Skip to main content

मी मराठी - अलक

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी गुरुवार, 04/02/2021 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
सनीचे बाबा मोठ्याने वर्तमानपत्रातली बातमी वाचत होते , " मराठी ही अभिजात भाषा व्हावी यासाठी सामान्य नागरिकांनी पुढे यायला पाहिजे ! " सनीला एकदम आठवण झाली . त्याने भगव्या रंगात ' मी मराठी ' असं लिहिलेला एक गडद निळ्या रंगाचा टीशर्ट आणला होता . त्याने त्याच्या कपडे कोंबलेल्या कपाटात तो शोधला ; पण सापडला नाही . मग त्याने आईला विचारलं , " मम्मी , माझा तो टीशर्ट कुठंय ग - मी मराठी लिहिलेला ? "
लेखनविषय:

वाचने 5889
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

सर्व मराठी लोकांची जबाबदारी आहे मराठी भाषा वाढवणे,तिचा रोजच्या व्यवहारात उपयोग करणे. फक्त सेनेवर आरोप केल्या मुले आपली जबाबदारी संपत नाही ती पळवाट झाली. मी मुंबई मध्ये सर्व ठिकाणी मराठी च वापरतो आणि आज पर्यंत तरी कोणतीच अडचण आली नाही.