लेखकGiriratn Rajeयांनी शनिवार, 22/08/2020 या दिवशी प्रकाशित केले.
जय देव, जय देव श्री गणराया, हो स्वामी गणराया,
आरती ओवाळू, भावार्थी ओवाळू तुज बाप्पा मोरया ||ध्रु. ||जय देव जय देव......
मस्तकी विराजे मुकुट रत्नांचा |
गळी साजिला तू हार दुर्वांचा ||
हस्ती धरिला पास अंकुशाचा |
नेवैद्य दावी तुज मोदक लाडूंचा ||1||
जय देव जय देव......
कटी शोभते हे तव पितांबर |
पायी घागऱ्या वाजती सुंदर ||
लंबोदर तुझे हे रूप मनोहर |
वाहन तव झाले हे मामा उंदीर ||2||
जय देव जय देव......
चौदा विद्या आणि चौसष्ट कला |
अर्पती सुमने श्री गणरायाला ||
विद्येने भांडार हा तुज समर्पिला |
ऋद्धी, सिद्धी वसे तुज संगतीला ||3||
जय देव जय देव......
भक्तीने पूजती सारे तुज मोरया |
चरणी लीन होऊन दास तुझिया ||
उद्धारी निर्वाण जीवास माझिया |
शरण तुज आलो मी हे श्री गणराया ||4||
जय देव जय देव......
नाव - स्वप्नील विलास अमृतकर
गाव - धुळे (बंगलोर )
भ्रमणध्वनी - 8884287110
चांगलंय. बर्यापैकी लयबद्धही आहे.
रचना म्हणून काही गोष्टी सांगाव्याशा -
१. शब्दांकडे थोडं अधिक लक्ष द्यावं असं वाटतं -
भावार्थी - योग्य शब्द "भावारती" असा आहे.
पास अंकुशाचा - मूळ शब्द प्रास आहे. प्रास म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे स्वतःच अंकुश.
२. एकेरी शब्दांचा वापर शक्यतो कमी असावा. [उदा. हा, मी, हे, तू.. तत्सम]
पुलेशु.
प्रतिक्रिया
सुंदर..
+१
||गणपती बाप्पा मोरया ||
चांगलंय
सुंदर आरती ! आवडली !
अरे वा. छान
छान आहे
सुंदर आरती