Skip to main content

श्रीगणेश लेखमाला २०२०

श्रीगणेश लेखमाला २०२० - समारोप

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 02/09/2020 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मागील दहा दिवस सुरू असलेला गणेशोत्सव अन मिपाच्या श्रीगणेश लेखमालेचा शब्दोत्सव यांचा आज समारोप होतोय. मिसळपावची स्थापना श्रीगणेश चतुर्थीची. मिपाचा यंदा चौदावा वर्धापनदिन. गणेशोत्सवानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या मिपा श्रीगणेश लेखमालेचे हे नववे वर्ष. यंदा 'आठवणी - स्मृती' या विषयावर लेखमाला घेण्याचे जाहीर केले आणि मिपाकर नॉस्टॅल्जिक झाले. हा विषय किती जिव्हाळ्याचा आहे, हे आवाहनाला मिळालेल्या प्रतिसादावरून दिसून आले. वाचकांनाही हा विषय व लेखमाला आवडल्याचे त्यांच्या प्रतिसादावरून दिसून आले. या लेखमालेच्या निमित्ताने मिपाकरांनी किती वेगवेगळ्या आठवणींचा धांडोळा घेतला!

श्रीगणेश लेखमाला २०२० - आठवणी मिपाकर्सच्या

लेखक प्रशांत यांनी मंगळवार, 01/09/2020 या दिवशी प्रकाशित केले.
1 नमस्कार मिपाकर. सर्वप्रथम मिपाच्या १४व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा. या वेळी श्रीगणेश लेखमालेचा विषय 'आठवणी' असा असल्यामुळे काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करू या, असा विचार करतच होतो, तेवढ्यात सुचले की मिसळपावच्याच खूप साऱ्या आठवणी आहेत, त्याबद्दल काहीतरी लिहून काढू... फोरम मिसळपाव.कॉमची ओळख - चौदा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.

श्रीगणेश लेखमाला २०२० - पेशंट एच एम

लेखक आनंदिनी यांनी मंगळवार, 01/09/2020 या दिवशी प्रकाशित केले.
1 पेशंट एच एम जाताजाता सहज कानावर पडलेली गाण्याची एखादी ओळ कधीकधी वर्षानुवर्षांपूर्वीची आठवण घेऊन येते. कधी विचार केलाय की ही आठवण नेमकी कुठून येते? हीच नव्हे, तर इतर साऱ्या लहान-मोठ्या आठवणी कुठे असतात? आणि जर आपल्याला इतक्या वर्षांपूर्वीची एखादी गोष्ट रंग-गंधासकट आठवते, तर मग परवा भेटलेल्या त्या माणसाचं नाव कसं काय आठवत नाही!

श्रीगणेश लेखमाला २०२० - Maroon Color

लेखक गणेशा यांनी सोमवार, 31/08/2020 या दिवशी प्रकाशित केले.
1 तू हसलीस की, फुले उमलू लागतात, आणि त्याचे रंग तुझ्या ओठांवर दिसू लागतात. तू अशीच हसत रहा, सर्वांचे मन मोहत रहा माझी नसताना पुन्हा, माझीच होत रहा.. मेघा, तुझ्या डायरीतील ह्या ओळी माझ्या अजूनही लक्षात आहेत. हातात घेतलेल्या फूलपाखराचे रंग जसे उडून जातात, तशा आठवणी थोड्याच त्या रंगांसारख्या असतात? काही आठवणी असतात त्या फूलपाखरासारख्या, नाजूक..

श्रीगणेश लेखमाला २०२० - अण्णासाहेब

लेखक अनिकेत अजित पुजारी यांनी सोमवार, 31/08/2020 या दिवशी प्रकाशित केले.
1 आयुष्यात लोक उगाच भेटणं हा योगायोग म्हणावा लागेल. पण ज्या भेटलेल्या व्यक्ती आपल्यासाठी आठवणीत राहतात, त्यांचा आदर आणि त्यांच्याबद्दलच्या भावना काही औरच असतात. अण्णासाहेब देशपांडे हे असंच माझ्या आठवणीतलं एक नाव. आई महिला मंडळामध्ये कार्यकारी सभासद असल्यामुळे अण्णासाहेब देशपांडे आणि शुभाताई दोघांशी ओळख झाली होती. काही वर्षांपूर्वी एक प्रथा होती.

श्रीगणेश लेखमाला २०२० - पडद्यावरचे चित्रपट

लेखक किसन शिंदे यांनी सोमवार, 31/08/2020 या दिवशी प्रकाशित केले.
1 ९०च्या दशकातला सुरुवातीचा काळ. मला चांगलं आठवतंय, जातीयवादी दंगलींमुळे आणि बाॅम्बस्फोटांच्या मालिकेमुळे लोकांमध्ये भीतिदायक वातावरण पसरलं होतं. त्यानंतर लातूरचा भूकंपही बरीच मोठी मनुष्यहानी करून गेला होता. महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीयांसाठी आणि त्यातल्या त्यात मुंबईकरांसाठी हा काळ थोडासा तणावग्रस्तच होता.

श्रीगणेश लेखमाला २०२० - आठवणीतला सापमार गरुड

लेखक MipaPremiYogesh यांनी सोमवार, 31/08/2020 या दिवशी प्रकाशित केले.
1 ऑक्टोबर, २०१८. नेहमीप्रमाणे आम्ही भल्या पहाटे - म्हणजे ५ वाजता पुण्यातून सासवडकडे कूच केले. बोपदेव घाटामार्गे सासवड पार करून यवतकडे निघालो. तिकडे थोडे अंतर गेल्यावर एक पूर्ण माळरान आहे. बऱ्याच वेळा आपल्याला माळरानाबद्दल काहीच माहिती नसते आणि बोडके डोंगर-दऱ्या दिसले की वृक्षारोपण करावे असे वाटते.

श्रीगणेश लेखमाला २०२० - बालपणाच्या स्मृती

लेखक Giriratn Raje यांनी रविवार, 30/08/2020 या दिवशी प्रकाशित केले.
1 बालपण म्हटले की खूप साऱ्या सुखद आठवणी ताज्या होतात.. हो ना? मनात विचार येऊन जातो, खरेच किती छान दिवस होते ते... कसले दुःख नाही, कसली जबाबदारी नाही वा कुठल्या गोष्टीचा विचार नाही की कशाचे दडपण नाही. अगदी स्वछंद, निर्मळ, निरागस आणि आता हवेहवेसे वाटणारे ते दिवस. प्रत्येकाच्या आयुष्यात येतात हे सोनेरी क्षण आणि उरतात फक्त आठवणी...

श्रीगणेश लेखमाला २०२० - जीवनातील पहिले महायुद्ध

लेखक प्रणव बनसोडे यांनी रविवार, 30/08/2020 या दिवशी प्रकाशित केले.
1 मित्रांनो, महायुद्ध म्हटले की तलवार, रणगाडा, बंदुका, भाले इ. गोष्टी आल्याच. पण मी ज्या महायुद्धाचा उल्लेख येथे करत आहे, ते शीतयुद्ध-cum-महायुद्ध आहे. हे युद्ध आहे इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे! आता तुम्हाला वरील उतार्‍याचा अर्थ कळला असेल. माझ्या बाबतीत दहावा वर्ग काय ठरला, याचे हे छोटे चित्र आपल्या डोळ्यासमोर मांडतो.