मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कानसेन कोण - भाग ११ (आतापर्यंत पंचाहत्तर विजेते!!)

बहुगुणी · · जनातलं, मनातलं
जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे किंवा कधी कधी अंतरे मी आणि माझे इथलेच काही सहकारी पेश करु, तुमच्यातील 'कानसेनां'नी ते गाणं ओळखायचंय. अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत. सहभागाबद्दल सर्वांचे धन्यवाद! पाहूयात पुढचे कानसेन कोण होतात ते... - बहुगुणी या आधीचे दुवे: भाग १ , भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८ , भाग ९, भाग १० ***************** कानसेन क्रमांक ७६: प्रभो कानसेन क्रमांक ७७: प्रभो कानसेन क्रमांक ७८:मेघवेडा कानसेन क्रमांक ७९: स्वप्निल कानसेन क्रमांक ८०: स्वप्निल कानसेन क्रमांक ८१: स्वप्निल कानसेन क्रमांक ८२: रेवती आणि मस्त कलंदर कानसेन क्रमांक ८३: कानसेन क्रमांक ८४: *****************

वाचने 15524 वाचनखूण प्रतिक्रिया 52

मस्त कलंदर Sat, 07/10/2010 - 02:12
या पानाला कुणी ऑटोरिफ्रेशर बसवा रे....आम्ही पाहायच्या आत हा दुष्ट प्रभो येऊन गाणं ओळखून जातो.... :( मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

मस्त कलंदर Sat, 07/10/2010 - 02:17
रूक जाना नहीं तू कहीं हारके? मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

In reply to by Nile

मेघवेडा Sat, 07/10/2010 - 02:28
तुम्ही कुठल्या हाताने काय करता हे जाणून घ्यायची इथे कुणाचीही इच्छा नाही तस्मात् उगाच फालतु एक्स्क्युजेस देऊ नये! ;)

In reply to by मेघवेडा

Nile Sat, 07/10/2010 - 02:44
शिंच्या गाणं फक्त पहिल्या सेकंदात ओळखलं होतं. माझी लिस्ट जाउन पहा, पहिलंच गाणं आहे. साला झोपेत्बी नायचुकाच. इथं आमचं नेट बी जरा स्लो आहे आज. :| -Nile

गणपा Sat, 07/10/2010 - 02:26
आमच गाण १/४ डाउनलोड होत नाहि तो पर्यंत हे फास्ट नेट वाले माजुर्डे उत्तर देउन पसाअर होतात.. त्यात परत ते पुर्व परिक्षण कराव लागत.. आरे हाट आम्ही आता हात टेकले बाबा. :( तुमच चालुद्या =)) आम्ही नुसत्या टाळ्या वाजवतो.

बहुगुणी Sat, 07/10/2010 - 02:39
२ मिनिटांत या प्रश्नाचं उत्तर नाही आलं तर मी उत्तर देईन, आणि एक शेवटचा प्रश्न देऊन आपली रजा घेईन. आपल्यापैकी खूप जणांच्या खरडी, व्य नि आले आहेत, मी ते सर्व वाचले, सर्वांचा आभारी आहे.

In reply to by प्रभो

रेवती Sat, 07/10/2010 - 02:53
ते 'आवारा' वगैरे नंतर बघता येइल. आधी स्वत:ला आवर! आता तू रिटायर होरे बाबा! रेवती

मस्त कलंदर Sat, 07/10/2010 - 02:46
घर आया मेरा परदेसी http://video.google.com/videoplay?docid=-5428189714904706996# मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

मस्त कलंदर Sat, 07/10/2010 - 02:54
आमच्याकडे रात्र झालीय. त्यामुळे आता मेघवेडा आणि गणपा ची इनिंग.. आधी स्ट्राइक गणपाकडे... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

गणपा Sat, 07/10/2010 - 02:57
खुप छळलत लेकांनो पण आम्ही दर्यादील आहोत सध्या सुरवात म्हणुन एकदम सोप्प गाण टाकतोय... हिंदी गाण आहे..... घ्या तुम भी क्या याद करोगे किसी ठाकुर से पाला पडा था ;)

मेघवेडा Sat, 07/10/2010 - 03:07
हे घ्या.. कानसेन क्र. ८० साठी! अलिकडच्याच काळातील हिंदी गाणं आहे. त्याचा अंतरा आहे!

मेघवेडा Sat, 07/10/2010 - 03:18
रेवती तै हिंट काय करायचीय आता.. स्वप्नील ने ओळखलं सुद्धा.. कानसेन क्र. ८० स्वप्नील. :) हे घ्या.. आणखी एक अलीकडच्याच हिंदी गाण्याचा अंतरा. आधीच क्लू देतो यात आमची प्राणप्रिय अभिनेत्री अर्थात दीक्षितांची माधुरी आहे! :)

मेघवेडा Sat, 07/10/2010 - 03:38
शाब्बास स्वप्नील हॅटट्रिक झाली आहे! पुढे: क्र. ८२ .. अतिशय भक्तिरसपूर्ण मराठी गाण्याचा हा सुंदर मुखडा!

मस्त कलंदर Sat, 07/10/2010 - 03:42
जय शारदे वागेश्वरी जी सापडली ती लिंक टाकलीय मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

मेघवेडा Sat, 07/10/2010 - 03:45
येस्स! कानसेन क्र. ८२ : रेवती आणि मस्त कलंदर! आता घेऊ एक छोटासा ब्रेक. यापुढची गाणी नव्या धाग्यावर कुणीतरी चालू करेलच! तोवर कुठेही जाऊ नका असं टीव्ही अँकर स्टाईलमध्ये मी अजिबात म्हणणार नाहीये. हवं तिथे जा आणि आरामात या! :D मिलते हैं ब्रेक के बाद! ;)