✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

फुलपाखरु भाग १

म
मदनबाण यांनी
Tue, 11/01/2011 - 09:27  ·  लेख
लेख
*टिप :--- सॉफ्टवेयर वापरुन कोणताही बदल केलेला नसुन फोटो फक्त रिसाईझ केले आहेत. (पाखरु प्रेमी हौशी फोटुग्राफर) ;)
  • फुलपाखरु भाग २

Book traversal links for फुलपाखरु भाग १

  • फुलपाखरु भाग २ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
19707 वाचन

💬 प्रतिसाद (37)

प्रतिक्रिया

सुरेख

प्रचेतस
Tue, 11/01/2011 - 09:37 नवीन
सुरेख फोटू रे बाणा. फुलपाखरे खूपच छान टिपली आहेत. आम्ही फुलपाखरांचे फोटू काढायला जावं तर ती खट्याळ लगेच उडून जातात. :(
  • Log in or register to post comments

मस्त रे..

गवि
Tue, 11/01/2011 - 09:41 नवीन
मस्त रे..
  • Log in or register to post comments

१ला आणी ३रा

किसन शिंदे
Tue, 11/01/2011 - 09:41 नवीन
मस्तच!! काँक्रिटच्या जंगलात तुला बरी फुलपाखरं गवसली.
  • Log in or register to post comments

काँक्रिटच्या जंगलात तुला बरी

मदनबाण
Tue, 11/01/2011 - 09:48 नवीन
काँक्रिटच्या जंगलात तुला बरी फुलपाखरं गवसली. ठाण्यात ओवळेकरवाडी फुलपाखरांच्या बागेसाठी प्रसिद्ध आहे,दिवाळीत मित्र म्हणाला चलतोस का ? मी म्हणालो येतो. :) जयपाल बरोबर तिथे जायचा विचार बर्‍याच वेळा आला होता,पण काही जमलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

भारी आलेत फोटू.

रेवती
Tue, 11/01/2011 - 19:25 नवीन
भारी आलेत फोटू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

बाणा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/01/2011 - 09:45 नवीन
मस्त रे.........!!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अरे फुलपाखरांचे फोटो काढणं हे

गवि
Tue, 11/01/2011 - 10:25 नवीन
अरे फुलपाखरांचे फोटो काढणं हे महान पेशन्सचं काम आहे. फोटो काढायला त्यांनी स्थिर बसणं हेच महाकठीण. कौतुक आहे तुझं.. मबा, तुझे फोटो इतके मस्त आहेत की फक्त त्यांची ब्यूटी बघावी.. माहितीची गरजच नाही, पण कधीकधी नावाने ओळखून आपली फुलपाखरांशी मैत्री जास्त वाढते असा अनुभव असल्याने न राहवून लिहितोय. स्ट्राईप्ड टायगर, ब्लू टायगर आणि (कदाचित) ब्लू पॅन्सी अशी तीन फुलपाखरं दिसताहेत. पैकी स्ट्राईप्ड टायगर आणि ब्लू टायगर ही दोन्ही वाईट चवीची आहेत (पक्ष्यांच्या दृष्टीने.. गैरसमज नसावा). स्ट्राईप्ड टायगरच्या अळ्या अतिशय रंगीबेरंगी आणि भयंकर असतात. रुईच्या किंवा वडाच्या झाडावर फीड करतात. ब्लू टायगर वाघनखीच्या (भिंतीवर चढणारा वेल वाघनखीच ना?) पानांवर फीड करतात. ही झाडे माहीत असली की ती अळी मिळवता येते. मग घरी बरणीत ठेवून तिला तीच पानं आणून काही दिवस दिली की तिथेच ती कोष करते (त्यासाठी एक झाडाची काडी बरणीत तिरकी ठेवावी. काही दिवसांनी कोष पारदर्शक होऊन बाहेरुनच आतलं बनलेलं फुलपाखरु (फोल्डेड!!) दिसायला लागतं.. ९९ टक्के कोष पहाटेपहाटे उघडतात. सुरळीसारखं ओलसर पाखरु बाहेर येऊन त्या काडीवर लटकतं.. मग पंख हळूहळू उलगडतात. पंख ओले असताना फुलपाखरु अत्यंत असहाय्य असतं. पंख लवकरच वाळून कडक होतात. दहा पंधरा मिनिटांत काडी घराबाहेर न्यायची की ते भुरकन उडून जातं. या सगळ्या प्रक्रियेत अत्यंत अ‍ॅडिक्टिव्ह आनंद आहे...
  • Log in or register to post comments

भारीच

प्रचेतस
Tue, 11/01/2011 - 11:16 नवीन
फुलपाखरांचा तुमचा अभ्यास कमाल आहे गवि. कोषातून बाहेर येत असलेले फुलपाखरू पाहणे नक्कीच आनंददायी अनुभव असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

धन्यवाद विहारी...

मदनबाण
Tue, 11/01/2011 - 11:47 नवीन
धन्यवाद विहारी... :) तुमच्यामुळे फुलपाखरां संदर्भात नविन माहिती कळाली... :) स्ट्राईप्ड टायगर, ब्लू टायगर आणि (कदाचित) ब्लू पॅन्सी अशी तीन फुलपाखरं दिसताहेत. असांच कुठलासा टायगर कोशातुन नुकताच बाहेर आला होता,त्याला टिपण्याची नामी संधी मला त्यावेळी मला मिळाली. तो फोटु मी पुढच्या भागात टाकीन. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

वा वा. टाक लवकर तो

गवि
Tue, 11/01/2011 - 12:00 नवीन
वा वा. टाक लवकर तो फोटो. (कदाचित) ब्लू पॅन्सी अशासाठी म्हटलं की त्याचे पंख मिटलेले आहेत, म्हणून बाहेरची बाजूच दिसतेय. आणि आता फुलपाखरांचा छंद सुटून पंधरा वर्षं झाली आहेत. तू सुंदर दिवसांची आठवण करुन दिलीस म्हणून खूप आभारी आहे. ठाण्यात अशी फुलपाखरांची बाग आहे हे ऐकून आनंद झाला. मी पण येतो तुझ्यासोबत, कधी जाणार असलास तर. अरे प्रत्येक फुलपाखराला ठराविक झाडाचीच पानं लागतात, आणि तसली झाडं आपल्या आजुबाजूला लावली तर फुलपाखरांची बाग बनवता येते. आम्ही फुलपाखरांच्या फॅन मित्रांनी कॉलेजात असताना एका संस्थेच्या एकरभर जागेवर असं प्लॅन करुन प्लँटेशन केलं आणि तिथे फुलपाखरांचं अक्षरशः पीक आलं होतं.. त्याविषयी कधीतरी सांगीन..विशेष म्हणजे परिसरातल्या जवळजवळ सर्व जातींच्या फुलपाखरांनी हजेरी लावली. तिथे तू फोटो काढायला हवा होतास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

मदनबाण: सुंदर प्रकाशचित्रे!

बहुगुणी
Tue, 11/01/2011 - 14:41 नवीन
गवि: मस्त माहिती देताय, त्या 'फुलपाखरी प्लँटेशन'विषयी सविस्तर लेख लिहाच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

सुरेख

ज्ञानराम
Tue, 11/01/2011 - 12:21 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments

छान किती दिसते फुलपाखरु.....

वपाडाव
Tue, 11/01/2011 - 12:50 नवीन
छान किती दिसते फुलपाखरु..... !!!
  • Log in or register to post comments

वप्या, आधी छानच्या आधी

अन्या दातार
Tue, 11/01/2011 - 17:36 नवीन
वप्या, आधी छानच्या आधी 'अय्या' लिहायचे विसरलास का?? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

मस्त रे बाणा.

दादा कोंडके
Tue, 11/01/2011 - 13:40 नवीन
वरून चौथं फुलपाखरु फुलांपेक्षा कचर्‍यावरच जास्त दिसतं!
  • Log in or register to post comments

वॉव

कच्ची कैरी
Tue, 11/01/2011 - 16:03 नवीन
वॉव !!!! मदनबाण तुम्ही काढलेले फोटो आणि गविंनी दिलेली माहिती मस्तच! धागा उघडल्याचे सार्थक झाले.
  • Log in or register to post comments

छान

मीनल
Tue, 11/01/2011 - 19:39 नवीन
सुंदर. अप्रतिम
  • Log in or register to post comments

मस्त!

पैसा
Tue, 11/01/2011 - 19:43 नवीन
सगळेच फोटो आणि गविनी दिलेली माहिती मस्त!
  • Log in or register to post comments

अत्यंत सुरेख फोटू रे बाणा!

चतुरंग
Wed, 11/02/2011 - 00:03 नवीन
प्रत्येक चित्रात फोकस अतिशय छान साधला आहेस आणि फुलांची पार्श्वभूमी अचूक निवडली आहेस. पेशन्सला दाद. गविंनी दिलेली माहितीसुद्धा अतिशय मनोरंजक आहे. एक लेख होऊन जाउदे राव. -रंगा
  • Log in or register to post comments

व्वा व्वा... लई भारी... !!

सुहास झेले
Wed, 11/02/2011 - 10:52 नवीन
व्वा व्वा... लई भारी... !! पुढचा भाग लवकर येऊ देत.
  • Log in or register to post comments

फुलपाखरं

सुधांशुनूलकर
Wed, 11/02/2011 - 14:39 नवीन
फोटो खूप छान आले आहेत. क्र. २ फोटोमधलं फुलपाखरु आहे 'ग्रास डेमन'. हे छोटंसं फुलपाखरु स्किपर (फॅमिली हेस्परिडी) या जातीचं आहे. पावसाळा आणि हिवाळा-उन्हाळा या ॠतूंमधे ग्रास डेमनच्या पंखांवरची रंगसंगती वेगवेगळी असते. स्किपर जातीच्या फुलपाखरांचं वैशिष्ट्य म्हणजे, यांच्या अळ्या पानाची बोगद्यासारखी गुंडाळी करून त्यात रहातात. त्या बोगद्यातच त्यांचा कोष होतो. यांचे डोळे मोठाले असतात. फोटो क्र. ४ मधलं फुलपाखरू 'कॉमन बुशब्राऊन' आहे (ब्लू पँझी नव्हे). अधिक माहिती इथे वाचा. गविंनी लिहिलंय : काही दिवसांनी कोष पारदर्शक होऊन बाहेरुनच आतलं बनलेलं फुलपाखरु (फोल्डेड!!) दिसायला लागतं.. ९९ टक्के कोष पहाटेपहाटे उघडतात. सुरळीसारखं ओलसर पाखरु बाहेर येऊन त्या काडीवर लटकतं.. मग पंख हळूहळू उलगडतात. पंख ओले असताना फुलपाखरु अत्यंत असहाय्य असतं. पंख लवकरच वाळून कडक होतात. दहा पंधरा मिनिटांत काडी घराबाहेर न्यायची की ते भुरकन उडून जातं. या सगळ्या प्रक्रियेत अत्यंत अ‍ॅडिक्टिव्ह आनंद आहे... अगदी खरं आहे ते ! रेड पियरो या जातीच्या फुलपाखराचा संपूर्ण जीवनक्रम मी दीड-दोन इंचावरून चित्रित (व्हिडिओ चित्रण) केला आहे. त्यात फुलपाखरू कोषातून बाहेर येताना स्पष्टपणे दिसतं. फुलपाखराच्या जन्माविषयी एक फार सुंदर आठवण लिहीन तेव्हा तो व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करीन. बाकी, फुलपाखरांवरच्या धाग्यांना सुरुवात केली ती जागुताईंनी (माझ्या आठवणीप्रमाणे). एका नव्या, इंटरेस्टिंग विषयाला सुरुवात केल्याबद्दल त्यांचे आभार मानायला हवेत !
  • Log in or register to post comments

खुपच सुंदर.. मस्त फोटु..

मराठमोळा
Wed, 11/02/2011 - 15:02 नवीन
खुपच सुंदर.. मस्त फोटु.. एकदम आवडेश. :)
  • Log in or register to post comments

छान आलेत फोटो

जाई.
Wed, 11/02/2011 - 18:55 नवीन
छान आलेत फोटो
  • Log in or register to post comments

अप्रतिम!!

पूनम ब
Wed, 11/02/2011 - 19:50 नवीन
अप्रतिम..खूपच सुरेख आहेत सर्व फोटो..
  • Log in or register to post comments

मस्तं.

दत्ता काळे
Wed, 11/02/2011 - 19:57 नवीन
फोटो सुरे़ख आले आहेत.
  • Log in or register to post comments

सुरेख

अतुल पाटील
Wed, 11/02/2011 - 21:40 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments

बाणाकडून जरा वेगळ्या पाखरांची

पिंगू
Wed, 11/02/2011 - 22:59 नवीन
बाणाकडून जरा वेगळ्या पाखरांची अपेक्षा होती.. ;) - (बाणाचा मित्र) पिंगू
  • Log in or register to post comments

निव्वळ अप्रतिम .खूप आवडले.!!

प्रकाश१११
Wed, 11/02/2011 - 23:06 नवीन
निव्वळ अप्रतिम .खूप आवडले.!!
  • Log in or register to post comments

प्रतिक्रिया देणार्‍या सर्व

मदनबाण
गुरुवार, 11/03/2011 - 10:03 नवीन
प्रतिक्रिया देणार्‍या सर्व मंडळींचा म्या लयं लयं आभारी हाय. :) लवकरच पुढचा भाग टाकेन.
  • Log in or register to post comments

लै भारी फोटो,

५० फक्त
गुरुवार, 11/03/2011 - 11:52 नवीन
लै भारी फोटो,
  • Log in or register to post comments

वा! बुवा. सुंदर फोटो काढले आहेत. आवडले.

नरेंद्र गोळे
गुरुवार, 11/03/2011 - 18:44 नवीन
वा! बुवा. सुंदर फोटो काढले आहेत. आवडले. कमालीची स्पष्टता आणि सापेक्षपृथकता (रिझोल्युशन) आहे प्रकाशचित्रांच्या कडांमधे. सुरेख.
  • Log in or register to post comments

सुरेख

सोत्रि
गुरुवार, 11/03/2011 - 18:56 नवीन
खुप छान फोटो! - (मन फुलपाखरू झालेला) सोकाजी
  • Log in or register to post comments

कॅमेरा फॉर्मात रे, आता लेखणी

सुहास..
गुरुवार, 11/03/2011 - 19:59 नवीन
कॅमेरा फॉर्मात रे, आता लेखणी पण येवु देत !
  • Log in or register to post comments

सुंदर फोटो

हुकुमीएक्का
Fri, 06/06/2014 - 00:07 नवीन
फोटो सुंदर आलेत. चौथा आणि शेवटचा तर एकदम झकास.
  • Log in or register to post comments

नेकी और पूछपूछ

एस
Fri, 06/06/2014 - 12:49 नवीन
@सुधांशुनूलकरसाहेबः
रेड पियरो या जातीच्या फुलपाखराचा संपूर्ण जीवनक्रम मी दीड-दोन इंचावरून चित्रित (व्हिडिओ चित्रण) केला आहे. त्यात फुलपाखरू कोषातून बाहेर येताना स्पष्टपणे दिसतं. फुलपाखराच्या जन्माविषयी एक फार सुंदर आठवण लिहीन तेव्हा तो व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करीन.
@गविसाहेब:
गवि: मस्त माहिती देताय, त्या 'फुलपाखरी प्लँटेशन'विषयी सविस्तर लेख लिहाच!
दोघांनाही - नेकी और पूछपूछ? आत्तापर्यंत टाकला नसेल तर कृपया टाका आणि टाकला असेल तर लिंक द्या. बादवे, मदनबाण - खूप छान प्रतिमा.
  • Log in or register to post comments

फोटो छान आलेत

हुकुमीएक्का
Fri, 06/20/2014 - 22:19 नवीन
फुलपाखरांचे फोटो काढताना फोटोग्राफरचा खरा कस लागतो. कारण जराशी हालचाल झाली की फुलपाखरू उडून जाते. त्यामुळे कॅमेरा सेटिंग, बॅकग्राऊंड, व जास्त हालचाल न करता कॅमेरा सेट करणे ह्या सर्व गोष्टींसाठी खुप वेळ जातो. Patience खुप लागतात. फोटो छानच आलेत. *good*
  • Log in or register to post comments

मस्त!

बोका-ए-आझम
Fri, 11/21/2014 - 20:33 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा