✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

"कढी,सार,ताक असात तां!" (असेल ते)

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Mon, 10/13/2008 - 20:12  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5059 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

अगदी असंच

रेवती
Mon, 10/13/2008 - 20:42 नवीन
व्हायचं मी लहान असताना. पदार्थ वेगळे असतील, पण संवाद हाच असायचा. काल केलेली श्रावणघेवड्याची भाजी त्यावेळी नको पण दुसर्‍या दिवशी नेमकी हवी असायची. मुलांना भाजी आवडलेली दिसते असे वाटून आईने पुन्हा केली की नको. आता माझा मुलगा हाच प्रकार करतो. रेवती
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
Tue, 10/14/2008 - 06:01 नवीन
रेवती, आपलाही अनुभव तसाच वाचून गम्मत वाटली. प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मस्त आहे..

प्राजु
Mon, 10/13/2008 - 20:49 नवीन
छोट्या छोट्या गोष्टी आपलं आयुष्य इतकं व्यापून असतात.. आपल्याला याची कल्पनाच नसते. लेख आवड्ला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
Tue, 10/14/2008 - 06:11 नवीन
प्राजु, तुला लेख आवडल्या बद्दल वाचून बरं वाटलं. खरंच छोट्या छोट्या गोष्टीच जास्त महत्वाच्या असतात्.आणि बरेच वेळा त्या छोट्यांकडून होतात्.म्हणूनच मला वाटतं देवाने "आई" निर्माण केली असावी.इतकी सहनशील्,इतकी हळ्वी अश्या ह्या "आईला" पर्यायच नसावा तुझ्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

इमोशनल झालो

टारझन
Mon, 10/13/2008 - 22:19 नवीन
मालक असलं काही लिहीलं की आम्हाला आमच्या घरची लय आठवण येती ब्वॉ .. आम्ही पण घरी आईला असाच त्रास द्यायचो ... आई मला कध्धीच वैतागली नाही पण.. अजुन लिवा ... चियर्स -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
Tue, 10/14/2008 - 06:15 नवीन
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. "आई तुझी आ-ठ्-व-ण येते" असं म्हणायला किती बरं वाटत असेल नाही? www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

सुंदर.

नारायणी
Tue, 10/14/2008 - 22:08 नवीन
काका, माझीही अवस्था टारझनसारखीचं झाली. आणि खरं सांगु का काका, "आई तुझी आ-ठ्-व-ण येते" असं म्हणायची खरं तर भीतीचं वाटते. न जाणो आपण आपल्या भावना श्ब्दात म्हणुन दाखवल्या आणि खळकन डोळ्यात पाणि आलं तर? बर्‍याच वेळा भावना लपवल्याने दु:ख सहन करणं सोपं होतं. निदान मला तरी. असेचं लिहित राहा.:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत

स्ट्रेस कमी होतो

श्रीकृष्ण सामंत
Tue, 10/14/2008 - 22:34 नवीन
नारायणी, आपलं म्हणणं खरंही असेल.पण खळकन डोळ्यात पाणी येणं आणि भावना जागृत होणं हा निसर्गाचा स्ट्रेस कमी करण्याचा उपाय आहे असं जाणकार म्हणतात. आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नारायणी

आई ग!

लवंगी
Tue, 10/14/2008 - 00:13 नवीन
आईला किती छाळ्ल ते आई बनले तेव्हाच कळल!
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
Tue, 10/14/2008 - 06:21 नवीन
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. आई होणं हे खरंच भाग्याचं आहे. निसर्गाने दिलेलं ते एक सौभाग्य आहे असं मला वाटतं www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लवंगी

खुप छान

ऋचा
Tue, 10/14/2008 - 09:21 नवीन
खुप छान लेख मला आईची आठवण आली..... "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
Tue, 10/14/2008 - 10:47 नवीन
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋचा

पहिला, दुसरा, तिसरा भात म्हणजे ??

अभिरत भिरभि-या
Tue, 10/14/2008 - 11:20 नवीन
श्रीकृष्ण जी , कोकणी जेवणात भात मुख्य असल्याने भाताची आवर्तने होतात असे दिसते. पण हा पहिला , दुसरा, तिसरा भात म्हणजे नक्की काय असते ?? माका ही गजाल कधी बी कल्ली नाय ( घाटावरचा) अभिरत
  • Log in or register to post comments

समजावून सांगतय हा!

श्रीकृष्ण सामंत
Tue, 10/14/2008 - 22:00 नवीन
मी तुमका समजावून सांगतय, आपला प्रश्न चांगला आहे.आपलं म्हणणं बरोबर आहे "कोकणी जेवणात भात मुख्य असल्याने भाताची आवर्तने होतात."हे अगदी खरं आहे. तसच दुसरी वस्तू म्हणजे नारळ,नारळाचं खोबरं-त्याला चून ही म्हणता-आणि नारळाचा रस-त्याला नारळाचं दुध ही म्हणतात. तांदूळ,आणि नारळ ह्याचा कोकणात मुबलक उपयोग होतो. जेवण्याच्या पद्धतीत पंगत बसल्यावर ताटात चिमुटभर मीठ,नारळाच्या चूनाची मिरची घालून चटणी,लिंबाची फोड,कसली तरी भाजी आणि वाटीभर भात-ह्याला मुदभर भात म्हणतात,त्यावर वरण आणि एक चमचा तूपाची धार, जेवायला बसल्यावर प्रथम वरण भात आणि तोंडी लावायला भाजी जेवली जाते. भात संपल्यावर पुन्हा भात नक्कीच वाढला जातो.त्या भातावर डाळीची किंवा दुसरी कसली ही आमटी वाढली जाते,भाजी खावून संपल्यास भाजी परत वाढली जाते. डाळ भात खाऊन संपल्यावर पुन्हा हवा तेव्हडा बहूदा थोडासाच तिसरा भात वाढला जातो.तो ताकाची कढी,किंवा सोलाचे सार,किवा नुसते ताक घेऊन जेवला जातो. तिसर्‍या भाताबरोबरचे सार वगैरे पाचक-ऍपीटायझर- म्हणून जेवतात.आठवड्यात एकाद्दा दिवशी ताक,तर एकाद्दा दिवशी सार,आणि कधीतरी ताकाची कढी असते. म्हणूनच आमच्या दाजीला आज तिसर्‍या भाताबरोबर काय हे माहित नसल्याने वाद व्हायचे. त्यावर उपाय, कढी,सार, ताक असात तां! (असेल ते.) माका वाटतां तिसरो भात म्हणजे काय तां मी तुमका समजाऊन सांगलंय. आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

समजले

अभिरत भिरभि-या
Wed, 10/15/2008 - 09:07 नवीन
सगले कल्ले माकां .. :) हांगा बंगळुरात शेम येकावर येक भात खातात. पहिला भात .. मेतकुट-तुप-भात नंतर वरण/सांबर भात मग रसम भात आणि शेवटी दहीभात दही भाता शिवाय जेवण पूर्ण झाले असे मानत नाहीत. आमच्या एका कचेरी-मित्राने आईला जेवायला कौतुकाने पंच-तारांकित हॉटेलात नेले. पण तेथे दहीभात न मिळाल्याने या मातोश्रींनी घरी येऊन दहीभात खाल्ला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत

सोपा उपाय

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 10/15/2008 - 15:02 नवीन
आमच्या मातोश्री / पिताश्रींनी आम्ही थोडे मोठे झाल्यावर या प्रश्नावर सोप्पा उपाय शोधला होता. आदल्या दिवशी सकाळच्या जेवणाचा आणि संध्याकाळी रात्रीच्या जेवणाचा मेन्यू आमच्याकडून (मी आणि भाऊ) "मान्य" करून घेण्याचा! बाबातर बाजारात जायच्या आधीच आम्हाला "कोणत्या भाज्या आणू?" असं विचारुन मगच बाहेर पडायचे. आणि जेवण कमी पडलं, किंवा उरलं वगैरेही भानगडी नाहीत, आधीच किती जेवणार त्याचा अंदाज देऊन ठेवायचा, म्हणजे शिळं उरलं तर फक्त आई किंवा बाबाच खाणार हाही त्रास नाही!
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
गुरुवार, 10/16/2008 - 10:21 नवीन
अदिती, उपाय छान होता. तुझ्या प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

त्यापासून

विसोबा खेचर
Wed, 10/15/2008 - 17:13 नवीन
त्यापासून आई असेल तेच वाढायची आणि दाजी असेल तेच जेवायचा नंतर आम्ही गमंतीत म्हणत असूं. "कढी,सार, ताक असात तां!" वा! सामंतसाहेब, कढी-सार-ताकाचे घरगुती स्फूट आवडले! :) आपला, (ताकप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
गुरुवार, 10/16/2008 - 10:23 नवीन
तात्याराव, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा