विश्वाचे आर्त - भाग १ - काळाचा आवाका
लेखनप्रकार
(वैज्ञानिक संकल्पनांवर सरळसोप्या भाषेत भाष्य करण्यासाठी ही लेखमाला सुरू केलेली आहे)
कधीतरी एखाद्या शांत, स्वच्छ रात्री; शहराच्या प्रकाश प्रदूषणापासून दूर कुठेतरी आकाशात पाहिलं की अक्षरशः अगणित तारे दिसतात. मंदपणे लुकलुकणारे, स्थिर. आणि त्या क्षणात आत्तापर्यंत जन्माला आलेल्या जवळपास प्रत्येक मनुष्यप्राण्याशी आपण जोडले जातो. याच किंवा अशाच आकाशावर त्यांनीही आपले डोळे रोखलेले होते. कोणी तारकांच्या समूहात व्याधांची आणि हरणांची चित्रं पाहिली, कोणी त्यांचा वापर करून जहाजांमधून दर्यावर हुकुमत मिळवत नवीन प्रदेश धुंडाळले, कोणी त्या चांदण्याला कवितेत बांधलं तर कोणी त्यांची निरीक्षणं करून पंचांगं तयार केली, तर बहुतेक इतरांनी जमिनीला पाठ लावल्यावर झोपेच्या अधीन होण्याआधी डोळे भरभरून हे तारे पाहिले. प्रत्येकालाच या अथांग आकाशाने कधी ना कधी मंत्रमुग्ध केलं हे निश्चित. पूर्वी अनेकांची समजूत होती की देवाने माणसाला प्रकाश मिळावा म्हणून चंद्र-सूर्य तयार केले आणि आकाशाचं छप्पर त्यावर बांधलं. त्या छपराला पडलेल्या भोकातून त्या पलिकडचा स्वर्गीय प्रकाशच लुकलुकतो जणू. पण आता आपल्याला माहीत आहे की हे लुकलुकणारे ठिपके म्हणजे आपल्या सूर्यासारखेच तारे आहेत. काही ठिपके तर आपल्या आकाशगंगेप्रमाणे इतर दीर्घिका आहेत. त्यांमध्ये अब्जानुअब्ज तारे आहेत. किती तरी ताऱ्यांभोवती पृथ्वीसारखे ग्रह आहेत. आणि कुणास ठाऊक, त्यांतल्या अब्जावधी ग्रहांवर आपल्यासारखेच जीवही असतील.
हा महाप्रचंड पसारा पाहिल्यावर आपल्याला अनेकदा आपल्या लहानपणाची जाणीव होते. मी, माझं विश्व, माझे त्रास, माझे प्रश्न, माझे आनंद, माझी दुःखं - ही सगळी मला मोठी वाटतात. पण अब्जावधी प्रकाशवर्षांच्या महाप्रचंड विश्वात आपण म्हणजे कःपदार्थ! हा स्वतःच्या क्षुद्रतेचा विचार काहीसा धक्का देणारा असतो. पण त्याच धक्क्यामध्ये आपलं मीपण सांडवून टाकून देण्याची क्षमता आहे. वैज्ञानिक लोक कदाचित विश्व नक्की किती मोठं आहे हे गणितं करून सांगू शकत असतील. पण आपल्या डोळ्यांसाठी ते अनंतच दिसतं. या अनंतात एक क्षणभर का होईना, विलीन होणं हे सुखद असतं.
अवकाशाचा आवाका जसा महाप्रचंड आहे तसाच काळाचाही. आपण जन्मतो आणि ऐशी-शंभर वर्षं जगतो. आपल्या आजीआजोबांविषयीची माहिती आपल्याला त्यांच्या तोंडून कळते. त्याआधीचा इतिहास आपण पुस्तकांमधून वाचतो, सिनेमांमधून पाहातो. पण हजार दोन हजार वर्षं मागे जायला लागलं की इतिहासही अंधूक, धूसर व्हायला लागतो. आणि तेही समजण्यासारखं आहे. माणूस ज्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून जन्माला आला, त्या प्रक्रियेचा हा परिणाम आहे. जगण्यासाठी त्याला काल, परवा, आत्ता, या क्षणी, गेल्या मिनिटात, काय झालं एवढंच जाणून घेणं आवश्यक असतं. एखाद्या गोष्टीचे परिणाम शंभर वर्षांनी काय होतील याची पर्वा करण्याची गरज नसते, उपयोगही नसतो. तसंच शंभर वर्षांपूर्वी, हजारो वर्षांपूर्वी काय झालं ज्यामुळे आजच्या क्षणीचं सत्य समोर दिसतं आहे, हेही समजून घेण्याची गरज नसते. त्यामुळे आपली काळाची जाण ही सेकंद-मिनिट-तासावर अधिक असते. दिवस-महिना-वर्षाच्या गोष्टीही जाणून घेऊ शकतो. पण त्या जाणीवांना तितकी धार नसते. दशकं-शतकं-सहस्रकांची तर बातच सोडा. ताऱ्यांकडे पाहाताना जशी दृष्टी तोकडी पडते, तशीच अतिप्राचीन काळाकडे मागे वळून पाहातानाही आपली जाणीव थिटी पडते.
अतिप्राचीन म्हणजे नक्की किती प्राचीन? या विश्वाचाच जन्म सुमारे चौदा अब्ज वर्षांपूर्वी झाला. पृथ्वीचा जन्म सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी झाला. मनुष्याचे जवळचे जातभाई सुमारे वीस लाख वर्षांपूर्वी पृथ्वीतलावर अवतरले. आणि आपला ज्ञात इतिहास आहे काही हजार वर्षांचा. अब्ज, कोटी, लाख, हजार - नुसते कोरडे आकडे बनतात. इतक्या मोठ्या आकड्यांनाही आपल्याला सहजपणे गवसणी घालता येत नाही. एकावर तीनचार पलिकडे शून्यं पडली की 'खूप खूप' पलिकडे समजण्यासाठी आपल्याला गणितं करावी लागतात. त्यापेक्षा आपण एक डोळ्यासमोर प्रतिमा उभी करू. कल्पना करा की तुम्ही दोन्ही हात पसरून उभे आहात. तुमची पसरलेली एक वाव म्हणजे आत्तापर्यंत पृथ्वीवर गेलेला एकंदरीत काळ. तुमच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाचं टोक म्हणजे पृथ्वीचा जन्म. शून्य वर्ष. आणि उजव्या हाताच्या मधल्या बोटाचं टोक म्हणजे आत्ताचा क्षण. या कवेत तुम्ही पृथ्वीचं आख्खं आयुष्य सामावून घेत आहात. या हातावर मनुष्यप्राणी नक्की कुठे आहे? असं विचारणं म्हणजे 'या महाप्रचंड अवकाशात आपण नक्की कुठल्या कणावर आहोत?' असं विचारण्यासारखंच. आपण प्रयत्न करून पाहू.
तुमच्या डाव्या हाताच्या मनगटापर्यंत संपूर्ण अंधार आहे. त्या पहिल्या सुमारे पन्नास कोटी वर्षांआधीचं आपल्याला काहीच माहीत नाही. आपल्याला माहीत असलेले सर्व दगड त्यानंतरचे आहेत. तुमचं मनगट आणि कोपर यामध्ये कुठेतरी अगदी साधे, आदीम जीव पृथ्वीवर अवतरले. हे सर्व जीव एकपेशीय होते. आणि पुढच्या काहीशे कोटी वर्षांपर्यंत सगळी जीवसृष्टी एकपेशीयच होती. तुमच्या डाव्या खांद्याच्या आसपास कधीतरी वातावरणात ऑक्सिजनची वाढ व्हायला लागली. आणि त्याचबरोबर एकपेशीय जीवांची सद्दी संपण्याचे दिवस सुरू झाले. पण तरी हे ताबडतोब झालं नाहीच. पृथ्वीच्या आयुष्याचा विचार करताना तसंही 'ताबडतोब' काहीच होत नाही. त्यानंतर शंभरेक कोटी वर्षांनी, तुमच्या डोक्यापलिकडे, उजव्या खांद्याच्या आसपास पृथ्वीला द्विपेशीय जीवांचं दर्शन झालं. एकदा दोन पेशींचे जीव तयार झाल्यानंतर मग पुढच्या उत्क्रांतीने काहीसा 'वेग' पकडलेला दिसतो. उजव्या कोपराच्या थोडं पुढे, म्हणजे पुन्हा साधारण शंभरेक कोटी वर्षांनी आपल्याला आपल्याला काही जटिल जीवांचे पुरावे मिळतात. पण तुम्ही जोपर्यंत मनगटांपर्यंत येत नाही तोपर्यंत कुठल्याच जीवाला हाडं, कवच, दात वगैरेंप्रमाणे कठीण भाग तयार झालेले दिसत नाहीत. तसं झाल्यानंतरच अश्मीभूत झालेले जीवनाचे स्पष्ट ठसे आपल्याला सापडतात. मधल्या बोटाची पहिली दोन पेरं म्हणजे डायनोसॉरचा कालखंड. उरलेलं पेर म्हणजे त्यानंतरची साडेसहा कोटी वर्षं.
त्यानंतर माणूस कधी आला? सुमारे साठ ते सत्तर लाख वर्षांपूर्वी मानवाचा मूळ पूर्वज पृथ्वीवर वावरत होता. हा प्राणी दोन पायांवर चालण्याचा प्रयत्न करत असे. चिंपांझी किंवा गोरिलांप्रमाणे चालताना हाताची मूठ टेकवून चालत असे. त्याच सुमाराला दोन पायांवर चालणारे आणि हाताच्या मुठींचा वापर करत चालणारे चिंपांझी-गोरिलासारखे प्राणी यांच्या वंशवृक्षाच्या फांद्या वेगळ्या झाल्या. त्यानंतर द्विपादांची फांदी ऑस्ट्रॅलोपिथेकस, आणि होमो इरेक्टस, होमो सेपिअन्स अशा पायऱ्यांनी पुढे गेली. आपण पसरलेल्या काळाच्या वावेत हे अंतर किती आहे? सुमारे सत्तर लाख वर्षं म्हणजे आपल्या बोटाच्या पेराचा एक दशांश भाग. त्यानंतर आलेले होमो सेपिअन काही लाख वर्षांपूर्वीचे, साधारण पंधरा दिवस वाढलेल्या, आता कापायला झालेल्या नखाइतकं अंतर व्यापतात. आणि आपल्याला माहीत असलेला लिखित इतिहास? शेतीप्रधान संस्कृतीनंतरचा इतिहासच आपल्याला वेगवेगळ्या संस्कृती म्हणून ठाऊक आहे. या संस्कृतीत काय येत नाही! हराप्पा-मोहेंजोदारो, इजिप्तचे पिरॅमिड, बाबिलोनियन सुमेरियन संस्कृती, महाभारत-रामायणांसारखी महाकाव्यं, सिकंदर-पोरसाची लढाई, येशू-बुद्ध-पैगंबरांचे धर्म, चेंगीझ खान-हिटलरसारखे क्रूरकर्मा आणि त्यांची युद्धं सगळं काही येतं. ज्ञात-अज्ञात अशा अब्जावधी लोकांची आयुष्यं, त्यांची सुखं-दुःखं, त्यांनी जीवनाशी दिलेले लढे, त्यांचे लहानमोठे जय-पराजय... अब्जावधी आयांनी आपल्या मुलांना दिलेले जन्म आणि सोसलेल्या वेदना, जोपासलेल्या आशा, त्यांची फळलेली किंवा विझलेली स्वप्नं... एवढा महाप्रचंड आवाका या काळाच्या कवेत कुठे बसतो?
तुमच्या किंचित वाढलेल्या नखाकडे पाहा. आता ते नख भिंतीवर थोडं घासा. नखाचे काही कण निश्चितच भिंतीला चिकटले असतील. तुमच्या नखाची लांबी किंचित कमी झाली. काळाच्या कवेच्या तुलनेत मनुष्याच्या इतिहासाची आणि संस्कृतीची लांबी एवढीच आहे. आपल्या केसाच्या जाडीच्या सुमारे एक शतांश!
आपल्या आकाशगंगेत दहाहजार कोटी तारे आहेत, अशा अब्जावधी आकाशगंगा आहेत... कित्येक ताऱ्यांभोवती ग्रह फिरतात... त्या ग्रहांवरही कदाचित सृष्टी असेल, त्यांच्यातही आपल्यासारखे प्रगत जीव असतील. त्यांचेही इतिहास कदाचित असेच समृद्ध असतील. कदाचित त्यांचेही इतिहास अशाच नखाच्या टोकांवर मावणारे असतील. त्यांनाही त्या नखाच्या टोकावरच्या कणाच्याही कणात आपलं आयुष्य मर्यादित करण्याची सवय असेल. आपण आपलं आयुष्य असं कणात व्यतित करतोच. पण याचा अर्थ असा नाही की तो आपला लहानगा कप्पा सोडून इतर विश्व तपासून पाहूच नये. आपण लहान आहोत, क्षुद्र आहोत म्हणून इतक्या भव्य दिव्यतेकडे डोळे उघडून पाहूच नये असं नाही. किंबहुना या विराट विश्वाकडे पाहून त्यातल्या प्रत्येक कणाच्या वेगळेपणातून आपण थक्क व्हायला हवं. आपल्या मर्यादित कणाच्या मर्यादित अवकाशात डोळ्यांवर झापड लावून बसलो, तर या आनंदाला आपण मुकून जाऊ.
कणाकणाने का होईना, पण या विश्वरूपाचं आपण दर्शन घेण्याचा प्रयत्न करायला हवा. या काळाच्या विशाल कवेत आपला कण सामावून देऊन त्याला आपले हात पसरून मिठी मारायला हवी.
(मी मराठी लाइव्हवर पूर्वप्रकाशित)
वाचने
48975
वाचनखूण
प्रतिक्रिया
137
या लेखमालेतले पहिल्या दोनतीन
In reply to या लेखमालेतले पहिल्या दोनतीन by राजेश घासकडवी
वा!!!पुभाप्र
In reply to या लेखमालेतले पहिल्या दोनतीन by राजेश घासकडवी
मी आज हा पहिला लेख वाचला.
जड विषय हलका करून सांगितलात.
छान माहीती.
वा छानच!
अरेवा! हे पाऊल उचलल्याबद्दल
हम्म
फारच बोअर लेखमाला आहे
In reply to फारच बोअर लेखमाला आहे by विवेक ठाकूर
खटकण्याजोगा प्रतिसाद
In reply to खटकण्याजोगा प्रतिसाद by गॅरी ट्रुमन
सहमत.
In reply to सहमत. by सस्नेह
लेखाचे शीर्षक पाहा :
In reply to लेखाचे शीर्षक पाहा : by विवेक ठाकूर
घड्याळ हे कालमापनाचं यंत्र
In reply to घड्याळ हे कालमापनाचं यंत्र by राजेश घासकडवी
हे बरोबर नाही तुमचं.
In reply to घड्याळ हे कालमापनाचं यंत्र by राजेश घासकडवी
भ्रमण कालात होत नाही आवकाशात होतं
In reply to भ्रमण कालात होत नाही आवकाशात होतं by विवेक ठाकूर
बरं बुवा. तुम्ही म्हणत असाल
In reply to बरं बुवा. तुम्ही म्हणत असाल by राजेश घासकडवी
हे फॅक्च्युअल आहे, ते एकतर मान्य होईल किंवा अमान्य
In reply to हे फॅक्च्युअल आहे, ते एकतर मान्य होईल किंवा अमान्य by विवेक ठाकूर
सगळं जग व्यक्तीच्या जाणीवेत
नमस्कार.
In reply to नमस्कार. by शरभ
बिग बॅंग वर एक स्वतंत्र, पण
In reply to नमस्कार. by शरभ
बिग क्रंच होण्याची शक्यता कमी
In reply to बिग क्रंच होण्याची शक्यता कमी by शब्दबम्बाळ
:)
In reply to बिग क्रंच होण्याची शक्यता कमी by शब्दबम्बाळ
सिंगल स्लिटचा
In reply to बिग क्रंच होण्याची शक्यता कमी by शब्दबम्बाळ
ह्म्म
In reply to बिग क्रंच होण्याची शक्यता कमी by शब्दबम्बाळ
कृष्णविवरे
In reply to कृष्णविवरे by गॅरी ट्रुमन
धन्स दुव्याबद्दल.
In reply to कृष्णविवरे by गॅरी ट्रुमन
मध्यंतरी बहुतेक हॉकीन्स साहेबांनी पण असाच दावा केला होता...
In reply to मध्यंतरी बहुतेक हॉकीन्स साहेबांनी पण असाच दावा केला होता... by अर्धवटराव
ही तर 'ब्रेकिंग न्यूज'च म्हणायची
In reply to ही तर 'ब्रेकिंग न्यूज'च म्हणायची by ३_१४ विक्षिप्त अदिती
"ब्रेकींग न्युज" शक्य आहे
अत्यंत सुंदर लेखमाला अत्यंत सुयोग्य वेळी शुभारंभ
सुंदर सुरूवात ! और आने दो.
उत्कृष्ट. धन्यवाद..
In reply to उत्कृष्ट. धन्यवाद.. by गवि
+१
In reply to उत्कृष्ट. धन्यवाद.. by गवि
+१
पुढच्या लेखांची उत्सुकता
पुढ्ले भाग लौकर टाका इथे :)
अप्रतिम सुरुवात. लेखमालेसाठी
लेख
अप्रतिम!
छान लेखन!
उत्कृष्ट लेख.
या विश्वाचाच जन्म सुमारे चौदा
In reply to या विश्वाचाच जन्म सुमारे चौदा by कानडाऊ योगेशु
त्याआधी काय होते?
In reply to या विश्वाचाच जन्म सुमारे चौदा by कानडाऊ योगेशु
थोडक्यात सांगायचं झालं तर काळ
In reply to थोडक्यात सांगायचं झालं तर काळ by राजेश घासकडवी
काळ असं काही नाही
In reply to काळ असं काही नाही by विवेक ठाकूर
काळ नसेल तर पृथ्वी स्वतःभोवती
In reply to काळ नसेल तर पृथ्वी स्वतःभोवती by राजेश घासकडवी
तुमचा वेळ नका वाया घालवू!इथे
In reply to काळ नसेल तर पृथ्वी स्वतःभोवती by राजेश घासकडवी
तुमचा वेळ नका वाया घालवू!इथे
In reply to काळ नसेल तर पृथ्वी स्वतःभोवती by राजेश घासकडवी
काळ नसेल तर पृथ्वी स्वतःभोवती कशी फिरेल?
In reply to काळ नसेल तर पृथ्वी स्वतःभोवती कशी फिरेल? by विवेक ठाकूर
बाहुबलीने असा विचार केला असता
In reply to बाहुबलीने असा विचार केला असता by sagarpdy
अस्तित्त्वात प्रक्रिया आहेत, पण वेळ हा भास आहे
In reply to काळ नसेल तर पृथ्वी स्वतःभोवती कशी फिरेल? by विवेक ठाकूर
काळ आणि वेळ या भिन्न गोष्टी आहेत.
In reply to काळ नसेल तर पृथ्वी स्वतःभोवती कशी फिरेल? by विवेक ठाकूर
कारण सूर्य सदैव प्रकाशमान आहे
In reply to कारण सूर्य सदैव प्रकाशमान आहे by ३_१४ विक्षिप्त अदिती
काल हा भास आहे असा मुद्दा आहे
In reply to थोडक्यात सांगायचं झालं तर काळ by राजेश घासकडवी
साधारण प्राथमिक इयत्तेत पहीले
In reply to साधारण प्राथमिक इयत्तेत पहीले by कानडाऊ योगेशु
तर्काला विज्ञान समजणं हीच अंधश्रद्धा.
In reply to तर्काला विज्ञान समजणं हीच अंधश्रद्धा. by ३_१४ विक्षिप्त अदिती
कॉफिचे उदाहरण आवडले. पण इथेही
In reply to कॉफिचे उदाहरण आवडले. पण इथेही by कानडाऊ योगेशु
काऊ
In reply to काऊ by विवेक ठाकूर
ध्वनी निर्माण होण्यासाठी
In reply to ध्वनी निर्माण होण्यासाठी by बिपिन कार्यकर्ते
ध्वनि निर्माण होण्यासाठी
In reply to ध्वनी निर्माण होण्यासाठी by बिपिन कार्यकर्ते
हौ डेअर यू?
In reply to कॉफिचे उदाहरण आवडले. पण इथेही by कानडाऊ योगेशु
तीच कॉफी, समांतर उदाहरण.
In reply to तीच कॉफी, समांतर उदाहरण. by ३_१४ विक्षिप्त अदिती
इंट्रेस्टींग.
In reply to इंट्रेस्टींग. by अर्धवटराव
या प्रतिसादाचाच वेगळा धागा
In reply to तर्काला विज्ञान समजणं हीच अंधश्रद्धा. by ३_१४ विक्षिप्त अदिती
नाही, विश्व नव्हे, काळ. उणे
नाही, विश्व नव्हे, काळ. उणे वस्तुमान असू शकत नाही, गुरुत्वाकर्षण कायम आकर्षण या स्वरूपातच असतं, प्रतिकर्षण नसतं, तसंच काळ कायम पॉझिटिव्ह असतो, काळ = शून्य याच्या आधी काहीही असू शकत नाही.हे म्हणणे म्हणजे मला आता माहीत आहे तेच आस्तित्वात आहे/होते... इतर काहीच नाही असे म्हणण्यासारखे आणि म्हणूनच "अशास्त्रिय" दावा आहे. आजच्या घडीला बिग बँग हा "सिद्धांत" मानवाच्या भूतकाळासंबंध्दीच्या आकलनाची सीमा आहे. म्हणूनच केवळ तो कालमापनासाठी एक अर्बिट्ररी झिरो पॉईंट आहे. "बिग बँग अगोदर काहीच नव्हते" हे शास्त्रज्ञांनी म्हणणे आणि "देवाने विश्व निर्माण केले त्याअगोदर काहीच नव्हते" हे आस्तिकांनी म्हणणे एकाच पठडीतले दावे आहेत, नाही का ? :) असं बघा... १. जर "देवाने विश्व निर्माण केले" हे खरे मानले तर त्याच विधानाने विश्वाआधी देव होता हेच सिद्ध होते... म्हणजे आस्तिकांचा "त्याअगोदर काहीच नव्हते" हा दावा फोल ठरतो. शिवाय, "मग देवाआधी काय होते ?" हा प्रश्नही निर्माण होतो :) त्याच न्यायाने... २. "वस्तुमान आणि उर्जा (मॅटर अँड एनर्जी) एकमेकात रुपांतरीत होऊ शकतात पण दोन्ही एकत्रितपणे कधीच नष्ट होऊ शकत नाहीत किंवा नथिंगनेसमधून निर्माण होऊ शकत नाहीत" हा आजचा मूलभूत शास्त्राधार खरा धरला तर... "अगोदर काहीच नव्हते व त्या नथिंगनेसमधून बिग बँग नंतर सगळे वस्तुमान आणि उर्जा निर्माण झाले" हे त्याच मूलभूत शास्त्राधाराला विपरित व फोल विधान झाले, नाही का ? अजून एक महत्वाचे... शास्त्रिय सत्य हे आहे की "आपल्याला बिग बँग (झाला असलाच तर) त्यागोदर काय होते हे आज माहीत नाही". आजच्या घडीला केवळ बिग बँग पर्यंतच मानवाच्या भूतकालाच्या शास्त्रिय आकलनाची परिसीमा आहे व म्हणूनच केवळ तो सद्याचा "अर्बिट्ररी पॉईंट ऑफ रेफरन्स फॉर मेझरमेंट ऑफ टाईम आहे". पिरियड. भविष्यकालात बिग बँगच्या अगोदर काय होते हे शास्त्रियदृष्ट्या माहीत (सिद्ध) झाले, तर मग काय ? मग एकतर कालमापनाचा अर्बिट्ररी पॉईंट ऑफ रेफरन्स बिग बँगच्या मागे न्यावा लागेल किंवा "इसविसनापूर्वी २१० वर्षे" च्या धर्तीवर "बिगबँगपूर्वी सात दशलक्ष वर्षे" असे म्हणावे लागेल, नाही का ?In reply to नाही, विश्व नव्हे, काळ. उणे by डॉ सुहास म्हात्रे
- बिगबॅंगमध्ये काळाचीच
In reply to नाही, विश्व नव्हे, काळ. उणे by डॉ सुहास म्हात्रे
वस्तुमान आणि उर्जा (मॅटर अँड
In reply to वस्तुमान आणि उर्जा (मॅटर अँड by sagarpdy
माझ्या माहीती प्रमाणे बिगबँग
माझ्या माहीती प्रमाणे बिगबँग च्या सिध्दांताप्रमाणे सर्व वस्तुमान व उर्जा एका बिंदूत एकवटले होतेहा त्या थियरीचा फार महत्वाचा गाभा आहे आणि तोच विवादास्पद आहे !!! डोळे मिटून मान्य करायचे नसेल व शास्त्रिय कारणे हवी असली तर नमुन्यादाखल खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे जरूर आहेत : १. तो बिंदू होता ना ? मग बिग बँग अगोदर काहीच नव्हते हे कसे काय बरे ??? २. त्या "आकारमान नसलेल्या" बिंदूत इतके सगळे "वस्तूमान + उर्जा" कसे सामावले असेल याचे काही सर्वमान्य शास्त्रिय कारण आहे का? आजपर्यंत तरी नाही. ३. मुळात, तो बिंदू तयार कसा झाला ? ४. तो बिंदू तयार होण्याअगोदर काय होते ? आता अजून एक खास महत्वाचे... ५. जर तो बिंदू होता, तर त्याच्या स्फोटाने प्रसरण पावणारे विश्व गोलाकार (स्फेरिकल... बिंदूपासून/मध्यापासून सर्व दशदिशांना समान) प्रसरण पावायला हवे होते... विश्व तसे नाही! याचे विवरण करायला मग दोन पापुद्रे (मेंब्रेन्स) एकमेकावर आदळून त्यांच्या स्फोटाने विश्व प्रसरण पावू लागले असा सिद्धांत व इतर स्पेस-टाईमचे सिद्धांतही पुढे आला. मग त्या पापुद्र्यांचा आणि आकारमान नसलेल्या एकुलत्या एका बिंदूचा संबंध कसा जोडणार ??? महत्वाचे म्हणजे, बिंदू आणि पापुद्रे हे दोन्हीही केवळ "थियरेटिकल फिजिक्स"च्या सद्या मान्य असलेल्या आवाक्यातले व सद्याच्या गणिती समीकरणांच्या आवाक्यातले, कमी-जास्त मान्यताप्राप्त "सिद्धांत" आहेत. पिरियड. ६. अजून या लेखमालेत, "दिसणारी आणि मोजता येणारे वस्तूमान + उर्जा" यांचाच उहापोह आहे... "डार्क मॅटर" पर्यंत ती पोचलेली नाही... अत्युच्च सायन्स फिक्शनच्या तोंडात मारेल इतका रोचक, आकर्षक आणि विस्मयकारक धडा आहे तो ! :) तो धडा मानवाला "कळायला" लागला तर अनेक मान्य सिद्धांत डळमळतील, अनेक कोलमडून पडतील असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे, बुवा. इ इ इIn reply to माझ्या माहीती प्रमाणे बिगबँग by डॉ सुहास म्हात्रे
या सर्व प्रश्नांना उत्तर
In reply to माझ्या माहीती प्रमाणे बिगबँग by डॉ सुहास म्हात्रे
या सर्व प्रश्नांना उत्तर
In reply to या सर्व प्रश्नांना उत्तर by राजेश घासकडवी
लिंकसाठी अनेक धन्यवाद!
In reply to माझ्या माहीती प्रमाणे बिगबँग by डॉ सुहास म्हात्रे
कुठून सुरुवात करावी कळेना ...
In reply to कुठून सुरुवात करावी कळेना ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
अर्थातच सिंग्युलॅरिटी, एका
अर्थातच सिंग्युलॅरिटी, एका बिंदूत सामावलेली उर्जा-वस्तुमान यांची अवस्था काय होती हे भौतिकशास्त्राला आजतरी समजत नाही. त्यापुढे काय झालं याचा अभ्यास बऱ्यापैकी तपशीलात झाला आणि होत आहे.महास्फोटाच्या सिद्धांतामध्ये अजूनही भोकं आहेत.उत्तम ! हे आणि या प्रतिसादातले इतर काही मुद्देच तर बहुतेक प्रतिवादी केव्हापासून मांडत आहेत आणि लेखक त्यांचा प्रतिवाद करत होता ! पण दुसर्या एका प्रतिसादात बिग बँग व इतर दावे "अल्टीमेट" / "अॅबसॉल्युट पॉईंट" वगैरे नाहीत आणि पुढच्या संशोधनाने त्यांच्यात बदल होऊ शकतो हे मानले आहे... लेखात तसा उल्लेख असता किंवा हे अगोदर मानले असते तर मिपाची बरीच बँड्विड्थ वाचली असती. इतकेच. बाय द वे "डार्क मॅटर/एनर्जी" सुद्धा "सच्छिद्र" "थियरी"च आहे. पण त्याबद्दल इथे नको. पुढे काही संबंध आला व गरज पडली तर चर्चा होईलच. :)In reply to अर्थातच सिंग्युलॅरिटी, एका by डॉ सुहास म्हात्रे
थियरी ही एका स्वेटरसारखी असते
In reply to थियरी ही एका स्वेटरसारखी असते by राजेश घासकडवी
जास्त हेअर स्प्लिटिंग न करता
In reply to माझ्या माहीती प्रमाणे बिगबँग by डॉ सुहास म्हात्रे
सर जी...
In reply to नाही, विश्व नव्हे, काळ. उणे by डॉ सुहास म्हात्रे
भविष्यकालात बिग बँगच्या अगोदर
In reply to या विश्वाचाच जन्म सुमारे चौदा by कानडाऊ योगेशु
हम्म,
In reply to हम्म, by नीलमोहर
जे काही असायचं ते असेल, पण
In reply to हम्म, by नीलमोहर
बाब्बो.. आता ह्या विचाराने
In reply to या विश्वाचाच जन्म सुमारे चौदा by कानडाऊ योगेशु
या विषयी एकदोन थिअरि वाचल्या
विश्वाचा जन्म चौदा अब्ज
In reply to विश्वाचा जन्म चौदा अब्ज by pacificready
'काही नाही' पासून 'काहीतरी आहे' हे कसं आणि का घडलं ते सांगा.
In reply to 'काही नाही' पासून 'काहीतरी आहे' हे कसं आणि का घडलं ते सांगा. by अर्धवटराव
'काहि नाहि' असं कधिच नसतं.
'काहि नाहि' असं कधिच नसतं.+१ मुळ मुद्दा असा आहे की... आज आवाक्याबाहेर आहे ते उद्या आवाक्यात येऊ शकतं... त्यामुळे किंवा अन्यथाही, आवाक्याबाहेरच्या गोष्टींसंबंधात "काही नाही" ऐवजी "(आज) माहीत नाही" असं म्हटलं तरच ते सत्य व शास्त्रिय वचन होईल.In reply to 'काही नाही' पासून 'काहीतरी आहे' हे कसं आणि का घडलं ते सांगा. by अर्धवटराव
मला माहिती आहे ते.
गुर्जी - तुमचा लेख ललित
साध्या सोप्या उपमा, रसाळ भाषा
सोपी भाषा
जर विश्व सतत प्रसरण पावत आहे, तर..
In reply to जर विश्व सतत प्रसरण पावत आहे, तर.. by बबन ताम्बे
जायचेच कशाला पण तिथे...? इथे