मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(अ)निवासी

कोलबेर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
अखेर सगळी माणसे निवासी काय अनिवासी काय. साले एनाराय तिकडे बसुन मजा मारतात वर इकडच्या नावाने बोटे मोडतात तिकडच्या थंडगार हापीसात बसून इथल्या भुकबळींवर चर्चा रंगतात.. "अरे इतकीच काळजी वाटते तर या ना परत भारतात" मग अनिवासींनी मांडायचा डॉलरचा हिशोब गेल्याच महिन्यात पाठवलेल्या वनवासी कल्याण आणि आश्रम शाळेला त्यासोबत एक सल्ला सार्‍या निवासी जनतेला "दान धर्म सोडा,निदान वेळच्या वेळेला इन्कम टॅक्स भरा.." शेवटी अनिवासी काय निवासी काय? हजारातला एखादा बाबा आमटे तर हजारात नउशे बाबा भामटे काही निवासी भामटे तर काही अनिवासी भामटे.

वाचन 14483 प्रतिक्रिया 0