(वैज्ञानिक संकल्पनांवर सरळसोप्या भाषेत भाष्य करण्यासाठी ही लेखमाला सुरू केलेली आहे)
कधीतरी एखाद्या शांत, स्वच्छ रात्री; शहराच्या प्रकाश प्रदूषणापासून दूर कुठेतरी आकाशात पाहिलं की अक्षरशः अगणित तारे दिसतात. मंदपणे लुकलुकणारे, स्थिर. आणि त्या क्षणात आत्तापर्यंत जन्माला आलेल्या जवळपास प्रत्येक मनुष्यप्राण्याशी आपण जोडले जातो. याच किंवा अशाच आकाशावर त्यांनीही आपले डोळे रोखलेले होते. कोणी तारकांच्या समूहात व्याधांची आणि हरणांची चित्रं पाहिली, कोणी त्यांचा वापर करून जहाजांमधून दर्यावर हुकुमत मिळवत नवीन प्रदेश धुंडाळले, कोणी त्या चांदण्याला कवितेत बांधलं तर कोणी त्यांची निरीक्षणं करून पंचांगं तयार केली, तर बहुतेक इतरांनी जमिनीला पाठ लावल्यावर झोपेच्या अधीन होण्याआधी डोळे भरभरून हे तारे पाहिले. प्रत्येकालाच या अथांग आकाशाने कधी ना कधी मंत्रमुग्ध केलं हे निश्चित. पूर्वी अनेकांची समजूत होती की देवाने माणसाला प्रकाश मिळावा म्हणून चंद्र-सूर्य तयार केले आणि आकाशाचं छप्पर त्यावर बांधलं. त्या छपराला पडलेल्या भोकातून त्या पलिकडचा स्वर्गीय प्रकाशच लुकलुकतो जणू. पण आता आपल्याला माहीत आहे की हे लुकलुकणारे ठिपके म्हणजे आपल्या सूर्यासारखेच तारे आहेत. काही ठिपके तर आपल्या आकाशगंगेप्रमाणे इतर दीर्घिका आहेत. त्यांमध्ये अब्जानुअब्ज तारे आहेत. किती तरी ताऱ्यांभोवती पृथ्वीसारखे ग्रह आहेत. आणि कुणास ठाऊक, त्यांतल्या अब्जावधी ग्रहांवर आपल्यासारखेच जीवही असतील.
हा महाप्रचंड पसारा पाहिल्यावर आपल्याला अनेकदा आपल्या लहानपणाची जाणीव होते. मी, माझं विश्व, माझे त्रास, माझे प्रश्न, माझे आनंद, माझी दुःखं - ही सगळी मला मोठी वाटतात. पण अब्जावधी प्रकाशवर्षांच्या महाप्रचंड विश्वात आपण म्हणजे कःपदार्थ! हा स्वतःच्या क्षुद्रतेचा विचार काहीसा धक्का देणारा असतो. पण त्याच धक्क्यामध्ये आपलं मीपण सांडवून टाकून देण्याची क्षमता आहे. वैज्ञानिक लोक कदाचित विश्व नक्की किती मोठं आहे हे गणितं करून सांगू शकत असतील. पण आपल्या डोळ्यांसाठी ते अनंतच दिसतं. या अनंतात एक क्षणभर का होईना, विलीन होणं हे सुखद असतं.
अवकाशाचा आवाका जसा महाप्रचंड आहे तसाच काळाचाही. आपण जन्मतो आणि ऐशी-शंभर वर्षं जगतो. आपल्या आजीआजोबांविषयीची माहिती आपल्याला त्यांच्या तोंडून कळते. त्याआधीचा इतिहास आपण पुस्तकांमधून वाचतो, सिनेमांमधून पाहातो. पण हजार दोन हजार वर्षं मागे जायला लागलं की इतिहासही अंधूक, धूसर व्हायला लागतो. आणि तेही समजण्यासारखं आहे. माणूस ज्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून जन्माला आला, त्या प्रक्रियेचा हा परिणाम आहे. जगण्यासाठी त्याला काल, परवा, आत्ता, या क्षणी, गेल्या मिनिटात, काय झालं एवढंच जाणून घेणं आवश्यक असतं. एखाद्या गोष्टीचे परिणाम शंभर वर्षांनी काय होतील याची पर्वा करण्याची गरज नसते, उपयोगही नसतो. तसंच शंभर वर्षांपूर्वी, हजारो वर्षांपूर्वी काय झालं ज्यामुळे आजच्या क्षणीचं सत्य समोर दिसतं आहे, हेही समजून घेण्याची गरज नसते. त्यामुळे आपली काळाची जाण ही सेकंद-मिनिट-तासावर अधिक असते. दिवस-महिना-वर्षाच्या गोष्टीही जाणून घेऊ शकतो. पण त्या जाणीवांना तितकी धार नसते. दशकं-शतकं-सहस्रकांची तर बातच सोडा. ताऱ्यांकडे पाहाताना जशी दृष्टी तोकडी पडते, तशीच अतिप्राचीन काळाकडे मागे वळून पाहातानाही आपली जाणीव थिटी पडते.
अतिप्राचीन म्हणजे नक्की किती प्राचीन? या विश्वाचाच जन्म सुमारे चौदा अब्ज वर्षांपूर्वी झाला. पृथ्वीचा जन्म सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी झाला. मनुष्याचे जवळचे जातभाई सुमारे वीस लाख वर्षांपूर्वी पृथ्वीतलावर अवतरले. आणि आपला ज्ञात इतिहास आहे काही हजार वर्षांचा. अब्ज, कोटी, लाख, हजार - नुसते कोरडे आकडे बनतात. इतक्या मोठ्या आकड्यांनाही आपल्याला सहजपणे गवसणी घालता येत नाही. एकावर तीनचार पलिकडे शून्यं पडली की 'खूप खूप' पलिकडे समजण्यासाठी आपल्याला गणितं करावी लागतात. त्यापेक्षा आपण एक डोळ्यासमोर प्रतिमा उभी करू. कल्पना करा की तुम्ही दोन्ही हात पसरून उभे आहात. तुमची पसरलेली एक वाव म्हणजे आत्तापर्यंत पृथ्वीवर गेलेला एकंदरीत काळ. तुमच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाचं टोक म्हणजे पृथ्वीचा जन्म. शून्य वर्ष. आणि उजव्या हाताच्या मधल्या बोटाचं टोक म्हणजे आत्ताचा क्षण. या कवेत तुम्ही पृथ्वीचं आख्खं आयुष्य सामावून घेत आहात. या हातावर मनुष्यप्राणी नक्की कुठे आहे? असं विचारणं म्हणजे 'या महाप्रचंड अवकाशात आपण नक्की कुठल्या कणावर आहोत?' असं विचारण्यासारखंच. आपण प्रयत्न करून पाहू.
तुमच्या डाव्या हाताच्या मनगटापर्यंत संपूर्ण अंधार आहे. त्या पहिल्या सुमारे पन्नास कोटी वर्षांआधीचं आपल्याला काहीच माहीत नाही. आपल्याला माहीत असलेले सर्व दगड त्यानंतरचे आहेत. तुमचं मनगट आणि कोपर यामध्ये कुठेतरी अगदी साधे, आदीम जीव पृथ्वीवर अवतरले. हे सर्व जीव एकपेशीय होते. आणि पुढच्या काहीशे कोटी वर्षांपर्यंत सगळी जीवसृष्टी एकपेशीयच होती. तुमच्या डाव्या खांद्याच्या आसपास कधीतरी वातावरणात ऑक्सिजनची वाढ व्हायला लागली. आणि त्याचबरोबर एकपेशीय जीवांची सद्दी संपण्याचे दिवस सुरू झाले. पण तरी हे ताबडतोब झालं नाहीच. पृथ्वीच्या आयुष्याचा विचार करताना तसंही 'ताबडतोब' काहीच होत नाही. त्यानंतर शंभरेक कोटी वर्षांनी, तुमच्या डोक्यापलिकडे, उजव्या खांद्याच्या आसपास पृथ्वीला द्विपेशीय जीवांचं दर्शन झालं. एकदा दोन पेशींचे जीव तयार झाल्यानंतर मग पुढच्या उत्क्रांतीने काहीसा 'वेग' पकडलेला दिसतो. उजव्या कोपराच्या थोडं पुढे, म्हणजे पुन्हा साधारण शंभरेक कोटी वर्षांनी आपल्याला आपल्याला काही जटिल जीवांचे पुरावे मिळतात. पण तुम्ही जोपर्यंत मनगटांपर्यंत येत नाही तोपर्यंत कुठल्याच जीवाला हाडं, कवच, दात वगैरेंप्रमाणे कठीण भाग तयार झालेले दिसत नाहीत. तसं झाल्यानंतरच अश्मीभूत झालेले जीवनाचे स्पष्ट ठसे आपल्याला सापडतात. मधल्या बोटाची पहिली दोन पेरं म्हणजे डायनोसॉरचा कालखंड. उरलेलं पेर म्हणजे त्यानंतरची साडेसहा कोटी वर्षं.
त्यानंतर माणूस कधी आला? सुमारे साठ ते सत्तर लाख वर्षांपूर्वी मानवाचा मूळ पूर्वज पृथ्वीवर वावरत होता. हा प्राणी दोन पायांवर चालण्याचा प्रयत्न करत असे. चिंपांझी किंवा गोरिलांप्रमाणे चालताना हाताची मूठ टेकवून चालत असे. त्याच सुमाराला दोन पायांवर चालणारे आणि हाताच्या मुठींचा वापर करत चालणारे चिंपांझी-गोरिलासारखे प्राणी यांच्या वंशवृक्षाच्या फांद्या वेगळ्या झाल्या. त्यानंतर द्विपादांची फांदी ऑस्ट्रॅलोपिथेकस, आणि होमो इरेक्टस, होमो सेपिअन्स अशा पायऱ्यांनी पुढे गेली. आपण पसरलेल्या काळाच्या वावेत हे अंतर किती आहे? सुमारे सत्तर लाख वर्षं म्हणजे आपल्या बोटाच्या पेराचा एक दशांश भाग. त्यानंतर आलेले होमो सेपिअन काही लाख वर्षांपूर्वीचे, साधारण पंधरा दिवस वाढलेल्या, आता कापायला झालेल्या नखाइतकं अंतर व्यापतात. आणि आपल्याला माहीत असलेला लिखित इतिहास? शेतीप्रधान संस्कृतीनंतरचा इतिहासच आपल्याला वेगवेगळ्या संस्कृती म्हणून ठाऊक आहे. या संस्कृतीत काय येत नाही! हराप्पा-मोहेंजोदारो, इजिप्तचे पिरॅमिड, बाबिलोनियन सुमेरियन संस्कृती, महाभारत-रामायणांसारखी महाकाव्यं, सिकंदर-पोरसाची लढाई, येशू-बुद्ध-पैगंबरांचे धर्म, चेंगीझ खान-हिटलरसारखे क्रूरकर्मा आणि त्यांची युद्धं सगळं काही येतं. ज्ञात-अज्ञात अशा अब्जावधी लोकांची आयुष्यं, त्यांची सुखं-दुःखं, त्यांनी जीवनाशी दिलेले लढे, त्यांचे लहानमोठे जय-पराजय... अब्जावधी आयांनी आपल्या मुलांना दिलेले जन्म आणि सोसलेल्या वेदना, जोपासलेल्या आशा, त्यांची फळलेली किंवा विझलेली स्वप्नं... एवढा महाप्रचंड आवाका या काळाच्या कवेत कुठे बसतो?
तुमच्या किंचित वाढलेल्या नखाकडे पाहा. आता ते नख भिंतीवर थोडं घासा. नखाचे काही कण निश्चितच भिंतीला चिकटले असतील. तुमच्या नखाची लांबी किंचित कमी झाली. काळाच्या कवेच्या तुलनेत मनुष्याच्या इतिहासाची आणि संस्कृतीची लांबी एवढीच आहे. आपल्या केसाच्या जाडीच्या सुमारे एक शतांश!
आपल्या आकाशगंगेत दहाहजार कोटी तारे आहेत, अशा अब्जावधी आकाशगंगा आहेत... कित्येक ताऱ्यांभोवती ग्रह फिरतात... त्या ग्रहांवरही कदाचित सृष्टी असेल, त्यांच्यातही आपल्यासारखे प्रगत जीव असतील. त्यांचेही इतिहास कदाचित असेच समृद्ध असतील. कदाचित त्यांचेही इतिहास अशाच नखाच्या टोकांवर मावणारे असतील. त्यांनाही त्या नखाच्या टोकावरच्या कणाच्याही कणात आपलं आयुष्य मर्यादित करण्याची सवय असेल. आपण आपलं आयुष्य असं कणात व्यतित करतोच. पण याचा अर्थ असा नाही की तो आपला लहानगा कप्पा सोडून इतर विश्व तपासून पाहूच नये. आपण लहान आहोत, क्षुद्र आहोत म्हणून इतक्या भव्य दिव्यतेकडे डोळे उघडून पाहूच नये असं नाही. किंबहुना या विराट विश्वाकडे पाहून त्यातल्या प्रत्येक कणाच्या वेगळेपणातून आपण थक्क व्हायला हवं. आपल्या मर्यादित कणाच्या मर्यादित अवकाशात डोळ्यांवर झापड लावून बसलो, तर या आनंदाला आपण मुकून जाऊ.
कणाकणाने का होईना, पण या विश्वरूपाचं आपण दर्शन घेण्याचा प्रयत्न करायला हवा. या काळाच्या विशाल कवेत आपला कण सामावून देऊन त्याला आपले हात पसरून मिठी मारायला हवी.
(मी मराठी लाइव्हवर पूर्वप्रकाशित)
वाचने
49035
प्रतिक्रिया
137
मिसळपाव
प्रतिक्रिया
लिंकसाठी अनेक धन्यवाद!
In reply to या सर्व प्रश्नांना उत्तर by राजेश घासकडवी
कुठून सुरुवात करावी कळेना ...
In reply to माझ्या माहीती प्रमाणे बिगबँग by डॉ सुहास म्हात्रे
अर्थातच सिंग्युलॅरिटी, एका
In reply to कुठून सुरुवात करावी कळेना ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
अर्थातच सिंग्युलॅरिटी, एका बिंदूत सामावलेली उर्जा-वस्तुमान यांची अवस्था काय होती हे भौतिकशास्त्राला आजतरी समजत नाही. त्यापुढे काय झालं याचा अभ्यास बऱ्यापैकी तपशीलात झाला आणि होत आहे.महास्फोटाच्या सिद्धांतामध्ये अजूनही भोकं आहेत.उत्तम ! हे आणि या प्रतिसादातले इतर काही मुद्देच तर बहुतेक प्रतिवादी केव्हापासून मांडत आहेत आणि लेखक त्यांचा प्रतिवाद करत होता ! पण दुसर्या एका प्रतिसादात बिग बँग व इतर दावे "अल्टीमेट" / "अॅबसॉल्युट पॉईंट" वगैरे नाहीत आणि पुढच्या संशोधनाने त्यांच्यात बदल होऊ शकतो हे मानले आहे... लेखात तसा उल्लेख असता किंवा हे अगोदर मानले असते तर मिपाची बरीच बँड्विड्थ वाचली असती. इतकेच. बाय द वे "डार्क मॅटर/एनर्जी" सुद्धा "सच्छिद्र" "थियरी"च आहे. पण त्याबद्दल इथे नको. पुढे काही संबंध आला व गरज पडली तर चर्चा होईलच. :)थियरी ही एका स्वेटरसारखी असते
In reply to अर्थातच सिंग्युलॅरिटी, एका by डॉ सुहास म्हात्रे
जास्त हेअर स्प्लिटिंग न करता
In reply to थियरी ही एका स्वेटरसारखी असते by राजेश घासकडवी
सर जी...
In reply to माझ्या माहीती प्रमाणे बिगबँग by डॉ सुहास म्हात्रे
भविष्यकालात बिग बँगच्या अगोदर
In reply to नाही, विश्व नव्हे, काळ. उणे by डॉ सुहास म्हात्रे
हम्म,
In reply to या विश्वाचाच जन्म सुमारे चौदा by कानडाऊ योगेशु
जे काही असायचं ते असेल, पण
In reply to हम्म, by नीलमोहर
बाब्बो.. आता ह्या विचाराने
In reply to हम्म, by नीलमोहर
या विषयी एकदोन थिअरि वाचल्या
In reply to या विश्वाचाच जन्म सुमारे चौदा by कानडाऊ योगेशु
विश्वाचा जन्म चौदा अब्ज
'काही नाही' पासून 'काहीतरी आहे' हे कसं आणि का घडलं ते सांगा.
In reply to विश्वाचा जन्म चौदा अब्ज by pacificready
'काहि नाहि' असं कधिच नसतं.
In reply to 'काही नाही' पासून 'काहीतरी आहे' हे कसं आणि का घडलं ते सांगा. by अर्धवटराव
'काहि नाहि' असं कधिच नसतं.+१ मुळ मुद्दा असा आहे की... आज आवाक्याबाहेर आहे ते उद्या आवाक्यात येऊ शकतं... त्यामुळे किंवा अन्यथाही, आवाक्याबाहेरच्या गोष्टींसंबंधात "काही नाही" ऐवजी "(आज) माहीत नाही" असं म्हटलं तरच ते सत्य व शास्त्रिय वचन होईल.मला माहिती आहे ते.
In reply to 'काही नाही' पासून 'काहीतरी आहे' हे कसं आणि का घडलं ते सांगा. by अर्धवटराव
गुर्जी - तुमचा लेख ललित
साध्या सोप्या उपमा, रसाळ भाषा
सोपी भाषा
जर विश्व सतत प्रसरण पावत आहे, तर..
जायचेच कशाला पण तिथे...? इथे
In reply to जर विश्व सतत प्रसरण पावत आहे, तर.. by बबन ताम्बे
ओके.
In reply to जायचेच कशाला पण तिथे...? इथे by संदीप डांगे
लेखात बाकी सगळे सिध्दांत
नेहमीप्रमाणेच सुंदर प्रतिसाद!
In reply to लेखात बाकी सगळे सिध्दांत by डॉ सुहास म्हात्रे
>>>एक मात्र नक्की, काल/वेळ ही
In reply to लेखात बाकी सगळे सिध्दांत by डॉ सुहास म्हात्रे
जे लोक 'सुरुवात कुठून झाली?'
In reply to >>>एक मात्र नक्की, काल/वेळ ही by pacificready
एवढा गोंधळ होण्यासारखं काय
In reply to लेखात बाकी सगळे सिध्दांत by डॉ सुहास म्हात्रे
Observer (निरीक्षक) नसताना
In reply to एवढा गोंधळ होण्यासारखं काय by sagarpdy
relevance नसला तरी अस्तित्व
In reply to Observer (निरीक्षक) नसताना by pacificready
'अस्तित्व' हीच तर शंका आहे
In reply to relevance नसला तरी अस्तित्व by sagarpdy
का ? जरी मानवी अस्तीत्व
In reply to 'अस्तित्व' हीच तर शंका आहे by संदीप डांगे
नाही. तो प्रश्न वेगळा.
In reply to का ? जरी मानवी अस्तीत्व by sagarpdy
कशाला विज्ञानात तत्त्वज्ञान
In reply to नाही. तो प्रश्न वेगळा. by संदीप डांगे
असं आहे काय? मी लिहिलेल्या
In reply to कशाला विज्ञानात तत्त्वज्ञान by sagarpdy
तंत्रीकतेत न जाता
In reply to असं आहे काय? मी लिहिलेल्या by संदीप डांगे
ते ठिक आहे. पण मी विज्ञानात
In reply to तंत्रीकतेत न जाता by sagarpdy
आईनस्टाईन आणि तुम्ही
In reply to ते ठिक आहे. पण मी विज्ञानात by संदीप डांगे
दुरुस्ती
In reply to आईनस्टाईन आणि तुम्ही by आरोह
रीलेटीविटी मधील "काळा"ची
In reply to ते ठिक आहे. पण मी विज्ञानात by संदीप डांगे
सहमत!
In reply to कशाला विज्ञानात तत्त्वज्ञान by sagarpdy
प्रथमतः माझ्या प्रतिसादात
In reply to सहमत! by शब्दबम्बाळ
अमिबाला किंवा त्या अगोदरच्या
In reply to लेखात बाकी सगळे सिध्दांत by डॉ सुहास म्हात्रे
राजेशजी, आपण काळानुसार
In reply to अमिबाला किंवा त्या अगोदरच्या by राजेश घासकडवी
आवर्तानानुसार काळ "मोजतो"
In reply to राजेशजी, आपण काळानुसार by संदीप डांगे
आवर्तनं सत्य आहे, काळ भ्रम
In reply to राजेशजी, आपण काळानुसार by संदीप डांगे
हेच.
In reply to आवर्तनं सत्य आहे, काळ भ्रम by राजेश घासकडवी
गैरसमज नको.
In reply to आवर्तनं सत्य आहे, काळ भ्रम by राजेश घासकडवी
मला काय म्हणायचं ते परत जरा
In reply to अमिबाला किंवा त्या अगोदरच्या by राजेश घासकडवी
मात्र मानवाच्या आधी काळाची जाणीवच नव्हती हे मी मान्य करणार नाही.ही जाणीवकोणाला
होती ??? मला काय म्हणायचं ते परत जरा वेगळ्या शब्दांत सांगतो... विश्वात असंख्य प्रकारचे बदल घडताहेत (व विश्व नष्ट (?) होणार असले तर, तोपर्यंत) घडत राहतील. माणुस सोडून दुसर्या कोणत्याही सजीव अथवा निर्जीव गोष्टींना त्या बदलांचा एकमेकाशी काय संबंध होता / आहे / असेल हे कळत नाही / कळण्याची ताकद नाही / कळण्याची निकड पडत नाही / कळण्याने फरक पडत नाही. माणसाला मात्र भूतकाळातील अवस्था, वर्तमान काळातील अवस्था आणि अगदी भविष्यात काय अवस्था असू शकेल यात (अनेक कारणांनी) रस असतो. अर्थातच मागची अवस्था पुढच्या अवस्थेत केव्हा संक्रमित झाली / होत आहे / होईल हे (अ) त्या एका संक्रमणाबाबतीत व (आ) अनेक संक्रमणांची तुलना करण्याची गरज फक्त मानवालाच आहे. त्यासाठी मानवाने वेळ ही संकल्पना व तिची एकके निर्माण केलेली आहेत. असो. पुभाप्र.माणुस सोडून दुसर्या
In reply to मला काय म्हणायचं ते परत जरा by डॉ सुहास म्हात्रे
मात्र मानवाच्या आधी काळाची
In reply to माणुस सोडून दुसर्या by राजेश घासकडवी
मात्र मानवाच्या आधी काळाची जाणीवच नव्हती हे मी मान्य करणार नाहीयात तुम्ही "एकंदर जाणिवे"बद्दल बोलत नसून तर "कालाच्या जाणिवेबद्दल" बोलत आहात असा माझा ग्रह झाला होता व त्यावर मी माझा प्रतिसाद लिहिला होता... तसे नसल्यास तुमच्या वरच्या वाक्यात बदल करावा लागेल असे वाटते. मग माझा प्रतिसादही वेगळा असेल.शिवाय...
In reply to मात्र मानवाच्या आधी काळाची by डॉ सुहास म्हात्रे
काळ-वेळेचा जाणीवपूर्वक उपयोग
In reply to शिवाय... by डॉ सुहास म्हात्रे
तुम्ही म्हणता त्या कृती
In reply to काळ-वेळेचा जाणीवपूर्वक उपयोग by एस
याविरुध्द, माणसाची काल आणि
In reply to तुम्ही म्हणता त्या कृती by डॉ सुहास म्हात्रे
काळ म्हणजे 'भूत-वर्तमान-भविष्य' अशि विभागणी नाहि
In reply to मला काय म्हणायचं ते परत जरा by डॉ सुहास म्हात्रे
बाकी सगळं जाऊ द्या आधी ही
कालव्यवस्थापन (Time
In reply to बाकी सगळं जाऊ द्या आधी ही by संदीप डांगे
धन्यवाद डॉक्टरसाहेब! पूर्वी
In reply to कालव्यवस्थापन (Time by डॉ सुहास म्हात्रे
पुढचा भाग टाका हो. छान लेख
लेखन तयार आहे म्हणून भसाभस
In reply to पुढचा भाग टाका हो. छान लेख by कवितानागेश
भसाभस लेख टाकण्यापूर्वी तुम्ही काल आहे हे गृहित धरून चाललाय!
In reply to लेखन तयार आहे म्हणून भसाभस by राजेश घासकडवी
व्याख्या ?
In reply to भसाभस लेख टाकण्यापूर्वी तुम्ही काल आहे हे गृहित धरून चाललाय! by विवेक ठाकूर
अवकाश (स्पेस) आणि काळ (टाइम) यात गल्लत होतेयं
In reply to व्याख्या ? by मराठे
ठाकूरसाब, आप एक अलग धागा
चर्चा ही चर्चाच आहे
In reply to ठाकूरसाब, आप एक अलग धागा by संदीप डांगे
एवढी चर्चा चाललीच आहे तर एक
राजेश साहेब, मनपुर्वक आभार,
अब्जावधी प्रकाशवर्षांच्या