Skip to main content

श्रीगणेश लेखमाला २०२०

श्रीगणेश लेखमाला २०२० - अजाणता

लेखक आजी यांनी सोमवार, 24/08/2020 07:00 या दिवशी प्रकाशित केले.
1 मी त्या वेळी चार-साडेचार वर्षांची असेन. आम्ही त्या वेळी मलकापूरला राहात होतो. मी सगळ्यांत धाकटी, शेंडेफळ. त्यामुळे सर्वांची लाडकी. वडील डॉक्टर. घरापासून दवाखाना जवळच होता. मलकापूर तसं खेडंच. घरापासून दूर एस टी स्टँड होता. रेल्वे नव्हती. घरापासून जरासं दूर एक देऊळ होतं. त्या देवळातच शाळा भरायची. प्राथमिक. शाळेत मुलं फारशी नव्हती.

श्रीगणेश लेखमाला २०२० - आठवणींच्या आठवणी

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 24/08/2020 07:00 या दिवशी प्रकाशित केले.
1 ४२चा सुमार असावा. ठाण्यात गडबड होती. कलेक्टर कचेरीवर मोर्चा निघणार होता आणि अर्थातच तो मोडून काढण्याचा सरकारचा प्रयत्न होता. भेटून देणं दूरच, पण कुणाला कचेरीच्या आसपासही फिरकू न देण्याचे आणि मोर्चा लांब, दूरवर अडवण्याचे हुकूम होते. कडेकोट बंदोबस्त होता.

श्रीगणेश लेखमाला २०२० - आठवणींच्या शिंपल्यातले खेड

लेखक मनस्विता यांनी रविवार, 23/08/2020 07:00 या दिवशी प्रकाशित केले.
1 बाबांच्या बदलीच्या नोकरीमुळे बारा नाही, तरी चार गावचे पाणी प्यायला मिळाले आणि आठवणींची अनेक गाठोडी माझ्याकडे सांभाळून ठेवली गेली. खरे तर सगळ्याच आठवणींचा पसारा मांडावासा वाटला. पण एवढा पसारा निस्तरायचा कसा, म्हणून मग एकच गाठोडे उघडायचे ठरवले. माझा आई-बाबांबरोबरच्या फिरतीचा प्रवास सोलापूरपासून सुरू झाला आणि पुण्यात येऊन थांबला.

श्रीगणेश लेखमाला २०२० - विली वोंका कॅडबरी काँटेस्ट (Willy Wonka Cadbury Contest)

लेखक अनुराधा काळे यांनी शनिवार, 22/08/2020 08:45 या दिवशी प्रकाशित केले.
1 अहो! मुंबई म्हणजे घड्याळाच्या काट्यांवर आणि लोकलगाड्यांच्या चाकांवर रुळांवरून सतत धावणारी! घड्याळ, किल्ल्या, पाकीट, रुमाल, टिफिन सांभाळत जीव मुठीत घेऊन आठवडाभर लोकलमध्ये कसाबसा शिरणारा, बसायला चौथी सीट मिळण्याची अपेक्षा न करणारा तो मुंबईकर! चाकरमान्या! आता तर गर्दी दसपट! असा हा मुंबईकर लोकलने शनिवारी रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी पाठ फिरवूनच.

श्रीगणेश लेखमाला २०२० - पाककृती - खुसखुशीत करंज्या (साठ्याच्या)

लेखक पियुशा यांनी शनिवार, 22/08/2020 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
1 खुसखुशीत करंज्या (साठ्याच्या) गणपती गौरींच्या नैवेद्यासाठी खुसखुशीत साठ्याच्या करंज्यांची रेसिपी देत आहे.

श्रीगणेश लेखमाला २०२० - || श्री गणराया ||

लेखक Giriratn Raje यांनी शनिवार, 22/08/2020 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
1 जय देव, जय देव श्री गणराया, हो स्वामी गणराया, आरती ओवाळू, भावार्थी ओवाळू तुज बाप्पा मोरया ||ध्रु. ||जय देव जय देव......

श्रीगणेश लेखमाला २०२०- प्रस्तावना

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 22/08/2020 07:22 या दिवशी प्रकाशित केले.
1 नमस्कार मिपाकर्स.. सालाबादप्रमाणे गणरायांच्या आगमनाचा दिवस आला आहे. आज आहे मिपा परिवाराचा १४वा वर्धापनदिन! आणि हाच तो दिवस जेव्हा येते मिपाची श्री गणेश लेखमाला. दरवर्षी आपण एका संकल्पनेभोवती लेखमाला गुंफतो आणि ती वाचकांसमोर सादर करतो.