चालचलाऊ गीता
Taxonomy upgrade extras
:P आज अचानक श्री. ज. के. उपाध्ये यांची "चालचलाऊ गीता" ही खूप लहानपणी वाचलेली कविता सापडली. मिपाच्या सदस्यांना होळीच्या मेजवानीनिमित्त सादर! होळीच्या रंगीबेरंगी, रंगतदार, रंगीत शुभेच्छा!
पार्थ म्हणे 'गा हृषीकेशी | या युद्धाची ऐशीतैशी
बेहेत्तर आहे मेलो उपाशी | पण लढणार नाही !
धोंड्यात जावो ही लढाई | आपल्या बाच्याने होणार नाही
समोर सारेच बेटे जावाई | बाप, दादे, काके
काखे झोळी, हाती भोपळा | भीक मागूनि खाईन आपला
पण हा वाह्यातपणा कुठला | आपसात लट्ठालठ्ठी
या बेट्यांना नाही उद्योग | जमले सारे सोळभोग
लेकांनो! होऊनिया रोग | मराना का!
लढाई का असते सोपी? मारे चालते कापाकापी
कित्येक लेकाचे संतापी | मुंडकीहि छाटती.'
कृष्ण म्हणे 'रे अर्जुना! | हा कोठला बे! बायलेपणा?
पहिल्याने तर टणाटणा | उडत होतास लढाया
मारे रथावरी बैसला | शंखध्वनि काय केला!
मग आताच कोठे गेला | जोर तुझा मघाचा?
तू बेट्या! मूळचाच ढिला | पूर्वीपासून जाणतो तुला;
परि आता तुझ्या बापाला | सोड्णार नाही बच्चमजी!
अहाहारे! भागूबाई! | म्हणे मी लढणार नाही;
बांगड्या भरा की रडूबाई | आणि बसा दळत!
कशास जमविले आपुले बाप? नसता बिचा-यांसी दिला ताप;
घरी डाराडूर झोप | घेत पडले असते!
नव्हते पाहिले मैदान | तोंवरी उगाच करी टुणटुण;
म्हणे यँव करीन त्यँव करीन | आताच जिरली कशाने?
अरे तू क्षत्रिय की धेड? आहे की विकली कुळाची चाड?
लेका भीक मागावयाचे वेड | टाळक्यात शिरले कोठुनी?'
अर्जुन म्हणे 'गा हरी! आता कटकट पुरे करी;
दहादा सांगितले तरी | हेका का तुझा असला?
आपण काही लढत नाही | पाप कोण शिरी घेई!
ढिला म्हण की भागूबाई | दे नाव वाटेल ते.'
ऐसे बोलोनि अर्जुन | दूर फेकूनि धनुष्य-बाण,
खेटरावाणी तोंड करून | मटकन खाली बैसला |
इति श्री चालचलाऊ गीतायाम प्रथमोध्यायः | :O)
वाचने
55653
वाचनखूण
प्रतिक्रिया
57
झबर्डस्ट!!!!!
In reply to झबर्डस्ट!!!!! by बिपिन कार्यकर्ते
ज ह ब ह
In reply to ज ह ब ह by परिकथेतील राजकुमार
विडंबन...
In reply to विडंबन... by बिपिन कार्यकर्ते
+१
In reply to विडंबन... by बिपिन कार्यकर्ते
(शब्द
In reply to (शब्द by विंजिनेर
चपखल...
In reply to विडंबन... by बिपिन कार्यकर्ते
प्रतिउतारा
लई भारी......
विडंबन लै
क्या बात है!!
In reply to क्या बात है!! by चतुरंग
जस्ट डु इट
फार मस्तं..
In reply to फार मस्तं.. by लिखाळ
खूप जुने...
In reply to खूप जुने... by बिपिन कार्यकर्ते
यशवंत देवांनी
खत्तरनाक आहे
विडंबन
In reply to विडंबन by क्रान्ति
माहितीबद्
In reply to माहितीबद् by लिखाळ
विडंबन
मस्त आहे.
मस्त
भारीच!
प्रतिसाद काढून टाकलाय.
मस्त!
In reply to मस्त! by राघव
सहमत
सही
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
छान
धन्यवाद
भन्नाट...
=))
एक एक ओळ म्हणजे दारुच कोठार.
लय भारी....
=))
क्लासीक
पुढचे अध्याय
In reply to पुढचे अध्याय by क्रान्ति
भन्नाटच...
तु शतजन्मी मीरा !
कहर _/\_
पूजा
In reply to पूजा by क्रान्ति
अगं जे असेल ते ... तुझा ब्लॉग
कविते, करिन तुला मी ठार
In reply to कविते, करिन तुला मी ठार by क्रान्ति
(No subject)
जबरा...
सु-रे-ख!!! कसली अफाट हसले!!
दोन ओळी
धन्यवाद
तुफान....! अजिबात ओढून ताणून
जबराट....
ऐकल्याचे स्मरत आहे.
:P
ज के उपाध्ये यांचे काही विनोद
हे झकास विडंबन वर आणतेय..
जितक्या वेळेला वाचली तितक्या
याचे पुढचे अध्याय मिपाकर लिहु
In reply to याचे पुढचे अध्याय मिपाकर लिहु by जेपी
@तू बेट्या! मूळचाच ढिला |
क्रांतीताई
हहपुवा
बोभाटा झाला ना आता