Skip to main content

रांगडी रात्र

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 28/09/2015 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीचे नऊ वाजत आलेत. बेडवर ती 'इनसाईड मॅडेलाइन' वाचत पडलीय. छकुलीचा पण होमवर्क झालाय, तसाही उद्या संडे होता. तिच्या रुममध्ये एव्हाना ती झोपलीही असेल. किचन ही आवरले होते. काही वेळापुर्वीच तिचे मिस्टर दुर कुठेतरी दोन दिवसांच्या अॉफिसटुरला गेले होते. तिने अगदी फोन करुन ट्रॅव्हल भेटल्याची खात्री करुन घेतली. दिवस तसा धावपळीतच गेला होता. एक अनामिक हुरहुर तिला लागुन राहीलेली. घड्याळाकडे वारंवार नजर चालली. तसही करण्यासारखं काही काम नव्हतं. रोजचा छंद म्हणुन बेडटाईम स्टोरीज वाचत पडली होती. तेवढ्यात बेल वाजली. दार उघडुन तिने त्याला लगबगीने आत घेतलं. आज त्यानं चक्क बियरचं आणलीये. गेल्यावेळीस म्हटला होता तसचं. तिनंही तशी ईच्छा दर्शविली होती. त्या चवीत आज तिलाही धुंद व्हायचं होतं. "तुझा हजबंड गेलाय ना नक्की टुरवर, नाहीतर मधुनच परतायचा" टि.व्ही अॉन करुन बेडवर बसत त्यानं विचारलं. " ट्रॅव्हल भेटलीये त्याला, आता दोन दिवस तरी नाहीये. फोन केला होता". त्यानं आणलेली बियर ग्लासमध्ये ओतत तिनं उत्तर दिलं. "आणि तुझी ती मुलगी, छकुली?" "तिलाही झोपवलयं" . कधीही आला तर त्याचे हे सुरवातिचे प्रश्न ठरलेले. मुद्दाम विचारल्यासारखे. या प्रश्नांनीच त्याला चेव फुटायचा. हल्ली तो नेहमीच यायला लागलाय. त्याचे प्रश्नही नेहमीचेच झाले होते. हा व्याभिचारही ठरवुन केल्यासारखा वाटत होता. आता यातही निरसपणा आलाय का? तिनं स्वत:लाच विचारलं. पण चेंज म्हणुन त्याने आज बियर आणली होती. "ए आज तु घेतलीच पाहीजे, थोडीशीच, बघ ट्राय करुन" कमरेत हात घालत त्यानं तिला जवळ ओढलं. तिनंही लटकं नको नको करत थोडीशी घेतलीच. थोडी थोडी करत अर्धा ग्लास संपवला. "मस्त आहे रे हे, पण चव नाही आवडली" छताकडं उत्तान बघत ती म्हणाली. ही नशा काही वेगळीच होती. राहीलेली त्यानं संपवली. "मग आज काय ट्राय करायचं?" तिला असले प्रश्न आवडाचेच नाहीत. केवळ अबोल प्रणय. तिला हवाहवासा. शब्दांवाचुन सगळं त्याला कळलं पाहीजे. त्याच्या कुशीत ती तशीच झेपावली. या रात्रीचा कैफ काही औरच होता. अंगभर रोमांच पसरलेले. उन्माद ठासुन भरलेला. आज त्याला ती वेगळीच वाटली. ज्वानीच्या आगीत बहरुन गेल्यासारखी. एखाद्या नववधुसारखी आज ती हुंकारत होती. तोही अगदी कसलेल्या कलाकारासारखा तिला सुखावत राहीला. आसुससलेली ती, ऊत्तुंग तो, उधानलेला प्रणय आणि ही व्याभिच्यारी रात्र. या रात्रीचा क्षण नी क्षण ऊपभोगला गेला. धुंद प्रीतीचं गीत गातच ही रात्र सरली. सकाळी तो ऊशीरापर्यंत बेडरुममध्येच पडुन राहिला. तिनंही लवकर ऊठुन सगळ आवरलेलं. छकुली ऊठायची वेळ झालीय, आता याला लवकर जायला सांगायला हवं. ती बेडरुममध्ये गेली. त्याला ऊठवायचा प्रयत्न केला. तोही डोळे चोळत चोळत जागा झाला. दरवाजा ऊघडाच होता. आतली चाहुल लागुन छकुली पळत पळतच बेडरुममध्ये शिरली. त्याला बघुन ती गोंधळली. दोन हात पुढे करत त्याच्या पोटावर पडली. त्याचे गालगुच्चे घेत आश्चर्यानं म्हणाली " अरे पप्पा, तु गेलाच नाही का टुरवर? मज्जा! आज आपण वॉटरपार्कला जाऊया, पिकनिक करायला" (एका विनोदावर आधारित)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 75713
प्रतिक्रिया 43

प्रतिक्रिया

In reply to by पीशिम्पी

मी एक विनोद वाचला होता अशाच कल्पनेचा काही वर्षापुर्वी. त्याचीच फुलवुन कथा केलीय. विनोदावर आधारीत असल्यानं टिप टाकली नव्हती. आता टाकतो.

In reply to by द-बाहुबली

बहुतेक क्लायमँक्स चुकला बघा तुमचा! छकुलीचं वाक्य नीट वाचा. अंदाज येईल काय होतं हे प्रकरणं :)

In reply to by अभ्या..

चंद्रबिंदी म्हणजे काय पटकन समजलंच नव्हतं. म्हटलं 'रोलप्ले'मध्ये कोठुन आली ब्वा चंद्रबिंदी??? नंतर आमची टूप पेटली. -राँर्बट प्यारे

कथा फालतू वाटली.

तुमची लेखन शैली चांगली आहे पण तुम्ही सातत्याने एकाच विषयावर लेखन करताय. काही तरी वैविध्य आणा, ते वाचायला जास्त आवडेल.

In reply to by चांदणे संदीप

पॉईंट नोटेड! मी मुद्दामच कथेत जास्त मसाला टाकला होता. कपिलमुनींसारखी एखादी प्रतिक्रिया अपेक्षित होती. यानिम्मीत्ताने येथे केवळ चमचमीतच खाल्ले जाते हा गैरसमज दुर झाला. आभार!

कमाल रंगवलाय ओ भारी शेवटच्या २-३ ओळीं पर्यंत काळात नाही कमाल रंगवलाय शुभेच्छा

छकुलीने एका अनोळखी माणसाला पप्पा म्हणुन स्विकारले ह्यात तिचे आणि त्याचे अफलातुन कौशल्य आहे ! लफडं करावं तर असं !!

In reply to by जव्हेरगंज

कळ्ळं होतं हो आम्हाला ...पण सारखंच काय नुसतं गोग्गोड लेखन वाचायचं ? जरा तरी तडका मारा राव लेखनाला नाविन्याचा ! आम्ही वाढवु का कथा पुढे बोला !

In reply to by प्रसाद गोडबोले

आवं, हा जुनाच माल हाय! कुणीतरी वर काढलाय. बाकी तडका वगैरे म्हणाल तर... हे हे हे... काय असतं त्ये? आम्ही वाढवु का कथा पुढे बोला !>>> चांगलं आणि शेपूट शेपूट!! येऊ द्या!!!

?????

एक जोडपं. त्यांची एक मुलगी. नवरा टुरला दोन दिवसासाठी म्हणून जायला निघतो. काही कारणानं टूरला न जाता परत येतो. येताना बीअर आणतो नि आपल्याच बायकोला नाटक म्हणून विचारतो की नवरा घरी नाही ना? बायको पण हुशार असल्यानं तिलाही समजून ती याला 'नाही' असं उत्तर देते. रात्रभर फुलाला फुल, दोन राजहंस वगैरे कार्यक्रम झाल्यानंतर सकाळी मुलीला जाग आल्यावर मुलगी विचारते..... " अरे पप्पा, तु गेलाच नाही का टुरवर? मज्जा! आज आपण वॉटरपार्कला जाऊया, पिकनिक करायला"

In reply to by प्यारे१

>>>>>कधीही आला तर त्याचे हे सुरवातिचे प्रश्न ठरलेले. मुद्दाम विचारल्यासारखे. या प्रश्नांनीच त्याला चेव फुटायचा. हल्ली तो नेहमीच यायला लागलाय. त्याचे प्रश्नही नेहमीचेच झाले होते. हा व्याभिचारही ठरवुन केल्यासारखा वाटत होता. आता यातही निरसपणा आलाय का? तिनं स्वत:लाच विचारलं.

In reply to by प्यारे१

कस काय सुचतं जव्हेरगंजभौंना? आणि कस काय जमतं प्यारेदादांना? (सॅन्डीसिंग : तुम्हारा कमाल तुम जानो, मुझे तो सब कमाल लगता है! ब्र्रर्र्हा!!)

पप्पांना जुळा भाऊ असावा असे वाटले.पण आता कळले.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

ख्याक!!!!! हे ही अगदी कहर बसतयं!!!!

छान आहे.
(एका विनोदावर आधारित)
विनोद नाही. अशीच कथा वाचलीय आधी. कुठे, कुणाची नाही आठवत. पण त्यात पुण्याची फॅमिली आहे आणि नवरा कामानिमीत्त मुंबईला जाणार असतो. शेवटचा ट्विस्ट तर सेम आहे.

In reply to by शलभ

पेपरमध्ये विनोद वाचला होता. कधी कुठे आठवत नाही. शेवटचा ट्विस्ट तर सेम आहे.>>>> हेच मी सांगतो शेवटचा ट्विस्ट जवळपास असाच काहीतरी होता. तेव्हढचं आठवत होतं. बाकीचं बांधकाम माझं आहे.

लैच भारी. आवडली कथा. गुड नाईट. ;) -दिलीप बिरुटे

नै जम्या. कितीही झालं तरी गोष्टीतली पात्रं स्वतःच्या मनाशी विचार करतील तर तो वास्तववादीच असायला पाहिजे. तो खरोखरच तिचा नवरा असेल तर "छकुली ऊठायची वेळ झालीय, आता याला लवकर जायला सांगायला हवं." हे वाक्य प्रचंड गैरलागू आहे. असो.