✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

असच..

प
पुष्कर विजयकुमार जोशी यांनी
गुरुवार, 07/05/2018 - 17:49  ·  लेख
लेख

अशुद्ध लेखनासाठी माफ करा, ऑफीस मधे क्विलपॅड उसे करावं लागतं.

========================

"So, are you from India" - तिने सुमधुर स्वरात विचारलं.
"Yeah, from quite far. So since when are you practicing this dance?" - संभाषण पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न.

युरोपात प्रत्येक शहरात अशा काही जागा असतातच जिथे singles एकत्र जमतात.
अशाच एका बुचारेस्ट नावाच्या शहरातली एक जागा.

अमाप सुंदर पूर्व युरोपिअन मुलं-मुली. मद्य असं प्यायलं जातं जसं उद्या नाहीच.
एका हातात मद्याचा प्याला, दुसऱ्या हातात जळती सिगारेट. गोठवणारी थंडी, ओपन एअर पब.

इथे अँप्रोच करण्याचे नियम असतात. मुलं मुलींना अँप्रोच करणार. मुलीने जर तेवढ्यापुरतं उत्तर देऊन दुसरीकडे पहिलं तर ती इच्छुक नाही.
मुलीने बोलतांना जर केसांना हात लावला, मुलाच्या खांद्याला लावला, किंवा साध्या विनोदावर हसली जरी, तरी समजायचं कि भावना पोहोचल्या.
लाजण्याचा बहाणा नाही. उगीच ओठ दाताने दाबने नाही. "मी तुला कधी तसं पाहिलं नाही" नाही.

तारुण्याचा बेभाम सोहळा. शरीर सुखाच्या ओढीबद्दल अपोलोजेटिक नाही.
एक अशीही संस्कृती.

"I am practicing since a long time, I don't even remember!" - इति मेनका.

कुरळे रेशमी केस हवेने हलतात. ती हाताने त्यांना कानाच्या मागे अडकवते.

जसं संभाषण पुढे सरकत, आम्ही गर्दी पासून लांब सरकतो.

"only thing I know about my father is his name and the place he came from"

मला माझ्या आजोबांच्या मावस भावाची मुलगी कुठे दिलीये हे पण माहित आहे.

"Ohh, but nevermind, our kids will know their father well, rather too well to be healthy" - आमचा वातावरण लाईट करायचा प्रयत्न.

ती जोरात हसून खांद्यावर मारल्यासारखं करते.
उगी लाजण्याचा नको हा बहाणा.

मी सिगारेट पेटवतो. धूर आणि रात्र समोरून सरकत जाते.
हजारो मैल पलीकडे, आमच्या गावी, आजी झोपायला जाण्याआधी माझ्या फोटोवरून माझी दृष्ट काढते.

नखुल्या बाई नखुल्या, चांदण्याच्या टिकुल्या.

वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
अनुभव
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
9607 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

जियो

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/05/2018 - 22:30 नवीन
जियो
  • Log in or register to post comments

छान लिहिताय. अजून लिहा.

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 07/05/2018 - 22:35 नवीन
छान लिहिताय. अजून लिहा.
  • Log in or register to post comments

मस्तच....

नावातकायआहे
Fri, 07/06/2018 - 08:12 नवीन
मस्तच....
  • Log in or register to post comments

एकदम मस्त. लिहीत रहा.

गवि
Fri, 07/06/2018 - 08:57 नवीन
एकदम मस्त. लिहीत रहा.
  • Log in or register to post comments

सुंदर.

सुबोध खरे
Fri, 07/06/2018 - 10:14 नवीन
सुंदर. कुठेही दांभिकतेचा स्पर्श नाही.
  • Log in or register to post comments

कडक

सिरुसेरि
Fri, 07/06/2018 - 10:51 नवीन
कडक
  • Log in or register to post comments

असंच लिहीलंत तरी प्रामाणिक लिहीलंत

श्वेता२४
Fri, 07/06/2018 - 11:58 नवीन
:)
  • Log in or register to post comments

खूप छान!

महेश रा. कोळी
Fri, 07/06/2018 - 12:38 नवीन
खूप छान!
  • Log in or register to post comments

Our kids will know their

अनिंद्य
Fri, 07/06/2018 - 14:49 नवीन
Our kids will know their father well :-) :-) क्या फास्ट जा रहे हो भाई :-) मुक्तक आवडले.
  • Log in or register to post comments

इथे अँप्रोच करण्याचे नियम

मराठी कथालेखक
Fri, 07/06/2018 - 15:27 नवीन
इथे अँप्रोच करण्याचे नियम असतात. मुलं मुलींना अँप्रोच करणार.
तिथे पण मुलांनाच नेहमी पुढाकार घ्यावा लागतो का ?
  • Log in or register to post comments

असे काही नाही.....तुम्ही

टवाळ कार्टा
Fri, 07/06/2018 - 16:34 नवीन
असे काही नाही.....तुम्ही खालीलपैकी एक निकष पूर्ण करत असाल तर तुम्हाला जास्त प्रयास करायची गरज नाही श्रीमंत असणे मदनाचा पुतळा असणे अंडरवल्ड डॉन असणे थोड्याफार प्रसिद्ध रॉक बँडमध्ये असणे प्रसिद्ध खेळाडू असणे (खेळ कोणताही असूदे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

छान लिहिलंय.

सस्नेह
Fri, 07/06/2018 - 16:57 नवीन
छान लिहिलंय.
  • Log in or register to post comments

झकास!!

पुंबा
Fri, 07/06/2018 - 18:11 नवीन
झकास!!
  • Log in or register to post comments

मस्तच!

शाली
Fri, 07/06/2018 - 20:46 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments

छानच जमलीये.

रातराणी
Sat, 07/07/2018 - 04:05 नवीन
छानच जमलीये. अजून एक शेवट - हजारो मैल पलीकडे, आमच्या गावी, माझी आई तिच्या लाडक्या नातवाला पायावर घेऊन वाटी चमचाने दूध पाजत म्हणत असते, अडगुल मडगुल सोन्याचं कडगुलं
  • Log in or register to post comments

आयोव.. रामा रामा रामा.

गवि
Sat, 07/07/2018 - 07:55 नवीन
आयोव.. रामा रामा रामा. __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

गलतीसे मिस्टेक हो गया

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 07/07/2018 - 09:24 नवीन
वयोमानानी जरा कमी दिसते त्या मुळे वरील वाक्यात "आई" ऐवजी "बायको" असे चुकून वाचले गेले. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

_/|_

संजय पाटिल
Sat, 07/07/2018 - 10:55 नवीन
कहर...कहर....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

(No subject)

टवाळ कार्टा
Sat, 07/07/2018 - 14:00 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

haha

पुष्कर विजयकुम…
Sat, 07/07/2018 - 14:16 नवीन
good one!! तसं मी सांगवं म्हणतो - स्थळ, वर्णन सगळं सत्य आहे, परंतु संभाषण काल्पनिक आहे. ते असो, तुम्ही आपल्या वार्धक्याचा दृष्टीदोशाचा गंभीर पने विचार करावा म्हणतो..नाही म्हणजे आता फक्त आई च्या जागी बायको वाचताहत, घरी दिसायला चुकीचा लागला तर...शिव शिव !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

तसं मी सांगवं म्हणतो - स्थळ,

गवि
Sat, 07/07/2018 - 14:20 नवीन
तसं मी सांगवं म्हणतो - स्थळ, वर्णन सगळं सत्य आहे, परंतु संभाषण काल्पनिक आहे.
बस का भाऊसाहेब, इथे आपल्या आपल्यात मराठी माणसांत हे वेगळं सांगायची गरज आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्कर विजयकुमार जोशी

tithe chalnari sambhashana

पुष्कर विजयकुम…
Sat, 07/07/2018 - 14:23 नवीन
tithe chalnari sambhashana farach 'direct' asatat...blog vagare var nako mhatala :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

चांगले

वरुण मोहिते
Sat, 07/07/2018 - 11:28 नवीन
लिहिताय.. आवडले
  • Log in or register to post comments

हे जर असंच होत असेल तर काही

खिलजि
Sat, 07/07/2018 - 13:13 नवीन
हे जर असंच होत असेल तर काही खरे नाही .. मला अजून एक प्रश्न पडलाय तो हा कि तिथे वटसावित्री , आय मिन वादाची झाडे नसावीत बहुधा .. आणि हेच कारण असेल कि तिथे असंच होत असेल .. नाहीतर आपल्याइकडे वटवटसावित्री काय , बैलपोळा काय नि नागपंचमी एकामागोमाग एक चालूच होतात आणि मग शेवटी आपण एकमेकांच्या नावाने शिव्या देऊन होळी पेटवतो आपल्या भावनांची .. पण मला हे सारं आवडतं , असंच नसलं तरी चालत .. आपलं कुणीतरी गोंडुल कुणी शोनुलं घरी वाट पाहत असतं , ते जरा बरं वाटतं . मी तुम्हाला निराश नाही करत आहे , पण एक क्षण मी तिथे मला स्वतःला ठेवून पहिले आणि घुसमटलो आतल्याआत . बाहेर पडलो तेव्हा या भावना बाहेर आल्या .. सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments

मस्त!

फारएन्ड
Sun, 07/08/2018 - 00:00 नवीन
छान लिहीले आहे!
  • Log in or register to post comments

अरेवा! मस्त

ज्योति अळवणी
Tue, 07/10/2018 - 22:35 नवीन
अरेवा! मस्त
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा