Skip to main content

दडपण

लेखक प्रमोद देर्देकर यांनी शुक्रवार, 29/07/2016 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
"अवो अजौन किती वेळ?" "अगं यीलच इतक्यात रोज याच येळेला येती की" "माझं हात दुखाया लागलं, बाळ्याला खाली ठेवा तो काय एकडाव झोपला की उठाचा न्हाई ; अन जरा हिला घ्या" "अगं ती बघ लाईट दिसाया लागली, आलीच बघ ती?" *** त्याने सतत कर्णकर्कश शीट्टी वाजवली तेव्हा बाजुच्या खुर्चीत डुलक्या देणारा सिनियर झटकन जागा झाला. "काय झालं? " "ते ते " इंजिनाच्या प्रकाशझोतात सिनियरने समोर पाहिलं. एक शिवी हासडत म्हणाला "भोसडीचे झेपत नाही तर एवढी पोरं कशाला काढतात कुणास ठाऊक?" खिडकीतुन हात बाहेर काढुन हलवत "बाजुला व्हा" सांगण्याचा त्याने प्रयत्न केला, पण ती ढिम्म हलली नाहीत. ताशी १२० च्या गतीने जाणार्‍या इंजीनानं त्या चौघांना फुटबॉलसारखं उडालेले त्यानं पाहिले. गाडीच्या रेलींगवर झुकुन तो भडभडा ओकला. "त्या किटलीतला चहा घे म्हणजे बरं वाटेल" त्याच्याकडे पाण्याची बाटली देत सिनियर बोलला. त्याच्या मनावर दडपण आलं. खांद्यावर हात ठेवत सिनियर बोलला "तु पापाचा विचार करु नकोस, त्यांची मने आधीच मेली होती". मागे पळणार्‍या समांतर रेल्वे रुळांकडे तो एकटक बघत राहिला.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5505
प्रतिक्रिया 31

प्रतिक्रिया

. -दिलीप बिरुटे

पहिल्या चार ओळी वाचून ते बसची वा रेल्वेची चढण्यासाठी वाट पाहत असावेत, आत्महत्येसाठी नाही असं वाटून गेलं.

In reply to by किसन शिंदे

सहमत आहे. विशेष करुन तिसरी ओळ वाचून. जिला जायचेच आहे ती व्यक्ती हात दुखण्याबद्दल तक्रार करेल असं वाटत नाही.

असलं काही नको टाकत जावुस. :((

....

कथा आवडली. पण पहिल्या चार ओळी पुढच्या घटनेशी जोडलेल्या वाटल्या नाहीत मला. धक्कातंत्र अपेक्षित असेल - पण ते नीटसे पोचले नाही माझ्यापर्यंत. एकंदर परिणामकारक आहे कथा.

:(

:-(

:(

:(

:(

:-(

भयान

:(

:( आता जरा आनंदी लीवा कायतरी...

:(

:(