अन्नदाता सुखी भव भाग ६ - आज काय बरे खावे - सामिष का निरामिष? का पुठ्ठा किंवा गवतच बरे ?
In reply to लेख आवडला. शाकाहारी असल्याने by मृत्युन्जय
In reply to अगदी अगदी. by गवि
एका बाजारात फॉर्मॅलिन टोचून टिकवलेल्या कोंबड्यांविषयी लिहीताना कोंकणात किंवा अन्यत्र अनेक ठिकाणी घातक रसायनांच्या वापराने लवकर पिकवलेले आंबे अस्तित्वातच नसतात. मुंबईच्या रेल्वेकडेला पिकणारी आणि गटारांच्या पाण्यात धुतली जाणारी पालेभाजी पूर्ण अनुल्लेखित राहते.झालस्तर सफरचंद चमकवण्यासाठी आणि कोरडी न पडण्यासाठी केलेलं वॅक्स कोटिंग, पिकांवरची रासायनिक फवारणी, गोदामांतल्या पोत्यांतली उंदरांची घुसखोरी आणि वीण, ज्या गोदामांमधे गेल्या आठवड्यात घातक रसायनं होती त्याच गोदामात गव्हाची पोती येऊन पडणं वगैरे व्यापारातल्या वेगवेगळ्या स्टेजला होणारे शाकाहारी अत्याचार राहिलेच.
In reply to एका बाजारात फॉर्मॅलिन टोचून by गवि
जरी वनस्पतींवर कीटकनाशकाची वगैरे फवारणी झालेली असेल, त्या घाणेरड्या पाण्यात वाढवलेल्या असल्या किंवा जरी त्यांना कीड लागलेली असली तरी स्वच्छ धुवून, व्यवस्थित चिरून खराब दिसणारा/वाटणारा भाग काढून टाकून नीट शिजवलेले वनस्पतीजन्य अन्नपदार्थ सहसा धोकादायक ठरत नाहीत. पण असेच उपाय केल्यावरही प्राणिज पदार्थांची खात्री बाळगता येणे कठीण ठरते.बाहेरुन लागलेली घाण (सांडपाणी, अस्वच्छ घटक वगैरे) स्वच्छ धुतल्याने जितकी भाज्यांची निघते तितकीच मांसाचीही निघते. वनस्पती, भाज्या यांमधे धुवून अधिक पूर्ण आतपर्यंत स्वच्छ होण्याची कोणती खास प्रॉपर्टी आहे? विषारी पदार्थ (जमिनीतून भाजीच्या रोपाने शोषलेली विद्राव्य घातक रसायने, वरुन पडलेली प्रदूषिते, फवारे, मासोळीने स्वाहा केलेला पार्याचा अंश, कोंबडीत टोचलेला फॉर्मॅलिनचा अंश इ.इ.) हे शिजवून नष्ट होणार नाहीत. हे मांस आणि भाज्या दोन्हींना लागू आहे. घातक जंतू, जीवाणू इत्यादि पुरेसे नीट शिजवल्याने नष्ट होतात. मांस पूर्ण नीट शिजवल्यानेही आणि भाजी पूर्ण नीट शिजवल्यानेही. तेव्हा निरामिष पदार्थाबाबत खात्री देता येत नाही आणि शाकाहारीमात्र गॅरंटीड स्वच्छ होतात हे विधान योग्य वाटलं नाही.
In reply to मूळ लेखातला हा परिच्छेदः by गवि
In reply to सामिष पदार्थ विषाणुंना सब्सीडाइज्ड रेट वर लीज देतात by अर्धवटराव
In reply to पदार्थ पूर्ण शिजवला की त्यात by गवि
In reply to मूळ लेखातला हा परिच्छेदः by गवि
In reply to बाहेरुन लागलेली घाण (सांडपाणी by शेखरमोघे
In reply to अगदी अगदी. by गवि
In reply to अगदी अगदी. by गवि
In reply to मांसाहारी व्यक्तींसाठी दोन तुकडेमोड आर्ग्युमेंट्स - by बोका-ए-आझम
In reply to जगातल्या जंगल:शेतजमिनी या by शेखरमोघे
जर सगळेच शाकाहारी झाले तर उलट शेती करून्/जमीन वापरून उगवलेले धान्य जास्त efficiently वापरले जाईल आणि जास्त लोकान्चे कमी जमीन वापरून पोट भरेल.हा भाग पटला नाही. शेतीतलं उत्पादन हे घटत्या दराने वाढतं. म्हणजेच ते एका मर्यादेपर्यंतच वाढू शकतं. शिवाय त्या जमिनीचा कस प्रचंड प्रमाणात उतरेल आणि त्यामुळे उत्पादन कमी होईल. शिवाय उगवलेले धान्य हे efficiently कसे वापरले जाईल? जे लोक मांसाहारी आहेत ते शाकाहारी पदार्थही खातात. उदाहरणार्थ एखादा शाकाहारी माणूस अाणि मांसाहारी माणूस हे दोघेही भात आणि चपाती/भाकरी किंवा त्यांच्या संस्कृतीत जे काही असेल ते खाणारच आहेत, जी परिस्थिती आता आहे आणि आताच अन्नधान्याचं वाटप व्यवस्थित न झाल्यामुळे किंमती वाढत आहेत (हे एक कारण आहे, एकमेव नव्हे) म्हणजे वाटप efficient नाहीये. मग जर सगळेजण शाकाहारी झाले तर ते efficient कसं होणार?
In reply to एकांगी लेखन by देश
In reply to शाकाहारातील धोकेपण अधोरेखित by शेखरमोघे
फसगत जर वनस्पतिज अन्नात झाली तर "दिसते तसे नसण्याचा धक्का" जरा मर्यादितच असेल पण जर प्राणिज अन्न असेल तर जास्त खोलात जाऊन बघावे लागेलहे विधान आपला बायस अधिक स्पष्ट करत आहे असे वाटते.
In reply to बापरे by पैसा
त्यामुळे जरी वनस्पतींवर कीटकनाशकाची वगैरे फवारणी झालेली असेल, त्या घाणेरड्या पाण्यात वाढवलेल्या असल्या किंवा जरी त्यांना कीड लागलेली असली तरी स्वच्छ धुवून, व्यवस्थित चिरून खराब दिसणारा/वाटणारा भाग काढून टाकून नीट शिजवलेले वनस्पतीजन्य अन्नपदार्थ सहसा धोकादायक ठरत नाहीत. पण असेच उपाय केल्यावरही प्राणिज पदार्थांची खात्री बाळगता येणे कठीण ठरते.बाकी मानवाला हानिकारक जंतू भक्ष्याकडून वाहकरुपातून येण्याबद्दल- डुक्कर तर विष्ठा भक्षण करते, पण त्या विष्ठेतले ई-कोलाय आदि जंतू त्याच्या स्वतःच्या मांसापर्यंत (मनुष्यांसाठी खाद्य असलेल्या) पोहोचत नाहीत. त्यातला नकोसा भाग काढून घेऊन निसर्ग त्यापासून चविष्ट हॅम, बेकन आदि तयार करतो (तोंडाला पाणी सुटलं आत्ताच...) त्याउलट घाणीत वाढलेल्या पाल्याचा दूषित भाग आणि खाद्य भाग एकच असतो. त्यामुळे शाकाहारातून जंतूसंसर्ग होण्याची शक्याता जास्त असायला हवी. मी गेल्या काही वर्षातल्या इ-कोलाय आउटब्रेकच्या अमेरिकेतल्या जितक्या घटनांबद्दल वाचलं त्यात मांसाइतकेच शाकाहारी सोर्सेसही (स्पिनॅच, सिलॅंट्रो, टोमॅटो, आईसक्रीम आदि) कारणीभूत होते. कत्तलखान्यात जनावरांच्या आतड्याचे आणि खाद्य(खाण्यायोग्य)मांसाचे काँटॅमिनेशन होऊ न देण्याची काळजी घेऊन असे जंतूसंसर्ग टाळण्याची खबरदारी घेता येते. पण ज्या कोथिंबिरीच्या रोपावर एखादा प्राणी देहधर्म करून गेला आहे, जी पालकची जुडी रेल्वे रुळांशेजारी, 'जाणार्या' लोकांच्या जवळपास वाढली आहे, ती किती आणी कशी धुतल्यावर निर्जंतुक होणार?
दोन्हीही स्वच्छ धुतल्यानन्तरसुद्धा मांसामध्ये भाजीपेक्षा जास्त जन्तू शिल्लक रहाण्याची शक्यता असते. असे होऊ नये यासाठी मांसाकरता सदैव शीतपेटीची जरूर असते (कमी तपमानात जन्तू वाढू शकत नाहीत) पण ते सगळीकडेच/नेहमीच शक्य नसते.हे खरं आहे, पण म्हणूनच मांसाहार करणारे मांसाच्या ताजेपणाबद्दल जास्त जागरूक असतात. कच्चे चिकन, अंडी वगैरे पदार्थ जरादेखिल खराब झाल्याची शक्यता वाटल्यास टाकून दिले जातात. त्याउलट भाज्या,फळे अगदी खराब होऊ लागेपर्यंत ठेवली जातात. धुळीचा थर बसलेली कोथिंबिर सहज चिरून पदार्थावर पसरली जाते... कारण भाज्या धोकादायक नसतातच! आईसक्रीम तर सदैव शीतपेटीत असतं ना? मग काही महिन्यांपूर्वी आईसक्रीम खाऊन लिस्टेरियाचा प्रादुर्भाव होऊन अमेरिकेत काही लोक मेले महाराजा!
जगातल्या वाढत्या hormones शी संबंधित आजारांचा/समस्यांचा (जसे मुली ९ -१० व्या वर्षीच वयात येणे) अशा "औषधीयुक्त" कोंबड्या आहारात असण्याशी काही संबंध आहे का???? मी तर ऐकलं होतं की मुलींच्या लवकर वयात येण्याचा संबंध गाईंच्या दुधाशी आहे म्ह्णून (गाईंना जास्त दूध देण्यासाठी दिल्या जाणार्या होर्मोन्स मुळे) rBST milk बद्दल जाणकारांना माहिती असेलच. बिचार्या कोंबड्याना कशाला मध्ये ओढता! (कोंबडी जाते जिवानिशी... आठवलं उगीच) ******* लेखमालिका चांगली आहे, लिखाणात समतोल राखल्यास उत्तम व्हावे.
In reply to माझा कुठलाही प्रचार करण्याचा by शेखरमोघे
बाकी मानवाला हानिकारक जंतू भक्ष्याकडून वाहकरुपातून येण्याबद्दल- डुक्कर तर विष्ठा भक्षण करते, पण त्या विष्ठेतले ई-कोलाय आदि जंतू त्याच्या स्वतःच्या मांसापर्यंत (मनुष्यांसाठी खाद्य असलेल्या) पोहोचत नाहीत.परंतू टेपवर्म सारखे परजीवी डुकराच्या मांसात असतात असे मांस व्यवस्थीत शिजवून न खाल्यास टेपवर्मचे इन्फेक्शन होउ शकते.
? मी तर ऐकलं होतं की मुलींच्या लवकर वयात येण्याचा संबंध गाईंच्या दुधाशी आहे म्ह्णून (गाईंना जास्त दूध देण्यासाठी दिल्या जाणार्या होर्मोन्स मुळे) rBST milk बद्दल जाणकारांना माहिती असेलच. बिचार्या कोंबड्याना कशाला मध्ये ओढतापोल्ट्रीत कोंबड्यांची झटपट वाढ होण्यासाठीही OXYTOCIN हार्मोनचा वापर केला जातो.
In reply to बाकी मानवाला हानिकारक जंतू by मार्मिक गोडसे
माझ्या एका आशियाई देशातल्या वास्तव्यात एकदा शहरातल्या मंडईवर देखरेख करणाऱ्या विभागाच्या लक्षात आले की सोललेल्या कोंबड्या विकणाऱ्या दुकानांत विकायला असलेल्या कोंबड्यांना formalin (जे मयत व्यक्तीचे शरीर दफ़नाच्या वेळेपर्यंत टिकवण्याकरता वापरले जाते) टोचून "चिरयौवना" (विकल्या जाईपर्यंत) ठेवले जात होते. त्यावर बराच आरडाओरडा झाला तरी अशा चिरयौवना कोंबड्या ओळखण्याची सहज सोपी पध्दत न मिळाल्यामुळे विकायला असलेल्या सर्व कोंबड्या जप्त करून त्यांची तपासणी केल्याखेरीज कोंबड्यांना formalin टोचल्याचे सिद्ध करणे शक्य नव्हते.महोदय, सोपी पद्धत? लै वास मारतं हो ते.. फॉर्म्यालीन टोचून टिकवलेले कोणत्याही प्रकारचे मृत शरीर आपण कधी पाहिले/हाताळले आहेत काय? किंवा फॉर्म्यालीन नामक प्रक्रणाचा वास तरी कधी घेतला आहे का? बिलीव्ह मी, फर्स्ट एम्बीबीएसचे संपूर्ण दीड वर्ष, फॉर्मॅलीन टोचून टिकवलेले अख्खे मनुष्य शरीर खिमा होईपर्यंत कापण्याचा प्रकार मी स्वतः (सर्वच डॉक्टर्स करतात तसा) केलेला आहे. डिसेक्क्षन नंतर ताबडतोब लंच अवर असे. खूप वेळा हात धुवूनही तो वास जात नाही. हळूहळू नाक मेल्यानंतर जेवण करणं जमतं, पण तोपर्यंत काय काय होतं, ती वेगळी गम्मत आहे. तेव्हा, फॉर्मॅलिन टोचून कोंबड्या टिकवणे, हा प्रकार निव्वळ भूलथापा आहे, असे नम्रपणे नमूद करतो. फॉर्मॅलीन "टोचून" बॉडी टिकवली तर ती कशी दिसेल, ते एकदा पाहिलं तर चिरयौवन वगैरे गेले तेल लावत, 'दिसायला' इजिप्शियन लोकांनी टिकवलेल्या ममीज जास्त सुंदर दिसतात, अन बाटाच्या दुकानातले चामडे जास्त नरम लागेल खायला. फॉर्मॅलीन टोचताना, ते कसे व कुठे "टोचतात" याबद्दलही थोडी माहीती घेतलीत तर बरे होईल. २.
मांसाहारी लोकांची मांसाची जरूर आणि त्याकरता लागणार्या जमिनीची गरज या गुणोत्तराचा जर जास्त विचार केला तर हे लक्षात येईल की मांसाहारी लोकांना जितके "सामिष खाद्य" लागेल, ते "बनवण्याकरता" म्हणजे गायी, बैल, शेळ्या, मेन्ढ्या, कोम्बड्या याना लागणारा आहार - जो शेवटी वेगवेगळ्या वनस्पती आहे - आणि त्या उगवण्याकरता जमीनच लागते, जन्गल नव्हे.शाकाहारी फक्त ताट भरून शाकाहारी जेवण करतात, तसे मांसाहारी फक्त (कच्चेच) मांस अंडी मासे ताट भरून (शाकाहारी जेवणाच्या प्रमाणात) खातात, अशी महोदयांची कन्सेप्ट दिसते आहे. म्हणजे चिकनच्या रस्श्यात कांदा/लसूण्/आलं/कोथिंबीर इ. काहीही घालायचं नाहीच, शिवाय सोबतीला अंड्याचीच पोळी लावून खायची बर्का लोखो. * बाकी मुद्द्यांचा प्रतिवाद वर आलेला आहेच. तेव्हा, लेखन शाखारी अजेंडाप्रणित आहे, असेच खेदाने नमूद करू इच्छितो.
In reply to १. by आनंदी गोपाळ
In reply to १. by आनंदी गोपाळ
आशियाई देशातल्या वास्तव्यात एकदा शहरातल्या मंडईवर देखरेख करणाऱ्या विभागाच्या लक्षातआशियाई देशांत मंडईवर देखरेख करणारा विभाग?? भरून आलं हो.. सदगदीत झालो. असा विभाग कोणत्या अशियाई देशात असतो? कुठल्याही मंडईत अन आजूबाजूला सडत पडलेल्या भाज्याच्या चिखलातून वाट काढण्याचा प्रकार कधी केलाय का?
In reply to कृपया वाचा: http://www by शेखरमोघे
In reply to कृपया वाचा: http://www by शेखरमोघे
"After we tested the noodles, we found that they contained formalin and the we confiscated them," Illiza said in Banda Aceh recently.हे त्या तुमच्या आंतरान्यूजवरून. फॉर्मॅलिन फ्युमिगेशन करण्यासाठी, अर्थात जंतू मारण्यासाठी वापरतात. फ्युमिगेशन केल्यानंतर त्या खोलीत, उदा. ऑपरेशन थिएटर, खाटिकखान्यामधे इ. फॉर्मॅलिन सापडणारच. यावरून कुणी ट्रिगरहॅपी पत्रकार फॉर्मॅलिन इंजेक्शनने नूडल्स टिकवतात असा जावाईशोध लावू लागला, अन तुम्ही त्यावर लेख पाडून लोकांची दिशाभूल करू लागलेत, तर कसे करावे?
प्राण्याना देण्यात येणाऱ्या खाद्यात जर प्राणिज आणि दूषित अन्न (जसे दळलेले वाळवलेले प्राण्यांचे मांस/हाडे/रक्त ज्यातून सगळे सजीव जीवाणू काढले गेलेले नाहीत) मिसळले गेले असेल तर तेमाझ्या मराठी मेडियम बायोलॉजीमधे जीवाणू = Bacteria व विषाणू = virus असे शिकविले होते. तुमच्या अगाध बुद्धीमत्तेनुसार, कोणत्याही जादूटोण्याने, जगातले कोणतेही जीवाणू विषाणूंत बदलतात असा निर्बुद्ध शोध लागत असेल, तर शिंच्या त्या बायोलॉजीला समुद्रात बुडवून टाकायला हवं. एकाद्या आजाराचं नांव विकीपेडियात शोधून बोव्हाइन स्पाँजीफॉर्म एन्केफॅलोपथी असं लिहिलं म्हणजे तुम्ही मॅडकाऊ डिसीजबद्दलचे तज्ज्ञ झालात असे नव्हे. या वर क्वोट केलेल्या वाक्यात तोडलेले शास्त्रीय ज्ञानाचे तारे पाहूनच मला माझी सर्जरीची डिग्री चोरबाजारात विकायला काढाविशी वाटायला लागली आहे.सजीव जीवाणू नंतर "विषाणू" मध्ये बदलू शकतात.असे विषाणू गायी-बैलाना "वेडे" (म्हणून mad cow हे रोगाचे नाव - ज्याला वैज्ञानिक नाव आहे Bovine Spongiform Encephalopathy) करू शकतात
In reply to प्राण्याना देण्यात येणाऱ्या by आनंदी गोपाळ
या वर क्वोट केलेल्या वाक्यात तोडलेले शास्त्रीय ज्ञानाचे तारे पाहूनच मला माझी सर्जरीची डिग्री चोरबाजारात विकायला काढाविशी वाटायला लागली आहे.=)) हा लेख वाचल्यापासुन कोंबड्या-बकर्यांना सद्गती देताना थोडं साशंक होतं मन... कुणितरी शास्त्रीय प्रतिवाद करुन हे मळभ दूर करावं असं वाटत होतं. या विकांतापुरतं तरी निवांत झालो आता :)
In reply to प्राण्याना देण्यात येणाऱ्या by आनंदी गोपाळ
In reply to " माझी सर्जरीची डिग्री by रामपुरी
In reply to हसून झालं माझं. by आनंदी गोपाळ
हरकत नाही. काढाच विकायला.याला उत्तर राहिले होते. ;) तर उत्तर : विकायला हवी तेव्हा काढू शकतो. स्वकमाईची आहे. घेण्याची ऐपत आहे का?
In reply to १. जीवाणू-विषाणु : कदाचित by शेखरमोघे
In reply to च्यायला... by अर्धवटराव
In reply to लिंकाना बळी! by साती
In reply to १. मी म्हणतो की जगातल्या काही by शेखरमोघे
In reply to १. मी म्हणतो की जगातल्या काही by शेखरमोघे
In reply to शंका by कवितानागेश
वा सुंदर लेख!!!