✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मामलेदार मिसळ पंढरी

म
मीउमेश यांनी
Tue, 02/09/2016 - 13:00  ·  लेख
लेख
काही दिवसांपूवी रविवारी सकाळी प्रिय पत्नीने नेहमी प्रमाणे स्वयंपाक या विषयाला फाटा दिल्याचे अधिकृत जाहीर केले. गेल्या काही दिवसांपासून मामलेदार मिसळ मंदिराला भेट न दिल्याने मनाला रुखरुख लागून राहिले होती,(पूर्वी बी पी ओ मध्ये काम करताना सकाळी पाच वाजता सुटून , आम्ही सकाळी साडे पाचला मामलेदार मिसळ मंदिरात हजेरी लावत असू ) या घटने मुळे योग जुळून आला. रविवारी मामलेदार मिसळ मिळत नसे, काही दिवसांपासून रविवारी सुद्धा पूर्ण दिवस हाटेल उघडे असते. अचानक आमच्या सासूबाई प्रकट झाल्या (अतिथी), मग त्या सुद्धा बरोबर निघाल्या,माझी पत्नी आणि सासुबाईची मिसळ मंदिरास भेट देण्याची हि पहिलीच वेळ होती , रविवार असला तरी मी नेहमी बाईक घेऊन मिसळ मंदिरास भेट देत असतो, पार्किंग चा खूप त्रास असतो तिकडे... प्रवास सुरु झाला, कशीबशी फायर ब्रिगेड जवळ जागा मिळवून गाडी पार्क करण्यात यश मिळवले. पंढरीच्या वारी वारकरी जसे विठ्ठलाच्या दर्शनाची आस डोळ्यात पाऊले चालत असतात तशीच काहीतरी माझी परिस्थिती झाली होती. अखेर दोन मिनिटात आमची पंढरी समोर दिसली,बाहेर नेहमीचीच गर्दी, हळूहळू वाट काढत काढत एका टेबला पर्यंत येउन पोहोचलो, आधीच दोन लोक त्या टेबला वर मिसळीचा आस्वाद घेत होते. आम्ही जरा बारीक होत टेबलावर कब्जा केला. आत गाभार्यात पोहोचताच ओळखीचे काकानी (वेटर) हसत मुखांनी स्वागत केले, बर्याच दिवसात न आल्याचे चौकशी झाल्यावर " होऊन जाऊदे" अशी हाक मारताच भरभर समोर बशीत दोन पाव अवतरले, मेनुकार्ड नाही का ? असे सासूबाईनी विचारताच हाटेलातले सगळे आमच्या तोंडाकडे बघायला लागले. किती खजील झाल्यासारखं झालं काय सांगू. माझ्या पंढरीचा केवढा हा अपमान? सासूबाई ची खरपूस शाळा ( समाचार ) घेतल्यावर सौ विचारत्या झाल्या," मिसळ आणि अजून काय मिळतं इकडे??", बाकी काहीही मिळूदे आपण मिसळच खायची असा दमच दिला. मामलेदार मिसळीची प्रचीती नसल्याने मी या अज्ञानी बालकांना देवणी क्षमा करावी अशी देवाला प्रार्थना करून एक तिखट आणि दोन मेडियम अशी हाक दिली. क्षणाचा विलंब न करता माझी परमप्रिय मिसळ समोर अवतरली, बायकोच्या हातचा मिळमिळीत खून तोंडाची चव गेली होती. जोरदार डल्ला मारायला सुरुवात झाली, हाता तोंडाची लढाई जोरदार सुरु झाली, मधेच सासूबाई बेस्लेरी आहे का ? थोडा कांदा मिळेल का ? टिशू नाहीत का ? असे काही तरी चालूच होतं. अरे किती तिखट आहे हे , नाकातून, डोळ्यातून पाणी यायला लागलाय--- सौ, (टाऊन मधल्या लोकांना मिळमिळीत खायची सवय ) त्याच्या कडे जराही लक्ष न देता आमच रसग्रहण - पाव सुरूच होतं. शेवटी ताकाचे ग्लास समोर येउन उभे राहिले. त्याचा आस्वाद घेऊन आम्ही बाहेर पडलो. गाडी जवळ पोचल्यावर सासूबाई आणि सौ यांची मिसळ या विषयावर चर्चा सुरूच होती, "अरे ती त्या मामाची ती हि आहे ना ती पण खूप छान मिसळ करते". अरे … मुर्ख लोक अशी मिसळ कुठे पृथ्वी तलावावर मिळते का ?, पुण्याची , कोल्हापूरची प्रत्तेक मिसळी ची आपली वेगळी चव असते, मिसळ हि मिसळच , पण मामलेदार मिसळ म्हणजे माझं भावनिक नातं अगदी लहान पणा पासूनच …. एकदम झकास ! मुळात मामलेदार मिसळ खाण्याचे शास्त्र आहे, ते तुमच्यावर संस्कार झालेले नाहीत. -- मी म्हणालो आमचे काही अलिखित नियम आहेत रांग लाऊन टेबला पर्यंत पोहचणे, त्याशिवाय मजाच नाही आधीच टेबला वर बसलेल्या लोकांबरोबर समंजस पणा दाखवून आसनस्थ होणे टेबलावर टिशू नाहीत या बद्दल कटकट न करणे वेटर काकांना जास्त त्रास न देता एकदाच ओर्डर देणे समोर वाढलेल्या मिसळेवर अधाश्या सारखा तुटून पडणे, नुसता रस्सा पाव न खाता पाचव्या पावासाठी वेगळी मिसळ मागवणे पोटातली जागा पूर्ण पणे व्याप्त झाल्यानंतर सुद्धा अतिक्रमणाची शेवटची शक्यता संपे पर्यंत त्याचा आस्वाद घेणे सरतेशेवटी न चुकता ताक हे घेतलंच पाहिजे पूर्वी बशी मिळणारी मिसळ आता छोट्या लहान बाउल मध्ये मिळू लागलीये , हॉटेल मध्ये थोड्या फार प्रमाणात नुतनीकरण झालंय , फक्त पार्सल मिसळ चे वेगळे दुकान सुरु झालाय , आणि बोरीवली कांदिवली मध्ये मामलेदार मिसळीची शाखा सुरु झाल्याचं पण ऐकण्यात आहे. मामलेदार मिसळ हि एक वेगळी पर्वणी आहे , आणि मी मामलेदार मिसळ पंढरीचा एक वारकरी आहे
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
मत

प्रतिक्रिया द्या
33890 वाचन

💬 प्रतिसाद (209)

प्रतिक्रिया

आयला हा लेख तर पुण्यातुन

मृत्युन्जय
Tue, 02/09/2016 - 13:13 नवीन
आयला हा लेख तर पुण्यातुन ठाण्यात निर्यात झालेल्या एखाद्या पुणेकराने लिहिल्यासारखे वाटते. पुणेकर सुद्धा बेडेकर बद्दल असेच भरभरुन लिहितो. अवांतरः माझ्यासाठी बेडेकरची गोडसर मिसळ आणि मामलेदारचा झटका नेहमीच संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहेत. दुसरा नंबर दिवे आगरच्या आवळसकरांचा. मग बाकीचे बरेच आहेत.
  • Log in or register to post comments

मामलेदार मिसळ मंदिर.....अरे बाप रे....

माम्लेदारचा पन्खा
Tue, 02/09/2016 - 13:24 नवीन
रविवार असला तरी मी नेहमी बाईक घेऊन मिसळ मंदिरास भेट देत असतो
सासूबाईना घेऊन कसे गेलात दोघे ?
  • Log in or register to post comments

माफ करा ते राहून गेलं

मीउमेश
Tue, 02/09/2016 - 14:08 नवीन
माफ करा ते राहून गेलं तिघ होतो म्हणूनच गाडी(कार) नी जावा लागलं ,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

मामलेदारला वड्याबरोबर मिळणारी

प्रचेतस
Tue, 02/09/2016 - 13:34 नवीन
मामलेदारला वड्याबरोबर मिळणारी हिरवी चटणी फारच आवडते. मिसळ काही इतकी खास वाटली नाही मात्र.
  • Log in or register to post comments

धैर्यवान आहात.....

माम्लेदारचा पन्खा
Tue, 02/09/2016 - 13:48 नवीन
हल्ली ठाणेकर असली वाक्यं वैयक्तीक पराभव म्हणून घेतात बर्का....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

=))

प्रचेतस
Tue, 02/09/2016 - 13:54 नवीन
=)) जे आहे ते आहे. मला व्यक्तीशः कोल्हापूरची फडतरे मिसळ आवडली. काहींना ती आवडत नाही. ज्याची त्याची चव. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

फडतरे रॉक्स!

वेल्लाभट
Tue, 02/09/2016 - 14:09 नवीन
फडतरे रॉक्स! पण रत्नागिरीला मारुती मंदिराजवळ गोपाळ ची मिसळ खाऊन बघा एकदा. आमची ती नंबर वन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कधी गेलो तर खाईन नक्कीच.

प्रचेतस
Tue, 02/09/2016 - 14:19 नवीन
कधी गेलो तर खाईन नक्कीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

+१००

स्वच्छंदी_मनोज
Tue, 02/09/2016 - 14:55 नवीन
ज्जे बात.. वेल्लाभट गोपाळच्या मिसळीच्या आठवणीने एकदम हळवे केलेत हो. ह्याच मारुती मंदिराजवळाची गोपाळ आणी समोरील साईची मिसळ ह्याला जगात तोड नाही... :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

गोपाळपेक्षा

पैसा
Tue, 02/09/2016 - 17:39 नवीन
गोपाळपेक्षा साईश्वरी, त्याचाच वडापाव भारी असतो. आणि गावात गांधीची मिसळ लै भारी. त्याला गांध्याची मिसळ असं म्हणायचं असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वच्छंदी_मनोज

नको नको.. रत्नागिरीच्या खाद्य

गवि
Tue, 02/09/2016 - 17:44 नवीन
नको नको.. रत्नागिरीच्या खाद्य आठवणी नकोत. मला तर विहार डिलक्सची मिसळपण आवडते. आणि त्याच्या समोर पंपाशेजारी तीस वर्षांपूर्वी "आहार" नावाची टपरी होती मिसळीची. ती बंद झाली असं कोणी सांगू नका.. यादोंके सब जुगनू जंगल में रहेते है..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आहे आहे!

पैसा
Tue, 02/09/2016 - 17:52 नवीन
आहार छान चालू आहे! अगदी दुधो नहाव पुतो फलो!! आता साधारण दर्जाचे हॉटेल आहे. हल्लीच गेल्या महिन्यात पोहे खाऊन आले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

टपरी??

नन्दादीप
Tue, 02/09/2016 - 17:59 नवीन
आता चान्गल मोठ्ठ प्रस्थ झालय ते... महाराष्ट्रीय पन्जाबी चायनीज दाक्षिणात्य अस काय काय मिळत तिथे... रत्नागिरीतील मिसळीची ठिकाणे : भिडे उपहार गृह : पुणेरी मिसळ गोपाळ साईश्वरी गान्धी - टॉकीज समोर रसराज (पापडी मिसळ) - टॉकीज शेजारी माऊली (हल्ली दर्जा किंचीत खालावलाय) रुद्र (मालक जरी दाक्षिणात्य असला तरी मिसळ चा रस्सा घट्ट, खोबर्‍याच वाटप लावलेला असतो)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

साईश्वरी सोबत वायंगणकरचा

विशाखा राऊत
Tue, 02/09/2016 - 19:14 नवीन
साईश्वरी सोबत वायंगणकरचा वडापाव पण बेस्ट. ताई गांधी मिसळला सध्या गोपाळ आणि रसराजने मागे टाकले आहे. आहार दणक्यात सुरु आहे. स्तंभावरची भेळ, थिबा पाँईटला बोंद्रेकाकींचा कोन, भेळ, मांडवी भेळ, छाया मधले पॅटीस बस आता जास्त आठवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नन्दादीप

बोंद्रेकाकांनी थिबा

गवि
Tue, 02/09/2016 - 19:55 नवीन
बोंद्रेकाकांनी थिबा पॉईंटवरच्या फळ्या लावून केलेल्या भेळस्टॉलवर पहिल्यांदा "पावभाजी" ही कन्सेप्ट रत्नागिरीत लाँच केली. मस्का पावभाजी, रुपया जास्त. नंतर हळुहळू खूप आले. पण त्यांनी फार फार आधी सुरु केला पदार्थ. त्यांची भेळही तुलनेपलीकडची. लहानपण आहे सगळं त्यात. कुठे तुलना करणार? एकदम पंधरा वर्षांच्या अंतराने गेलो. बोंद्रेंच्या स्टॉलवर शेवटचं तर वीस वर्षांहून जास्त झाली असतील त्यावेळी. पाऊस पडत होता. थिबा पॉईंट तसाच होता. तिकीट लावून उद्यानाचा अजून पायाही झाला नव्हता. बोंद्रेकाका एकटेच पावसात उभे होते. समोर गेल्यावर नावाने ओळखलं. भेळ बनवून दिली. डोळ्यात पाणीच आलं. पुढच्या एका वेळी भेळेचा कोनही खाल्ला, नवीन उद्यानही पाहिलं. पण बोंद्रेकाका नव्हते आणि थिबापॉईंटही गाडला गेला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा राऊत

वैशाली मला वाटते

पैसा
Tue, 02/09/2016 - 20:37 नवीन
रत्नागिरीत पावभाजी वैशाली मधे सुरुवात झाली बहुतेक. नंतर थिबा पॉइंटला बोंद्रेंच्याही आधी कलघटगीचा भेळेचा स्टॉल असायचा. नंतर मग बंदरावर लहान लहान हॉटेल्स सुरू झाली. पण आधी वाटेत मुरलीधराच्या देवळाबाहेर एकजण पानाच्या गादीसारख्या स्टॉलवरून भेळ द्यायचा. पांढर्‍या समुद्राजवळ गाड्यांवर भेळ मिळायची. ती खाणे हा आवडता उद्योग असायचा. आता पांढरा समुद्रच मरून गेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मारुतीमंदिराच्या जवळ भाटवडेकर

गवि
Tue, 02/09/2016 - 21:31 नवीन
मारुतीमंदिराच्या जवळ भाटवडेकर खानावळ म्हणून अस्सल राईसप्लेट फेम खानावळ होती. संध्याकाळनंतर बॅचलरांची फुल गर्दी. खानावळीचा फ्लेवरही टिपिकल. खेरीज स्टँडशेजारी हेळेकर शिक्केवाला प्रचंड पेढा. ..विहार डिलक्समधे तेव्हा दोन दालनं होती. अंधुक प्रकाश, संगीत.. एकीकडे शाकाहारी, दुसरीकडे मांसाहार अन परमिट रुम. विवेक लॉजसमोर साईकृपा की कायतरी. त्या वेळची "फाईन डाईन"च ही दोन्ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

विहार डिलक्स,

पैसा
Tue, 02/09/2016 - 21:54 नवीन
विहार डिलक्स तेव्हा जरा पैशेवाल्यांसाठी म्हणून फेमस होतं. आता त्यानी रेस्टॉरंट दुसर्‍या कोणाला चालवायला दिलंय बहुतेल. क्वालितीही ती राहिली नाही. जुनं विठोबाच्या देवळाजवळचं विहार मात्र आपली चव टिकवून आहे. तसंच खानोलकरांचं प्रशांत लंच होम. रत्नागिरीतल्या खानावळींशी कधी संबंध आला नाही, पण भाटवडेकरांचं नाव आठवतंय. नित्यानंद चव्हाणचं अंगण नंतर बंद झालं. हेळेकरांचे आणि मलुष्ट्यांचे पेढे, कोहाळे पाक, चपटे पेढे अगदी तसेच्या तसे अजून मिळतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आहाहा...

स्वच्छंदी_मनोज
गुरुवार, 02/11/2016 - 14:47 नवीन
पण मुळ हेळेकर स्टँडपेक्षा खाली श्रीकृष्ण औषधालयाजवळचा, तिथेच विठोबा देवळाजवळच्या राजा आईस्क्रीम सेंटर मधे कसाटा आणी कुल्फी, साईश्वरी वडापाव, समाधानचा डोसा, अशोक हॉटेलची कुर्मापुरी (दुर्दैवाने पार्टनरच्या भांडणात बंद झाले हे :( ), छाया गेस्ट हाऊस मधले पियुष, पांढर्‍या समुद्रावरची भेळ आणी अनेक अनेक अनेक.. खंप्लीट नॉस्टॅल्जिक...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

पण मुळ हेळेकर स्टँडपेक्षा

गवि
गुरुवार, 02/11/2016 - 15:05 नवीन
पण मुळ हेळेकर स्टँडपेक्षा खाली श्रीकृष्ण औषधालयाजवळचा
खाली आणि वर याचा अर्थ रत्नागिरीतल्यांनाच बरोबर कळतो. बाहेरुन आलेल्यांना एखादा सडेकर "दुपारी जरा खालती जाऊन येतो" म्हणाला किंवा मधलीआळीकर "वरती वारा भरपूर सुटलेला काल" वगैरे बोलला की काही कळत नसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वच्छंदी_मनोज

करेक्ट

स्वच्छंदी_मनोज
गुरुवार, 02/11/2016 - 15:55 नवीन
बाहेरुन आलेल्यांना एखादा सडेकर "दुपारी जरा खालती जाऊन येतो" म्हणाला किंवा मधलीआळीकर "वरती वारा भरपूर सुटलेला काल" वगैरे बोलला की काही कळत नसे >>> एकदम करेक्ट.. सड्यावर जाऊन येतो असे म्हणणारे अजूनही रत्नागिरीत आहेत. आता सडा म्हणजे मेंटल हॉस्पिटलचा चढाव चढून वरती माळनाक्याला आले म्हणजेच असे पण त्यावेळी एस्टी स्टँड ही हद्द होती आणी माळनाका म्हणजे गावाच्या बाहेर. माळनाक्यावरच्या वैद्य वकीलांच्या बंगल्यातून समुद्र दिसत असे म्हणूनच त्या बंगल्याचे नाव 'सागर दर्शन' असे आहे. असो.. मिसळीच्या धाग्यावर बरेच अवांतर झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

कृपया लगेच रत्नागिरी असा धागा

गवि
गुरुवार, 02/11/2016 - 16:22 नवीन
कृपया लगेच रत्नागिरी असा धागा काढा. लगोलग येतोच. भेटू तिकडे. कोंकणातले इतरजणही आपापल्या गावाबद्दल चर्चा करतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वच्छंदी_मनोज

+१००

सौंदाळा
गुरुवार, 02/11/2016 - 16:25 नवीन
+१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

खरच खुप आठवणी जाग्या झाल्या.

विशाखा राऊत
गुरुवार, 02/11/2016 - 17:57 नवीन
खरच खुप आठवणी जाग्या झाल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

खरंच, खरंच.

यशोधरा
Fri, 02/12/2016 - 23:02 नवीन
खरंच, खरंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मी ह्यावेळी कोहाळेपाक आणला

विशाखा राऊत
गुरुवार, 02/11/2016 - 14:54 नवीन
मी ह्यावेळी कोहाळेपाक आणला हेळेकरांचा.. खुपच आवडला सगळ्यांना. पुढच्या वेळी दुप्पट आण सांगितले आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

कोहाळेपाक = पेठा

सुनील
गुरुवार, 02/11/2016 - 15:12 नवीन
कोहाळेपाक म्हणजे उत्तरेत ज्याला पेठा म्हणतात तोच का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा राऊत

अगदी = नाही

वेल्लाभट
गुरुवार, 02/11/2016 - 17:56 नवीन
पण पेठा कोहाळ्यापासूनच बनवतात म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

पेठा वेगळा.. कोहाळेपाक वेगळा.

विशाखा राऊत
गुरुवार, 02/11/2016 - 17:59 नवीन
पेठा वेगळा.. कोहाळेपाक वेगळा. कोहाळेपाकमध्ये बहुदा खवा पण असतो. पेठा पांढराशुभ्र आणि कोहाळेपाक चॉकलेटी. इथे लोकांनी फज म्हणून खाल्ले हिहिहि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

एवढी भारी असते? गेली सहा

असंका
Tue, 02/09/2016 - 15:04 नवीन
एवढी भारी असते? गेली सहा वर्षं त्या गोपाळवरून जा ये करतोय. अगदी सुरुवातीला एकदा आत पाउल टाकलंय-सहा वर्षांपूर्वी. आता एकदा जायला हवं....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

लय भारी...

नन्दादीप
Tue, 02/09/2016 - 16:04 नवीन
आठवड्यातून एकदा तरी मिसळग्रहण करण्याचे व्रत घेतले आहे.... त्यातूनही गोपाळलाच जास्त... तशी हल्ली राधाकृष्ण टॉकीज च्या बाजूला नवीनच खास मिसळ सेंटर उघडलय... फरसाण न घालता फक्त पापडीची मिसळ.... झक्कास एकदम... अवांतर : नाही नाही म्हणता या प्रतिसादावर बरेच रत्नांग्रीकर मिपाकर समजले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

रसराज की काय... गोपाळच्या

विशाखा राऊत
Tue, 02/09/2016 - 17:36 नवीन
रसराज की काय... गोपाळच्या मिसळसाठी कुछ भी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नन्दादीप

रसराज जुनं ग

पैसा
Tue, 02/09/2016 - 17:55 नवीन
रसराज जुनं ग! मी कॉलेज मध्ये असतानापासून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा राऊत

रसराजच

नन्दादीप
Tue, 02/09/2016 - 18:01 नवीन
पैसा ताई, रसराजच ते.. फक्त हे नव्या साच्यातल... सद्ध्या तात्पुरत स्थलांतर केलय त्यानी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

भेळेने सुरुवात केलेली!

पैसा
Tue, 02/09/2016 - 18:08 नवीन
त्याने थिएटरच्या बाजूला लहानशा जागेत भेळेने सुरुवात केलेली. अप्रतिम भेळ मिळायची. कैरी घातलेली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नन्दादीप

ताई तेच ते पण आता सध्या नवीन

विशाखा राऊत
Tue, 02/09/2016 - 19:17 नवीन
ताई तेच ते पण आता सध्या नवीन सुरु झालेय. पायनॅपल शिरा मस्त असतो तिथे असे बहिण सांगत होती. कॉलेजला म्हणशील तर शेंबेकराच्या कँन्टीनचा कटवडा कोणी खाल्ला आहे की नाही? भेळ तर कधीही कुठेही मस्तच मिळते रत्नागिरीला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

+१

नन्दादीप
Wed, 02/10/2016 - 10:51 नवीन
+१११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा राऊत

मी +१

स्वच्छंदी_मनोज
गुरुवार, 02/11/2016 - 14:50 नवीन
कॉलेजला म्हणशील तर शेंबेकराच्या कँन्टीनचा कटवडा कोणी खाल्ला आहे की नाही? >>> + १००. कॉलेजला असताना शेंबेकरांच्या कँटीनमध्येच पडीक असायचो आम्ही. त्यांचा मुलगा आमच्या बरोबरचा असल्याने आमची फुल वट कँटीनमध्ये :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा राऊत

+१०० फॉर फडतरे

कपिलमुनी
Tue, 02/09/2016 - 16:01 नवीन
फडतरे याक्क ! खुद्द कोल्हापूरकर फडतरेकडे खात नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

गर्दीमुळे फक्त!

असंका
Tue, 02/09/2016 - 16:08 नवीन
गर्दीमुळे फक्त! शिवाय थोडं पुढे शेजारीच महालक्ष्मी मिसळ पण आहे की...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

बेश्ट मिसळ मिळण्याची ठिकाणे

मीउमेश
Tue, 02/09/2016 - 14:12 नवीन
मुनमुन मिसळ डोंबिवली , कवीची मिसळ चिंचवडगाव , पेण RTO ची मिसळ , मयुर मिसळ मंचर एस टी स्टेंड
  • Log in or register to post comments

अहो ती मुनमुन मामलेदारकडूनच

प्रचेतस
Tue, 02/09/2016 - 14:20 नवीन
अहो ती मुनमुन मामलेदारकडूनच श्याम्पल आणते. चिंचवडला कविपेक्षा मयुरची चांगली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीउमेश

किधर हय?

खान्देशी
Tue, 02/09/2016 - 15:40 नवीन
मयूर मिसळ किधर हय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

जयश्री

चाणक्य
Tue, 02/09/2016 - 17:45 नवीन
वल्ली, 'जयश्री'ची पण चांगली असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

चिंचवड ला अरिहंत मिसळ मस्त एकदम :) !!!!

जिन्गल बेल
गुरुवार, 02/11/2016 - 15:14 नवीन
चिंचवड ला अरिहंत मिसळ मस्त एकदम :) !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

साहेब जास्त तिखट म्हणजे मिसळ

प्रमोद देर्देकर
Tue, 02/09/2016 - 14:19 नवीन
साहेब जास्त तिखट म्हणजे मिसळ भारी असे समजु नका. मागे खफवर लिहले होते तेच सांगतो त्या मिसळीला तिखटपणा आणण्यासाठी चुन्याच्या निवळीचे पाणी घालतात तेव्हा जरा जपुन.
  • Log in or register to post comments

त्या मिसळीला तिखटपणा

होबासराव
Tue, 02/09/2016 - 14:23 नवीन
त्या मिसळीला तिखटपणा आणण्यासाठी चुन्याच्या निवळीचे पाणी घालतात तेव्हा जरा जपुन. हे बर्‍याच मित्रांकडुन ऐकले आहे.
  • Log in or register to post comments

असं काहीही नाही , अफवा आहे

मीउमेश
Tue, 02/09/2016 - 14:24 नवीन
असं काहीही नाही , अफवा आहे
  • Log in or register to post comments

" होऊन जाऊदे" अशी हाक मारताच

होबासराव
Tue, 02/09/2016 - 14:27 नवीन
" होऊन जाऊदे" अशी हाक मारताच भरभर समोर बशीत दोन पाव अवतरले वाह ! खुब जमेगि मेहफिल जब मिल बैठेंगे तिन यार...जबराट
  • Log in or register to post comments

मिसळ आख्यान वाचुन पोट तुडुंब

भावना कल्लोळ
Tue, 02/09/2016 - 14:34 नवीन
मिसळ आख्यान वाचुन पोट तुडुंब भरले, पण जर मामलेदार मिसळीचा ठाण्यातला अचूक पत्ता मिळाला असता तर कधी कधी ठाण्यात आगमन झाल्यास चव घ्यावी असा मानस आहे, मिपा बंधुच्या मार्गदर्शनच्या अपेक्षेत.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा