मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सख्या रे..

प्राची अश्विनी · · जे न देखे रवी...
काव्यरस
न्हाऊ कशी सख्या रे तनु चंद्र जाहलेली काया अजून आहे स्पर्शात माखलेली.. न्हाऊ कशी सख्या रे आताच फूल झाली, कळी काल मोग-याची केसांत माळलेली. न्हाऊ कशी सख्या रे अंगांग पेटलेले, ते तेवतात अजुनी तू दीप लावलेले. न्हाऊ कशी सख्या रे मृद्गंध आसपास, जो कोसळून गेला पाऊस काल खास. न्हाऊ कशी सख्या रे देही चितारलेले, जे शब्द जाफरानी ओठी तुझ्या न आले..

वाचने 10327 वाचनखूण प्रतिक्रिया 31

कर्नलतपस्वी 14/06/2023 - 17:00
कविता मोरपीस सारखी आहे. सख्या कदाचित असे उत्तर देईल. धुंद आठवणी त्या साठव मन कुपीत सांगू नकोस कोणा तू कालचे गुपीत

कर्नलतपस्वी 15/06/2023 - 11:17
कविता एकांगी वाटते. परवानगी असेल तर दुसरी बाजू डकवतो. तयार आहे. सख्याचे म्हणणे आहे,विडंबन नाही.

राजेंद्र मेहेंदळे 15/06/2023 - 13:32
अर्थही लागतोय आणि वृत्तातही चपखल बसतेय. आवडली.

चांदणे संदीप 15/06/2023 - 16:50
आणखी एक सुंदर रचना. सैल असावी मिठी... ची आठवण झाली. :) सं - दी - प
नको रे असा दूर जाऊ सख्या तू.. सुगंधाविना, मोगरा, पोरका तू.. सांगू कसे, का फुले - रातराणी!! तुला ना कळे लोचनांची कहाणी..

In reply to by राघव

राजेंद्र मेहेंदळे 16/06/2023 - 19:18
नको रे असा, दूर जाउ वड्या तू चटणीविना बालका ,पोरका तू पावाविना डिश का ये हाताशी तरीही तुला हादडी मी अधाशी!!

चित्रगुप्त 17/06/2023 - 04:00
मस्त आहे रचना. 'जाफरानी शब्द' या जाफरानी संकल्पनेबद्दल आमच्याकडून एक जाफरानी तोहफा कुबूल कीजियेगा: .

अवतार 27/06/2023 - 12:13
अतिशय तरल आणि नेमक्या शब्दांत आशय व्यक्त केला आहे.

किल्लेदार 20/12/2023 - 22:07
न्हाऊन घे सखे तू ... का अशी आळशी येतो पुनः निशेला राहू नको पारोशी... न्हाऊन घे सखे तू... दाव थोडी कसोशी वा मीलनात अपुल्या उगा शिंकेल माशी...

In reply to by किल्लेदार

राघव 20/12/2023 - 22:18
न्हाऊन घ्या दोघेही.. का उगा मखलाशी?? पुनःपुन्हा कशाला.. त्या आंघोळीची काशी!! 😉

In reply to by राघव

राजेंद्र मेहेंदळे 21/12/2023 - 11:52
उपाशी, अधाशी, काशी, मखलाशी शी ची पार काशी केलेय प्रतिसादांनी श्श्शी!!

राघव 21/12/2023 - 16:30
वाह! चांगलंय की! @किल्लेदार, उपाशी आणि अधाशी वापरायचे राहिलेत हो.. येऊं देत! स्वगतः त्या प्राचीतैने फोडून काढले नाही म्हणजे मिळवली! ;-)

किल्लेदार 22/12/2023 - 01:20
अरे ते "न्हाऊन" आहे "खाऊन" नव्हे. हे शब्द वापरायचे असतील तर... खाऊन घे सखे तू... राहू नको उपाशी पुरे पोह्यांची बशी होऊ नको अधाशी ... शी शी शी !!! पडल्या-पडल्या उशाशी... काहीतरीच सुचले मघाशी