडात चेनला राज्यावर जयवेदी नावाच्या राणीने राज्य केले. २. अंगकोर कालखंड : जावा-सुमात्रा राज्यांत बंदिवासात असणारा एक ख्मेर राजपुत्र नवव्या शतकाच्या सुरुवातीला कंबोडियात परतला आणि त्याने ख्मेर प्रदेश एकत्रित करून त्यावर आपले आधिपत्य स्थापन करायला सुरुवात केली. इ स ८०२ मध्ये त्याने राज्याभिषेक करवून घेऊन राजा दुसरा जयवर्मन या नावाने स्वतःला ख्मेर साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट असे जाहीर केले. त्याच्या राजधानीचे नाव अंगकोर असे होते. त्या जागेला आता "सियाम रीप" असे नाव आहे... या नावाचा अर्थ "सियाम (थायलंडचे जुने नाव) चा पाडाव" असा आहे. दुसरा जयवर्मन आणि पुढच्या २६ सम्राटांनी १५ व्या शतकापर्यंत "आताचा थायलंड, कंबोडिया, लाओस, ब्रह्मदेशाचा काही भाग, मलेशियाचा काही भाग आणि व्हिएतनामचा दक्षिण भाग" एवढ्या विस्तृत प्रदेशावर राज्य केले आणि सर्व दक्षिणपूर्व आशियावर आपला प्रभाव पाडला...
......
ख्मेर साम्राज्य (तांबड्या रंगात) .................................................... सम्राट दुसरा जयवर्मन
(दोन्ही चित्रे जालावरून साभार)
अंगकोर वट (जालावरून साभार)
कंबोडियाचा राष्ट्रध्वज (जालावरून साभार)
वाचने
24578
वाचनखूण
प्रतिक्रिया
46
पहिलाच भाग एकदम जोरदार
In reply to पहिलाच भाग एकदम जोरदार by मुक्त विहारि
++++++११११११
In reply to ++++++११११११ by अत्रुप्त आत्मा
+११११११११११११११ हेच म्हणतो.
In reply to पहिलाच भाग एकदम जोरदार by मुक्त विहारि
+१११११११
वाव !!!
आवडले
लेख व फोटो दोन्ही जबरी
पुढच्या भागात मंदिरांच्या छान
तूफान रोचक!
वाचतोय वाचतोय.
सहीच.... चला अजून एका
In reply to सहीच.... चला अजून एका by सुहास झेले
+१...असेच म्हणतो
जबरदस्त..
आणखी येऊ द्या!
आपल्याला मिपाचे पुनाओक ही
In reply to आपल्याला मिपाचे पुनाओक ही by मराठीच
बळंच??????
In reply to बळंच?????? by बॅटमॅन
@आणि त्याची तुलना पु ना
In reply to आपल्याला मिपाचे पुनाओक ही by मराठीच
@ मराठीच
कंबोडियाच्या राजकीय
In reply to कंबोडियाच्या राजकीय by प्रचेतस
गुंतवणूक चुकलीच म्हणायची ......
In reply to गुंतवणूक चुकलीच म्हणायची ...... by ज्ञानव
धन्यवाद !
In reply to कंबोडियाच्या राजकीय by प्रचेतस
धन्यवाद !
मस्तच.....
मोठ्या आशेने लेख उघडला, आणि
झकास ......
वा वा वा... नेहमी प्रमाणे
खुप छान माहिती.
सुंदर !
वाचतेय.
वा वा वा एक्काजी. अंगकोर वट
मस्त सुरुवात . नविन सहल सुरु
सुरुवात
वाचतीये. किती तो नरसंहार!
मस्तं लेख
हिस्टरी चेनल वर कम्बोडियाचा
धन्यवाद !
आवडले व्वा छान मस्त !!
मस्त!
मजा येणार आहे
धन्यवाद !
खूपच माहितीपूर्ण लेख.
एक्का साहेबांची सफर...
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
वरचा फोटो पाहुन क्रिस्टलच्या
In reply to वरचा फोटो पाहुन क्रिस्टलच्या by मदनबाण
हा योगायोग नाही !
वाचतेय!