मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

श्रीमंत तात्या अभ्यंकर.

अभिज्ञ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
संजोपराव व प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ह्यांच्या लेखनशैलीवरून प्रेरित आमचा एक प्रयत्न. श्रीमंत तात्या अभ्यंकर. बुधवारची रात्र होती.तात्या खुशीतच होते.आज नव्या को-या ग्लेन्फ़िडिच चे उदघाटन त्यांनी केलेले होते. नुकतेच खाणेपिणे आटपून तात्या निद्रिस्त झाले असतील नसतील तोच तात्यांचा फ़ोन खणखणला. "अरे झोपतोस काय तात्या ! उठ ! अभिनंदन.अतिशय महत्वाची बातमी आहे.पेढे काढ आधी पेढे." तात्याला एकदम कळेनाच काय झाले ते. तर तात्यांच्या एका अमेरिकतील मित्राचा फ़ोन होता. त्याने दिलेली बातमि ऐकुन तात्याची झोप ठार उडालीच. कारण हि त्याला तसेच होते म्हणा. जालमहर्षी तात्या अभ्यंकरांना नुकतीच एक लॉटरी लागलेली होती. रक्कम फ़ारच घसघशीत होती.अन ती हि लॉटरी साधीसुधी नाहि तर अमेरिकन.डॉलर्समधली. भारतीय रुपयात विचार करता त्याची किंमत कित्येक करोडो रुपयात होती, क्षणभर तात्याला काय बोलावे हे सुचेनाच.त्याने अभिनंदनाचा स्वीकार करून फ़ोन ठेवला. आता झोप गेलीच होती. एवढ्या पैशाचे करायचे काय हा प्रश्न तात्याच्या मनाला टोचु लागला.विचारचक्र सुरु झाले. तसा तात्या अभ्यंकर देव माणुस.मनाचा अगदी दिलदार. एवढे पैशे आपल्याला करायचे तरी काय?त्यापेक्षा आपण हेच मित्र परिवारात वाटून टाकु असा विचार त्यांच्या मनात आला. पण असे कसे वाटणार? मग तात्यांना एक कल्पना सुचली. त्यांनी लगेचच मिसळ्पाव संकेतस्थळावर एक घोषणा केली. "आता पर्यंत ज्या ज्या लोकांनी मिसळपाव संकेतस्थळाच्या वाढिकरता येथे लेखन केलेले आहे, करत आहेत, प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या सर्वांना त्याचा योग्य तो अर्थिक मोबदला दिला जाईल. तसेच ह्यापुढील प्रत्येक लेखाला,ज्याचे प्रतिसाद ३० पेक्षा जास्त होतील त्या सर्व लेखकांना प्रति लेख १५ डॉलर्स,प्रतिसाद देणा-यांना प्रति प्रतिसाद ५ डॉलर्स दिले जातील. तसेच ह्या आधीच्या सर्व लेखांना एकुण प्रतिसाद १५ पेक्षा जास्त असतील तर आर्थिक मोबदला प्रति लेख २५ डॉलर्स दिला जाईल.ज्यांचा प्रतिसाद २० ओळिंपेक्षा जास्त आहे त्या सर्व प्रतिसादकर्त्यांना प्रतिप्रतिसाद १० डॉलर्स अवांतर दिले जातील.तसेच हे सर्वच धाग्यांना लागु पडेल." झाले.मिसळपाव संकेतस्थळावर ह्या बातमीने प्रचंड खळ्बळ उडाली.मिसळपाववरिल सभासद एकदम भांबावुनच गेले. ह्या संधीचा कसा काय फ़ायदा करून घेता येइल ह्याचा मंडळी रात्रंदिवस विचार करु लागली. जुनी मंडळि तर एकदम भांबावूनच गेली. जो तो आपले जुने लेख काढून पहायला लागला. किती प्रतिसाद आलेत,आपण कुठे कुठे प्रतिसाद दिला होता आपल्या प्रतिसादाची लांबी किती ह्याची मोजणी करण्यात मंडळी प्रचंड गुंग झाली.आपल्याला नक्की किती पैशे मिळणार ह्याचा हिशोब करु लागली. आपला लेखनकर्मदरिद्रिपणा पाहुन बरेच जण हळहळले.अजून आपल्याला बरेच लिहिता आले असते की वगैरे उसासे सोडु लागली. देवकाका,विजुभाउ,केशवसुमार,स्वाती दिनेश,राजे जैन,धोंडोपंत,भडकमकर मास्तर,चतुरंग वगैरे मंडळी जाम खुष झाली पण त्याच बरोबर काहिशी खट्टूहि झाली. देवकाका--आपल्या बालपणीचा काळ सुखाचा ह्या मालिकेत अजून पाणि घालून किमान १० भाग तरी अजून वाढवता आले असते असे त्यांना वाटून गेले. राजे जैन--ह्यांना आपल्या नशीबाचा फ़ारच राग आला. आपण साला १४ वेळाच पळुन गेलो नाहितर च्यायला आज किती पैशे मिळाले असते.जाउ देत.झाले ते झाले.आता बाहुबली होस्टेलचे आपण किमान ३० भाग तरि पाडणारच. धोंडोपंत-- च्यायला आपल्या ब्लोगवरचे सर्वच लेख इथे टाकले असते तर आज आपण लाखात नाहि किमान काहि हजारात तरी खेळलो असतो. स्वाती दिनेश ह्यांना आपण आजवर केलेल्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटले.घरि आपल्या स्वयपाकाला नाके मुरडण-या दिनेश रावांना आता दाखवतेच कि माझ्या पाककृती किती "लक्षलाभ" आहेत ते.तसेच अजून किती तरि पाककृत्या टाकता आल्या असत्या असेहि त्यांना वाटून गेले. केशवसुमार- हे तर भलतेच खुशीत होते.प्रतिभावान माणुस.मिसळपाव वरच काय जालावर कुठेहि प्रसिध्द झालेल्या कवितेचे त्यांनी वेळात वेळ काढून विडंबन पाडले होते.ह्या तात्या अभ्यंकरांच्या आर्थिक मोबदला योजनेत सर्वात जास्त फ़ायदा बहुतेक यांनाच मिळणार होता. विजुभाउ- गर्भ श्रीमंत माणुस. प्रतिभेने व आता ह्या नव्या स्कीम मुळेही. तरिहि त्यांना आतून वाटत होते की आपण एप्रिल फ़ळे,स्वप्न प्रवास,चहा,प्रेम हे प्रेमच असते वगैरे वगैरे ची प्रत्येकी अजून किमान १० एक भाग तरी टाकायला होते. काहिच नाहि तरी अजून अशी १० एक स्वप्ने तरि आपल्याला पडायला हवी होती असेहि त्यांना वाटुन गेले. भडकमकर मास्तर जरा वैतागलेच होते.च्यायला आपल्या करियर एकेड्मीत एवढे कोर्स आहेत,त्या सर्वांची माहिती दिली असती तर.? आजवर एवढे पिक्चर पाहिले,नाटके पाहिली,ढिगाने पुस्तक वाचली,रेखाचित्रे काढली अन साला इथे फ़ुकटची मास्तरकी करत बसलॊ.श्या... त्या सर्वांबद्दल एकेक लेख लिहिला असता तर किमान माझे १५० एक लेख तरि इथे पाडले असते. चतुरंग--आता मधुशाळेचे किमान ३० भाग तरि पाडणार. इतर मंडळीत सर्वात जास्त खुष कोण असेल तर तीनच माणसे. धनंजय व मुक्तसुनीत व पेठकर काका. आपण इतके दिवस जो काहि किबोर्ड बडवला, बोटे तुटेस्तव टाइप केले,कुठून कुठुन संदर्भ शोधून आणले त्याचे असे सोने होइल असे त्यांना स्वप्नात देखील वाटले नव्हते. सर्वात श्रीमंत प्रसिसाद कर्त्यांमध्ये हे तिघे भलतेच आघाडिवर होते. छोटा डोन,प्राजु,पिवळा डांबीस वगैरे मंडळि हि खुशीत होती.आपणहि इथे बरेच काहि लिहिले आहे हे पाहुन त्यांनाहि आनंद झालेला होता. दु:खी लोकात सर्किट,संजोपराव,अजानुकर्ण,बेसनलाडू हि मंडळी आघाडिवर होती. आपली एवढी उच्च प्रतिभा असुनही आपण इथे फालतु डोकेफोडि करत बसलो हयाचा त्यांना स्वत:बद्दल रागच आला. बाकिच्या मंडळिंचे भलतेच चालले होते. घाटपांडे काकांना आपले अख्खे पुस्तकच इथे क्रमाक्रमाने टाकता आले असते तर किती बरे झाले असते असे वाटून गेले. प्रा. डॉ. ना कुठुन आपण संपादक मंडळात येउन बसलो अन इथे नाठाळ मंडळी हाकल्त बसलो त्यामुळेच लिखाणाकडे आपले साफ़ दुर्लक्ष झाले असे त्यांना वाटुन गेले.संपादक मंडळातील सभासदांना काहितरि मोबद्ला मिळालाच पाहिजे असे त्यांनी तात्याशी बोलायचे ठरवले. मंडळी भुतकाळ विसरुन भविष्यकाळाचे मनसुबे आखु लागली. रामदासांनी पी सी जे सी चे अजून १० भाग वाढवायचे ठरवले. आपण इथे काहि जास्त लिहिले नाहि्ये हे पाहून प्रियाली ताईंनी भयकथेचि सिरीजच आणायची ठरवले. भारतातून रामसे,रामगोपाल वर्मा च्या सर्व भयपटांच्या सीडिज मागवण्यात आल्या. केशवसुमारांनी जालावर काहि कविता शिल्लक आहेत का हे शोधायला सुरुवात केली. आंबोळीने तर स्मशानातच कंदिलाच्या प्रकाशात महिनाभर राहून तो अनुभव लिहायचे ठरवले. सखाराम गठणे तर भलतेच फ़ोर्मात आले.अजून कुठल्या कुठल्या विषयावर कौल घेता येईल ह्याचा अभ्यास सुरु केला. तसेच ह्या वर्षी किमान ५ कट्टे तरि भरवायच व त्याचे प्रत्येकी १० धागे टाकायचा संकल्प केला. भडकमकर मास्तरांनी जास्त प्रतिसादाचा मुद्दा लक्षात घेउन जुन्या हिंदी चित्रपटांच्या सिडिज आणून त्याचा अभ्यास सुरु केला.जुनी पुस्तके माळ्यावरून खाली काढली गेली.आपल्या घराच्या खिडकितून अजून काय काय दिसते ह्याचाहि अभ्यास सुरु केला. प्राजुताईंनी तर रोज १० चारोळ्या लिहायचा संकल्प केला.तसेच भारतातून खास संतसाहित्य मागवले गेले. त्याचाहि जोरदार अभ्यास सुरु केला. ऎडि जोशी- आयुष्याच्या नाटकाचे अजून १० भाग लिहिण्याच्या तयारीला लागला.पण हे भाग लग्न करून लिहावेत की असेच लिहावेत ह्या विचारात पडला. विनायक प्रभूंनी स्वत:च्या क्रिप्टिक समुपदेशन लेखाचे अर्थ स्पष्ट करणारे अजून लेख पाडले... त्यावरून क्रिप्टिक कौन्सेलिंग नावाची नवीनच शाखा तयार झाली... मिपावरचा भगिनीवर्ग तर भलताच खुश झालेला. दुपारचा मोकळा वेळ सास बहु सिरीयल्स न बघता काहितरि सत्कारणी लावता येइल का ह्याचा विचार सुरु केला. पाककृत्य़ांची पुस्तके आणण्यात आली.रोज नवनवीन पदार्थ करून त्याचा नव-यावर भडिमार सुरु झाला. नवनवीन पाककृत्या लिहिण्यात आल्या. धमाल मुलगा तर एकदम सुन्न हौन बसला होता. त्याला काय बोलावे हे कळतच नव्हते. आपण इतक्या नळासारख्या गळून मोठ्या मोठ्या प्रतिक्रिया लिहिल्या त्याचे एवढे पैशे मिळणार? ह्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. इतके दिवस उगाच नव्या सदस्यांच्या खरडवह्या भरवून टाइमपास केला असा विचार करून आनंदयात्रीहि नव्या दमाने लिहायला बसला. चतुरंग ह्यांनीहि विडंबनाचा जोरात सराव सुरु केला. डांबीस काकांनी हि आपले शिक्षक आठवून त्यांचे व्यक्तीचित्र लिहायला सुरु केले. आपण इतक्या सुगरण असूनहि इथे आता पर्यंत चारच भाग लिहिले ह्याचे मेघना ताईंना वैषम्य वाटले.त्याहि नव्या दमाने लिहायला सुरु झाल्या. टारझन,यशोधरा,ब्रिटिश टिंगी, इनोबा,आन्या नावाचा बैल,पावसाची परि, मृगनयनी,बिपीन कार्यकर्ते,वरद वगैरे मंडळिंना फ़ारच दु:ख झाले.आपण उगाचच खरडफ़ळ्यावर मा-यामा-या करत बसलो,त्यापेक्षा इथे काहितरी लिहून डॉलर्स तरि कमवता आले असते असे त्यांना राहून राहून वाटुन गेले. टारझनने तर समस्त आफ़्रिका पालथी घालून त्याचे प्रवासवर्णन लिहायचे ठरवले. लिखाळ युरोपातील प्रत्येक शहराला भेट देउन त्याची माहिती लिहायचा घाट घालू लागले. मदनबाण हि मागे नव्हताच.त्याने तर महिनाभराची सुट्टि घेउन महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळांना भेटि देउन तिथले फ़ोटो इथे द्यायचे ठरवले. धम्याने कुठल्या कुठल्या गडांवर कसे कसे संस्कृतीरक्षण केले त्याचे लेख लिहायला सुरुवात केले. उगाच मनसेगिरी करत बसलो अन गोखुळवाडिचा गंपु अर्धवट सोडून दिला.ते काहि नाहि आता तो लेख पुर्ण करायचाच असा विचार करून इनोबा मोठ्या जिद्दिने कामाला लागले. पोलिसदलातील नोकरि सोडून इथेच लिखाण करावे काय ह्याचा नीलकांतने विचार सुरु केला. मिपावरील ख-या अर्थाने प्रतिसाद विक्रमी डो.दाढे अजून कुठल्या विषयावर सभासादांमध्ये मा-यामा-या लावता येतील असा एखादा टोपिक सुरु करता येइल, महाराष्ट्रात थालीपिठ कुठे चांगले मिळेल अशा अनेक विषयांचा विचार करु लागले. दिवसाला किमान २ लेख पाडून व सर्वप्रथम लेखांची शंभरी गाठलि तरी आपल्याला एक दमडिहि मिळत नाहि हे पाहून सामंत काकांना भलताच राग आला.त्यांनी तात्या अभ्यंकरांकडे त्याबद्दल जाब विचारला. भोचक,सहज,सुवर्णमयी,शितल,रेवती,भाग्यश्री,वगैरे मंडळिहि कामाला लागलीच होती. १_६ यमी ने हि एलियन सिरिज २० भागाची करायचे ठरवले. फक्त कट्ट्याला जाउन दारु पिणे ह्या व्यतिरिक्त इथे काहिच कर्तुत्व नसलेल्या अभिज्ञ ने हि आता काहितरी सकस लिखाण करायचे ठरवले. आता पर्यंत सर्वजणच फ़क्त काय काय लिहिता येइल ह्याचा विचार करत बसु लागली.त्याला प्रतिसादहि मिळायला हवेत हे काहि चाणाक्ष मंडळि वगळता कोणीच विचारात घेतले नव्हते. मोठ्या प्रतिसादाचा मुद्दा लक्षात आल्यावर ह्या बाजारात धनंजय,मुक्तसुनीत,प्राजु,पेठकरकाका,धमाल मुलगा,१_६ यमी,छोटा डॉन,बेसनलाडु,सर्किट,ह्यांना भलताच भाव आला. आमच्या लेखांना प्रतिसाद द्या असा त्यांच्यावर खरडींचा व व्यनिंचा भडिमार सुरु झाला. इतर सभासदांनाहि लेखाच्या लिंकस पाठवणे सुरु झाले. धनंजयराव व मुक्तसुनीत ह्यांनी तर ठरवलेच कि आता ह्या पुढे प्रतिक्रिया टाइप करायला माणुस ठेवायचा.एका प्रतिसादाला २ डॉलर्स ह्या हिशोबाने. व ती रक्कम हि लेखकाकडून वसूल करायची. विजुभाउंनी तर खरडवहिच्यावर बोर्डच लावला होता. "आमच्या येथे कुठल्याहि विषयावर किमान २० ओळिंचि प्रतिक्रिया पाडून मिळेल." ह्या सर्वाचा परिणाम म्हणजे दिवसाला मिसळपावर शेकडो लेख,कविता,विडंबने,पाककृत्या, फ़ोटो चे धागे पडू लागले.मिपावर भलताच ट्रॅफिक जाम सुरु झाला. पण ह्याचा अजून एक मोठा परिणाम म्हणजे खुद्द तात्यांच्या लेखाला मिळणारे प्रतिसाद कमी झाले. अजूनहि तात्याला बक्षीसाची रक्कम हातात मिळाली नव्हती. जस जसे दिवस जाउ लागले तस तशी मंडळी अस्वस्थ होऊ लागली. आपला आपला हिशोब देवून मंडळिनी तात्याला व्यनि,खरडि पाठवून भंडावून सोडले. दिवसागणिक हा त्रास वाढु लागला. तात्याला विचार करायला वेळ मिळेनासा झाला.अन्न पाणि गोड लागेनासे झाले. सिंगल माल्ट अप्रभावी ठरु लागली.झोप येईनाशी झाली.गाण्यात लक्ष लागेना. अन हे सगळे असह्य होऊ लागले.अन तात्या स्वत:शीच जोरात ओरडला " झेपेल तितके दिवस चालवीन नाहितर बंद करून टाकीन." तात्याला खडबडून जाग आली अन तात्या डोके गच्च धरून बसून राहिला. घडाळ्यात पहाटेचे ५ वाजलेले होते अन समोर ग्लेनफ़िडिच ची अख्खी रिकामी बाटली भेसुर उभी होती. (च्यायला हे स्वप्न होते तर....श्या...... पण पहाटेची स्वप्ने खरि होतात असे म्हणतात अन असे काहि खरेच घडले तर??????) -------------------------------------------------------------------- वरिल लिखाण काल्पनिक असून सर्वांनीच ह.घे. हि विनंती.

वाचने 16900 वाचनखूण प्रतिक्रिया 58

झकासराव 23/09/2008 - 23:38
=)) तुझ्या प्रतिभेची कल्पनाभरारी भारीच की. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

In reply to by भाग्यश्री

धनंजय 24/09/2008 - 00:56
*** ;-) धनादेश मिळाल्यावर अधिक शब्द घालू. ;-) ***

सध्या ट्रॅफिक इतका वाढलाय की मला क्षणभर हे सारे खरेच वाटले... .... =)) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मुक्तसुनीत 24/09/2008 - 00:12
अभिज्ञ साहेब ! च्यामारी धमाल उडवली आहे ! एकेक वाक्य वाचून मुरकुंड्या उडाल्या राव ...तात्यांसकट सगळ्यांची टोपी उडवलेली आहे ! धमाल चाल्ली आहे राव आज मिपावर ! ते सुनीलराव एक आणि आता तुम्ही ! लगे रहो !

टग्या 24/09/2008 - 00:22
ह्यापुढील प्रत्येक लेखाला,ज्याचे प्रतिसाद ३० पेक्षा जास्त होतील त्या सर्व लेखकांना प्रति लेख १५ डोलर्स,प्रतिसाद देणा-यांना प्रति प्रतिसाद ५ डोलर्स दिले जातील. तसेच ह्या आधीच्या सर्व लेखांना एकुण प्रतिसाद १५ पेक्षा जास्त असतील तर आर्थिक मोबदला प्रति लेख २५ डोलर दिला जाईल.ज्यांचा प्रतिसाद २० ओळिंपेक्षा जास्त आहे त्या सर्व प्रतिसादकर्त्यांना प्रतिप्रतिसाद १० डोलर्स अवांतर दिले जातील.
म्हणजे इथे लिहिणारे पैशासाठी लिहितात, आणि तेही इतक्या क्षुल्लक मोबदल्यासाठी, असं सुचवायचं आहे का आपल्याला? त्याची काही गरज नाही हो... त्यासाठी ऑफिसकडून मिळणारा पैसाच भरपूर आहे! (बाय द वे, प्रत्येक गोष्टीचा मोबदला पैशांत करण्याची वृत्ती, शिवाय 'डॉलर' हे 'डोलर' असं लिहिलंय... हम्म्म्म्......)

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

प्रियाली 24/09/2008 - 00:22
ह्यापुढील प्रत्येक लेखाला,ज्याचे प्रतिसाद ३० पेक्षा जास्त होतील त्या सर्व लेखकांना प्रति लेख १५ डोलर्स,प्रतिसाद देणा-यांना प्रति प्रतिसाद ५ डोलर्स दिले जातील. तसेच ह्या आधीच्या सर्व लेखांना एकुण प्रतिसाद १५ पेक्षा जास्त असतील तर आर्थिक मोबदला प्रति लेख २५ डोलर दिला जाईल.ज्यांचा प्रतिसाद २० ओळिंपेक्षा जास्त आहे त्या सर्व प्रतिसादकर्त्यांना प्रतिप्रतिसाद १० डोलर्स अवांतर दिले जातील.
अहो ज्यांना पटेल त्यांच्यासाठी चांगलं आहे की. ;) शुक्र माना (म्हणजे हुश्श म्हणा) की डोलर दिले जाईल म्हटले. डोरलं दिलं जाईल नाही म्हटलं. ;)

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 24/09/2008 - 00:26
शुक्र करा (म्हणजे हुश्श म्हणा) की डोलर दिले जाईल म्हटले. डोरलं दिलं जाईल नाही म्हटलं. मस्त! :) आपला, (पावसाळ्यात माहुली किल्ल्याजवळ डोकीवर प्लाश्टिकचं डोरलं घेऊन भाताची लावणी करणारा) ठाकरतात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रियाली 24/09/2008 - 00:49
अहो तात्या मी त्या अर्थाने डोरलं नव्हतं म्हटलं. या अर्थाने http://www.aathavanitli-gani.com/Song%20Html/1448.htm लाखामधुनी सख्या तुम्हाला अचूक मी हेरलं तुमच्या नावानं गळ्यात माझ्या बांधा एक डोरलं ! म्हटलं. आता इतक्या बाया-बाप्यांना डोरलं बांधलं तर काय होईल. अरेरेरेरेरेरेरे!!!!!

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 24/09/2008 - 08:10
येस्स! डोरल्याचा अर्थ आत्ता लक्षात आला. काल बुधवार नसूनही माझा इरलं आणि डोरलं या दोघात काहितरी घोटाळा झाला... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्लाश्टिकचं डोरलं घेऊन भाताची लावणी करणारा त्ये डोक्यावर घ्येतात ते इरलं अस्तय भौत्येक.... डोरलं दागिना अस्तोय ना?... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

प्रियाली 24/09/2008 - 00:54
ते इरलं आणि डोरलं हा लग्नात बांधला जाणारा सोन्याचा मंगळसूत्राटाईप दागिना असतो असं वाटतं. ;)

In reply to by विसोबा खेचर

चतुरंग 24/09/2008 - 00:58
इरलं म्हणायचं असावं! कारण बाया गळ्यात बांधतात ते डोरलं आणि पावसाळ्यात डोक्यावर घेतात ते इरलं. (खुद के साथ बातां : अनुष्का वहिनींच्या गळ्यात आहे का रे रंगा डोरलं? :? पाहिल्याचं आठवत नाहीये. :W ) चतुरंग

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

लिखाळ 24/09/2008 - 01:11
>>त्याची काही गरज नाही हो... त्यासाठी ऑफिसकडून मिळणारा पैसाच भरपूर आहे! :) लेख छान..मजा आली. --लिखाळ.

प्राजु 24/09/2008 - 00:19
चालूद्या... बाकी मी खरंच संत साहित्य मागवलं आहे भारतातून. यावेळी चोखोबा आहे डोक्यात.. ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर 24/09/2008 - 00:22
अभिज्ञराव, अंमळ मौज वाटणारा लेख. तुमच्या निरिक्षणशक्तिला खरंच सलाम..! :) वाचतांना बर्‍याच ठिकाणी मनमोकळा हसलो.. बहुतेक सर्व पात्र कव्हर झाली आहेत! :) बरं झालं ते स्वप्नच होतं नायतर एवढे पैशे मी कुठून आणले असते? :) असो, आपला, (जालमहर्षी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

>>बरं झालं ते स्वप्नच होतं नायतर एवढे पैशे मी कुठून आणले असते? तुमचा मेलबोक्स बघा, दोन-चार ई-मेल असतील. लाटरीच्या. ----- नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.

यशोधरा 24/09/2008 - 00:27
=)) धन्य रे अभिज्ञ!! :) आणि मी पण लिहिलेय की रे मिपावर म्हणजे मला पण डॉलर मिळायला हवेत!!

In reply to by देवदत्त

देवदत्त 24/09/2008 - 00:33
माझे खाते विभागात आणखी एक कलम जोडले जाईल. (कमावलेले एकूण डॉलर्स ) तसेच वाटचाल/माझे लेखन च्या माहितीमध्ये आणखी एक रकाना प्रकार, शीर्षक, लेखक, वेळ, प्रतिक्रिया, डॉलर्स

चतुरंग 24/09/2008 - 00:31
एकच विषय खूप खेचत नेल्याने असेल कदाचित पण असं झालं खरं माझं. पुलेशु. (एकूण १३५ रुबाया आणि प्रत्येक भागात ५ रुबाया आहेत ना, त्यामुळे मधुशालेचे ३० नाही पण बरोब्बर २७ भाग होणार आहेत! १० झालेत, १७ बाकी!) चतुरंग

सर्किट 24/09/2008 - 00:32
दिवसाला किमान २ लेख पाडून व सर्वप्रथम लेखांची शंभरी गाठलि तरी आपल्याला एक दमडिहि मिळत नाहि हे पाहून सामंत काकांना भलताच राग आला. त्यांनी तात्या अभ्यंकरांकडे त्याबद्दल जाब विचारला. त्यावर आपण यापुढे एकहि लेख न लिहिलात तर मी आपल्याला आर्थिक मोबदला देइन असे तात्याने सुचवले. हे सर्वात खास !!! -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

श्रीमंत तात्या अभ्यंकरांचे नाव मी आता प्रे.बुशला सुचवित आहे.अमेरिका आर्थिक टंचाईत आल्याने कदाचीत अमेरिकेला तात्यांकडून डॉलर मधे मदत होईल. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by श्रीकृष्ण सामंत

विजुभाऊ 24/09/2008 - 10:13
श्रीमंत तात्या अभ्यंकरांचे नाव मी आता प्रे.बुशला सुचवित आहे. यातला प्रे. म्हणजे प्रेमळ बुश की प्रेतात्मा बुश ?

टारझन 24/09/2008 - 02:16
आमचे येथे श्रीकृपेकरून , प्रतिसाद पाडले जातील :) आम्ही मात्र बेक्कार हसलो ... इजाभौंपासून सावध रहा रे भो आता.... त्यांचा फोकस तुझ्यावरच आहे :) ४ अफ्रिका पालथ्या घातलेला -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

अभिज्ञा लईच मनकवडा हाय बाबा! तुला फलज्योतिष चिकित्सा मंडळाचा सदस्य अशे घोशीत करतो. मनातल्या मनात- च्यायला आपलं "यंदा कर्तव्य आहे?" पुस्तक तुकडे करुन टाकाव काय? संगनकात हायेच.जरा जास्त तुकडे केले कि जास्त पैशे भेटतीन. नाईतरी आता माळ्यावर पडलय .आता आपुन च लक्ष देत नाई त ल्वॉक तरी काय करनार? ते ज्योतिषा कडे जान्या पुर्वी ते मनोविकास प्रकाशनवाल्याला असंच दिल. एक रुपया बी भेटला नाई.काडतो म्हन्ला त काडा. लोकांपर्यंत पोचतय म्हन्ल्याव आपन बी दुसर काय म्हन्नार.आदुगर दोन आवृत्त्यात सोताचे पैशे घातले ते नशीब म्हनुन वसुल तरी झाले.अंनिस वाल्यांनी बी दोन भागात काढलय कवाच. रिप्रिंट बी काढत्यात. आता आपलीच मान्स हायेत. लस्कर च्या भाकर्‍या भाजायची सवंच लागली आपल्याला. पोलिस बिनतारि मदी बी सोताच्या पैशाने सरकारची काम केली. का त् म्हन त्येंच्या पद्द्तीने केल्याव डॉक गहान ठेवाव लागतय. उघडपणे- चालु द्या मंडळी . आपापल्या खरडी आन ट्रॅकर संभाळुन ठेवा. त्येच्या तुन बी यखांद्या बारीला पैशे भेटतिन प्रकाश घाटपांडे

कालपनिक कथानकच्या आडून घेतलेले चिमटे, गुदगुल्या आणि कोपरखळ्या दाद द्याव्या अशा. अभिनंदन. मिपाचे लिहीते सभासद खूप असल्या कारणाने त्या सर्वांच्या साहित्यसेवेला कथानकाच्या आवाक्यात आणायचे म्हणजे कथानकची लांबी वाढणारच. अभिनंदन.

In reply to by प्रभाकर पेठकर

मनस्वी 24/09/2008 - 09:22
कालपनिक कथानकच्या आडून घेतलेले चिमटे, गुदगुल्या आणि कोपरखळ्या दाद द्याव्या अशा. अभिनंदन.
असेच म्हणते. मनस्वी *डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*

सुनील 24/09/2008 - 09:23
वा! सगळ्यांची झाडाझडती चांगलीच जमलीय! आवडले. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मन 24/09/2008 - 09:40
मस्त आयडिया आहे.. दिला ना हा प्रतिसाद; द्या पाहु आता ५ डॉलर.... (हरिश्चंद्रानं स्वप्नातलं वचन पाळलं होतं. संत तात्याबा त्या पुराणपुरुषाचं अनुकरण करतील ही अपेक्षा.) आपलाच, मनोबा

विजुभाऊ 24/09/2008 - 09:41
आंबोळीने तर स्मशानातच कंदिलाच्या प्रकाशात महिनाभर अशा रीतीने त्याने देशाचा लोकसंख्येचा प्रश्न सोडवला होता. =)) =)) =)) डॉ.दाढे नव्या विषयाच्या शोधातच होते. बरे झाले थालिपीठाची आठवण करुन दिली. लगे रहो दाढे भौ होऊन जाउद्या नवे संशोधन ( अजून या विषयावर किमान २० ओळिंचि प्रतिक्रिया पाडून झाली नाहिय्ये) डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

हाण तिच्यायला... अभिज्ञा, मित्रा, तुला एक पार्टी लागू आपल्या कडून. अजून २ दिवस आहे मी. ;) नाही तर नेक्ष्ट टाईम डायरेक्ट बाम्भे मदेच बसुत, काय? बिपिन.

प्रगती 24/09/2008 - 11:35
आज खूप दिवसांनी मि.पा. वर आले आणी लेख वाचून तब्येत एकदम खूष झाली. जियो तात्या जियो!

वरद 24/09/2008 - 12:15
अभिज्ञबाबू तुमची निरीक्षण आणि कल्पनाशक्ती जबरदस्त आहे.. मानले बुवा तुम्हाला.. विजुभाउंनी तर खरडवहिच्यावर बोर्डच लावला होता. "आमच्या येथे कुठल्याहि विषयावर किमान २० ओळिंचि प्रतिक्रिया पाडून मिळेल हे मात्र जबरा हसून हसून वाट लागली... =)) =)) =)) =))

छोटा डॉन 24/09/2008 - 14:47
प्रतिक्रीयेला अंमळ उशीरच झाला, वाट बघत होतो कुणी पैसे ऑफर करते आहे का ? तेवढीच सोय झाली असती ह्या विकांताची ( व आजच्या बुधवारची ) आम्ही तश्या लंब्याचौड्या व तेवढ्याच निरर्थक प्रतिक्रीया लिहण्यासाठी ( कु) प्रसिद्ध ना .... पण कशाचे काय आणि फाटक्यात पाय, साधी एक खरड नाही आली याबद्दल ....
अरे झोपतोस काय तात्या ! उठ ! अभिनंदन.अतिशय महत्वाची बातमी आहे.पेढे काढ आधी पेढे." तात्याला एकदम कळेनाच काय झाले ते. तर तात्यांच्या एका अमेरिकतील मित्राचा फ़ोन होता.
हा कोण मित्र बॉ ??? जाने तु , या जाने ना ? माने ( मित्र ) तु , या माने ना ??? असो. कुणी का असेना, नावात काय आहे शेवटी ?
प्रा. डॉ. ना कुठुन आपण संपादक मंडळात येउन बसलो अन इथे नाठाळ मंडळी हाकल्त बसलो त्यामुळेच लिखाणाकडे आपले साफ़ दुर्लक्ष झाले असे त्यांना वाटुन गेले.संपादक मंडळातील सभासदांना काहितरि मोबद्ला मिळालाच पाहिजे असे त्यांनी तात्याशी बोलायचे ठरवले.
आग्गाग्गाग्गा ... डायरेक्ट डिलीटसरांवर हल्ला ? ( कॄपया ह. घ्या.)
इतर मंडळीत सर्वात जास्त खुष कोण असेल तर तीनच माणसे. धनंजय व मुक्तसुनीत व पेठकर काका. आपण इतके दिवस जो काहि किबोर्ड बडवला, बोटे तुटेस्तव टाइप केले,कुठून कुठुन संदर्भ शोधून आणले त्याचे असे सोने होइल असे त्यांना स्वप्नात देखील वाटले नव्हते.
+++++++ १. ज ह ब ह र्‍या ऑब्झर्वेशण !!!
इतके दिवस उगाच नव्या सदस्यांच्या खरडवह्या भरवून टाइमपास केला असा विचार करून आनंदयात्रीहि नव्या दमाने लिहायला बसला.
हाण्ण तिच्यायला !!!
मोठ्या प्रतिसादाचा मुद्दा लक्षात आल्यावर ह्या बाजारात धनंजय,मुक्तसुनीत,प्राजु,पेठकरकाका,धमाल मुलगा,१_६ यमी,छोटा डॉन,बेसनलाडु,सर्किट,ह्यांना भलताच भाव आला.
ह्या ह्या ह्या. कसचं कसं ... तुमचं आपलं काहीतरीच .... ( न विसरता ह्या प्रतिक्रीयेचे बील पाठवुन देणे , अन्यथा भविष्यात बहिष्कार टाकला जाईल )
(च्यायला हे स्वप्न होते तर....श्या......
ह्यॅत तिच्यायला ... आम्ही सर्व तयारी केली होती राव ... कंपणीत नोकरी करण्यापेक्षा " इसी मनी" चा हाच मार्ग आहे ओळखुन " पेपर तयार ठेवले" होते ... आता कुणाला कळायच्या आत फाडुन टाकायला हवेत ... थोडक्यात काय तर अफाट आणि बेफाट टोलेबाजी ... तरी बरीच मंडळी हुकली. असो. अजुन येऊ द्यात " अभिद्यशेठ" , आता शेठच म्हणायला हवं नाही का ? अवांतर : वायद्याप्रमाणे बील पाठवुन द्यावे. नाहितर आम्हाला " पंटर" पाठवायला लागतील ... अतिअवांतर : ह्या लेखाबद्दल मिळालेल्या पैशाच्या २५ % भाग " प्रोटेक्शन मनी" म्हनुन पाठवुन द्यावा, पुढची काळजी आम्ही घेऊ ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

अनिल हटेला 24/09/2008 - 18:17
अभिज्ञ राजे !! पाय कुठायत हो तुमचे ? चरणस्पर्श का काय असतो ते कराव म्हणतो !!! एकदम सही ``````````~~~~~~~ (च्यामारी : नुसते प्रतीसाद देण्यापेक्षा लिखाण चालू कराव म्हणतो !! सकाळ प्रहरीची स्वप्न खरी असतात !!!) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

रेवती 24/09/2008 - 19:15
खदाखदा हसू आले नसले तरी तू घेतलेल्या प्रयेक फिरकीबरोबर गुदगुल्या कि कायसे होत होते. माझं नाव इनक्लूडून तू मला धन्य केलस बाबा! आत्ता बसते नव्या रेसेप्या लिहायला! माझ्यातही काही कमी प्रतिभा नाही हं. बिघडलेले अनेक पदार्थ नावावर जमा आहेत. रेवती

मनिष 24/09/2008 - 19:30
मजा आली वाचून! - मनिष (खुद के साथ बातां - स्वप्नात पण कोणी पैसे देत नाही मला! :()

आंबोळी 24/09/2008 - 20:45
बाबा अभिज्ञा, तु वाचनमात्र आणि प्रतिक्रीयामात्र होतास तेच ठिक होते रे. हे असे एकच लेख लिहुन सगळ्यांच्या विकेटी काढायच्या हे काही बरे नाही. बाकी लेख फर्मास झालाय. आजुन येउद्या. सर्किटशी सहमत. आंबोळी

विजुभाऊ 26/09/2008 - 12:17
फक्त कट्ट्याला जाउन दारु पिणे ह्या व्यतिरिक्त इथे काहिच कर्तुत्व नसलेल्या अभिज्ञ ने हि आता काहितरी सकस लिखाण करायचे ठरवले. =)) बाकी आम्बोळीशी सहमत डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

In reply to by विजुभाऊ

अभिज्ञ 27/09/2008 - 12:08
फक्त कट्ट्याला जाउन दारु पिणे ह्या व्यतिरिक्त इथे काहिच कर्तुत्व नसलेल्या अभिज्ञ ने हि आता काहितरी सकस लिखाण करायचे ठरवले. ;) अभिज्ञ.

अनाडि 26/01/2009 - 16:05
वा,छान. वाचायला मजा आली. अनाडि. (अब्दुल नारायण डिसुझा.)