Skip to main content

मिसळ कशी बनवतात?

लेखक आनंद जोशी यांनी शनिवार, 23/02/2008 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळ कशी बनवायची? पाककृती कुठे मिळेल? -- आनंद जोशी
लेखनविषय:

वाचने 9380
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

पोटात कावळे काव काव, नकोस आणू उगीच आव. मिळेल शहरी अन गावोगाव, मस्त चव आणि स्वस्त भाव. पावमिसळ कुणा नाही ठाव ? मिसळ पाव, मिसळ पाव. ||१|| पावाला थोडं बटर लाव. उसळ,दाणे,टमाटर दाव, लिंबाला मधेच घाल घाव, जरासा रस मग त्यात श्राव. शेवेखालचा कांदा खाव, कोथिंबीरीला वर असेल वाव.||२|| तोंडाला पाणी वासाने याव, पहाणा-याला फार सुटेल हाव, खाणा-याची ती पोटात जाव, मोठ्ठे घास ,जरा हळ्ळूच चाव, चवीने खा पण मार ताव, असशील चोर अथवा साव.||३|| नसेल थारा ऐकताच नाव, असो नसो भूक ,घेतील धाव, गरीब रंक अन राजा राव, गरम मिसळ जशी उन्हात छाव, मिसळपावाची असे अशीच माव, मिसळ पाव, मिसळ पाव.||४||

In reply to by मीनल

सुंदर कविता...! :) तात्या.