Skip to main content

श्रीगणेश लेखमाला २०२०- प्रस्तावना

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 22/08/2020 07:22 या दिवशी प्रकाशित केले.
1 नमस्कार मिपाकर्स.. सालाबादप्रमाणे गणरायांच्या आगमनाचा दिवस आला आहे. आज आहे मिपा परिवाराचा १४वा वर्धापनदिन! आणि हाच तो दिवस जेव्हा येते मिपाची श्री गणेश लेखमाला. दरवर्षी आपण एका संकल्पनेभोवती लेखमाला गुंफतो आणि ती वाचकांसमोर सादर करतो. 1 यंदाच्या नवव्या लेखमालेची संकल्पना आहे आठवणी, स्मृती, नॉस्टॅल्जिया. आपल्याला आठवणी किती प्रिय असतात, हे यंदाच्या श्रीगणेश लेखमालेच्या आवाहनाला मिळालेल्या प्रतिसादावरून लक्षात येते. गणेशोत्सवाचे दहा दिवस आपण साधारण दहा ते पंधरा लेख प्रकाशित करतो. यंदा चाळीसहून अधिक लेख व्य नि आणि ईमेलने प्राप्त झाले. त्यातून निवडक लेख घेणे हे तसे जिकिरीचे काम होते. सर्व चांगल्या लेखांना जास्तीत जास्त न्याय कसा देता येईल, याचा प्रयत्न करत आहोत. यानिमित्ताने काही नवे सदस्य आपल्या परिवारात सामील होत आहेत. त्यांचंही मनःपूर्वक स्वागत. तुम्ही लिहिते राहाल, याची खात्री आहे. मिपावर अनेक तरुण, उत्साही, नव्या विचारांचे सदस्य येत आहेत. त्याने आपल्या सर्वांचे मिपायुष्य जास्त समृद्ध होत राहील. पुढचे दहा दिवस उत्साहाचे, चैतन्याचे, मांगल्याचे अन आपल्या मिपाच्या श्रीगणेश लेखमालेचे आहेत. आपलं मिपावरील प्रेम, लोभ असंच अखंडित राहू द्या. तुम्हाला, तुमच्या परिवाराला, मित्रपरिवाराला गणेशोत्सवाच्या आणि चौदाव्या मिपा वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया! 2

वाचने 21934
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या आणि मिपाच्या चौदाव्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! श्री गणेश लेखमालेत उत्तमोत्तम लेखन वाचायला मिळेल अशी खात्री आहेच !

सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या आणि मिपाच्या चौदाव्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मिपाचा चौदावा वर्धापनदिन!! आणि लेखमालेलासुद्धा नऊ वर्षे झाली की.. मिपावर साहित्यिक समृद्धी दिवसेंदिवस बहरत राहो या शुभेच्छा!

मिपावर्धापन दिनाच्या मालक, चालक, तंत्रज्ञ, मिपाकर लेखक, वाचक, सदस्य, सर्वांना खुप खुप शुभेच्छा.....! मिपाची प्रगती अशीच होत राहो, हीच त्या गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो. गणेशलेखमालिकेत लेखन करणार्‍या सर्व लेखकांचंही कौतुक आहेच, आता एकेक लेख वेळ मिळेल तसे वाचत राहीन. दाद सर्वांनाच देईन असा माझा संकल्प आहे, बघुया कसे जमते ते....! गंपती बप्पा मोरया....! -दिलीप बिरुटे. (कट्टर मिपाकर)

सर्वांना गणेशोत्सवाच्या आणि मिसळपावआणि मिपाच्या चौदाव्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! श्री गणेश लेखमालेत उत्तमोत्तम लेखन वाचायला मिळतील ही मोठी मेजवानीच म्हणायची !

रक्ष रक्ष गणाध्यक्ष रक्ष त्रैलोक्यरक्षकं। भक्तानामभयं कर्ता त्राता भव भवार्णवात्॥ सर्व मिपाचालकांचे आणि मिपाकरांचे अभिनंदन ! गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Ranjan gavala | Female version | new song | by kartiki

आपणां सर्वांस आत्मिक आनंद, प्रेम आणि समाधान लाभावे हीच गणरायाकडे प्रार्थना! मिपाच्या वर्धापनदिना निमित्त आणि लेखमालेसाठी सर्वांना अनेकानेक शुभेच्छा!

सर्वांना श्रीगणेश आगमनानिमित्त शुभेच्छा आणि मिपाला वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! श्रीगणेश लेखमालेच्या रुपड्याबद्दल उत्सुकता.

सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या आणि मिपाच्या चौदाव्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! सर्व वाचकांना, लेखकांना , संयोजकांना गणेशोत्सव मंगलमय जावो !