चालचलाऊ गीता
Taxonomy upgrade extras
:P आज अचानक श्री. ज. के. उपाध्ये यांची "चालचलाऊ गीता" ही खूप लहानपणी वाचलेली कविता सापडली. मिपाच्या सदस्यांना होळीच्या मेजवानीनिमित्त सादर! होळीच्या रंगीबेरंगी, रंगतदार, रंगीत शुभेच्छा!
पार्थ म्हणे 'गा हृषीकेशी | या युद्धाची ऐशीतैशी
बेहेत्तर आहे मेलो उपाशी | पण लढणार नाही !
धोंड्यात जावो ही लढाई | आपल्या बाच्याने होणार नाही
समोर सारेच बेटे जावाई | बाप, दादे, काके
काखे झोळी, हाती भोपळा | भीक मागूनि खाईन आपला
पण हा वाह्यातपणा कुठला | आपसात लट्ठालठ्ठी
या बेट्यांना नाही उद्योग | जमले सारे सोळभोग
लेकांनो! होऊनिया रोग | मराना का!
लढाई का असते सोपी? मारे चालते कापाकापी
कित्येक लेकाचे संतापी | मुंडकीहि छाटती.'
कृष्ण म्हणे 'रे अर्जुना! | हा कोठला बे! बायलेपणा?
पहिल्याने तर टणाटणा | उडत होतास लढाया
मारे रथावरी बैसला | शंखध्वनि काय केला!
मग आताच कोठे गेला | जोर तुझा मघाचा?
तू बेट्या! मूळचाच ढिला | पूर्वीपासून जाणतो तुला;
परि आता तुझ्या बापाला | सोड्णार नाही बच्चमजी!
अहाहारे! भागूबाई! | म्हणे मी लढणार नाही;
बांगड्या भरा की रडूबाई | आणि बसा दळत!
कशास जमविले आपुले बाप? नसता बिचा-यांसी दिला ताप;
घरी डाराडूर झोप | घेत पडले असते!
नव्हते पाहिले मैदान | तोंवरी उगाच करी टुणटुण;
म्हणे यँव करीन त्यँव करीन | आताच जिरली कशाने?
अरे तू क्षत्रिय की धेड? आहे की विकली कुळाची चाड?
लेका भीक मागावयाचे वेड | टाळक्यात शिरले कोठुनी?'
अर्जुन म्हणे 'गा हरी! आता कटकट पुरे करी;
दहादा सांगितले तरी | हेका का तुझा असला?
आपण काही लढत नाही | पाप कोण शिरी घेई!
ढिला म्हण की भागूबाई | दे नाव वाटेल ते.'
ऐसे बोलोनि अर्जुन | दूर फेकूनि धनुष्य-बाण,
खेटरावाणी तोंड करून | मटकन खाली बैसला |
इति श्री चालचलाऊ गीतायाम प्रथमोध्यायः | :O)
वाचने
55661
वाचनखूण
प्रतिक्रिया
57
=)) =)) =)) =)) =))
लहानपणी माझा एक मित्र नेहमी सांगायचा या बद्दल... कधी वाचली नव्हती... झबर्डस्ट!!!!!
बिपिन कार्यकर्ते
In reply to झबर्डस्ट!!!!! by बिपिन कार्यकर्ते
ज ह ब ह र्या च !!
काखे बाटली, हाती ग्लास | चकना मागूनि खाईन खास
दार्जुन
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली
तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो..
आमचे राज्य
In reply to ज ह ब ह by परिकथेतील राजकुमार
परा... साक्षात भगवद्गीतेचे हे विडंबन... ते सुद्धा इतके जुने... म्हणजे सगळ्या विडंबकांसाठी २ चांगल्या गोष्टी...
०१. विडंबनातून भगवद्गीता / व्यास (कोण रे तो फोकलिचा म्हणतोय त्यांना ;) ) सुद्ध सुटले नाहीत. तर बाकिच्यांनी उगाच ओरडू नये...
०२. विडंबनाला फार जुनी प्रंपरा (शब्द बरोबर लिहिला आहे ना. काय आहे आज हात कापत आहेत जरा) आहे.
काय बोल्तो?
बिपिन कार्यकर्ते
In reply to विडंबन... by बिपिन कार्यकर्ते
सहमत सहमत बिपिनभौ ! आयला आमच्या हे लक्षातच आले नाहि की :( अंमळ सध्या आमचे रॉयल स्टॅग उन्हाळ्यामुळे व्हाईट मिश्चीफ झालय त्याचा परिणाम असावा.
ह्या आनंदाच्या बातमी बद्दल तुम्हास्नी आमच्याकडुन येक प्याग !
दार्जुन
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली
तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो..
आमचे राज्य
In reply to विडंबन... by बिपिन कार्यकर्ते
(शब्द बरोबर लिहिला आहे ना. काय आहे आज हात कापत आहेत जरा) आहे.तुम्हाला 'चपखल' म्हणायचे आहे का ;)
In reply to (शब्द by विंजिनेर
हाहाहा!!! आज काहीही करा सगळं चपखल... एरवी चप्पल.... ;)
बिपिन कार्यकर्ते
In reply to विडंबन... by बिपिन कार्यकर्ते
शब्द बरोबर लिहिला आहे ना. काय आहे आज हात कापत आहेत जरा)विडंबनाच्या उतार्यावर प्रतिउतारा घ्यावा लागनार अस दिसतय प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
लई भारी...... ;)
=)) =))
विडंबन लै झ्यॉक...
क्रांतीताई, हा खजिना शोधून आम्हा विडंबनपंथीयांसमोर ठेवल्याबद्दल तुमचे आभार मानावे तितुके थोडके!! :) :)
विडंबनकलेचा उगम बराच जुना आहे हे ह्यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
साक्षात गीतेचे इतके सुंदर विडंबन करणारे हे उपाध्येबुवा आम्हाला जणू म्हणताहेत "जस्ट डू इट!" ;)
चतुरंग
In reply to क्या बात है!! by चतुरंग
साक्षात गीतेचे इतके सुंदर विडंबन करणारे हे उपाध्येबुवा आम्हाला जणू म्हणताहेत "जस्ट डू इट!"
+ १
सहमत. :)
--अवलिया
फार मस्तं.. एकदम मजेदार :)
हे विडंबन साधारण किती साली केले गेले असावे? ज के उपाध्ये कोण..त्यांचे इतर लेखन काय आहे याबद्दल जाणून घ्यावेसे वाटत आहे.
-- लिखाळ.
In reply to फार मस्तं.. by लिखाळ
अगदी लहानपणापासून ज. के. उपाध्यांचं नाव ऐकत आलो आहे. आज वाचनाचा योग आला. त्यांच्या अजूनही काही कविता असतील तर जाणून घ्यायला आवडेल.
बिपिन कार्यकर्ते
In reply to खूप जुने... by बिपिन कार्यकर्ते
संगीतबद्ध केलेलं आणि आशाताईंनी गायलेलं 'विसरशील खास मला' हे गीत लिहिणारे ज.के.उपाध्ये.
http://www.aathavanitli-gani.com/Lists/Lyrics%20Details/J%20K%20Upadhye.htm
पण त्यांचे अजूनही साहित्य नक्कीच असावे. अधिक माहिती आवडेलच.
(त्यांनी विडंबने मूळ नावानीच केली की टोपणनावाने?)
चतुरंग
हे विडंबन.... आवडलं खूप.
धागा दिल्याबद्दल धन्स :)
जयकृष्ण केशव उपाध्ये {१८८२-१९३७}
माझ्याकडे त्यांची उपलब्ध असलेली माहिती अशी आहे - एकीकडे ते परमेश्वरभक्तीची गीते आणि लोकमान्यांसारख्या विभुतींची चरित्रे गाण्यात तल्लिन होतात, तर दुसरीकडे कमालीच्य मिस्किलतेने विनोदी काव्यलेखनातही प्रसन्नपणे रंगून जातात. तल्लख बुद्धिमत्ता आणि सूक्ष्म निरिक्षणशक्ती यामुळे त्यांच्या विनोद्-विडंबनात्मक कवितांना विशेष रंगत चढते. अशा वैशिष्ट्यांमुळेच त्यांचे लेखन मोजके असूनही ते रसिकांच्या लक्षात राहिले आहे.
उपाध्ये यांच्या इतर कविता तसेच साहित्य याच्या शोधात मी आहेच. इतरही कुणाला काही मिळाल्यास अवश्य सांगावे.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
In reply to विडंबन by क्रान्ति
माहितीबद्दल आभार. :)
-- लिखाळ.
मजा आली वाचून.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
खूप मजेशीर आहे..:)
दुसरा अध्याय आहे का?...:)
भारीच! मजेशीर आहे...
कृष्ण म्हणे 'रे अर्जुना! | हा कोठला बे! बायलेपणा? पहिल्याने तर टणाटणा | उडत होतास लढाया=))
चुकीची माहीती होती म्हणून मीच प्रतिसाद काढून टाकत आहे.
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
विडंबनाच्या प्रंपरेबद्दल (बिकांकडून साभार) सगळ्यांनी लिहिलेच आहे वर.
त्यात आणखी एक खास बात जाणवते ती म्हणजे गीतेचा मूळ आशय कायम ठेवत विडंबन केलेलंय!! ;;)
खूप खूप आभार!
राघव
विडंबन मस्त आहे. येथे दिल्याबद्दल अनेक आभार.
मजेशीर विडंबन आहे.
:H सगळ्या मित्रांना धन्यवाद. खर तर "फोडिले भांडार | धन्याचा हा माल | मी एक हमाल | भारवाही |" अजून काही नवी माहिती किंवा या काव्याच्या पुढील भागाबद्दल माहिती मिळाली तर अवश्य देईन.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
इतरही पामरांनी "या" गीतामृताचा लाभ घ्यावा म्हणून धागा वर आणण्याचा प्रपंच.
धन्यवाद पैसातै, खफवर दुवा टाकण्यासाठी.
अरे, याचे पुढचे अध्याय कुठे आहेत?
एक एक ओळ म्हणजे दारुच कोठार. अशी सुरबाण उडल्यागत उडते प्रत्येक ओळ.
हे असल झक्कड विडंबन वर काढल्याबद्दल धन्यवाद.
लय भारी....
=))
अप्रतिम आहे हे ...=))
पुढचे अध्याय आहेत का ?
या विडंबनाचे पुढचे अध्याय कवि. ज. के. उपाध्ये यांना लिहायचे होते, पण ते होऊ शकले नाही. मात्र याच रचनेत आणखी दोन चरण आहेत, ते अलिकडेच वाचनात आले.
अर्जुनाच्या
लढाई का असते सोपी? मारे चालते कापाकापी
कित्येक लेकाचे संतापी | मुंडकीहि छाटती.'
यापुढच्या दोन ओव्या अशा आहेत :
मग बायका बोंबलती घरी | डोई बोडून करिती खापरी [केशवपन प्रथेचा संदर्भ असावा इथे]
चाल चाल कृष्णा माघारी | सोड पिच्छा युद्धाचा
अरे, आपण मेल्यावर | घरच्या करतील परद्वार
माजेल सारा वर्णसंकर | आहेस कोठे बाबा
In reply to पुढचे अध्याय by क्रान्ति
भन्नाटच... :)) :)) :))
तु शतजन्मी मीरा !
क्रांतीच्या आनखी कविता गझला असतिल तर वर आणाल का ??
मज्जा आली वाचुन :D
.
ही माझी नाही बरं. [मी एक हमाल भारवाही] :D
In reply to पूजा by क्रान्ति
अगं जे असेल ते ... तुझा ब्लॉग शोधला .. मिळाला नाहि. .
तु लिहिलेलं बरच वाचायचं असतं .. मग धाग्याची वाट बघत बसावं लागतं :(
थोडसच पण उत्क्रुष्ट लिहितेस .. मला आवडतं .. मनापासुन दाद द्याविशी वाटते ..
समोर चित्रं उभी रहातात तुझ्या ओळीतुन .. आवडतं मला .
ही एक मस्त उपरोधिक रचना मिळाली ज. के. उपाध्ये यांची.
कविते! करिन तुला मी ठार ||धृ ||
पूर्व कवींनी तुज रस पाजुनि मस्त बनविले फार
रस बिस आता मम साम्राज्यी काहि न तुज मिळणार
.......पदलालित्ये जना भुलविले केले नाना चार
भावाची बहु हाव तुला परि अभाव तुज करणार
नादातचि रंगुनी गुंगविसि रसिका करिसी गार
नाद तुझा तो नष्ट कराया समर्थ मी साचार
समृद्ध अर्थे असा मिरविला आजवरी बडिवार
अर्थाचा परि लेश यापुढे तुजला नच मिळणार!
In reply to कविते, करिन तुला मी ठार by क्रान्ति
:D
हहपुवा.
सु-रे-ख!!! कसली अफाट हसले!!
कृष्ण म्हणे अर्जुना | काढ तंबाखु लाव चुना ||
त्याविण माझी सुस्ती जाईना ||
मला वाटायचं कि या ओळी उपाध्यांच्या विडंबनातल्या आहेत. पण तसं नाहि आहे तर.
अर्धवटराव
हा इतका जुना धागा नजरेतून कसा सुटला कोणास ठाऊक! पण ही कविता आहे असे समजल्यावर अनेक वर्षे शोधत होतो पण मिळाली नव्हती. आता गावाला वळसा घालून झाल्यावर मिळाली! :-)
तुफान....! अजिबात ओढून ताणून न करता सहजतेनं केलेलं 'बेन्चमार्क' विडंबन!
हे विडंबन शोधून दिल्याबद्दल बॅट्याला धन्यवाद.
पार्थ म्हणे 'गा हृषीकेशी | या युद्धाची ऐशीतैशी बेहेत्तर आहे मेलो उपाशी | पण लढणार नाही !हाहाहाहा... १९८५ च्या सुमारास या कवितेच्या काही ओळी ऐकल्याचे स्मरत आहे. बहुधा वृत्तपत्रात एक टिकात्मक लेख आला होता, असेही पुसटसे आठवते. कृष्ण म्हणे 'रे अर्जुना! | हा कोठला बे! बायलेपणा? अहाहारे! भागूबाई! | म्हणे मी लढणार नाही; या ओळी अजूनही आठवणीत आहेत. :)
:D
कालच्या पिकनिक मध्ये मित्राने हे विनोद सांगितले
१] उपाध्ये त्यांच्या मित्राकडे गेले असताना मित्राने मोलकरणी मार्फत कळवले की तो बाहेर गेला आहे
हा मित्र काही दिवसांनी त्यांचे घरी आला तेव्हा उपाध्येनी घरातून ते बाहेर गेल्याचे सांगितले
मित्र म्हणाला कमाल करतोस . तू स्वताच बाहेर गेलास असे खोटे का सांगतोस ?
उपाध्ये म्हणाले '' मी मित्राच्या मोलकरणीवरही विश्वास ठेवतो आणि तू खुद्द मित्रावर अविश्वास दर्शवतोस ?"
२] उपाध्ये यांची गंमत करण्यासाठी त्यांचा मित्र म्हणाला
'' काल मुलगी म्हणत होती कुणीतरी पाध्ये मला भेटण्यास आले होते ''
'' म्हणजे ऊ तिच्या डोक्यातच राहिलेली दिसते '' उपाधेंचे उत्तर .
हे झकास विडंबन वर आणतेय.. :)
जितक्या वेळेला वाचली तितक्या वेळेला अगदी मजा आली. :)
याचे पुढचे अध्याय मिपाकर लिहु शकतील या आशेने धागा वर आणत आहे.
In reply to याचे पुढचे अध्याय मिपाकर लिहु by जेपी
@तू बेट्या! मूळचाच ढिला
| पूर्वीपासून जाणतो तुला;
परि आता तुझ्या बापाला
| सोड्णार नाही बच्चमजी!>>>
आगं आयायाअयाअयाआयाअयाआयायायायाया... =)) वाक्या वाक्याला अत्यंत वाइट खपल्या गेलो आहे.. =)) सदर धागा वर आणल्या बद्दल जे.पि.चे अत्यंतिक आभार!
| सोड्णार नाही बच्चमजी!>>> जितक्या वेळी हे विडंबन वाच्लं तितक्या वेळी अशक्य हसलेय.
हा धागा परत वरती आणला म्हणून जे.पी. यांचे खरंच अनेकानेक आभार..
हसून हसून डोळ्यात पाणी आले, म्हणलं धागा वर काढू.
बोभाटा झाला ना आता
झबर्डस्ट!!!!!