Skip to main content

राउळी या मनाच्या

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 02/03/2017 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा : http://www.apurvaoka.com/2017/03/poem-moon-sky-stars-memories-marathi.h… a राऊळी या मनाच्या वृत्तः भुजंगप्रयात जसा चंद्र हा या महाली नभाच्या तशी ती वसे राऊळी या मनाच्या तिला काढिता घोर अंधार दाटे स्मृती राहती या रुपे चांदण्यांच्या तिला वाटले तोडुनी बंध जावे न मी आड आलो तिच्या निर्णयाच्या तशी मी मना लाविली शिस्त आहे करू लागले योजना ते उद्याच्या न ठेवीन विश्वास आता त्वरेने न मोडीन मी कायद्याला जगाच्या तरी खिन्नता पौर्णिमेला अपूर्व जरी ठेवितो बंद काचा घराच्या - अपूर्व ओक
लेखनविषय:

वाचने 7985
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

सुंदरच! प्रचंड आवडल्या गेली आहे! Sandy

सुरेख कविता!

किंचित छिद्रान्वेष .... तिला काढिता घोर अंधार दाटे स्मृती राहताती रुपे चांदण्यांच्या दुसर्‍या ओळीत किंचित लय जाते आहे.. तिला काढता घोर अंधार दाटे स्मृती राहती या रुपे चांदण्यांच्या असे काही जमेल का?

सुंदर कविता!

सुंदर कविता!

सुंदर कविता!

सुंदर कविता!

सुंदर कविता!

In reply to by स्रुजा

हो म्हणजे झालं असं की, कुणीतरी मला छंदबद्ध रचना आणि मुक्तछंद याबाबत विचारलं. मग तो किडा डोक्यात दोन एक दिवस वळवळत होता. आणि मग असं काहीतरी सुचायला लागल्यावर मी म्हटलं, चला वृत्तातच बांधू. म्हणून ते आवर्जून नमूद केलं. :)

अतिशय सुंदर रचना !! कौतुकास शब्द अपुरे आहेत !! थेट मनास भेदुन गेली !!

http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gif

सुंदर रचना.

खुप मस्त गझल.

तरी खिन्नता पौर्णिमेला अपूर्व... नाव मागे सोडायची स्टाईल आवडली आपल्याला :) वृत्त दिले आहे खरे, पण शाळेत असताना बाईंनी या वृत्ताची शिकवलेली चाल काही आठवेना :P

वृत्तातली कविता पाहिली कि आय फील जेलस

अरे वा! भुजंगप्रयाती य चारीहि येती. कविता आवडली. या निमित्ताने उपक्रमावरचा अक्षरगणवृत्त वगैरेवरचा एक धागा आठवला.

कविता आवडलीच पण फोटोतले घर आणि निसर्ग खूपच आवडला. काय मजा येईल अशा एखाद्या ठिकाणी राहायला मिळाले तर.