Skip to main content

फिफा२०१०

उपांत्य फेरीचे दावेदार....

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी मंगळवार, 29/06/2010 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
श्वास रोखले गेले आहेत... धडधड वाढली आहे... डिफेंडर्सची भिंत उभी आहे... गोलकीपर शेवटच्या क्षणापर्यंत आपले मोहरे योग्य जागी लावतोय... रेफरीची शिट्टी.... आणि संघाचा सर्वोत्तम स्ट्रायकर फ्री किक घेतो... उड्या मारणार्‍या डिफेंडर्सना चुकवून तो जाबुलानी चेंडू एक बाकदार वळण घेत नेटच्या एका कोपर्‍याचा वेध घेत हवा कापत चाललाय.... गोलकीपरनी जिवाच्या आकांतानी तो चेंडू अडवण्यासाठी झेप घेतली आहे.... आणि... ..... आणि???? आणि काय घडणार पुढे??
विशेष

अर्जेंटिना पुढे..

लेखक संजय अभ्यंकर यांनी सोमवार, 28/06/2010 02:11 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तम आक्रमण व शेवटच्या सत्रात उत्तम बचाव! शेवटी अर्जेटीनी थकले होते व मेक्सिकोच्या आक्रमणातही जान राहीली नव्हती. मॅराडोनाने थेवेझ ऐवजी मेस्सीच्या जागी वेरॉनला आणायला हवे होते. थेरॉनला बदलले तेव्हा तो जोशात होता. शेवटची काही मिनिटे मेस्सीच्या पायतुन चेंडू सटकत होता. मेस्सी शरिरापेक्षा मनाने जास्त थकला होता. मॅराडॉनाला पुढच्या सामन्यात, जर्मनी विरुद्ध बाकाचा वापर हुशारीने करावा लागेल.
विशेष

कोण पुढे जाणार - जर्मनी की इंग्लंड?

लेखक मेघवेडा यांनी रविवार, 27/06/2010 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
आज जर्मनी विरुद्ध इंग्लंड. आज फिफा २०१० मधून बाहेर पडणार्‍या युरोपियन जायंट्सच्या यादीत आणखी एकाची भर पडेल. उपांत्यपूर्व फेरीतील जागा निश्चित करण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नांची शर्थ निश्चित करणार. आज पहायला मिळेल फुटबॉलच्या मैदानावरील एक फेमस खुन्नस. जर्मनांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी जरी नेदरलॅण्ड्स असले तरी इंग्लिश संधाविरुद्धची त्यांची खुन्नस सर्वज्ञातच आहे.
विशेष

{गोल}

लेखक गणपा यांनी गुरुवार, 24/06/2010 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
रंगात असताना विश्वचषक आम्ही ही ओरडायचो जिवाच्या आकांताने ते इंग्लंड/स्पेन ला सपोर्ट करायचे अन आम्ही जर्मनीला मॅच संपल्यावर मिपावर सामना रंगायचा किती गोल खाल्ले? विचारत एकमेकांना हलकेच चिमटे काढयचो वुझुंच्या गोंगाटात चाहात्यांच्या साक्षीनं मारियोच्या पासावर ल्युकासच्या गोल्डन बूटातुन गोल बरसतात...दे दणादण दे दणादण
विशेष

इटली विश्वचषकाच्या बाहेर

लेखक निखिल देशपांडे यांनी गुरुवार, 24/06/2010 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
वर्ल्ड कप २००६ च्या उपविजेत्या फ्रान्स चा पाठोपाठ आत्ताच गतविजेता इटली वर्ल्डकपच्या बाहेर गेलेला आहे. आत्ताच संपलेल्या सामन्यात स्लोवाकिया ने इटली ला ३-२ अश्या गोलफरकाने हरवले. शेवटच्या काही मिनिटांचा खेळ पाहण्यालायक होता याच बरोबर स्लोवाकिया पुढच्या राउंड मधे पण पोहचला आहे. आता पुढचा बाहेर जाणार मोठा संघ कोणता असेल???
विशेष

अर्जेंटिना एक परिपूर्ण संघ!

लेखक संजय अभ्यंकर यांनी बुधवार, 23/06/2010 02:06 या दिवशी प्रकाशित केले.
२०१० चा फिफा विश्वचषक जर अर्जेंटिना जिंकू शकली नाही तर ते एक आश्चर्य ठरेल. शिस्त, संयम आणी कलाकारी जी अर्जेंटिना ने आता पर्यंत दाखवली त्याला तोड नाही. खेळाडूंच्या गर्दीत गोलक्षेत्राजवळ अचूक पासिंग केवळ अप्रतिम! चेंडूवर सतत ताबा ठेवणे, आपल्याला अनूकूल परिस्थीती निर्माण झाली की हल्ला करणे. उगाच ताकतीचे प्रयोग न करता, अचुकता व नजाकतीचे SILKY Passing, सारे केवळ पहात रहावे असे. लायोनेल मेस्सी स्वतः गोल न करता सतत समन्वयाचे (provider) काम करतो हे सर्व संघांच्या फॉरवर्डसनी शिकावे असे स्कील. माझ्या अर्जेंटीनाला शुभेच्छा!
विशेष

फुटबॉल विश्वचषक :- आजचा व्हिडिओ संग्रह

लेखक निखिल देशपांडे यांनी शुक्रवार, 18/06/2010 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
विश्वचशकाच्या पानावर आजचा व्हिडिओ हे सदर चालु करण्यात आलेले आहे. या पानावर रोजच्या व्हिडिओ चा संग्रह करण्यात येईल. एखाद्या सदस्यास दिनांक वार व्हिडिओ पाहिचे असल्यास या पानावर पाहता येतिल.
विशेष