Skip to main content

श्रीगणेश लेखमाला २०२०

श्रीगणेश लेखमाला २०२० - आठवणी…

लेखक Mandar Ayachit यांनी शनिवार, 29/08/2020 06:19 या दिवशी प्रकाशित केले.
1 आठवणी…. आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात. वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अंदाज येत नाही, पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग एक असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचेही तसेच असते.. वपु असे म्हणाले होते.

श्रीगणेश लेखमाला २०२० - थप्पड

लेखक मी-दिपाली यांनी शुक्रवार, 28/08/2020 07:35 या दिवशी प्रकाशित केले.
1 थप्पड सिनेमा पाहून तसे बरेच दिवस झाले होते, पण तरीही तो मनात रेंगाळत राहिला होता. चित्रपटाचं कथानक किंवा साैंदर्यस्थळं सांगण्याचा माझा हेतू नाही. पण मूळ हेतू समजण्यासाठीच मध्यवर्ती कल्पना सांगायची झाली, तर चित्रपटाची नायिका अमृता हिला तिचा नवरा (त्याला नायक म्हणू की खलनायक?

श्रीगणेश लेखमाला २०२० - कथा : बाप ( कथावाचन / ऑडियो)

लेखक चौथा कोनाडा यांनी शुक्रवार, 28/08/2020 06:54 या दिवशी प्रकाशित केले.
1 जुलै महिन्यात श्रीगणेश लेखमाला २०२० या विशेषांकासाठी सहभागी होण्यासाठी आवाहन केलं गेलं, आणि वाटलं आपणही सहभागी व्हावं. २०१४ साली दिवाळी अंकाच्या निमित्ताने तलकाडू : एक प्रवास हा भटकंती लेख लिहिला होता, त्यानंतर विशेषांकासाठी लिहिणं काही जमलं नव्हतं. विशेषांकाच्या 'आठवण

श्रीगणेश लेखमाला २०२० - माळवा परिसर : काही आठवणी, काही चित्रे

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 28/08/2020 06:43 या दिवशी प्रकाशित केले.
1 माझा जन्म आणि पहिली २६ वर्षे इंदुरात गेली. हा प्रांत इतिहासात ‘माळवा’ या नावाने ओळखला जातो. मल्हारराव होळकर (१६९४ - १७६६) हे माळवा सुभ्याचे पहिले मराठी अधिपती.

श्रीगणेश लेखमाला २०२० - काही धमाल किस्से शाळा आणि कॉलेजचे

लेखक दुर्गविहारी यांनी गुरुवार, 27/08/2020 06:54 या दिवशी प्रकाशित केले.
1 शाळा! बहुतेक सर्व जणांच्या मनाचा हळवा कप्पा. आयुष्याच्या घडणीची महत्त्वाची साधारण दहा ते बारा वर्षे इथे जातात. (काहींना अधिक व्यासंग करायची इच्छा असल्यामुळे थोडी जास्त वर्षे घेतली जातात ;-) ). अर्थात बालपणाची हूड वर्षे याच कालखंडात येत असल्यामुळे साहजिकच शालेय जीवनात धमाल किस्से होतात. अगदी अनेक वर्षे त्या आठवणी मनात ठसलेल्या असतात.

श्रीगणेश लेखमाला २०२० - रंगीत चित्रं

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी गुरुवार, 27/08/2020 06:50 या दिवशी प्रकाशित केले.
1 रंगीत चित्रं? शीर्षक वाचून थोडंसं गोंधळल्यासारखं होईल खरं. पण ते तसंच आहे. कुठलं तरी एखादं चित्रं म्हणजे ते रंगीत असणारच, असंच आपल्या डोक्यात असतं. अगदी पूर्णपणे नाही, पण बरंचसं. सध्याच्या काळात तर नक्कीच. सध्या तर त्याचा विस्फोट झाला आहे.

श्रीगणेश लेखमाला २०२०- स्नानांतर

लेखक अनिंद्य यांनी बुधवार, 26/08/2020 07:00 या दिवशी प्रकाशित केले.
1 प्रसंग अगदी काल घडलाय असा डोळ्यासमोर आहे... "बाबू, ई नदिलोनि पवित्र जलालधु स्नानम चेसरा... जलालो मुनीगी रा.." नदीकाठावरच्या आणि पलीकडे गुडघाभर पाण्यात उभ्या आईच्या मातुल कुटुंबातील नातेवाईक मंडळींनी कृष्णेच्या 'पवित्र' पाण्यात मी स्नान करावे, असा एकच धोषा लावला होता.

श्रीगणेश लेखमाला २०२० - साध्यासुध्या आठवणी

लेखक नूतन यांनी मंगळवार, 25/08/2020 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
1 जादूच्या दिव्यातल्या राक्षसासारखी, आज्ञा करताच तत्क्षणी इच्छापूर्ती करणारी 'तू नळी' आज आपल्या सेवेस सादर आहे. नाटक, सिनेमा, भाषणं, गाणी.. अगदी कीर्तनदेखील आपण 'कधीही कुठेही' बघू शकतो, ऐकू शकतो. आज तंत्रज्ञानाचे असंख्य फायदे आहेत.