न्हाऊ कशी सख्या रे
तनु चंद्र जाहलेली
काया अजून आहे
स्पर्शात माखलेली..
न्हाऊ कशी सख्या रे
आताच फूल झाली,
कळी काल मोग-याची
केसांत माळलेली.
न्हाऊ कशी सख्या रे
अंगांग पेटलेले,
ते तेवतात अजुनी
तू दीप लावलेले.
न्हाऊ कशी सख्या रे
मृद्गंध आसपास,
जो कोसळून गेला
पाऊस काल खास.
न्हाऊ कशी सख्या रे
देही चितारलेले,
जे शब्द जाफरानी
ओठी तुझ्या न आले..
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
10327
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडली...
वाह!
In reply to आवडली... by कर्नलतपस्वी
वा, कर्नल साहेब!
In reply to आवडली... by कर्नलतपस्वी
ही घ्या
In reply to वा, कर्नल साहेब! by तुषार काळभोर
प्राचीताई...
परवानगी कसली त्यात! डकवा की
धन्यवाद ताई
कविता मस्तच
धन्यवाद!
In reply to कविता मस्तच by राजेंद्र मेहेंदळे
वाहवा!
Thank you. आणि तुमच्या
In reply to वाहवा! by चांदणे संदीप
सैल असावी मिठी... ची आठवण झाली. :)
In reply to वाहवा! by चांदणे संदीप
:):)
In reply to सैल असावी मिठी... ची आठवण झाली. :) by तुषार काळभोर
आवडली
प्रचेतस, thanks;)
In reply to आवडली by प्रचेतस
नको रे असा दूर जाऊ सख्या तू..
पावसाळी हवा आहे म्हणुन :)
In reply to नको रे असा दूर जाऊ सख्या तू.. by राघव
अर्र्रर्.:)
In reply to पावसाळी हवा आहे म्हणुन :) by राजेंद्र मेहेंदळे
राघवा, वा!
In reply to नको रे असा दूर जाऊ सख्या तू.. by राघव
शब्द जाफरानी
शुक्रन|:)
In reply to शब्द जाफरानी by चित्रगुप्त
व्वा, सुंदर
धन्यवाद!
In reply to व्वा, सुंदर by चौथा कोनाडा
आवडली !
धन्यवाद!
In reply to आवडली ! by अवतार
प्रतिभासंपन्न
दुसरी बाजू ...
हा हा हा!
In reply to दुसरी बाजू ... by किल्लेदार
अर्र र्र र्र!!
In reply to हा हा हा! by राघव
खिक्क!
अरे ते "न्हाऊन" आहे "खाऊन" नव्हे