सख्या रे..

प्राची अश्विनी जे न देखे रवी...
न्हाऊ कशी सख्या रे तनु चंद्र जाहलेली काया अजून आहे स्पर्शात माखलेली.. न्हाऊ कशी सख्या रे आताच फूल झाली, कळी काल मोग-याची केसांत माळलेली. न्हाऊ कशी सख्या रे अंगांग पेटलेले, ते तेवतात अजुनी तू दीप लावलेले. न्हाऊ कशी सख्या रे मृद्गंध आसपास, जो कोसळून गेला पाऊस काल खास. न्हाऊ कशी सख्या रे देही चितारलेले, जे शब्द जाफरानी ओठी तुझ्या न आले..
वर्गीकरण
काव्यरस

31 टिप्पण्या 10,327 दृश्ये

Comments

कर्नलतपस्वी नवीन

कविता मोरपीस सारखी आहे. सख्या कदाचित असे उत्तर देईल. धुंद आठवणी त्या साठव मन कुपीत सांगू नकोस कोणा तू कालचे गुपीत

कर्नलतपस्वी नवीन

कविता एकांगी वाटते. परवानगी असेल तर दुसरी बाजू डकवतो. तयार आहे. सख्याचे म्हणणे आहे,विडंबन नाही.

राजेंद्र मेहेंदळे नवीन

अर्थही लागतोय आणि वृत्तातही चपखल बसतेय. आवडली.

चांदणे संदीप नवीन

आणखी एक सुंदर रचना. सैल असावी मिठी... ची आठवण झाली. :) सं - दी - प

राजेंद्र मेहेंदळे नवीन

In reply to by राघव

नको रे असा, दूर जाउ वड्या तू चटणीविना बालका ,पोरका तू पावाविना डिश का ये हाताशी तरीही तुला हादडी मी अधाशी!!

चित्रगुप्त नवीन

मस्त आहे रचना. 'जाफरानी शब्द' या जाफरानी संकल्पनेबद्दल आमच्याकडून एक जाफरानी तोहफा कुबूल कीजियेगा: .

अवतार नवीन

अतिशय तरल आणि नेमक्या शब्दांत आशय व्यक्त केला आहे.

किल्लेदार नवीन

न्हाऊन घे सखे तू ... का अशी आळशी येतो पुनः निशेला राहू नको पारोशी... न्हाऊन घे सखे तू... दाव थोडी कसोशी वा मीलनात अपुल्या उगा शिंकेल माशी...

राघव नवीन

In reply to by किल्लेदार

न्हाऊन घ्या दोघेही.. का उगा मखलाशी?? पुनःपुन्हा कशाला.. त्या आंघोळीची काशी!! 😉

राजेंद्र मेहेंदळे नवीन

In reply to by राघव

उपाशी, अधाशी, काशी, मखलाशी शी ची पार काशी केलेय प्रतिसादांनी श्श्शी!!

राघव नवीन

वाह! चांगलंय की! @किल्लेदार, उपाशी आणि अधाशी वापरायचे राहिलेत हो.. येऊं देत! स्वगतः त्या प्राचीतैने फोडून काढले नाही म्हणजे मिळवली! ;-)

किल्लेदार नवीन

अरे ते "न्हाऊन" आहे "खाऊन" नव्हे. हे शब्द वापरायचे असतील तर... खाऊन घे सखे तू... राहू नको उपाशी पुरे पोह्यांची बशी होऊ नको अधाशी ... शी शी शी !!! पडल्या-पडल्या उशाशी... काहीतरीच सुचले मघाशी