Skip to main content

{गोल}

लेखक गणपा यांनी गुरुवार, 24/06/2010 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
रंगात असताना विश्वचषक आम्ही ही ओरडायचो जिवाच्या आकांताने ते इंग्लंड/स्पेन ला सपोर्ट करायचे अन आम्ही जर्मनीला मॅच संपल्यावर मिपावर सामना रंगायचा किती गोल खाल्ले? विचारत एकमेकांना हलकेच चिमटे काढयचो वुझुंच्या गोंगाटात चाहात्यांच्या साक्षीनं मारियोच्या पासावर ल्युकासच्या गोल्डन बूटातुन गोल बरसतात...दे दणादण दे दणादण
विशेष

वाचने 3479
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

क्या बात है गणपासेठ!! विडंबनांच्या मांदियाळीत आणखी एक! सर्व विडंबनांसारखंच उत्तम.. तरी काहीसं वेगळं.. शेवटच्या दोन ओळी तर अंमळ दिल खुश करून गेल्या! व्व्वा!!

वृत्तात अंमळ मार खाता आहात, पण ही रेसिपीही जमली आहे! ;-) अदिती

मस्त कविता!!! मला फिफा चं पान फार फार आवडलं. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

हे विडंबन फिफा सदरात टाका रे!!! लै भारी गणपा... निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

चालायचेच हो... ;) निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

गण्या.... लेका लै भारी... डॉइशलांड ! डॉइशलांड !! डॉइशलांड !!! डॉइशलांड ! डॉइशलांड !! डॉइशलांड !!! डॉइशलांड ! डॉइशलांड !! डॉइशलांड !!! डॉइशलांड ! डॉइशलांड !! डॉइशलांड !!! डॉइशलांड ! डॉइशलांड !! डॉइशलांड !!! हा प्रतिसाद डान्रावांना समर्पित. बिपिन कार्यकर्ते

च्यायला हे आमच्या चार डोळ्यातुन सुटलेच कसे ? लै भारी हो बल्लवाचार्य + कविवर्य गणपा ;) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

च्यायला इकडे माझी प्रतिक्रीया नाही ? अपमान .. घोर अपमान ! -(कॉर्पोरेशन) मनपा

लई भारी रे... शेवटी बघा आमची जर्मनी येते की नाही............ (डान्या वाचतोयस ना) स्वाती

एकदम आकडेबाज आणि समयोचित कविता *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/