संजोपराव व प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ह्यांच्या लेखनशैलीवरून प्रेरित आमचा एक प्रयत्न.
श्रीमंत तात्या अभ्यंकर.
बुधवारची रात्र होती.तात्या खुशीतच होते.आज नव्या को-या ग्लेन्फ़िडिच चे उदघाटन त्यांनी केलेले होते.
नुकतेच खाणेपिणे आटपून तात्या निद्रिस्त झाले असतील नसतील तोच तात्यांचा फ़ोन खणखणला.
"अरे झोपतोस काय तात्या ! उठ ! अभिनंदन.अतिशय महत्वाची बातमी आहे.पेढे काढ आधी पेढे."
तात्याला एकदम कळेनाच काय झाले ते. तर तात्यांच्या एका अमेरिकतील मित्राचा फ़ोन होता.
त्याने दिलेली बातमि ऐकुन तात्याची झोप ठार उडालीच.
कारण हि त्याला तसेच होते म्हणा. जालमहर्षी तात्या अभ्यंकरांना नुकतीच एक लॉटरी लागलेली होती.
रक्कम फ़ारच घसघशीत होती.अन ती हि लॉटरी साधीसुधी नाहि तर अमेरिकन.डॉलर्समधली.
भारतीय रुपयात विचार करता त्याची किंमत कित्येक करोडो रुपयात होती,
क्षणभर तात्याला काय बोलावे हे सुचेनाच.त्याने अभिनंदनाचा स्वीकार करून फ़ोन ठेवला.
आता झोप गेलीच होती. एवढ्या पैशाचे करायचे काय हा प्रश्न तात्याच्या मनाला टोचु लागला.विचारचक्र सुरु झाले.
तसा तात्या अभ्यंकर देव माणुस.मनाचा अगदी दिलदार.
एवढे पैशे आपल्याला करायचे तरी काय?त्यापेक्षा आपण हेच मित्र परिवारात वाटून टाकु असा विचार त्यांच्या मनात आला.
पण असे कसे वाटणार? मग तात्यांना एक कल्पना सुचली.
त्यांनी लगेचच मिसळ्पाव संकेतस्थळावर एक घोषणा केली.
"आता पर्यंत ज्या ज्या लोकांनी मिसळपाव संकेतस्थळाच्या वाढिकरता येथे लेखन केलेले आहे, करत आहेत,
प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या सर्वांना त्याचा योग्य तो अर्थिक मोबदला दिला जाईल.
तसेच ह्यापुढील प्रत्येक लेखाला,ज्याचे प्रतिसाद ३० पेक्षा जास्त होतील त्या सर्व लेखकांना
प्रति लेख १५ डॉलर्स,प्रतिसाद देणा-यांना प्रति प्रतिसाद ५ डॉलर्स दिले जातील.
तसेच ह्या आधीच्या सर्व लेखांना एकुण प्रतिसाद १५ पेक्षा जास्त असतील तर आर्थिक मोबदला प्रति लेख २५ डॉलर्स
दिला जाईल.ज्यांचा प्रतिसाद २० ओळिंपेक्षा जास्त आहे त्या सर्व प्रतिसादकर्त्यांना प्रतिप्रतिसाद १० डॉलर्स अवांतर दिले जातील.तसेच हे सर्वच धाग्यांना लागु पडेल."
झाले.मिसळपाव संकेतस्थळावर ह्या बातमीने प्रचंड खळ्बळ उडाली.मिसळपाववरिल सभासद एकदम भांबावुनच गेले.
ह्या संधीचा कसा काय फ़ायदा करून घेता येइल ह्याचा मंडळी रात्रंदिवस विचार करु लागली.
जुनी मंडळि तर एकदम भांबावूनच गेली. जो तो आपले जुने लेख काढून पहायला लागला.
किती प्रतिसाद आलेत,आपण कुठे कुठे प्रतिसाद दिला होता आपल्या प्रतिसादाची लांबी किती ह्याची मोजणी करण्यात मंडळी प्रचंड गुंग झाली.आपल्याला नक्की किती पैशे मिळणार ह्याचा हिशोब करु लागली.
आपला लेखनकर्मदरिद्रिपणा पाहुन बरेच जण हळहळले.अजून आपल्याला बरेच लिहिता आले असते की वगैरे उसासे सोडु लागली.
देवकाका,विजुभाउ,केशवसुमार,स्वाती दिनेश,राजे जैन,धोंडोपंत,भडकमकर मास्तर,चतुरंग वगैरे मंडळी जाम खुष झाली पण त्याच बरोबर काहिशी खट्टूहि झाली.
देवकाका--आपल्या बालपणीचा काळ सुखाचा ह्या मालिकेत अजून पाणि घालून किमान १० भाग तरी अजून वाढवता आले असते असे त्यांना वाटून गेले.
राजे जैन--ह्यांना आपल्या नशीबाचा फ़ारच राग आला. आपण साला १४ वेळाच पळुन गेलो नाहितर च्यायला आज किती पैशे मिळाले असते.जाउ देत.झाले ते झाले.आता बाहुबली होस्टेलचे आपण किमान ३० भाग तरि पाडणारच.
धोंडोपंत-- च्यायला आपल्या ब्लोगवरचे सर्वच लेख इथे टाकले असते तर आज आपण लाखात नाहि किमान काहि हजारात तरी खेळलो असतो.
स्वाती दिनेश ह्यांना आपण आजवर केलेल्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटले.घरि आपल्या स्वयपाकाला नाके मुरडण-या दिनेश रावांना आता दाखवतेच कि माझ्या पाककृती किती "लक्षलाभ" आहेत ते.तसेच अजून किती तरि पाककृत्या टाकता आल्या असत्या असेहि त्यांना वाटून गेले.
केशवसुमार- हे तर भलतेच खुशीत होते.प्रतिभावान माणुस.मिसळपाव वरच काय जालावर कुठेहि प्रसिध्द झालेल्या कवितेचे त्यांनी वेळात वेळ काढून विडंबन पाडले होते.ह्या तात्या अभ्यंकरांच्या आर्थिक मोबदला योजनेत सर्वात जास्त फ़ायदा बहुतेक यांनाच मिळणार होता.
विजुभाउ- गर्भ श्रीमंत माणुस. प्रतिभेने व आता ह्या नव्या स्कीम मुळेही. तरिहि त्यांना आतून वाटत होते की आपण एप्रिल फ़ळे,स्वप्न प्रवास,चहा,प्रेम हे प्रेमच असते वगैरे वगैरे ची प्रत्येकी अजून किमान १० एक भाग तरी टाकायला होते. काहिच नाहि तरी अजून अशी १० एक स्वप्ने तरि आपल्याला पडायला हवी होती असेहि त्यांना वाटुन गेले.
भडकमकर मास्तर जरा वैतागलेच होते.च्यायला आपल्या करियर एकेड्मीत एवढे कोर्स आहेत,त्या सर्वांची माहिती दिली असती तर.? आजवर एवढे पिक्चर पाहिले,नाटके पाहिली,ढिगाने पुस्तक वाचली,रेखाचित्रे काढली अन साला इथे फ़ुकटची मास्तरकी करत बसलॊ.श्या... त्या सर्वांबद्दल एकेक लेख लिहिला असता तर किमान माझे १५० एक लेख तरि इथे पाडले असते.
चतुरंग--आता मधुशाळेचे किमान ३० भाग तरि पाडणार.
इतर मंडळीत सर्वात जास्त खुष कोण असेल तर तीनच माणसे. धनंजय व मुक्तसुनीत व पेठकर काका.
आपण इतके दिवस जो काहि किबोर्ड बडवला, बोटे तुटेस्तव टाइप केले,कुठून कुठुन संदर्भ शोधून आणले त्याचे असे सोने होइल असे त्यांना स्वप्नात देखील वाटले नव्हते. सर्वात श्रीमंत प्रसिसाद कर्त्यांमध्ये हे तिघे भलतेच आघाडिवर होते.
छोटा डोन,प्राजु,पिवळा डांबीस वगैरे मंडळि हि खुशीत होती.आपणहि इथे बरेच काहि लिहिले आहे हे पाहुन त्यांनाहि आनंद झालेला होता.
दु:खी लोकात सर्किट,संजोपराव,अजानुकर्ण,बेसनलाडू हि मंडळी आघाडिवर होती.
आपली एवढी उच्च प्रतिभा असुनही आपण इथे फालतु डोकेफोडि करत बसलो हयाचा त्यांना स्वत:बद्दल रागच आला.
बाकिच्या मंडळिंचे भलतेच चालले होते.
घाटपांडे काकांना आपले अख्खे पुस्तकच इथे क्रमाक्रमाने टाकता आले असते तर किती बरे झाले असते असे वाटून गेले.
प्रा. डॉ. ना कुठुन आपण संपादक मंडळात येउन बसलो अन इथे नाठाळ मंडळी हाकल्त बसलो त्यामुळेच लिखाणाकडे आपले साफ़ दुर्लक्ष झाले असे त्यांना वाटुन गेले.संपादक मंडळातील सभासदांना काहितरि मोबद्ला मिळालाच पाहिजे असे त्यांनी तात्याशी बोलायचे ठरवले.
मंडळी भुतकाळ विसरुन भविष्यकाळाचे मनसुबे आखु लागली.
रामदासांनी पी सी जे सी चे अजून १० भाग वाढवायचे ठरवले.
आपण इथे काहि जास्त लिहिले नाहि्ये हे पाहून प्रियाली ताईंनी भयकथेचि सिरीजच आणायची ठरवले.
भारतातून रामसे,रामगोपाल वर्मा च्या सर्व भयपटांच्या सीडिज मागवण्यात आल्या.
केशवसुमारांनी जालावर काहि कविता शिल्लक आहेत का हे शोधायला सुरुवात केली.
आंबोळीने तर स्मशानातच कंदिलाच्या प्रकाशात महिनाभर राहून तो अनुभव लिहायचे ठरवले.
सखाराम गठणे तर भलतेच फ़ोर्मात आले.अजून कुठल्या कुठल्या विषयावर कौल घेता येईल ह्याचा अभ्यास सुरु केला.
तसेच ह्या वर्षी किमान ५ कट्टे तरि भरवायच व त्याचे प्रत्येकी १० धागे टाकायचा संकल्प केला.
भडकमकर मास्तरांनी जास्त प्रतिसादाचा मुद्दा लक्षात घेउन जुन्या हिंदी चित्रपटांच्या सिडिज आणून त्याचा अभ्यास सुरु केला.जुनी पुस्तके माळ्यावरून खाली काढली गेली.आपल्या घराच्या खिडकितून अजून काय काय दिसते ह्याचाहि अभ्यास सुरु केला.
प्राजुताईंनी तर रोज १० चारोळ्या लिहायचा संकल्प केला.तसेच भारतातून खास संतसाहित्य मागवले गेले. त्याचाहि जोरदार अभ्यास सुरु केला.
ऎडि जोशी- आयुष्याच्या नाटकाचे अजून १० भाग लिहिण्याच्या तयारीला लागला.पण हे भाग लग्न करून लिहावेत की असेच लिहावेत ह्या विचारात पडला.
विनायक प्रभूंनी स्वत:च्या क्रिप्टिक समुपदेशन लेखाचे अर्थ स्पष्ट करणारे अजून लेख पाडले... त्यावरून क्रिप्टिक कौन्सेलिंग नावाची नवीनच शाखा तयार झाली...
मिपावरचा भगिनीवर्ग तर भलताच खुश झालेला.
दुपारचा मोकळा वेळ सास बहु सिरीयल्स न बघता काहितरि सत्कारणी लावता येइल का ह्याचा विचार सुरु केला.
पाककृत्य़ांची पुस्तके आणण्यात आली.रोज नवनवीन पदार्थ करून त्याचा नव-यावर भडिमार सुरु झाला. नवनवीन पाककृत्या लिहिण्यात आल्या.
धमाल मुलगा तर एकदम सुन्न हौन बसला होता. त्याला काय बोलावे हे कळतच नव्हते. आपण इतक्या नळासारख्या गळून मोठ्या मोठ्या प्रतिक्रिया लिहिल्या त्याचे एवढे पैशे मिळणार? ह्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता.
इतके दिवस उगाच नव्या सदस्यांच्या खरडवह्या भरवून टाइमपास केला असा विचार करून आनंदयात्रीहि नव्या दमाने लिहायला बसला.
चतुरंग ह्यांनीहि विडंबनाचा जोरात सराव सुरु केला.
डांबीस काकांनी हि आपले शिक्षक आठवून त्यांचे व्यक्तीचित्र लिहायला सुरु केले.
आपण इतक्या सुगरण असूनहि इथे आता पर्यंत चारच भाग लिहिले ह्याचे मेघना ताईंना वैषम्य वाटले.त्याहि नव्या दमाने लिहायला सुरु झाल्या.
टारझन,यशोधरा,ब्रिटिश टिंगी, इनोबा,आन्या नावाचा बैल,पावसाची परि, मृगनयनी,बिपीन कार्यकर्ते,वरद वगैरे मंडळिंना फ़ारच दु:ख झाले.आपण उगाचच खरडफ़ळ्यावर मा-यामा-या करत बसलो,त्यापेक्षा इथे काहितरी लिहून डॉलर्स तरि कमवता आले असते असे त्यांना राहून राहून वाटुन गेले.
टारझनने तर समस्त आफ़्रिका पालथी घालून त्याचे प्रवासवर्णन लिहायचे ठरवले.
लिखाळ युरोपातील प्रत्येक शहराला भेट देउन त्याची माहिती लिहायचा घाट घालू लागले.
मदनबाण हि मागे नव्हताच.त्याने तर महिनाभराची सुट्टि घेउन महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळांना भेटि देउन तिथले फ़ोटो इथे द्यायचे ठरवले.
धम्याने कुठल्या कुठल्या गडांवर कसे कसे संस्कृतीरक्षण केले त्याचे लेख लिहायला सुरुवात केले.
उगाच मनसेगिरी करत बसलो अन गोखुळवाडिचा गंपु अर्धवट सोडून दिला.ते काहि नाहि आता तो लेख पुर्ण करायचाच असा विचार करून इनोबा मोठ्या जिद्दिने कामाला लागले.
पोलिसदलातील नोकरि सोडून इथेच लिखाण करावे काय ह्याचा नीलकांतने विचार सुरु केला.
मिपावरील ख-या अर्थाने प्रतिसाद विक्रमी डो.दाढे अजून कुठल्या विषयावर सभासादांमध्ये मा-यामा-या लावता येतील असा एखादा टोपिक सुरु करता येइल, महाराष्ट्रात थालीपिठ कुठे चांगले मिळेल अशा अनेक विषयांचा विचार करु लागले.
दिवसाला किमान २ लेख पाडून व सर्वप्रथम लेखांची शंभरी गाठलि तरी आपल्याला एक दमडिहि मिळत नाहि हे पाहून सामंत काकांना भलताच राग आला.त्यांनी तात्या अभ्यंकरांकडे त्याबद्दल जाब विचारला.
भोचक,सहज,सुवर्णमयी,शितल,रेवती,भाग्यश्री,वगैरे मंडळिहि कामाला लागलीच होती.
१_६ यमी ने हि एलियन सिरिज २० भागाची करायचे ठरवले.
फक्त कट्ट्याला जाउन दारु पिणे ह्या व्यतिरिक्त इथे काहिच कर्तुत्व नसलेल्या अभिज्ञ ने हि आता काहितरी सकस लिखाण करायचे ठरवले.
आता पर्यंत सर्वजणच फ़क्त काय काय लिहिता येइल ह्याचा विचार करत बसु लागली.त्याला प्रतिसादहि मिळायला हवेत हे काहि चाणाक्ष मंडळि वगळता कोणीच विचारात घेतले नव्हते.
मोठ्या प्रतिसादाचा मुद्दा लक्षात आल्यावर ह्या बाजारात धनंजय,मुक्तसुनीत,प्राजु,पेठकरकाका,धमाल मुलगा,१_६ यमी,छोटा डॉन,बेसनलाडु,सर्किट,ह्यांना भलताच भाव आला.
आमच्या लेखांना प्रतिसाद द्या असा त्यांच्यावर खरडींचा व व्यनिंचा भडिमार सुरु झाला.
इतर सभासदांनाहि लेखाच्या लिंकस पाठवणे सुरु झाले.
धनंजयराव व मुक्तसुनीत ह्यांनी तर ठरवलेच कि आता ह्या पुढे प्रतिक्रिया टाइप करायला माणुस ठेवायचा.एका प्रतिसादाला २ डॉलर्स ह्या हिशोबाने. व ती रक्कम हि लेखकाकडून वसूल करायची.
विजुभाउंनी तर खरडवहिच्यावर बोर्डच लावला होता. "आमच्या येथे कुठल्याहि विषयावर किमान २० ओळिंचि प्रतिक्रिया पाडून मिळेल."
ह्या सर्वाचा परिणाम म्हणजे दिवसाला मिसळपावर शेकडो लेख,कविता,विडंबने,पाककृत्या, फ़ोटो चे धागे पडू लागले.मिपावर भलताच ट्रॅफिक जाम सुरु झाला. पण ह्याचा अजून एक मोठा परिणाम म्हणजे खुद्द तात्यांच्या लेखाला मिळणारे प्रतिसाद कमी झाले.
अजूनहि तात्याला बक्षीसाची रक्कम हातात मिळाली नव्हती. जस जसे दिवस जाउ लागले तस तशी मंडळी अस्वस्थ होऊ लागली.
आपला आपला हिशोब देवून मंडळिनी तात्याला व्यनि,खरडि पाठवून भंडावून सोडले.
दिवसागणिक हा त्रास वाढु लागला. तात्याला विचार करायला वेळ मिळेनासा झाला.अन्न पाणि गोड लागेनासे झाले.
सिंगल माल्ट अप्रभावी ठरु लागली.झोप येईनाशी झाली.गाण्यात लक्ष लागेना.
अन हे सगळे असह्य होऊ लागले.अन तात्या स्वत:शीच जोरात ओरडला " झेपेल तितके दिवस चालवीन नाहितर बंद करून टाकीन."
तात्याला खडबडून जाग आली अन तात्या डोके गच्च धरून बसून राहिला.
घडाळ्यात पहाटेचे ५ वाजलेले होते अन समोर ग्लेनफ़िडिच ची अख्खी रिकामी बाटली भेसुर उभी होती.
(च्यायला हे स्वप्न होते तर....श्या......
पण पहाटेची स्वप्ने खरि होतात असे म्हणतात अन असे काहि खरेच घडले तर??????)
--------------------------------------------------------------------
वरिल लिखाण काल्पनिक असून सर्वांनीच ह.घे. हि विनंती.
वाचने
16916
प्रतिक्रिया
58
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुझ्या
)
:-)
In reply to ) by भाग्यश्री
सध्या
म्हणजे
In reply to सध्या by भडकमकर मास्तर
खो खो खो
एल चीपो!
पटेल
In reply to एल चीपो! by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
शुक्र करा
In reply to पटेल by प्रियाली
डोरलं म्हणजे
In reply to शुक्र करा by विसोबा खेचर
येस्स!
In reply to डोरलं म्हणजे by प्रियाली
प्लाश्टिक
In reply to शुक्र करा by विसोबा खेचर
बरोबर!
In reply to प्लाश्टिक by भडकमकर मास्तर
मला वाटतं तात्या तुम्हाला
In reply to शुक्र करा by विसोबा खेचर
पटले
In reply to एल चीपो! by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
गुड गोईंग..
अभिज्ञराव,
>>बरं झालं
In reply to अभिज्ञराव, by विसोबा खेचर
धन्य रे
>
माझे खाते
In reply to > by देवदत्त
अभिज्ञ, फारसं नाही आलं रे बाबा हसू!
ठ्ठ्ठो...
अमेरिकेला मदतीची जरूरी आहे.
In reply to ठ्ठ्ठो... by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
प्रेमळ बुश
In reply to अमेरिकेला मदतीची जरूरी आहे. by श्रीकृष्ण सामंत
प्रेमळ बुश
In reply to अमेरिकेला मदतीची जरूरी आहे. by श्रीकृष्ण सामंत
जबराट ....
मस्त!!! Finally I
मनकवड्या
चिमटे..
+१
In reply to चिमटे.. by प्रभाकर पेठकर
१००%
In reply to +१ by मनस्वी
सहमत
In reply to चिमटे.. by प्रभाकर पेठकर
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
काकांशी
In reply to चिमटे.. by प्रभाकर पेठकर
वा!!
व्वा!!
लोकसंख्येचा प्रश्न
जबरा
हाण
झकास रे!
जबराट...
शाखा
धमाल...
:))
मस्त..
लय भारी...
दाम करी काम येड्या, दाम करी काम ...
मस्तच!
अभिज्ञ
मस्त :)
अभिज्ञ,
मस्त आहे!!!
बाबा
फक्त
फक्त
In reply to फक्त by विजुभाऊ
श्रिमन्त तात्या
मस्त.
हे स्वप्न खरं आता व्हायला