दडपण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
"अवो अजौन किती वेळ?"
"अगं यीलच इतक्यात रोज याच येळेला येती की"
"माझं हात दुखाया लागलं, बाळ्याला खाली ठेवा तो काय एकडाव झोपला की उठाचा न्हाई ; अन जरा हिला घ्या"
"अगं ती बघ लाईट दिसाया लागली, आलीच बघ ती?"
***
त्याने सतत कर्णकर्कश शीट्टी वाजवली तेव्हा बाजुच्या खुर्चीत डुलक्या देणारा सिनियर झटकन जागा झाला.
"काय झालं? "
"ते ते "
इंजिनाच्या प्रकाशझोतात सिनियरने समोर पाहिलं. एक शिवी हासडत म्हणाला "भोसडीचे झेपत नाही तर एवढी पोरं कशाला काढतात कुणास ठाऊक?"
खिडकीतुन हात बाहेर काढुन हलवत "बाजुला व्हा" सांगण्याचा त्याने प्रयत्न केला, पण ती ढिम्म हलली नाहीत. ताशी १२० च्या गतीने जाणार्या इंजीनानं त्या चौघांना फुटबॉलसारखं उडालेले त्यानं पाहिले.
गाडीच्या रेलींगवर झुकुन तो भडभडा ओकला.
"त्या किटलीतला चहा घे म्हणजे बरं वाटेल" त्याच्याकडे पाण्याची बाटली देत सिनियर बोलला.
त्याच्या मनावर दडपण आलं.
खांद्यावर हात ठेवत सिनियर बोलला "तु पापाचा विचार करु नकोस, त्यांची मने आधीच मेली होती".
मागे पळणार्या समांतर रेल्वे रुळांकडे तो एकटक बघत राहिला.
प्रतिक्रिया
:(
त्रास होतो. नको.
पहिल्या चार ओळी वाचून ते बसची
सहमत आहे. विशेष करुन तिसरी ओळ
कथा आवडली...असे कसे म्हणणार?
खरच त्रास होतो.
सहमत
बाबारे
वास्तववादी पण त्रासदायक
होय
....
कथा आवडली.
देर्देकरजी दर्दभरी कहानी...
:(
.
:(
:(
खरंच त्रास झाला कथा वाचुन.
:(
:-(
भयान
:(
आई ग
:(
अहो...भयानक रस कुठून आणलात ?
कससच वाटत अस वाचून.
:(
हृदयद्रावक चित्रण
मायची कटकट. :-(
:(
भयानक