सख्या रे..
लेखनविषय:
काव्यरस
न्हाऊ कशी सख्या रे
तनु चंद्र जाहलेली
काया अजून आहे
स्पर्शात माखलेली..
न्हाऊ कशी सख्या रे
आताच फूल झाली,
कळी काल मोग-याची
केसांत माळलेली.
न्हाऊ कशी सख्या रे
अंगांग पेटलेले,
ते तेवतात अजुनी
तू दीप लावलेले.
न्हाऊ कशी सख्या रे
मृद्गंध आसपास,
जो कोसळून गेला
पाऊस काल खास.
न्हाऊ कशी सख्या रे
देही चितारलेले,
जे शब्द जाफरानी
ओठी तुझ्या न आले..
वाचने
10327
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
कविता मोरपीस सारखी आहे.
सख्या कदाचित असे उत्तर देईल.
धुंद आठवणी त्या
साठव मन कुपीत
सांगू नकोस कोणा
तू कालचे गुपीत
In reply to आवडली... by कर्नलतपस्वी
वाह!
In reply to आवडली... by कर्नलतपस्वी
दुसर्या बाजूच्या प्रतिक्षेत..
In reply to वा, कर्नल साहेब! by तुषार काळभोर
https://www.misalpav.com/user/34339
कविता एकांगी वाटते. परवानगी असेल तर दुसरी बाजू डकवतो. तयार आहे.
सख्याचे म्हणणे आहे,विडंबन नाही.
परवानगी कसली त्यात! डकवा की खुशाल. आणि विडंबन असेल तरीही चालेल. सृजनाचंं नेहमीच स्वागत
👍
अर्थही लागतोय आणि वृत्तातही चपखल बसतेय. आवडली.
In reply to कविता मस्तच by राजेंद्र मेहेंदळे
धन्यवाद!
आणखी एक सुंदर रचना. सैल असावी मिठी... ची आठवण झाली. :)
सं - दी - प
In reply to वाहवा! by चांदणे संदीप
Thank you. आणि तुमच्या स्मरणशक्तीला सलाम!
In reply to वाहवा! by चांदणे संदीप
मलापण आठवण झाली, पण कशाची ते आठवत नव्हतं!
In reply to सैल असावी मिठी... ची आठवण झाली. :) by तुषार काळभोर
:):)
सुरेख रचना
In reply to आवडली by प्रचेतस
प्रचेतस, thanks;)
नको रे असा दूर जाऊ सख्या तू..
सुगंधाविना, मोगरा, पोरका तू..
सांगू कसे, का फुले - रातराणी!!
तुला ना कळे लोचनांची कहाणी..
In reply to नको रे असा दूर जाऊ सख्या तू.. by राघव
नको रे असा, दूर जाउ वड्या तू
चटणीविना बालका ,पोरका तू
पावाविना डिश का ये हाताशी
तरीही तुला हादडी मी अधाशी!!
In reply to पावसाळी हवा आहे म्हणुन :) by राजेंद्र मेहेंदळे
अर्र्रर्.:)
In reply to नको रे असा दूर जाऊ सख्या तू.. by राघव
राघवा, वा!
मस्त आहे रचना. 'जाफरानी शब्द' या जाफरानी संकल्पनेबद्दल आमच्याकडून एक जाफरानी तोहफा कुबूल कीजियेगा:


In reply to शब्द जाफरानी by चित्रगुप्त
शुक्रन|:)
व्वा, सुंदर ... चित्रदर्शी !
💕 💕 💕
In reply to व्वा, सुंदर by चौथा कोनाडा
धन्यवाद!
अतिशय तरल आणि नेमक्या शब्दांत आशय व्यक्त केला आहे.
लेखन प्रतिभासंपन्न
न्हाऊन घे सखे तू ...
का अशी आळशी
येतो पुनः निशेला
राहू नको पारोशी...
न्हाऊन घे सखे तू...
दाव थोडी कसोशी
वा मीलनात अपुल्या
उगा शिंकेल माशी...
In reply to दुसरी बाजू ... by किल्लेदार
न्हाऊन घ्या दोघेही..
का उगा मखलाशी??
पुनःपुन्हा कशाला..
त्या आंघोळीची काशी!! 😉
In reply to हा हा हा! by राघव
उपाशी, अधाशी, काशी, मखलाशी
शी ची पार काशी केलेय प्रतिसादांनी श्श्शी!!
वाह! चांगलंय की!
@किल्लेदार, उपाशी आणि अधाशी वापरायचे राहिलेत हो.. येऊं देत!
स्वगतः त्या प्राचीतैने फोडून काढले नाही म्हणजे मिळवली! ;-)
अरे ते "न्हाऊन" आहे "खाऊन" नव्हे. हे शब्द वापरायचे असतील तर...
खाऊन घे सखे तू...
राहू नको उपाशी
पुरे पोह्यांची बशी
होऊ नको अधाशी ...
शी शी शी !!!
पडल्या-पडल्या उशाशी...
काहीतरीच सुचले मघाशी
आवडली...