काही दिवसांपूवी रविवारी सकाळी प्रिय पत्नीने नेहमी प्रमाणे स्वयंपाक या विषयाला फाटा दिल्याचे अधिकृत जाहीर केले.
गेल्या काही दिवसांपासून मामलेदार मिसळ मंदिराला भेट न दिल्याने मनाला रुखरुख लागून राहिले होती,(पूर्वी बी पी ओ मध्ये काम करताना सकाळी पाच वाजता सुटून , आम्ही सकाळी साडे पाचला मामलेदार मिसळ मंदिरात हजेरी लावत असू ) या घटने मुळे योग जुळून आला.
रविवारी मामलेदार मिसळ मिळत नसे, काही दिवसांपासून रविवारी सुद्धा पूर्ण दिवस हाटेल उघडे असते.
अचानक आमच्या सासूबाई प्रकट झाल्या (अतिथी), मग त्या सुद्धा बरोबर निघाल्या,माझी पत्नी आणि सासुबाईची मिसळ मंदिरास भेट देण्याची हि पहिलीच वेळ होती , रविवार असला तरी मी नेहमी बाईक घेऊन मिसळ मंदिरास भेट देत असतो, पार्किंग चा खूप त्रास असतो तिकडे... प्रवास सुरु झाला, कशीबशी फायर ब्रिगेड जवळ जागा मिळवून गाडी पार्क करण्यात यश मिळवले.
पंढरीच्या वारी वारकरी जसे विठ्ठलाच्या दर्शनाची आस डोळ्यात पाऊले चालत असतात तशीच काहीतरी माझी परिस्थिती झाली होती.
अखेर दोन मिनिटात आमची पंढरी समोर दिसली,बाहेर नेहमीचीच गर्दी, हळूहळू वाट काढत काढत एका टेबला पर्यंत येउन पोहोचलो, आधीच दोन लोक त्या टेबला वर मिसळीचा आस्वाद घेत होते. आम्ही जरा बारीक होत टेबलावर कब्जा केला.
आत गाभार्यात पोहोचताच ओळखीचे काकानी (वेटर) हसत मुखांनी स्वागत केले, बर्याच दिवसात न आल्याचे चौकशी झाल्यावर " होऊन जाऊदे" अशी हाक मारताच भरभर समोर बशीत दोन पाव अवतरले,
मेनुकार्ड नाही का ? असे सासूबाईनी विचारताच हाटेलातले सगळे आमच्या तोंडाकडे बघायला लागले. किती खजील झाल्यासारखं झालं काय सांगू. माझ्या पंढरीचा केवढा हा अपमान?
सासूबाई ची खरपूस शाळा ( समाचार ) घेतल्यावर सौ विचारत्या झाल्या," मिसळ आणि अजून काय मिळतं इकडे??",
बाकी काहीही मिळूदे आपण मिसळच खायची असा दमच दिला. मामलेदार मिसळीची प्रचीती नसल्याने मी या अज्ञानी बालकांना देवणी क्षमा करावी अशी देवाला प्रार्थना करून एक तिखट आणि दोन मेडियम अशी हाक दिली.
क्षणाचा विलंब न करता माझी परमप्रिय मिसळ समोर अवतरली, बायकोच्या हातचा मिळमिळीत खून तोंडाची चव गेली होती. जोरदार डल्ला मारायला सुरुवात झाली, हाता तोंडाची लढाई जोरदार सुरु झाली, मधेच सासूबाई बेस्लेरी आहे का ? थोडा कांदा मिळेल का ? टिशू नाहीत का ? असे काही तरी चालूच होतं.
अरे किती तिखट आहे हे , नाकातून, डोळ्यातून पाणी यायला लागलाय--- सौ, (टाऊन मधल्या लोकांना मिळमिळीत खायची सवय )
त्याच्या कडे जराही लक्ष न देता आमच रसग्रहण - पाव सुरूच होतं. शेवटी ताकाचे ग्लास समोर येउन उभे राहिले. त्याचा आस्वाद घेऊन आम्ही बाहेर पडलो.
गाडी जवळ पोचल्यावर सासूबाई आणि सौ यांची मिसळ या विषयावर चर्चा सुरूच होती, "अरे ती त्या मामाची ती हि आहे ना ती पण खूप छान मिसळ करते".
अरे … मुर्ख लोक अशी मिसळ कुठे पृथ्वी तलावावर मिळते का ?, पुण्याची , कोल्हापूरची प्रत्तेक मिसळी ची आपली वेगळी चव असते, मिसळ हि मिसळच , पण मामलेदार मिसळ म्हणजे माझं भावनिक नातं अगदी लहान पणा पासूनच …. एकदम झकास !
मुळात मामलेदार मिसळ खाण्याचे शास्त्र आहे, ते तुमच्यावर संस्कार झालेले नाहीत. -- मी म्हणालो
आमचे काही अलिखित नियम आहेत
रांग लाऊन टेबला पर्यंत पोहचणे, त्याशिवाय मजाच नाही
आधीच टेबला वर बसलेल्या लोकांबरोबर समंजस पणा दाखवून आसनस्थ होणे
टेबलावर टिशू नाहीत या बद्दल कटकट न करणे
वेटर काकांना जास्त त्रास न देता एकदाच ओर्डर देणे
समोर वाढलेल्या मिसळेवर अधाश्या सारखा तुटून पडणे,
नुसता रस्सा पाव न खाता पाचव्या पावासाठी वेगळी मिसळ मागवणे
पोटातली जागा पूर्ण पणे व्याप्त झाल्यानंतर सुद्धा अतिक्रमणाची शेवटची शक्यता संपे पर्यंत त्याचा आस्वाद घेणे
सरतेशेवटी न चुकता ताक हे घेतलंच पाहिजे
पूर्वी बशी मिळणारी मिसळ आता छोट्या लहान बाउल मध्ये मिळू लागलीये , हॉटेल मध्ये थोड्या फार प्रमाणात नुतनीकरण झालंय , फक्त पार्सल मिसळ चे वेगळे दुकान सुरु झालाय , आणि बोरीवली कांदिवली मध्ये मामलेदार मिसळीची शाखा सुरु झाल्याचं पण ऐकण्यात आहे.
मामलेदार मिसळ हि एक वेगळी पर्वणी आहे , आणि मी मामलेदार मिसळ पंढरीचा एक वारकरी आहे
वाचने
34050
प्रतिक्रिया
209
मिसळपाव
प्रतिक्रिया
कधीपासून वाट बघतोय तुमची
In reply to आता नाशकात आलो की... by मुक्त विहारि
माफ करा
In reply to मिसळ-पाव म्हणजे नाशिक. बाकी by संदीप डांगे
कुठे आणि कधी खाल्ली ते
In reply to माफ करा by मीउमेश
हे वाचा. मग नाशिकची मिसळ असं का म्हणतात ते कळेल!
In reply to माफ करा by मीउमेश
आठवणिंनी मन भरुन आलं.
In reply to मिसळ-पाव म्हणजे नाशिक. बाकी by संदीप डांगे
+++११११
In reply to मिसळ-पाव म्हणजे नाशिक. बाकी by संदीप डांगे
लढ बाप्पू
मामलेदार ची मिसळ नंबर १.
मापं हे आमचे खास मित्र असले
In reply to मामलेदार ची मिसळ नंबर १. by शान्तिप्रिय
हायला....ऐकावं ते नवलच....
In reply to मापं हे आमचे खास मित्र असले by अभ्या..
मापंदादा एक ठिकाण तर वर
In reply to हायला....ऐकावं ते नवलच.... by माम्लेदारचा पन्खा
भाक-या ज्वारीच्याच ना भाऊ?
In reply to मापंदादा एक ठिकाण तर वर by अभ्या..
नरीबाला हे काय एकलेले नाय
In reply to भाक-या ज्वारीच्याच ना भाऊ? by बोका-ए-आझम
निमंत्रितांच्या ??
In reply to मापंदादा एक ठिकाण तर वर by अभ्या..
माजघरातल्यांचा आहे का कट्टा?
In reply to निमंत्रितांच्या ?? by कपिलमुनी
हम्म. म्हणू शकतोस. सगळे
In reply to माजघरातल्यांचा आहे का कट्टा? by टवाळ कार्टा
:)
In reply to निमंत्रितांच्या ?? by कपिलमुनी
घरच्यानी पत्रिकेची अपेक्षा
In reply to :) by चांदणे संदीप
मिसळ वर तर्री ओतून घेणे हे
मिसळ-पाव म्हणजे नाशिक
हाव, आन पानीपुरी
In reply to मिसळ-पाव म्हणजे नाशिक by होबासराव
अकोल्यात पानीपुरी ले अजुन एक
In reply to हाव, आन पानीपुरी by संदीप डांगे
फुग्गेच! :))
In reply to अकोल्यात पानीपुरी ले अजुन एक by कैलासवासी सोन्याबापु
मिसळ आणी पुण्याचा उल्लेख नाही
धानोरीला जकात नाक्याजवळ
In reply to मिसळ आणी पुण्याचा उल्लेख नाही by उगा काहितरीच
पाव छान मऊ लुसलुशीत असतात.
In reply to धानोरीला जकात नाक्याजवळ by उगा काहितरीच
तसे पाव पण ट्राय केले (करावे
In reply to पाव छान मऊ लुसलुशीत असतात. by अभ्या..
पुण्यातली मिसळ
अगदी हेच लिहायचे होते.
In reply to पुण्यातली मिसळ by राजेंद्र मेहेंदळे
पुण्यातील रामनाथची मिसळ
In reply to अगदी हेच लिहायचे होते. by भक्त प्रल्हाद
गाववाले
अकोला छाप (जसे आवडते तसे)शँपल
In reply to गाववाले by होबासराव
पुण्यात फुग्गे :D
In reply to गाववाले by होबासराव
पैल्यांडाव ते वरण पायल्यावर
In reply to पुण्यात फुग्गे :D by कैलासवासी सोन्याबापु
मध्यंतरी वाडीला गेलो होतो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bruce Lee's One inch punch
जवळपास तर्री म्हणुन तेलच दिले
In reply to मध्यंतरी वाडीला गेलो होतो by मदनबाण
ठाण्यात आणखीही आहेत. गोखलेही
In reply to जवळपास तर्री म्हणुन तेलच दिले by गवि
तिथे पियुष पण भारी मिळते !!!
In reply to ठाण्यात आणखीही आहेत. गोखलेही by माझीही शॅम्पेन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bruce Lee's One inch punchतात्पुरते वायदे आझम का हो? =)
In reply to तिथे पियुष पण भारी मिळते !!! by मदनबाण
मामलेदार मिसळ मध्ये तीन प्रकारच्या मिसळ मिळतात
In reply to मध्यंतरी वाडीला गेलो होतो by मदनबाण
मी पहिल्यांदा गेलो तेव्हा असे
In reply to मामलेदार मिसळ मध्ये तीन प्रकारच्या मिसळ मिळतात by मीउमेश
ते 'आमंत्रण', तिकडेच खाल्ली
In reply to मी पहिल्यांदा गेलो तेव्हा असे by गवि
ते मामलेदार वाल्यांचंच आहे ना.
In reply to ते 'आमंत्रण', तिकडेच खाल्ली by संदीप डांगे
.
In reply to मध्यंतरी वाडीला गेलो होतो by मदनबाण
एकाटेपेक्षा तळ्याच्या जवळ
In reply to . by मोगा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Birds-of-Paradise Project Introduction
फिके पेठे हे फिके "पेढे" असे
In reply to एकाटेपेक्षा तळ्याच्या जवळ by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Birds-of-Paradise Project Introduction
मिसळ्पाववर मिसळपाववर धागा
सोलापुर रोड भिगवण
मुनमुन आणि मामलेदार नुसती हवा
मुनमुन आणि मामलेदार नुसती हवा आहे
In reply to मुनमुन आणि मामलेदार नुसती हवा by स्पा
चला मूवी तुमच्या घरीच बसू आता
In reply to मुनमुन आणि मामलेदार नुसती हवा आहे by मुक्त विहारि
चालेल....
In reply to चला मूवी तुमच्या घरीच बसू आता by स्पा
आता धागा इतर मिसळींनी हायजॅक
बेडेकर बेष्ट!
In reply to आता धागा इतर मिसळींनी हायजॅक by मृत्युन्जय
Vaishnavi chi Chan aasate
In reply to बेडेकर बेष्ट! by अनिरुद्ध.वैद्य
काटाकिर्र
In reply to आता धागा इतर मिसळींनी हायजॅक by मृत्युन्जय
पुण्यात इन्क्म टॅक्स
In reply to आता धागा इतर मिसळींनी हायजॅक by मृत्युन्जय
पुर्रेपूर मिसळ …
In reply to आता धागा इतर मिसळींनी हायजॅक by मृत्युन्जय
बर्याच शहरातल्या मिसळ
-))
In reply to बर्याच शहरातल्या मिसळ by स्पा
काहीजण गावाची लाल करण्यासाठी
In reply to बर्याच शहरातल्या मिसळ by स्पा
चल येतो का
In reply to काहीजण गावाची लाल करण्यासाठी by अभ्या..
जाऊ की. इलासरावांना आणि इतर
In reply to चल येतो का by स्पा
हिहि
In reply to जाऊ की. इलासरावांना आणि इतर by अभ्या..
ओ.. काय तो विदा तयार झाला का ?
In reply to हिहि by स्पा
हाहा
In reply to बर्याच शहरातल्या मिसळ by स्पा
स्पा बुवा
In reply to बर्याच शहरातल्या मिसळ by स्पा
+१
In reply to स्पा बुवा by सुबोध खरे
टुंडे कबाब दा जवाब नही!
In reply to +१ by कैलासवासी सोन्याबापु
धाग्यावर प्रतिसाद लिहिताना